पूर्वाषाढा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पूर्वाषाढा हे एक नक्षत्र आहे.

नक्षत्र
अश्विनी
भरणी
कृत्तिका
रोहिणी
मृग
आर्द्रा
पुनर्वसु
पुष्य
आश्लेषा
मघा
पूर्वाफाल्गुनी
उत्तराफाल्गुनी
हस्त
चित्रा
स्वाती
विशाखा
अनुराधा
ज्येष्ठा
मूळ
पूर्वाषाढा
उत्तराषाढा
श्रवण
धनिष्ठा
शततारका
पूर्वाभाद्रपदा
उत्तराभाद्रपदा
रेवती
अभिजीत

हे सुद्धा पहा[संपादन]

भारतीय नक्षत्रमालिकेतील विसावे नक्षत्र. वृश्चिक तारकासमूहाच्या नांगीच्या टोकाशी हे दिसते, यात तीन वा चार तारे मानतात. याचा अंतर्भाव धनू राशीत असून धनूमधील डेल्टा, गॅमा, लॅंब्डा व एप्सायलॉन हे तारे यात अंतर्भूत आहेत. यांपैकी डेल्टा [ कॉस मीडिया ; विषुवांश १८ ता. १७ मि. ३९.८ से., क्रांती - २९° ५१' ७".७, प्रत २.८ ; ⟶ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति ; प्रत] हा योगतारा (प्रमुख तारा) आहे. एप्सायलॉन (कॉस ऑस्ट्रॅलिस; विषुवांश १८ ता. २० मि. ४३.२ से., क्रांती - ३४° २४' ४०".३, प्रत १.९) व लॅंब्डा (कॉस बोरिअलिस ; विषुवांश १८ ता. २४ मि. ४५.६ से., क्रांती - २५° २७' ८".१, प्रत २.९) हे उल्लेखनीय आहेत. या नक्षत्राचा उल्लेख अथर्ववेदात आला असून याची देवता आप व आकृती शय्या आहे. हे नक्षत्र सप्टेंबरमध्ये रात्री ९ च्या सुमारास डोक्यावर दिसते.

                ठाकूर, अ. ना.(स्रोत: मराठी विश्वकोश)