सरस्वती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(श्री सरस्वती माता या पानावरून पुनर्निर्देशित)
सरस्वती

ज्ञान, बुद्धीचातुर्य, स्मृति, संगीत, कला, भाषण, ज्ञान आणि शिक्षणाची देवी - इत्यादींची अधिपती देवता

मराठी देवी सरस्वती
संस्कृत सरस्वती देवी
कन्नड ಸರಸ್ವತಿ
तमिळ சரசுவதி
निवासस्थान ब्रह्मलोक
लोक ब्रह्मलोक
वाहन मोर, हंस
पती ब्रह्मा
अन्य नावे/ नामांतरे शारदा, शतरूपा, सावित्री , ब्राह्मी, वीणावादिनी, वीणापाणि, वाग्देवी, वागेश्वरी, भारती, बेंझाइतेन
मंत्र श्री सरस्वत्यै नमः
नामोल्लेख महाभारत शान्ती पर्व, देवी भागवत,ऋग्वेद
तीर्थक्षेत्रे शृंगेरी शारदा पीठम

सरस्वती (Sanskrit: सरस्वती देवी, IAST: 'Sarasvatī') ही ज्ञान, बुद्धी, वाचा, संगीत, कला, विद्या आणि शिक्षणाची हिंदू देवी आहे.[१] ही आदिशक्तीकचे सत्वगुणप्रधान रूप आहे. सरस्वती मातेला संखीयरूपिणी असेही म्हटले जाते. गणित, कालमापन व ती ब्रह्मांडा मधील सर्व वाहकतत्वांची देवता आहे । ती सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती या त्रिदेवीपैकी एक आहे. [२] सरस्वती देवी ही हिंदू, बौद्ध व जैन ह्या तीनही धर्मांमध्ये ज्ञानदेवता म्हणून उपासली जाते । बौद्ध धर्मग्रंथांमध्ये देवीचे कित्येक उल्लेख आढळून येतात।

वैदिक काल[संपादन]

ऋग्वेदात सरस्वती देवीस सर्वोत्तम मातृशक्ति, सर्वोत्तम देवी व सर्वोत्तम नदी म्हणून म्हटले गेले आहे । वैदिक काळात सरस्वती ही एक प्राचीन नदी होती. सरस्वती देवीला बुद्धी व ज्ञानसोबतच सर्व नद्या, झरे, वायु, ध्वनि व प्रवाहित जलांची अधिष्ठात्री देवी मानत असत. [३] ऋग्वेदात सरस्वती मातेस अनेक स्तोत्रे समर्पित केली गेली आहेत। विशेषतः ऋग्वेदाच्या प्रथम, द्वितीय , सहाव्या व दहाव्या मंडलात तिचे वर्णनात्मक श्लोक आढळून येतात । तिला धी, बुद्धी व वैश्विक ज्ञानस्वरूपिणी म्हटले जाते। ती बुद्धी जी ऋषि , शास्त्रज्ञ, कवि, कलाकार ह्यांना उपजत असते तीच सरस्वती स्वतः आहे । यजुर्वेदामध्ये तिचा वाक् , वाचा ह्याच्याशी थेट संबंध प्रस्थापित केला गेला आहे । वाचेची , भाषेची व भाष्याची देवी म्हणून तीस वाग्देवी असे संबोधन पडले ।

स्वरूप[संपादन]

चित्रात सरस्वती शुभ्र वस्त्रे नेसलेली आणि अनेकदा कमळावर बसलेली दाखवतात आणि मोर अथवा हंस तिच्या बाजूला असतो. हातात वीणा असते. सरस्वतीचे वाहन हंस आहे ; जैन पुराणांमधून आणि लोककथांमधून सरस्वती वाहन मोर असल्याचे सांगितले जाते. हिंदू धर्मात सरस्वती ही विद्येची व ज्ञानाची देवता मानली जाते. माघ महिन्यातल्या शुद्ध पंचमीला वसंत पंचमी वा श्रीपंचमी [४] म्हणतात. या दिवशी सरस्वतीचा जन्म झाल्याने हा दिवस सरस्वती जयंती म्हणून साजरा केला जातो.[५] गुजरात, महाराष्ट्र, बंगाल , केरळ व तामिळनाडू मध्ये अश्विन नवरात्रीचे शेवटचे तीन दिवस हे सरस्वती देवीच्या पूजन अर्चनाला समर्पित असतात. संपूर्ण दक्षिण भारत व महाराष्ट्रात विजयादशमीला सरस्वती पूजन करून विद्या आरंभ करण्यात येतो । विशेषत : तमिळ नाडू व कर्नाटकात हा समारंभ मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो ।

सरस्वतीचे वर्णन करणारे सुप्रसिद्ध श्लोक[संपादन]

सरस्वती वंदना[संपादन]

या कुन्देन्दुतुषारहारधवला

या शुभ्रवस्त्रावृता

या वीणावरदण्डमण्डितकरा

या श्वेतपद्मासना।

या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता

सा माम् पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्याऽपहा ॥[६][७]

शुक्लां ब्रह्मविचार सार परमामाद्यां जगद्व्यापिनीं,

वीणा-पुस्तक-धारिणीमभयदां जाड्यान्धकारापहाम्‌।

हस्ते स्फटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थिताम्‌,

वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम्‌॥२॥[८]


संदर्भ यादी[संपादन]

  1. ^ Tripathi, Kk (2013-01-01). Hindu Devi Devta (इंग्रजी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 978-81-7721-127-6.
  2. ^ Śarmā, Sumana (1998). पुराणों में सरस्वती व लक्स्मी: एक अध्ययन (हिंदी भाषेत). Klāsika Pablikeśansa. ISBN 978-81-87068-07-5.
  3. ^ Singh, Rahees (2010). Pracheen Bharat (हिंदी भाषेत). Pearson Education India. ISBN 978-93-5394-224-3.
  4. ^ "वसंत पंचमी". विकिपीडिया. 2019-05-07.
  5. ^ Shandilya, Rajeshwari (2009-01-01). Bharatiya Parva Evam Tyohar (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 978-81-7315-617-5.
  6. ^ "सरस्वती वंदना या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता। या वींणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपदमासना॥ या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः … | संस्कृत | Vedic mantras, Hindu mantras, Yoga mantras". Pinterest (इंग्रजी भाषेत). 2019-09-16 रोजी पाहिले.
  7. ^ Mishra, Sheo Gopal (2009-01-01). General Knowledge Encyclopedia (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 978-81-7315-410-2.
  8. ^ "आरती: माँ सरस्वती वंदना - Aarti Maa Saraswati Vandana". BhaktiBharat.com (हिंदी भाषेत). 2019-09-16 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]

सरस्वती माता की आरती इन हिंदी - Saraswati Mata Ki Aarti in Hindi Archived 2020-07-22 at the Wayback Machine.. BhaktiSansar.in.