युटा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युटा
Utah
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वज राज्याचे राज्यचिन्ह
ध्वज चिन्ह
टोपणनाव: सिल्व्हर स्टेट (Beehive State)
ब्रीदवाक्य: Industry
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषा इंग्लिश
राजधानी सॉल्ट लेक सिटी
मोठे शहर सॉल्ट लेक सिटी
क्षेत्रफळ  अमेरिकेत १३वा क्रमांक
 - एकूण २,१९,८८७ किमी² 
  - रुंदी ४३५ किमी 
  - लांबी ५६५ किमी 
 - % पाणी ३.२५
लोकसंख्या  अमेरिकेत ३४वा क्रमांक
 - एकूण २७,६३,८८५ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता १०.५/किमी² (अमेरिकेत ४१वा क्रमांक)
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश ४ जानेवारी १८९५ (४५वा क्रमांक)
संक्षेप   US-UT
संकेतस्थळ www.utah.gov

युटा (इंग्लिश: Utah, En-us-Utah.ogg उच्चार ) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या पश्चिम भागात वसलेले युटा क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील १३वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ३४व्या क्रमांकाचे राज्य आहे.

युटाच्या पश्चिमेला नेव्हाडा, पूर्वेला कॉलोराडो, दक्षिणेला अ‍ॅरिझोना, उत्तरेला आयडाहो, ईशान्येला वायोमिंग तर आग्नेयेला न्यू मेक्सिको ही राज्ये आहेत. सॉल्ट लेक सिटी ही युटाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. युटामधील ८० टक्के रहिवासी ऑग्डेन-सॉल्ट लेक सिटी-प्रोव्हो ह्या शहरी पट्ट्यामध्ये राहतात. त्यामुळे ही महानगरे वगळता युटामधील इतर भागांमध्ये अत्यंत तुरळक वस्ती आहे.

युटामधील ६० टक्के नागरिक येशू ख्रिस्ताच्या आधुनिक भक्तांच्या चर्चचे अनुयायी आहेत. ह्या समुदायाला मॉर्मन (Mormon) ह्या नावाने देखील ओळखले जाते.

खुल्या हवेतील मनोरंजन क्रीडांसाठी युटा राज्य प्रसिद्ध आहे. स्कीइंग हा येथील एक लोकप्रिय खेळ आहे. खाणकाम, मीठ उत्पादन, शेती हे येथील प्रमुख उद्योग आहेत.


मोठी शहरे[संपादन]


गॅलरी[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: