अळिंबी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अळिंबी /मशरूम या पानावरून पुनर्निर्देशित)

मशरूम ही बुरशी गटातील वनस्पती आहे. मशरूमला मराठीत ‘अळिंबी’ असे म्हटले जाते. ही वनस्पती पावसाळ्यात निसर्गतःच उगवते. ही कुत्र्याची छत्री, भूछत्र, तेकोडे, धिंगरी या नावाने ओळखली जाते.

निसर्गात अनेक प्रकारचे मशरूम आढळतात; त्यांत काही विषारीदेखील असतात. जगात मशरूमच्या १२,०००हून अधिक जाती आहेत. मशरूमची लागवड प्रामुख्याने पूर्व आशिया, तैवान, चीन, कोरिया, इंडोनेशिया या देशांत करतात. या वनस्पतीचे २०१७ सालचे जागतिक उत्पन्न ८५ लाख मेट्रिक टन आहे. त्यापैकी ५५% युरोपात, २७% उत्तर अमेरिकेत व १४% पूर्व आशिया खंडात घेतात. मशरूमचे सर्वात अधिक सेवन जर्मनीमध्ये होते.

भारतामध्ये बटन मशरूम (Agaricus bisporus), शिंपला मशरूम (pleurotus sp.) व धानपेंढ्यांवरील चिनी मशरूम (Volvariella volvacea) या जातींच्या मशरूमची लागवड केली जाते.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Home | Mushroom Learning Center Kolhapur". 2021-02-16 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]