शार्दूलविक्रीडित (वृत्त)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शार्दूलविक्रीडित हे एक अक्षरगणवृत्त आहे. ह्या वृत्ताच्या प्रत्येक चरणात १९ अक्षरे येतात. यति बाराव्या अक्षरावर येतो. ह्या वृत्ताचे गण म-स-ज-स-त-त-ग असे येतात. महाराष्ट्रातील हिंदुधर्मीयांच्या विवाहांत म्हणण्यात येणारी मंगलाष्टके ही शार्दूलविक्रीडित वृत्तात असतात.

शार्दूलविक्रिडिताचा लघुगुरू आणि मात्रांचा क्रम असा आहे :

गा गा गा ल ल गा ल गा ल ल ल गा गा गा ल गा गा ल गा
२ २ २ १ १ २ १ १ २ १ १ २ २ २ १ २ २ १

उदाहरणे[संपादन]

  • आम्ही कोण म्हणून काय पुसता आम्ही असू लाडके।

देवाचे दिधले असे जग तये आम्हांस खेळावया।
विश्वी या प्रतिभाबले विचरितो चोहीकडे लीलया।
दिक्कालातुन आरपार अमुची दृष्टी पाहाया शके।।

  • आहे वृत्त विशाल त्यास म्हणती शार्दूलविक्रीडित ।

मा सा जासत ता ग येति गण हे पादास की जोडित।।

  • मासाजा सतताग येति गण ते शार्दूलविक्रीडिती।
  • मानावा समरा जनास समरा ताराप ताराप गा।
  • म्हातारी उडता न येचि तिजला माता मदीया अशी।

कांता काय वदो नवप्रसव ते साता दिसांची तशी॥

हेसुद्धा पाहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]