रियो दे ला प्लाता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रियो दे ला प्लाता
रियो दे ला प्लाताच्या दक्षिण काठावर वसलेले बुएनोस आइरेस
रियो दे ला प्लाताच्या मार्गाचा नकाशा
उगम उरुग्वेपाराना नद्यांचा संगम
मुख अटलांटिक महासागर
पाणलोट क्षेत्रामधील देश आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना, उरुग्वे ध्वज उरुग्वे
लांबी २९० किमी (१८० मैल)
सरासरी प्रवाह २२,००० घन मी/से (७,८०,००० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ३१७००००
उपनद्या उरुग्वे नदी, पाराना नदी

रियो देला प्लाता (स्पॅनिश: Río de la Plata) ही दक्षिण अमेरिका खंडामधील एक प्रमुख नदी आहे. ही नदी आर्जेन्टिनाउरुग्वे देशांच्या सीमेवर उरुग्वे नदी आणि पाराना नदीच्या संगमापासून सुरू होते व २९० किमी वाहत जाऊन दक्षिण अटलांटिक महासागरास मिळते. संगमाजवळ केवळ २ किमी रूंद पात्र असलेल्या ह्या नदीचा विस्तार मुखाजवळ प्रचंड असून तिची रुंदी तब्बल २२० किमी इतकी आहे. काही भूगोलतज्ञांच्या मते रियो देला प्लाता नदी नसून उपसागर किंवा आखात आहे.

ला प्लाता, बुएनोस आइरेस, मोन्तेविदेओ ही प्रमुख शहरे रियो देला प्लाताच्या काठांवर वसली आहेत. दुसऱ्या महायुद्धातील प्लेट नदीची लढाई ही पहिली सागरी लढाई येथेच घडली होती.