सेंटिनेली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सेंटिनेली, सेंटिनेलीज किंवा उत्तर सेंटिनेल आयलंडर्स हे भारतातील बंगालच्या उपसागरातील उत्तर सेंटीनेल बेटावर राहणारे लोक आहेत. उत्तर सेंटीनेल बेटे अंदमान बेटांचे भाग असल्याने सेंटिनेलीज अंदमान लोकांची जमात मानली जाते. त्यांना अनुसूचित जमाती म्हणून घोषित केले गेले आहे. सेंटिनेलीज लोक हजारो वर्षांपासून बाहेरील जगापासून अलिप्त राहिले आहेत. त्यांची लोकसंख्या अजून निश्चित करण्यात आलेली नाही. ती 50 ते 200 व्यक्ती इतकी असल्याचा अंदाज नोंदविला गेला आहे.[१]

सेंटिनेल बेट


सेंटिनेलीज लोकांनी बाहेरील जगाशी संवाद साधण्यास सतत नकार दिला आहे असे दिसते. त्यामुळे कोणी त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केल्यास संघर्ष उद्भवतो. त्यांच्या बेटावर जाणाऱ्या लोकांना त्यांनी ठार केले आहे. हजारो वर्ष अलिप्त राहिल्याने त्यांच्यामध्ये इन्फ्लूएंझा आणि गोवरसारख्या सामान्य विषाणूंविरुद्ध प्रतिकारशक्ती कमी असण्याची शक्यता आहे. रहिवाशांच्या संरक्षणासाठी आणि बाहेरील लोकांच्या सुरक्षिततेसाठी या बेटाच्या ३ मैल (४.८ किमी) किंवा कमी अंतरावरून प्रवास करणे भारतीय कायद्याच्या विरुद्ध आहे.[२]


१७ नोव्हेंबर २०१८ मध्ये अमेरिकन मिशनरी जॉन ॲलेन चाऊ बेकायदेशीररीत्या सेंटिनेलीज बेटावर गेला आणि सेंटिनेलीज लोकांनी त्याला ठार मारले.[३]


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "प्रवाह : आदिवासींच्या भूमीत". लोकसत्ता. १ सप्टेंबर २०१६. १ डिसेंबर २०१८ रोजी पाहिले.
  2. ^ "A Human Zoo on the World's Most Dangerous Island? The Shocking Future of North Sentinel". forbes.com. १ डिसेंबर २०१८ रोजी पाहिले.
  3. ^ "अंदमान : प्रतिबंधित बेटावर गेलेल्या अमेरिकन नागरिकाची 'बाण मारून' हत्या". बीबीसी मराठी. २२ नोव्हेंबर २०१८. १ डिसेंबर २०१८ रोजी पाहिले.