मजरूह सुलतानपुरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मजरूह सुलतानपुरी


जन्म १ ऑक्टोबर १९१९
आझमगढ जिल्हा, उत्तर प्रदेश
मृत्यू २४ मे, २००० (वय ८०)
अन्य नाव/नावे मुंबई)
कार्यक्षेत्र साहित्य (कविता, गीते)
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा उर्दू, हिंदी

मजरूह सुलतानपुरी (१ ऑक्टोबर १९१९ , आझमगढ जिल्हा, उत्तर प्रदेश - २४ मे २०००, मुंबई) हे एक भारतीय उर्दू कवी व गीतकार होते. १९५० व १९६० च्या दशकांमध्ये बॉलिवूडमधील आघाडीच्या व सर्वात लोकप्रिय गीतकारांपैकी एक असलेल्या असलेल्या मजरूह सुलतानपुरी ह्यांनी जवळजवळ सर्व प्रमुख भारतीय संगीत दिग्दर्शकांसाठी अनेक यशस्वी गाणी रचली होती.

पुस्तक[संपादन]

मजरूह सुलतानपुरी यांच्या जीवनावर सुभाषचंद्र जाधव यांनी ‘यहॉं के हम सिकंदर मजरूह सुलतानपुरी’ नावाचे पुस्तक लिहिले आहे.

नातेवाईक[संपादन]

मजरूह सुलतानपुरी यांची कन्या सबा ही संगीत दिग्दर्शक नौशादअली यांच्या राजू नावाच्या मुलाची पत्‍नी आहे.

पुरस्कार[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील मजरूह सुलतानपुरी चे पान (इंग्लिश मजकूर)