कव्वाली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कव्वाली हा गीतप्रकार आहे. कव्वाली म्हणजे मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी ईश्वराकडे केलेली प्रार्थना होय. याची रचना सहसा उर्दू भाषेत असते, कव्वाली गाणाऱ्या गायकांना कव्वाल असे म्हणतात. उत्सव, सण, समारंभ अश्या विशिष्ट प्रसंगांना रात्रभर कव्वाली गायनाचा कार्यक्रम केला जातो.

झिंझोटी, खमाज, रागेश्री, देस, पहाडी इत्यादी राग आणि केरवा, धुमाळी इत्यादी ताल काव्वालीसाठी वापरले जातात.