लिओनार्दो दा विंची

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


लिओनार्दो दा विंची

लाल खडूने काढलेले आत्मव्यक्तिचित्र (१५१२ - १५१५). हे चित्र त्याने काढलेले अस्सल आत्मव्यक्तिचित्र असल्याचे 'मानले' जाते.
पूर्ण नावलिओनार्दो दी सेर पिएरो दा विंची
जन्म एप्रिल १५ १४५२
आंकियानो, फ्लॉरेन्स, इटली
मृत्यू मे २, १५१९
आंब्वास, इंद्र-ए-ल्वार, फ्रान्स
राष्ट्रीयत्व इटालियन
कार्यक्षेत्र चित्रकला, अभियांत्रिकी, स्थापत्यशास्त्र, खगोलशास्त्र, पुराजीवशास्त्र, शरीरशास्त्र, भूमिती, गणित, भौतिकशास्त्र, यामिकी
प्रशिक्षण आंद्रेआ देल वेर्रोच्चिओकडे उमेदवारी
चळवळ प्रबोधनकाळ

लिओनार्दो हा १५ व्या शतकात रेनेसान्स (प्रबोधन )काळात झालेला एक महान चित्रकार व संशोधक होता. कलेच्या इतिहासात त्याने संशोधक वृत्तीने दिलेल्या अमूल्य योगदानामुळे त्याचे नाव नेहमीच अग्रस्थानी राहिले आहे. लिओनार्दोने अनेक क्षेत्रांत योगदान दिले असले, तरी इतिहासात त्याचे नाव चित्रकार म्हणून ठळकपणे दिसते. मोनालिसा, द लास्ट सपर, मॅडोना ऑफ द रॉक्स ही त्याची काही जगप्रसिद्ध चित्रे आहेत. चित्रांवरून त्याचे तत्कालीन चर्च या धर्मसंस्थेसोबत असलेले मतभेद, उलट अक्षरे काढून लिहिण्याची सवय, नव्याने सापडलेल्या त्याच्या नोंदवह्यांतील आश्चर्यकारक माहिती व कित्येक विचारवंतांनी त्याचा अभ्यास करून मांडलेली मते, यांवरून लिओनार्दो विसाव्या शतकापासून काहीसा गूढतेच्या वातावरणात आला आहे. त्यातच त्याच्या विविध चित्रांचा अभ्यास वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून सुरू झाला. तत्कालीन सामाजिक, राजकीय व धार्मिक परिस्थितीचा अभ्यास केलेले विचारवंत त्याच्या चित्रांवरून वेगवेगळ्या संदेशांच्या कल्पना करतात. डॅन ब्राऊन या लेखकाने नुकतीच 'दा व्हिंची कोड' या काल्पनिक कादंबरीत लिओनार्दोची वेगळीच गूढ भूमिका मांडली.

बालपण[संपादन]

लिओनार्दो त्याच्या आईवडिलांचे अनौरस अपत्य होता. जन्मानंतर त्याचा सांभाळ ५ वर्षे आईनेच केला. त्यानंतर मात्र त्याच्या वडिलांनी त्याचा सांभाळ करायची तयारी दर्शविली व याचवेळी त्याच्या आईचेही लग्न ठरले. अशात लिओनार्दो त्याच्या वडिलांकडे फ्लॉरेन्सला आला. त्याचे वडील सधन होते. लिओनार्दोच्या शिक्षणाकडे , देखभालीकडे त्यांनी योग्य लक्ष पुरवले. त्याची कलेतील आवड लक्षात घेऊन त्याला व्हेरोशिओ या प्रसिद्ध् चित्रकाराकडे शिक्षणासाठी पाठवले. चित्रकला, शिल्पकला अशा शास्त्रांचा अभ्यास त्याने व्हेरोशिओकडे केला. याचवेळी त्याने स्वतःहून इतर शाखांचाही अभ्यास चालू ठेवला.

लिओनार्दो दा व्हि्न्ची हे प्रबोधनयुगातील अष्टपैलू व्यक्तीमत्त्व मानले जाते. तो अनेक शास्त्रे व कलांमध्ये पारंगत होता. शिल्पकला,स्थापत्यकला, गणित, अभियांत्रिकी, संगीत, खगोलशास्त्र यांसारख्या विविध विषयांवर त्याचे प्रभुत्व असले तरी तो चित्रकार म्हणून जगप्रसिद्ध ठरला. आपली चित्रे वास्तववादी बनावित यासाठी त्यांनी शरीर शास्त्राचा अभ्यास केला . मानवी चेहरे व शरीर कृतींवर त्याने मनापासून प्रेम केले. त्यांच्या मोनालिसा व द लास्ट सफर या चित्राकृती अजरामर ठरल्या लिओनार्डोची सर्वोत्कृष्ठ समजली जाणारी ,प्रचंड गाजलेली जगप्रसिद्ध कलाकृती म्हणजे 'मोनालिसा'च चित्र.मोनालिसाच्या चेहऱ्यावरचे स्मित आजही भल्याभल्यांना कोड्यात टाकत.फ्रान्सेस्को दि बतोर्लमिओ डेल गीओकोन्डो नावाच्या एका व्यापाराच्या मोनालिसा उर्फ मैडोना लिसा नावाच्या चोवीस वर्ष्याच्या वर्ष्याच्या बायकोच हे चित्र होत. लिओनार्डो ने काढलेल्या 'म्याडोना ओन दि रॉकस' , 'लास्ट सपर' आणि 'मोनालिसा' यांसारख्या मोच्क्या चित्रांनी त्याचं नाव जगात अजरामर झाल.

मिलानला प्रयाण[संपादन]

मॅडोना ऑफ द रॉक्स[संपादन]

चर्चच्या दबावामुळे लिओनार्दोला अखेर मॅडोना ऑफ द रॉक्सचे दुसरे चित्रही रंगवावे लागले. पहिले चित्र सध्या फ्रान्सच्या पॅरिस येथील लूव्र संग्रहालय येथे आहे तर दुसरे लंडन येथील म्युझियममध्ये आहे. पहिल्या चित्राला सध्या मॅडोना ऑफ द रॉक्स (लुव्र व्हर्जन) व दुसऱ्या चित्राला मॅडोना ऑफ द रॉक्स (लंडन व्हर्जन ) म्हणून ओळखतात.

द लास्ट सपर

मोनालिसा[संपादन]

लिओनार्डोची सर्वोत्कृष्ठ समजली जाणारी ,प्रचंड गाजलेली जगप्रसिद्ध कलाकृती म्हणजे 'मोनालिसा'च चित्र.मोनालिसाच्या चेहऱ्यावरचे स्मित आजही भल्याभल्यांना कोड्यात टाकत.फ्रान्सेस्को दि बतोर्लमिओ डेल गीओकोन्डो नावाच्या एका व्यापाराच्या मोनालिसा उर्फ मैडोना लिसा नावाच्या चोवीस वर्ष्याच्या बायकोच हे चित्र होत. लिओनार्डो ने काढलेल्या 'म्याडोना ओन दि रॉकस' , 'लास्ट सपर' आणि 'मोनालिसा' यांसारख्या मोच्क्या चित्रांनी त्याचं नाव जगात अजरामर झाल.

लिओनार्दो दा विंची आणि मोनालिसासंबंधी मराठी पुस्तके[संपादन]

  • रूपबंध (एस.डी. इनामदार)
  • लिओनार्दो (डाॅ. संजय कप्तान)
  • लिओनार्दो - बहुरूपी प्रतिभावंत (दीपक घारे)