मार्याम मिर्झाखानी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मार्याम मिर्झाखानी

जन्म ३ मे १९७७ (1977-05-03)
तेहरान, इराण
मृत्यू १४ जुलै, २०१७ (वय ४०)
निवासस्थान पालो अल्टो, कॅलिफोर्निया, अमेरिका
नागरिकत्व इराण, अमेरिका
कार्यक्षेत्र गणित
कार्यसंस्था प्रिंस्टन विद्यापीठ
स्टॅनफर्ड विद्यापीठ
प्रशिक्षण शरीफ युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी (बी.एस.)
हार्वर्ड विद्यापीठ (पी.एच.डी.)
डॉक्टरेटचे मार्गदर्शक कर्टिस मॅक्‌मुलेन
पुरस्कार ब्लूमेंथल अवॉर्ड
क्ले रिसर्च अवॉर्ड
फील्ड्स् मेडल (२०१४)
पती जॅन वोन्ड्राक
अपत्ये

मार्याम मिर्झाखानी (इंग्रजी: Maryam Mirzakhani, फारसी: مریم میرزاخانی‎‎‎; ३ मे १९७७ – १४ जुलै २०१७) इराणी - अमेरिकन गणितज्ञ आणि स्टॅनफर्ड विद्यापीठातील प्राध्यापिका होत्या.

१३ ऑगस्ट २०१४ रोजी, मिर्झाखानी फील्ड्स मेडल या गणितातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्काराच्या मानकरी ठरल्या.[१] त्या हा पुरस्कार मिळवणाऱ्या पहिली महिला आणि पहिली इराणियन व्यक्ती होत्या.

मिर्झाखानी यांचे १४ जुलै २०१७ रोजी ४० व्या वर्षी स्तनाच्या कर्करोगाने निधन झाले.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "IMU Prizes 2014". Archived from the original on 2018-12-26. 12 August 2014 रोजी पाहिले.