आर्या आंबेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आर्या आंबेकर

आर्या आंबेकर
आयुष्य
जन्म १६ जून १९९४
जन्म स्थान नागपूर, महाराष्ट्र, भारत
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
मूळ_गाव पुणे
देश भारत
भाषा मराठी
पारिवारिक माहिती
आई श्रुती आंबेकर
वडील समीर आंबेकर
संगीत साधना
गुरू श्रुती आंबेकर
गायन प्रकार सुगम संगीत
संगीत कारकीर्द
पेशा पार्श्वगायन
कारकिर्दीचा काळ २००८ पासून
गौरव
पुरस्कार बिग मराठी रायाजिंग स्टार ॲवॉर्ड
(इंग्लिश: Big Marathi Rising Star Award)

आर्या आंबेकर ही मराठी गायिका व अभिनेत्री आहे. झी मराठी वाहिनीच्या सा रे ग म प:लिटील चॅम्प्स या संगीत विषयक स्पर्धात्मक कार्यक्रमात ती एक स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.[१]

ओळख[संपादन]

गायन करताना आर्या

आर्याचा जन्म नागपूरमध्ये समीर आणि श्रुती आंबेकर या मराठी दांपत्याच्या घरी झाला. आर्याचे वडील समीर हे आयुर्वेदिक डॉक्टर असून आई श्रुती गायिका आहे. आर्या आपल्या आईकडून गायनाचे शिक्षण घेत आहे.

आर्याची आजीसुद्धा एक शास्त्रीय गायिका आहे. तिने आर्या जेमतेम २ वर्षाची असतानाच तिचे गायनातले कौशल्य ओळखले. आर्या साडेपाच वर्षाची असताना तिने आपल्या आईकडे शास्त्रीय गायनाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. वयाच्या सहाव्या वर्षी तिने संगीताची पहिली परीक्षा दिली.

तिसरीत असताना आर्याने आंतरशालेय गायनाच्या स्पर्धेत भाग घेतला आणि आपल्या शाळेला पहिले पारितोषिक मिळवून दिले. आर्याने आतापर्यंत अनेक मराठी / हिंदी भाषा अल्बम्स तसेच काही मराठी चित्रपटांसाठी व नाटकांसाठी गाणी गायली आहेत. गायनासोबतच आर्या अभिनेत्री म्हणून देखील लोकांसमोर आली, २०१७ च्या सुरुवातीस प्रदर्शित झालेल्या 'ती सध्या काय करते' या चित्रपटातून तिने अभिनय कारकिर्दीस सुरुवात केली. यामध्ये तिने गायलेले हृदयात वाजे समथिंग हे गाणे प्रसिद्ध आहे.

कारकीर्द[संपादन]

सा रे ग म प:लिटील चॅम्प्स हा एक संगीत विषयक स्पर्धात्मक कार्यक्रम, झी मराठी या दूरदर्शन वाहिनीवर जुलै २००८ ते फेब्रुवारी २००९ या कालावधीत प्रसारित झाला. या कार्यक्रमासाठी वय वर्ष ८ ते १४ मधील मुलांच्या चाचण्या घेण्यात आल्या. आर्या सर्वोत्कृष्ट ५० स्पर्धकांमध्ये निवडली गेली आणि सा रे ग म प:लिटील चॅम्प्स या कार्यक्रमाची एक स्पर्धक झाली.

आर्याने आपल्या सुमधुर आवाज आणि सांगीतिक कौशल्याच्या जोरावर अंतिम फेरीत व नंतर महाअंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत १२ स्पर्धकांची निवड झाली तर महाअंतिम फेरीत ५ स्पर्धकांची निवड केली होती.

आर्याने या कार्यक्रमांमध्ये अनेक उत्तमोत्तम गाणी सादर केली. तिच्या पान खाये सैंया हमारो या गाण्याला परीक्षकांकडून वरचा नी पर्यंत (२०० %) गुण मिळाले. हा विक्रम सा रे ग म पच्या त्या आधीच्या ८ पर्वात अबाधित होता. हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत गायक हरिहरन हे त्या भागाचे परीक्षक होते. आर्याला अनेकदा परफॉर्मर ऑफ द वीक (Performer of the week) घोषित करण्यात आले.

आर्याला आवाजाची दैवी देणगी लाभली आहे. त्याला आपल्या रियाजाची जोड देत आर्याने संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. संगीत क्षेत्रातील अनेक नामवंत कलाकारांनी आर्याच्या आवाजाची व तिच्या गान कौशल्याची भरभरून प्रशंसा केली आहे. शास्त्रीय संगीत असो वा नाट्यगीते, भावगीते असो वा भक्तिगीते, मराठी चित्रपट संगीत असो वा हिंदी गाणी, इतकेच नव्हे तर, लावणी, लोक-गीते या सर्व शैलीतील गाणी आर्या तितक्याच ताकदीने गाते. आर्याला या कार्यक्रमादरम्यान माणिक वर्मा शिष्यवृत्ती देण्यात आली. ही शिष्यवृत्ती आर्याला दोन वर्षांसाठी प्रदान करण्यात आली होती.

फिल्मोग्राफी[संपादन]

गीतसंग्रह[संपादन]

  • गर्जती सह्याद्रीचे कडे
  • जय हरी विठ्ठल
  • मराठी अभिमानगीत संगीत दिग्दर्शक: कौशल इनामदार
  • आठवा स्वर संगीत दिग्दर्शक: वर्ष भावे
  • मला म्हणत्यात आर्या आंबेकर
  • खाऊचा गाव संगीत दिग्दर्शक: यशवंत देव
  • हम और तुम - हिंदी गाण्यांचा गीतसंग्रह, संगीत दिग्दर्शक: खलिल अभ्यंकर
  • आनंदवन आले घरी - बाबा आमटे
  • मझ्या मातीचे गान - कुसुमाग्रज प्रतिष्ठान
  • दिवा लागू दे रे देवा - पहिला सोलो अल्बम, संगीत दिग्दर्शक: सलील कुलकर्णी

मराठी चित्रपट[संपादन]

  • लेटस्‌ गो बॅक
  • बालगंधर्व
    • कळी या चित्रपटाच्या निमित्ताने श्रीनिवास खळे यांनी १५ वर्षांनी संगीत दिग्दर्शक म्हणून काम केले. याच चित्रपटासाठी पार्श्वगायन करणारी आर्या आंबेकर, श्रीनिवास विनायक खळे यांच्याकडे गाणारी शंभरावी गायिका ठरली.[२]
  • रमा माधव - हमांमा रे पोरा या गाण्याची पार्श्वगायिका [३][४]
  • योद्धा
  • संत कैकडी महाराज - संगीतकार: नरेंद्र भिडे
  • गोष्ट तिच्या प्रेमाची
  • रेडी मिक्स - संगीतकार: अविनाश विश्वजीत

शीर्षक गीत[संपादन]

चित्रपट[संपादन]

पुरस्कार[संपादन]

  • २००८ - माणिक वर्मा शिष्यवृत्ती
  • २००९ - उपविजेती झी मराठी सा रे ग म प लिटिल चॅम्प्स
  • २०१० - हरिभाऊ साने पुरस्कार
  • २०१० - पुण्यरत्न युवा गौरव पुरस्कार[६]
  • २०११ - बिग मराठी रायझिंग स्टार अवॉर्ड (संगीत)
  • २०१२ - यंग अचिव्हर्स अवॉर्ड - विसलींग वूड्स इंटरनॅशनल
  • २०१२ - डॉ. वसंतराव देशपांडे पुरस्कार
  • २०१४ - आर्या पुरस्कार
  • २०१५ - डॉ. उषा (अत्रे) वाघ पुरस्कार
  • २०१६ - विद्या प्राज्ञ पुरस्कार - ग.दि.मा. प्रतिष्ठानद्वारा [७]
  • २०१७ - गोदरेज फ्रेश फेस ऑफ द इयर - सह्याद्री नवरत्न अवॉर्ड [८]
  • २०१९ - फेव्हरेट पार्श्वगायिका, ती सध्या काय करते चित्रपटातील 'हृदयात वाजे समथिंग' या गाण्यासाठी - झी टॉकीजच्या महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या कार्यक्रमामध्ये[९][१०]
  • २०१९ - फेव्हरेट नवोदित अभिनेत्री, ती सध्या काय करते चित्रपटासाठी - झी टॉकीजच्या महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या कार्यक्रमामध्ये[९][१०]
  • २०१८ - मोस्ट नॅचरल परफॉर्मन्स ऑफ द इयर - झी चित्रगौरव पुरस्कार [११]
  • २०१८ - सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका व सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्री, ती सध्या काय करते चित्रपटासाठी - रेडीओ सिटी द्वारा सिटी सिने अवॉर्ड मराठी
  • २०१९ - सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार[१२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "News18 Lokmat: Marathi News, Breaking News in Marathi, Politics, Sports News Headlines". News18 Lokmat. 2018-04-09 रोजी पाहिले.[permanent dead link]
  2. ^ "खळेकाकांची शंभरावी गायिका आर्या आंबेकर". महाराष्ट्र टाइम्स. 2011-09-03. 2018-04-02 रोजी पाहिले.
  3. ^ "सांगितिक सोहळ्यात 'रमा माधव'चे म्युझिक लॉंच, मंचावर अवतरली पेशवाई, पहा PICS". दिव्य मराठी. 2014-07-30. 2018-04-09 रोजी पाहिले.
  4. ^ "MUSIC REVIEW: Rama Madhav - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2018-04-09 रोजी पाहिले.
  5. ^ "Aarya Ambekar to make her debut in acting". The Times of India (इंग्रजी भाषेत). १० ऑगस्ट २०१५. २७ एप्रिल २०१९ रोजी पाहिले.
  6. ^ "Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper,Marathi News Paper in Mumbai". www.loksatta.com. 2018-04-09 रोजी पाहिले.
  7. ^ "जब्बार पटेल यांना गदिमा पुरस्कार". २२ नोव्हेंबर २०१६. २२ एप्रिल २०१९ रोजी पाहिले.
  8. ^ "सह्याद्री वाहिनेचे कार्य कौतुकास्पद". २१ जून २०१७. Archived from the original on 2018-08-26. २२ एप्रिल २०१९ रोजी पाहिले.
  9. ^ a b "Zee Talkies' 'Maharashtracha Favorite Kon 2017' Awards Winners Photos". २८ जानेवारी २०१८. २२ एप्रिल २०१९ रोजी पाहिले.
  10. ^ a b "'फास्टर फेणे' ठरला महाराष्ट्राचा फेव्हरेट चित्रपट". २५ जावनेवारी २०१८. २२ एप्रिल २०१९ रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  11. ^ "Zee Chitra Gaurav Awards 2018 Winners List". १२ मार्च २०१८. २२ एप्रिल २०१९ रोजी पाहिले.
  12. ^ "Sur Jyotsna Awards : श्रेया घोषालच्या आवाजाने नागपूरकर मंत्रमुग्ध". www.lokmat.com. २७ एप्रिल २०१९ रोजी पाहिले.