अँतोनियो दि ऑलिव्हेरा सालाझार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अन्तानिओ द ऑलिव्हेरा सालाझार

अन्तानिओ द ऑलिव्हेरा सालाझार हा पोर्तुगालचा हुकुमशहा होता. १९१० साली स्थापन झालेले गणराज्य काही लष्करी अधिकाऱ्यांनी १९२६ साली उलथवून पाडले. त्यानंतर काही वर्षांतच अर्थशास्त्राचा प्राध्यापक असलेल्या ॲंतोनियो दि ऑलिव्हेरा सालाझारची हुकुमशाही स्थापन झाली. १९३२ साली तो पंतप्रधान झाला आणि १९६८ सालापर्यंत त्याने पोर्तुगालची सत्ता सांभाळली. दुसऱ्या महायुद्धात याने तटस्थता बाळगली.