अलका कुबल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अलका कुबल
अलका कुबल
जन्म अलका समीर कुबल-आठल्ये
२३ सप्टेंबर १९६५
गोरेगाव, मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ १९८१ पासून
भाषा मराठी, हिंदी
प्रमुख नाटके मधुचंद्राची रात्र
प्रमुख चित्रपट माहेरची साडी, चक्र
प्रमुख टीव्ही कार्यक्रम दर्शन (कलर्स मराठी), मंगळसूत्र (फक्त मराठी), आई माझी काळुबाई (सोनी मराठी)
पुरस्कार राज्य सांस्कृतिक पुरस्कार २०१३, व्ही.शांताराम पुरस्कार २०१६
पती
समीर आठल्ये (ल. १९९२)
अपत्ये ईशानी, कस्तुरी

अलका कुबल (सासरच्या अलका आठल्ये) ह्या मराठी-हिंदी चित्रपटांतून काम करणाऱ्या एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहेत.[१] बालकलाकार म्हणून त्यांनी लहानपणापासूनच व्यावसायिक नाटकांतून काम करायला सुरुवात केली. इयत्ता १०वी मध्ये असताना त्यांनी चक्र या चित्रपटात छोटी भूमिका केली होती. नटसम्राट, संध्याछाया, वेडा वृंदावन अशा काही नाटकांत त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या. स्त्रीधन या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट सृष्टीत व्यावसायिक अभिनेत्री म्हणून प्रवेश केला. माहेरची साडी ह्या प्रसिद्ध चित्रपटाच्या यशामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या.[ संदर्भ हवा ] त्यासोबतच लेक चालली सासरला, तुझ्यावाचून करमेना, माहेरचा आहेर, दुर्गा आली घरा, काळूबाईच्या नावानं चांगभलं, सुवासिनीची सत्त्वपरीक्षा, अग्निपरीक्षा असे त्यांचे अनेक चित्रपट लोकप्रिय झाले. यांपैकी काही चित्रपटांची निर्मिती देखील त्यांनी केली.[ संदर्भ हवा ] अमृतवेल, युगंधरा, बंदिनी, येरे येरे पैसा, आकाशझेप, माझी आई काळुबाई अशा दूरचित्रवाणी मालिकांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका केल्या.

अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, दादा कोंडके, सचिन पिळगांवकर अशा मराठीतील आघाडीच्या नायकांबरोबर त्यांनी भूमिका केल्या. हिंदीमधल्या शिर्डीचे साईबाबा या चित्रपटातील भूमिका उल्लेखनीय आहे.[ संदर्भ हवा ]

मराठी चित्रपट[संपादन]

  • अग्निपरीक्षा, २०१०
  • अनुराधा, १९९१
  • अमृतवेल
  • अष्टरूपा जय वैभवलक्ष्मी माता, २००१
  • आई तुझा आशीर्वाद, २००४
  • आई मला माफ कर, २००६
  • आदि माया आदि शक्ती, २००९
  • आम्ही का तिसरे, २०१२
  • उदे गं अंबाबाई, २००७
  • ओटी कृष्णामाईची, २००४
  • ओवाळणी, २००२
  • ओळख - माय आयडेंटिटी, २०१५
  • कणसा कणसा दाणा दे
  • कमाल माझ्या बायकोची (चित्रपट), १९९७
  • कर्तव्य, २००९
  • काल रात्री १२ वाजता (चित्रपट)
  • काळुबाईच्या नावानं चांगभलं, २००४
  • कुंकू लावते माहेरी, २००४
  • गाढवाचे लग्न,१९९१
  • गृहलक्ष्मी, २००६
  • घात - प्रतिघात, २००७
  • चार दिवस सासूचे, १९९३
  • चिरंजीव, २०१५
  • जखमी कुंकू, १९९५
  • झाकली मूठ सवा लाखाची, १९८९
  • डॉक्टर डॉक्टर, १९९१
  • डॉ.तात्याराव लहाने, २०१८
  • तुझ्या वाचून करमेना, १९८६
  • तुळस आली घरा, २००१
  • दे टाळी, १९८९
  • देवकी, २००१
  • दैवाचे खेळ, २००४
  • दुर्गा आली घरा, १९९६
  • धरलं तर चालतंय, १९९१
  • धुरळा, २०२०
  • नाती गोती, २००७
  • नाशकलंक, २००३
  • निर्मला मच्छिंद्र कांबळे, १९९९
  • पहिलं पाऊल, २००७
  • पोरीची धमाल बापाची कमाल, १९८७
  • बंडलबाज, १९९५
  • बाळाचे बाप ब्रह्मचारी
  • बाळुमामाच्या नावानं चांगभलं, २००८
  • भक्ती हीच खरी शक्ती, २००६
  • भाऊबीज, २००३
  • मंगळसूत्र
  • मधुचंद्राची रात्र,१९८९
  • मराठा बटालियन, २००२
  • श्री महालक्ष्मी व्रतकथा
  • माझं घर तुझा संसार, १९८६
  • माझी शाळा, २०१२
  • माय माऊली मनुदेवी, २००७
  • माया ममता, १९९६
  • माहेरचा आहेर, १९९३
  • माहेरची पाहुणी, १९९९
  • माहेरची साडी, १९९१
  • मी सासर मागते, २००८
  • राजाने वाजवला बाजा, १९८९
  • लगीन माझ्या खंडोबाचं, १९८८
  • लेक चालली सासरला, १९८४
  • वधु माऊली, २०१३
  • वहिनीची माय
  • वाट पाहते पुनवेची, १९९२
  • विघ्नहर्ता, २०१५
  • वेडिंगचा शिनेमा, २०१९
  • शुभ बोल नाऱ्या, १९९०
  • श्रीमंत दामोदरपंत, २०१३
  • सविता बानो, २००६
  • सूर राहू दे, २०१२
  • सोबती, १९८४
  • स्त्रीधन, १९८४
  • ही वाट जीवनाची, २०१२

हिंदी चित्रपट[संपादन]

  • आदमी और औरत,१९८४
  • चक्र,१९८१
  • नया जहर, १९९१
  • फिर वही आवाज, १९९८
  • महात्मा बसवेश्वर, २००७
  • बाबा
  • शिरडी साई बाबा, २००१

दूरचित्रवाणी मालिका[संपादन]

  • आई माझी काळुबाई (सोनी मराठी वाहिनीवर, २०२०)
  • दर्शन (कलर्स मराठी वाहिनीवर, २०१६)
  • मंगळसूत्र (फक्त मराठी वाहिनीवर, २०१३)
  • आकाश झेप ( ई टीव्ही मराठी )

नाटक[संपादन]

पुरस्कार[संपादन]

  • कला साधना-कला जीवन गौरव, २०१४
  • गंगा-जमुना पुरस्कार, २०१८
  • महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार, २०१३
  • व्ही.शांताराम पुरस्कार, २०१६

संदर्भ[संपादन]

  1. ^ कुबल, अलका (१ जानेवारी २०१९). विवेक आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोश. नाथीबाई दामोदर ठाकरसी, पुणे: साप्ताहिक विवेक (हिन्दुस्थान प्रकाशन). pp. ८.

बाह्य दुवे[संपादन]