चार्ल्स सातवा, पवित्र रोमन सम्राट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चार्ल्स सातवा

चार्ल्स सातवा (६ ऑगस्ट १६९७, ब्रसेल्स – २० जानेवारी १७४५, म्युनिक) हा १७४१ पासून मृत्यूपर्यंत बोहेमियाचा राजा व १७४२ पासून मृत्यूपर्यंत पवित्र रोमन सम्राट होता. हाब्सबुर्ग राजघराण्याचा वंशज नसलेला तो एकमेव पवित्र रोमन सम्राट होता.

सम्राट जोसेफ पहिला ह्याचा जावई असलेल्या सातव्या चार्ल्सने सम्राट सहाव्या चार्ल्सने आपली मुलगी मारिया तेरेसा हिची राज्यपदावर केलेली नियुक्ती नाकारली. सहाव्या चार्ल्सच्या मृत्यूनंतर झालेल्या युद्धांदरम्यानच १७४२ साली सातव्या चार्ल्सने सम्राटपद स्वीकारले. केवळ तीन वर्षे रोमन सम्राट राहिल्यानंतर १७४५ साली त्याचे तीव्र संधिवाताने निधन झाले. त्याच्या मृत्यूनंतर सातव्या चार्ल्सच्या मुलाने ऑस्ट्रियासोबत तह केला व त्यानंतरच ऑस्ट्रियाने सातव्या चार्ल्सच्या सम्राटपदाला अधिकृत मंजूरी दिली.

मागील
चार्ल्स सहावा
पवित्र रोमन सम्राट
१७४२-१७४५
पुढील
फ्रान्सिस पहिला