सदस्य:Swati1911972/alternative school

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतात पर्यायी शाळेची परंपरा ऐतिहासिक काळा पासून आहे. 1500 ईसवी ते 500 ईसवी दरम्यान वैदिक आणि गुरुकुल शैक्षणिक पद्धतीत विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक प्रगती वर जोर दिल्या जायचा. ह्या शैक्षणिक पद्धतीत धार्मिक ग्रंथ, तत्त्वज्ञान, मुत्साद्दिपणां, ज्योतिष विद्या, वेद शास्त्र ईत्यादि चा तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता विकसित करण्यावर भर दिला जायचा. स्थानिक अर्थव्यवस्थेच्या पतन आणि ईंग्रजांच्या वाढत्या प्रभावामुळे ही पारंपरिक शैक्षणिक पद्धत अधु झाली. ईंग्रजांनी, ईंग्रजी शैक्षणिक पद्धतीला वाव दिल्या मुळे पारंपरिक शिक्षा पद्धतीच्या मुळावर प्रहार झाला व त्याचा विकास खंडित झाला. ह्या ईंग्रजी शाळेनचा मुख्य उद्देश्य भारतीय मुळच्या लोकांना ईंग्रजी शिकवणे होत जेणे करून ते हुकुमतीची सेवा करण्या योग्य होतील. भारताला स्वातंत्र मिळाल्या वर सुद्धा ईंग्रजी शिक्षणाचा प्रभाव ओसरला नाही. आज भारतीय सरकार जास्तीत जास्त लोकांना साक्षर करण्यावर आणि शिक्षणात स्थानिक भाषेच्या प्रयोगावर जोर देत आहे. परंतु आजही भारतात ईंग्रजी शिक्षा पद्धतीचाच बोलबाला आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला, स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, ई. समाज सुधारकांचा कल पर्यायी पारंपरिक शिक्षणाकडे झुकला. ह्या पर्यायी (आल्टर्नेटिव) शाळेंच्या मार्फत त्यांनी समाजातील विषमतेचे अभीभाषण करण्याचे कार्य सुरू केले. ह्या काळात काही अश्या पर्यायी शाळेनची स्थापना करण्यात आली ज्या आजही कार्यरत आहेत - उदा. रवींद्रनाथ टागोर ह्यांच शांती निकेतन, जिद्दु कृष्णमुर्ती ह्यांची ऋषि वॅली आणि श्री अरोविन्दो ह्यांची आश्रम शाळा. १९७०च्या दशकात पर्यायी शिक्षा पद्धतीला चांगलाच वाव मिळाला. ह्याच मुख्य कारण शिक्षा पद्धती समाजाच्या प्रत्येक वर्गा पर्येन्त न पोहचणे होते. पर्यायी विचारसरणीचा उद्देश समाजातील वंचित वर्गाला सक्षम करणे होते. १९८९ मधे भारतीय सरकारने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगची स्थापना केली जेणेकरून अश्या शाळा एका छत्रा खाली आणण्यात आल्या, परंतु मुख्यतः पर्यायी शाळेंच्या क्षेत्रात सुधार व्यक्‍तिगत योगदानाचे परिणाम आहे. ही शिक्षा पद्धत मुलांवर केंद्रित असून, मुलांना त्यांच्या कलानुसर शिकण्याची सूट देते. तेव्हा, ह्या शिक्षण पद्धतीचा विकास अपरिहार्य आहे.