प्रथमोपचार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एखाद्या व्याधीवर वैद्योपचार करण्यापूर्वीची पायरी म्हणजे 'प्रथमोपचार'.

प्रथमोपचार म्हणजे रुग्णालयात जायच्या आधी केलेला घरगुती उपाय म्हणजे प्रथमोपचार. यासाठी प्रथमोपचार पेटी आवश्यक असते.

पायऱ्या

प्रथोमोपचार सुरू करताना प्रथम रूग्णाला धीर द्यावा. श्वासोच्छ्वास असेल तर

  • प्रथमोपचार करतांना तुम्हाला धोका तर नाहीना हे प्रथम तपासा
  • आवश्यक असल्यास रुग्णवाहिका बोलावण्याची व्यवस्था करा
  • श्वासोच्छ्वास तपासा, सुरू असेल तर.
  • रुग्णास एका कडेवर झोपवा.
  • उताणे झोपवू नका बेशुद्ध रुग्णाची जीभ हळू हळू आत सरकून त्याचे श्वासमार्ग बंद होऊ शकतात.
  • इतर आवश्यक उपचार देण्याची सुरुवात करा.

श्वासोच्छ्वास बंद असेल तर

  • श्वासोच्छ्वास बंद असेल तर त्वरित उताणे करा. रुग्णाच्या तोंडात काही नाही हे पहा.
  • तोंडाने श्वासोच्छ्वास द्या
  • दोन्ही हातांनी छातीवर दोन्ही हातानी जोरदार दाब द्यायला सुरुवात करा एका - मिनिटात किमान ३० वेळा
  • परत तोंडाने २ श्वासोच्छ्वास द्या
  • हा क्रम वैद्यकीय मदत मिळे पर्यंत सुरू ठेवा.

लक्षात ठेवा कृत्रिम श्वासोच्छ्वास आणि छातीवरचा दाब याद्वारे मानवी शरीर कितीही काळ जिवंत ठेवता येते. कारण मानवी ह्रदयाला रक्तप्रवाह सुरू राहील आणि त्यातून मेंदूपर्यंत रक्त पोहोचत राहील. यामुळे जीवनासाठी आवश्यक असणारे महत्त्वाचे अवयव जिवंत राहून प्राण वाचण्याची शक्यता तयार होते.

प्रथमोपचार पेटी आतून
प्रथमोपचार साहित्य

चित्र:प्रथमोपचार पेटी साहित्य सलाईनचे पाणी.jpg|thumb|प्रथमोपचार -सलाईनचे पाणी मार लागणे, रक्तस्राव होणे, भाजणे, बेशुद्ध पडणे, हृदयविकाराचा झटका येणे आदी प्रसंग जीवनात कधीही ओढवू शकतात. आपत्काळात उपचारांसाठी लगेचच डॉक्टर उपलब्ध होऊ शकतील, असे नाही. अशा वेळी रुग्णावर तात्पुरते उपचार करून त्याचे प्राण वाचवता यावेत, यासाठी ‘प्रथमोपचार प्रशिक्षण’ घेणे आवश्यक ठरते.