छगन भुजबळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
छगन चंद्रकांत भुजबळ

विद्यमान
पदग्रहण
इ.स. २००९
मतदारसंघ येवला

जन्म १५ ऑक्टोबर इ.स. १९४७
नाशिक
राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
पत्नी मीना
अपत्ये पंकज भुजबळ :आमदार
निवास मिलिशिया अपार्टमेंट, म्हातारपाखाडी रोड, माझगाव, मुंबई-४०००१०.
धर्म हिंदू

छगन चंद्रकांत भुजबळ ( १५ ऑक्टोबर १९४७) हे भारतातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत.

भुजबळांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेना या राजकीय पक्षातून केली. १९९१ साली त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर भुजबळ त्या पक्षात आले आणि त्या पक्षात एक नेता बनले.

जीवन परिचय[संपादन]

  • जन्म -

१५ ऑक्टोबर, १९४७, नाशिक. मुंबईतील व्हिक्टोरिया ज्य़ुबिली टेक्निकल इन्स्टिट्यूटमधून त्यांनी मेकॅनिकल इंजिनियरिंगमधील पदविका घेतली. तरुणपणी ते शेती व शेतीवर आधारित व्यवसाय करत होते. मात्र अगदी सुरुवातीपासून त्यांना महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात रस होता.

  • १९७३ मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले. १९७३ ते ८४ ते महापालिकेत विरोधी पक्षनेता बनले, तर १९८५ मध्ये महापौर झाले. १९९१ मध्ये ते दुसऱ्यांदा महापालेकेत मुंबईचे महापौर झाले.
  • मुंबईतील नायर हॉस्पिटल, प्रिन्स आगाखान हॉस्पिटल, व्ही. जे. टी. आय. संस्थांवर ट्रस्टी म्हणून काम.
  • वांद्रे (मुंबई) येथे मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट (एम. ई. टी.) या शैक्षणिक संस्थेची स्थापना.
  • १९९१ मध्ये त्यांचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेशी टोकाचे मतभेद झाले आणि कालांतराने त्यांनी याचवर्षी सेनेला जय महाराष्ट्र केला. त्यांनी सुरुवातीला कॉग्रेसमध्ये प्रवेश केला नंतर १९९९ मध्ये शरद पवारांनी कॉग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर भुजबळ त्यांच्यासह राष्ट्रवादीत दाखल झाले. ते राष्ट्रवादीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. याच वर्षी राष्ट्रवादीची प्रदेशाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली.
  • १९८५ व १९९० अशा दोन वेळा मुंबईतील माझगावमधून विधानसभेवर निवड. नोव्हेंबर १९९१ मध्ये महसूलमंत्री. गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा या खात्याचे १९९५पर्यंत मंत्री. एप्रिल १९९६ मध्ये विधान परिषदेत विरोधी पक्षनेते.
  • १८ ऑक्टोबर १९९९ रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ. शिवाय गृह आणि पर्यटन ही दोन खाती सांभाळली. एप्रिल-२००२ मध्ये विधान परिषदेवर बिनविरोध निवड. एप्रिल २००२ ते २३ डिसेंबर २००३ या कालावधीत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री. २००४ मध्ये येवला मतदारसंघातून विधानसभेवर निवड. नोव्हेंबर २००४ ते ३ डिसेंबर २००८ या कालावधीत सार्वजनिक बांधकाममंत्री. आठ डिसेंबर २००८ रोजी महाराष्ट्राचे दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री.
  • भुजबळ यांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची मुंबईत १ नोव्हेंबर १९९२ रोजी स्थापना केली.
  • भुजबळ हे शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित उद्धव ठाकरे सरकार मधे कॅबिनेट मंत्री होते.
  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक. या पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले प्रदेशाध्यक्ष.

योगदान[संपादन]

त्यांनी दैवत (१९८५) आणि नवरा बायको (१९९०) या दोन मराठी चित्रपटांची निमिर्तीही केली.

दिल्लीचे महाराष्ट्र सदन प्रकरण[संपादन]

महाराष्ट्र सदन घोटाळा व मनी लॉंडरिंग प्रकरणी छगन भुजबळ यांना १४ मार्च २०१६ रोजी अटक करण्यात आली आहे. मुंबईतील एन्फोर्समेंट डिरेक्टरेटच्या कार्यालयात झालेल्या ११ तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर त्यांना ही अटक झाली.आता सध्या ते जामिनावर सुटलेले आहेत

बाह्य दुवे[संपादन]

महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रातील छगन भुजबळ यांच्यावरील लेख[permanent dead link]