वसंत सरवटे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वसंत शंकर सरवटे (जन्म : कोल्हापूर, ३ फेब्रुवारी १९२७; - २३ डिसेंबर २०१६) हे ख्यातनाम महाराष्ट्रीय व्यंगचित्रकार तसेच लेखक होते. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्यांनी पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातून स्थापत्य-अभियंता (सिव्हिल इंजिनियर) ह्या विषयाची पदवी घेतली होती. ते एसीसी कंपनीत अभिकल्पक अभियंता (डिझाईन इंजिनियर) होते. १९५७ साली ते निवृत्त झाले.[१]

व्यंगचित्रकार[संपादन]

व्यंगचित्रकार म्हणून सरवटे ह्यांची विशेष ख्याती होती. त्यांनी व्यंगचित्रांचे विविध प्रकार हाताळले. त्यांच्या विविध चित्रमालिका गाजल्या. ललित ह्या मासिकासाठी त्यांनी केलेली मुखपृष्ठे लक्षणीय ठरली. पु. ल. देशपांडे, रमेश मंत्री, विंदा करंदीकर, विजय तेंडुलकर ह्यांच्यासारख्ये वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या लेखकांच्या पुस्तकांची मुखपृष्ठे तसेच मजकुराला पूरक अशी चित्रे सरवटे ह्यांनी काढली आहेत. पु. ल. देशपांडे ह्यांच्या "मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास" ह्या पुस्तकातील त्यांची व्यंगचित्रे ही मूळ आशयाला अधिक ठाशीव करणारी होती. अर्कचित्र (कॅरिकॅचर) हा चित्रप्रकार त्यांनी मराठीत रूढ केला. त्यासाठी कॅरिकॅचर ह्या इंग्लिश संज्ञेऐवजी अर्कचित्र ही संज्ञाही त्यांनीच घडवली.[१]

लेखन[संपादन]

  • खडा मारायचा झाला तर....!
  • खेळ चालू राहिला पाहिजे
  • खेळ रेषावतारी
  • टाकसाळी कथा : निवडक मुकुंद टाकसाळे
  • परकी चलन
  • व्यंगकला-चित्रकला
  • संवाद रेषालेखकाशी
  • सहप्रवासी
  • सावधान पुढे वळण आहे


वसंत सरवटे यांच्यावरील पुस्तके[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b घारे, दीपक; सरवटे, वसंत शंकर; समाविष्ट : विवेक आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण - शिल्पकार चरित्रकोश; खंड ०६; दृश्यकला; संपा. बहुळकर, सुहास आणि घारे, दीपक; साप्ताहिक विवेक (हिंदुस्थान प्रकाशनसंस्था); २०१३; मुंबई (पृ. ७१९-७२३)