हेलिपॅड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हेलिकॉप्टर उतरण्यासाठी बांधण्यात आलेला तळाला हेलिपॅड म्हणतात.

प्रकार[संपादन]

यात दोन प्रकार आहेत.

  • कायमस्वरूपी हेलिपॅड
  • तात्पुरते हेलिपॅड
हेलिपॅड

कायमस्वरूपी हेलिपॅड[संपादन]

हेलिपॅड म्हणजे सिमेंटच्या सपाट जमिनीचा एक छोटा तुकडा आणि तिच्यावर रंगवलेले मोठे वर्तुळ अथवा इंग्रजी अक्षर 'एच'. हे बहुधा विमानतळाच्या परिसरातच असते. तेथे हेलिकॉप्टरला जळण(एव्हिएशन पेट्रोल), प्रवाशांसाठी आवश्यक सोयी, हेलिकॉप्टरला उभे राहण्यास जागा व एर ट्रॅफिक कंट्रोलसारख्या सोयी मिळतात. मात्र हेलिपॅड हे विमानतळाच्या मुख्य धावपट्टीला जोडलेले पण धावपट्टीपासून थोडेसे दूर असते.

तात्पुरते हेलिपॅड[संपादन]

हे एखाद्या आवश्यक पण तात्पुरत्या कामासाठी बांधण्यात येते. पूरस्थितीत मदत, खाद्य सामग्री पोचविणे, अतिविशिष्ट महत्त्वाच्या व्यक्ती यांची एखाद्या ठिकाणास भेट इत्यादी. अशा स्थितीत हेलिकॉप्टरच्या पायलटला तेथे पोचणे सोपे व्हावे म्हणून त्या ठिकाणचे अक्षांश व रेखांश कळविण्यात येतात.

भारतात सियाचेन येथे 'जगातले सर्वात उंच ठिकाणचे हेलिपॅड' आहे. त्याचा वापर लष्करी कामासाठी करण्यात येतो.