वासुदेव गायतोंडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वासुदेव गायतोंडे

जन्म १९२४
मृत्यू ऑगस्ट १०, २००१
नवी दिल्ली, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र चित्रकला
प्रशिक्षण जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई
चळवळ प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रुप
पुरस्कार पद्मश्री पुरस्कार (१९७१)

वासुदेव गायतोंडे (१९२४ - ऑगस्ट १०, २००१) हे भारतातील सर्वाधिक नावाजलेले अमूर्ततावादी चित्रकार होते. अमूर्त घटनांना दृश्यरूप देण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता.

गायतोंडे यांचा जन्म गोव्यातील एका खेड्यात झाला. बालपणातील काही वर्षे गोव्यात घालविल्यानंतर त्यांचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. मुंबईतीलच जे.जे. स्कूल ऑफ आर्ट या महाविद्यालयातून त्यांनी चित्रकलेचे शिक्षण घेतले. इ.स. १९६४ साली मिळालेल्या रॉकफेलर शिष्यवृत्तीद्वारे गायतोंडे न्यू यॉर्कला गेले.[१] तिथे त्यांनी अमेरिकेतील विविध चित्रशैलींचा अभ्यास केला. त्यानंतर ते जपानला गेले. जपानमध्ये त्यांच्यावर झेन तत्त्वज्ञानाचा प्रभाव पडला. इ.स. १९७२ साली ते भारतात परतले व शेवटपर्यंत त्यांनी दिल्लीत वास्तव्य केले.

सन्मान[संपादन]

  • मुंबई शहरातील डी विभागात गिरगाव येथे आर.आर. रोड व टाटा रोड नंबर २ जेथे एकत्र येतात त्या चौकास चित्रकार वासुदेव गायतोंडे यांचे नाव दिले आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "कलासंघ व चित्रकार : महाराष्ट्रातील प्रमुख कलासंघ". Archived from the original on 2013-04-01. २० मे २०१४ रोजी पाहिले.