अराजकता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अराजकता विचारधारेचे चिन्ह

अराजकता ही अशी एक राजकीय विचारधारा आहे ज्यामध्ये सरकार अथवा शासन अनावश्यक मानले जाते व अराजक आणि अशासित समाजाची प्रस्तावना केली जाते. अराजकतेचा प्रचार करणाऱ्यांच्या मते समाजातील सर्व प्रकारचे प्रशासन बरखास्त करणे गरजेचे आहे

विल्यम गॉडविन ह्या १९व्या शतकातील ब्रिटिश तत्ववेत्त्याने अराजकतेची संकल्पना जगासमोर मांडली. तेव्हापासून अनेक लेखक व विद्वानांनी अराजकतेवर लिखाण केले आहे. परंतु समाजाच्या कोणत्या स्थितीला संपूर्ण अराजकता म्हणायचे ह्याबाबत मात्र अनेक मते व व्याख्या आहेत.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत