रोख पत खाते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रोख पत खाते हे बँकेतील व्यावसायिक प्रकारचे एक खाते आहे. रोख पत खाते हे एकप्रकारचे कर्ज खाते असते. ज्या व्यावसायिकाला रोजच्या कामासाठी अचानक पैशाची गरज लागू शकते असा व्यावसयिक बँकेकडे रोख पत खाते उघडण्यासाठी अर्ज करू शकतो. या अर्जाची तपासणी करून बँक ग्राहकालाखात्यातून ठराविक रक्कम काढण्याची मर्यादा ठरवून देते. रोख पत खाते असणारा ग्राहक खात्यामध्ये शिल्लक नसली तरी आपल्या खात्यावर दिलेल्या मर्यादेपर्यंत रक्कम नावे करून काढू शकतो.

रोख पत खात्याची वैशिष्ट्ये[संपादन]

१) रोख पत खाते व्यवसायामध्ये लागणाऱ्या तरल भांडवलाच्या पूर्तीसाठी दिले जाते

२) रोख पत खातेधारकास दिलेल्या मर्यादेपर्यंतच रक्कम काढता येते.

३) रोख पत खात्यामध्ये जमा असणाऱ्या रकमेवर व्याज दिले जात नाही.

४) रोख पत मर्यादा ठराविक रक्कम आणि कालावधीसाठी असते

५) व्यवसायातील माल , देणेकरी अथवा अचल मालमत्ता तारण ठेवून रोख पत खाते उघडता येते.

६) रोख पत खात्यामध्ये धनादेश देता येतात.

७) रोख पत खात्यामध्ये ग्राहकाकडे पैसे असतील तर जमा करून ठेवता येतात. शिल्लक रकमेपेक्षा जास्ती पैसे हवे असले तर खात्याची शिल्लक नावे पण करता येते.

८) दिलेल्या कर्जाऊ रकमेचा दुरुपयोग होऊ नये म्हणून खात्याला ए टी एम कार्ड दिले जात नाही.

९) तारण ठेवलेल्या मालमत्तेच्या किमतीपेक्षा खात्यातील नावे रक्कम जास्त असेल तर ग्राहकास ज्यादा व्याज आकारून दंड केला जातो. ग्राहकाने आर्थिक शिस्त पाळावी असा यामागील उद्देश आहे.