"सदस्य चर्चा:Abhijitsathe" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
→‎Image licensing: नवीन विभाग
ओळ ४९२: ओळ ४९२:


मी वैयक्तिक आरोप वगळत आहे. ते चूक आहे काय?
मी वैयक्तिक आरोप वगळत आहे. ते चूक आहे काय?

== Image licensing ==

Hello Abhijitsathe, I saw that you are uploading pictures to the Marathi Wikipedia, like [[:चित्र:Los Angeles Clippers logo.svg|this one]] or [[:चित्र:Harry Potter and the Deathly Hallows.jpg|this one]] without a clear source and license given. Please notice that on Wikimedia projects ([[meta:Non-free content|if not stated otherwise]], which is not the case for this wiki) only Free Content Licensed images are allowed. If images aren't under a free license (I'm pretty sure the ones listed above aren't) and/ or you aren't able to state the source, please delete them. Please enter up all missing sources and license tags for the images you uploaded and get the ones you can't do that for deleted, thanks. [[foundation:Resolution:Licensing policy|Further information]] - [[सदस्य:Hoo man|Hoo man]] ([[सदस्य चर्चा:Hoo man|चर्चा]]) ०६:५३, २३ मे २०१२ (IST)

०६:५३, २३ मे २०१२ ची आवृत्ती


मराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक दुसरा - (फेब्रुवारी २०१२ )

चांदणे शिंपित जा ...!
मराठी विकिपीडिया गौरव समितीची
मराठी विकिपीडियावर अनेक मंडळी अहोरात्र काम करत आहेत. काही नवीन आहेत तर काही जुनी झाली, काम करणार्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच कामाची कदर करण्यासाठी गौरवासारखे दुसरे साधन नाही. कामाच्या वाढत्या व्यापाबरोबरच त्याची योग्य रीतीने कदर पण करण्याच्या उद्देशाने एक आधारभूत संरचना मराठी विकिपीडियावर असावी ह्या उद्देशाने "मराठी विकिपीडिया गौरव समिती" ची स्थापना करण्यात येत आहे.

सदर समिती तर्फे दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपादन योगदानाचे गौरव जसे - १००० संपादने, २००० , ५००० संपादने आणि काही इतर गौरव (सदस्यांचे काम तपासून) प्रदान करण्यात येतील तसेच इतरांनी शिफारस केलेले अथवा समितीस योग्य वाटलेले/सुचलेले विशेष गौरवही प्रदान करण्यात येतील. अर्थात व्यक्तिगत बार्नस्टार देण्याच्या जुन्या पद्धतीला पूरक म्हणून ही समिती कार्य करेल.

"मराठी विकिपीडिया गौरव समितीची " सुरुवात होत असतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्ही आशा करतो की भविष्यात सदर समिती ही मराठी विकिपीडियाच्या उज्ज्वल भविष्यात मोलाचा वाट उचलण्यात उपयोगी ठरेल. आपणही ह्या उपक्रमात भरीव सहभाग द्यालच ही अपेक्षा.


जानेवारी २०१२ मधील सक्रिय सदस्यांचा आलेख
२०१२ जानेवारी महिन्यात जवळ जवळ एक हजार नवीन सदस्य नोंदणीकृत झाले त्याचा आलेख
जानेवारी २०१२ मध्ये मराठी विकिपीडियाने एक लाख पानांचा टप्पा गाठला त्याचा आलेख
पाने सांख्यिकी
लेख ३४,५४४
पाने

(चर्चा पाने, पुनर्निर्देशने, साचे, इ. सह एकूण पाने)

१,०९,५३४
चढवलेल्या संचिका ३,१९२
संपादन सांख्यिकी
एकूण संपादने ९,६८,६९३
प्रतिपान संपादने ८.८४
सदस्य सांख्यिकी
नोंदणीकृत सदस्य २२,०८४
कार्यरत सदस्य

(गेल्या ३० दिवसांत एक तरी कृती केलेले सदस्य)

१९०
सांगकामे ६०
प्रचालक १२
स्वीकृती अधिकारी
१८:३८ १ फेब्रुवारी २०१२ ची आकडेवारी


कार्यक्षेत्रातील प्रत्यक्ष कार्यक्रम
  • टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई येथे ६ ते ८ जानेवारी दरम्यान मराठी विकिपीडियाचे स्टॉल लावण्यात आले होते, त्यास उत्तम प्रतिसाद लाभला. 'टेक फेस्ट २०१२' ला एक लाखाहून जास्त लोकांनी भेट दिली.
  • १५ जानेवारी २०१२ ला W - 11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि टेक्याथॉन, मुंबई आय. आय. टी बॉम्बे येथे आयोजित करण्यात आली होती.
टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई
टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई

त्या दरम्यान मराठी विकिपीडिया मोबाइल तसेच टॅबलेट वरून वापरण्यासाठी 'अँड्रॉईड अ‍ॅप' निर्माण करण्यात आल्या.

  • * ८ जानेवारी २०१२ - मराठी विकिपीडिया (एडिट ट्रेनिंग/ प्रशिक्षण/ मार्गदर्शन) शिबिर टेक मराठी महामेळावा, पुणे. १०० प्रशिक्षणार्थीनी ह्यात भाग घेतला.
  • * १५ जानेवारी २०१२ - W11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि विकी शिकवणी, ज्ञान प्रबोधिनी, पुणे येथे आयोजित करण्यात आली.
  • * १३ जानेवारी २०१२ - आबासाहेब अत्रे शाळा, रास्ता पेठ, पुणे येथे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विकी शिकवणी आयोजित करण्यात आली होती. ५० शाळकरी विद्यार्थ्यांनी ह्यात हिरीरीने भाग घेतला.
  • * २९ जानेवारी २०१२ - शाहीर अमर शेख सभागृह, चर्चगेट मुंबई, मराठी अभ्यास केंद्राच्या विद्यार्थी आणि शिक्षक महामेळाव्यात "मराठी विकिपीडिया आणि मराठी भाषेकरिता उपलब्ध होत असलेल्या तंत्रज्ञानाचा परिचय" यावर व्याख्यान तसेच विकिपीडियावर संपादन कसे केले जाते याचे सोदाहरण प्रात्यक्षिक दिले गेले. कार्यक्रमास १२५ मराठीप्रेमींची उपस्थिती होती.

२०१२ फेब्रुवारी महिन्यातील आयोजित कार्यक्रम

  • ३ फेब्रुवारी - "माहिती तंत्रज्ञान, विकिपीडिया आणि मराठी भाषा" चर्चासत्र, मराठी विभाग पुणे विद्दापीठ.
  • १० फेब्रुवारी २०१२ - विकी शिकवणी, L&T इनस्टीट्युट ऑफ टेक्नोलॉजी, साकीनाका मुंबई.
  • १० ते १२ फेब्रुवारी - हॅक्याथॉन, (Gnunify) SICSR पुणे आणि मराठी विकिपीडिया - परिचय,
  • १७ फेब्रुवारी - मराठी विकिपीडिया - परिचय, COE, Pune
  • १८ फेब्रुवारी - विकी कार्यशाळा, आय आय टी मुंबई.
  • २० ते २७ फेब्रुवारी - फोटोथॉन, मुंबई.
  • २५ फेब्रुवारी - मराठी भाषा दिवस कार्यक्रम, रानडे इन्स्टिट्यूट, पुणे.
.
ठळक घडामोडी आणि आढावा
  • मराठी विकिस्रोतला प्रशासकीय मान्यता

मराठी विकिस्रोत हा बंधू प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव विकी मीडियाकडे बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होता. विकी संमेलन २०११, मुंबईच्या जाहीरनाम्यात ह्या प्रकल्पास सुरुउ करण्याच्या घोषणेनंतर प्रस्तावाचा पाठपुरावा आणि इतर अनिवार्य गोष्टींची पूर्तता मराठी विकिपीडिया समाजाने केल्याने,. लॅंग्वेज कमिटीने मराठी विकिस्रोत ह्या बंधू प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिली आहे. लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होईल.

विकिस्रोत म्हणजे विकी समुदायाने उभारलेले व देखभाल केले जाणारे, प्रताधिकारमुक्त दस्तऐवजांचे इंटरनेटवरील खुले ग्रंथालय आहे. ऐतिहासिक काळापासूनचे ललितेतर व ललित साहित्य, चित्रे/कलाकॄती यांच्या अस्सल प्रकाशनाबरहुकूम विश्वासार्ह विकिआवॄत्त्या सर्वांसाठी गोळा करून देणे हे विकिस्रोताचे उद्दिष्ट आहे. नवीन पिढीस जुने प्रताधिकारमुक्त मराठी ग्रंथ वाचण्यास इंटरनेटवर युनिकोड फॉर्ममध्ये सहज उपलब्ध करून देणे तसेच संदर्भ देणे आणि पडताळणे सोपे करण्यासाठी सदर प्रकल्प उपयोगात येईल.

मराठी विकिस्रोत' हे एक आंतरजालावर असलेले मुक्त पुस्तकालय आहे. यामध्ये वाचकांसाठी मोफत वाचनाची सोय आहे. आपल्याला या प्रकल्पात भर घालण्यासाठी निमंत्रण आहे. येथे प्राचीन तसेच प्रताधिकार नसलेले लेख आपण आणू शकता. मराठी विकिपेडियावर त्या लेखांची चर्चा होऊ शकते.

परंतु ते लेख मूळ स्वरूपात मराठी विकिस्रोत येथे साठवले जातात. उदा० ऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी. तसेच ऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने येथे संग्रहित करता येतील.


  • नवीन नियुक्ती
माहितगार - विकिसंमेलन भारत २०११, मुंबई

मराठी विकिपीडिया वरील दैनंदिन कामे, नवीन प्रस्ताव, तांत्रिक जबाबदाऱ्या, सुरक्षा, ध्येय धोरणे, प्रगती आदी अनेक आघाड्या अभय नातू हे एकटेच प्रशासक म्हणून कार्यभार सांभाळत होते. वाढत्या व्यापाबरोबरच खांदे वाढवावे जेणे करून कामाचा वैयक्तिक दबाव कमी होईल आणि सेवाही सुरळीत मिळतील या उद्देशाने प्रशासक (ज्याला आता स्वीकृती अधिकारी असे संबोधण्यात येते) या पदासाठी मराठी विकिपीडिया समाजाने एकमताने 'माहितगार' यांना ही जबाबदारी दिली आहे.

माहितगार हे कुशल संघटक आहेत, मराठी विकिपीडियावर ‎प्रचालक म्हणून ७ जून २००६ पासून ते कार्यरत आहेत. तांत्रिक तसेच धोरणात्मक विषयांवर त्यांनी नेहमीच त्याच्या व्यक्तिमत्त्वातील परिपक्वतेचा परिचय दिलेला आहे. प्रेमळ व्यक्तिमत्त्व, प्रत्यक्ष क्षेत्रातील त्यांचे काम आणि कार्यकर्त्यांशी त्यांचा थेट संपर्क हे वाखाणण्याजोगे आहे. तेंव्हा माहितगारांना 'स्वीकृती अधिकारी' (प्रशासक) पदाची जबाबदारी दिल्याने प्रशासकीय पातळीला अधिक बळकटी येईल.

'माहितगार' यांच्या पुढील कार्यास 'विकीपत्रिका' वाचकांतर्फे हार्दिक शुभेच्छा ...!!!

* विकिप्रकल्पांकरीता प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते हवे आहेत..!

वाचकांच्या प्रतिक्रिया

  • राहुल जी, सादर नमस्कार, मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचा आपल्या उत्कृष्ट संपादनाकरीता आपणांस व संपादक टीमचे हार्दिक अभिनंदन. या पत्रिकेमुळे मराठी विकिपीडिया विकास कार्याकरीता अनेक स्वयंसेवक जोडता येतील.--विजय नगरकर
  • नमस्कार राहुल, विकीचा अंक मस्त झाला आहे. आवडला. त्यात सांख्यिकी देण्याची कल्पना फार आवडली. हा अंक इतर संकेतस्थळांवर सादर केला तर चालेल का? निनाद
  • Superb effort ... Is there any away I can read in English -- Naveenpf
  • मला विकिपत्रिका नको आहे, त्यासंबंधीच्या लिंक किंवा मजकूर माझ्या सदस्य किंवा चर्चापानावर कृपया टाकू नये. धन्यवाद. मनोज
  • नमस्कार राहुल ! विकिपत्रिकेचा पहिला अंक प्रकाशित झाल्याबद्दल आपल्या सर्वांचे, आणि अधिककरून तुमचे, अभिनंदन ! अंक नेटका आणि देखणा (याबद्दल विशेष शाबासकी :) ) झाला आहे. संकल्प द्रविड
विकिपत्रिका प्रकाशक...
मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा...! * विकिपत्रिका संपादन मंडळात सहभागी व्हा !



मराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक पहिला - (जानेवारी २०१२ )

२०१२ नववर्ष अभिष्टचिंतन ...!
सर्व मराठी विकिपिडीयंसना नवीन वर्षाच्या अनेक अनेक शुभेच्छा. आम्ही आपल्यासाठी नवीन वर्षाची आगळी वेगळी भेट घेऊन आलो आहोत. हो विकीपात्रिका ...! मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय राहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्‍या कामांची सर्वाना माहिती व्हावी ह्या प्रमुख उद्देशाने हा नवीन उपक्रम सुरु करीत आहोत. जेणेकरून, सदस्यांना आपल्या आवडीच्या कामात भाग घेऊन योगदान करता येईल, तसेच कार्यरत सदस्याचे योगदान पण समोर आणता येईल. सांख्यिकी, लक्ष, ध्येय आणि ऑफ लाईन कामे त्यासाठी लागणारा जनाधार आणि नेटवर्क ह्यात सुसंवाद साधण्यात ह्याचा उपयोग होईल.

नववर्षाच्या मुहूर्तावर विकीपात्रिका ह्या मासिकाच्या प्रकाशनाची सुरुवात होत असतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्ही आशा करतो कि भविष्यात सदर मासिक हे मराठी विकिपीडियाच्या उज्वल भविष्यात मोलाचा वाट उचलण्यात उपयोगी ठरेल. आपणही ह्या उपक्रमात भरीव सहभाग द्यालच ही अपेक्षा.

विकिपत्रिका मराठी विकिपीडिया
२०११ मधील गुगल वरील मराठी विकिपीडियाबाबतचा लोकांनी घेतलेल्या शोधाचा लेखाजोखा (ट्रेंड)
पाने सांख्यिकी
लेख ३४,७९७
पाने

(चर्चा पाने, पुनर्निर्देशने, साचे, इ. सह एकूण पाने)

९६,२४०
चढवलेल्या संचिका ३,१६८
संपादन सांख्यिकी
एकूण संपादने ९,३२,७५०
प्रतिपान संपादने ९.६९
सदस्य सांख्यिकी
नोंदणीकृत सदस्य २१,१५१
कार्यरत सदस्य

(गेल्या ३० दिवसांत एक तरी कृती केलेले सदस्य)

१९०
सांगकामे ६०
प्रचालक १२
स्विकृती अधिकारी


प्रत्यक्ष क्षेत्रातील कार्यक्रम
  • विकिपीडिया व त्याचे बंधू-प्रकल्प- विकिस्रोत, विक्शनरी इत्यादी यात वापरल्या जाणार्‍या मिडियाविकी सॉफ्टवेअरच्या मिडियाविकी आणि मिडियाविकि विस्ताराच्या संदेशांचे स्थानिकीकरण, अनुवाद, अनुवादांचे प्रमाणिकरण
    CMDA IT expo. १५ ते १८ डिसेंबर २०११, पुणे. मराठी विकिपीडिया स्टॉल.

व सर्वसामान्य मराठी माणसास समजण्यास सुलभ भाषेचा उपयोग करण्याच्या उद्देशाने 'ट्रान्सलेशन स्प्रिंट (अनुवाद दौड/भाषांतर कार्यशाळा)' 'शनिवार,दिनांक २६ नोव्हेंबर २०११ रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. ह्या उपक्रमाद्वारे ३२० संदेशांचे स्थानिकीकरण (लोकलायझेशन) पूर्ण करण्यात आले.

  • "CMDA IT Expo 2011, पुणे येथे १५ ते १८ डिसेंबर दरम्यान मराठी विकिपीडियाचे स्टॉल लावण्यात आले होते, त्यास पुणेकरांचा उत्तम प्रतिसाद लाभला. स्टॉलला सुमारे ३००० लोकांनी भेट दिली तर २५० पेक्षा जास्त लोकांनी सक्रीय सहभागासाठी नावे नोंदविली.
  • शनिवार दिनांक २४ डिसेंबरला 'मामासाहेब मोहोळ महाविद्यालय पुणे' येथे विद्यार्थांसाठी विकी शिकवणीचे आयोजन करण्यात आहे होते. शिकवणीत ५० विद्यार्थांनी भाग घेतला ज्यात ४०% विद्यार्थिनी होत्या.

२०१२ जानेवारी महिन्यातील आयोजित कार्यक्रम

  • ६ ते ८ जानेवारी - टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई
  • ७ - ८ जानेवारी - विकी शिकवणी टेक मराठी मेळावा, पुणे
  • १५ जानेवारी - W -11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि विकी शिकवणी, पुणे
  • १५ जानेवारी - W - 11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि टेक्याथॉन, मुंबई
  • २९ जानेवारी - विद्यार्थी मेळावा विकीशिकवणी , मराठी अभ्यास केंद्र, दादर मुंबई
विकिसंमेलन भारत २०११, मुंबई आढावा
मराठी ट्रॅक - विकिसंमेलन भारत २०११, मुंबई

मुंबईमध्ये भरलेल्या विकीसंमेलन २०११ च्या निमित्याने अनेक मराठी भाषाप्रेमी मंडळीना चर्चा करण्यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले. उपस्थितांमध्ये मराठी विकिपीडिया संपादक, मराठी साहित्यिक, राज्य मराठी विकास संथेचे अधिकारी, उच्य माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र शासनाचे माहिती अधिकारी, आय आय टी मुंबईचे संशोधक, पत्रकार, आणि मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी-माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या परिषदेत, इंग्रजी भाषेचे ‘विकिपीडिया’तील वाढते महत्त्व जितके अभ्यासू वृत्तीने मांडण्यात आले तितकेच मराठी भाषा या नव्या ज्ञानकोशात कशा पद्धतीने समाविष्ट होऊ शकते याचाही तज्ज्ञांनी चांगलाच ऊहापोह केला. मराठी माणसाचा तंत्रज्ञानाविषयीचा न्यूनगंड, त्याच्यामध्ये माहिती आणि आत्मविश्वासाचा असलेला आभाव, मराठी युनिकोडची माहिती नसणे किंवा टायपिंग न येणे, मजकूर संपादनाचे कौशल्य नसणे, इंटरनेटच्या सोयींचा आभाव, अगदी मराठी विकिपीडिया अस्तित्वात आहे याची माहिती नसणे, अशा अनेक अडचणींमुळे मराठी समाजाने या तंत्रज्ञानाकडे पाठ फिरवली आहे, असे प्रमुख तज्ज्ञांचे मत होते. मराठी भाषेला ज्ञानभाषेच्या पातळीवर आणून ठेवायचे असेल तर हाताशी असलेल्या तंत्रज्ञानाचा जोरकस वापर करण्याची गरज आली आहे, असेही काहींचे मत होते. सध्याच्या जमान्यात सोशल नेटवर्किंग साइटचा प्रभाव वाढत असताना लोकांमध्ये संवाद वाढत आहे. पण यामध्ये ज्ञानाची देवाणघेवाण कितपत होते हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या दृष्टीने सोशल नेटवर्किंग साइटवर जास्त वेळ बसणाऱ्या मंडळींनी आपला १० टक्के वेळ वाचवून ‘विकिपीडिया’त योगदान दिले तर त्याने भाषाव्यवहारात भर पडेल, शिवाय ज्ञानशाखेची ओळखही अनेकांना होईल असा विचार मांडण्यात आला, तर काही उपस्थितांनी भाषाशास्त्र, भाषासंवर्धन, मराठीतील नव्या शब्दांचा उपयोग, जुन्या शब्दांना पुनर्जन्म, इंग्रजी शब्दांसाठी नेमका प्रतिशब्द, भाषांतर, मजकुराचे उत्तमरीत्या संपादन अशा विविध पैलूंनाही स्पर्श केला. मराठी फाँट हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. त्यावर अनेक पर्याय सुचवण्यात आले. संमेलनादरम्यान आय आय टी मुंबईच्या संशोधकांनी 'ह्याक्याथॉन' ह्या तांत्रिक मार्गीकेतून 'नारायम' या फाँटचे मराठीकरण आणि सुलभीकरण पूर्ण केले.

या समस्यांच्या खोलाशी जाताना महाराष्ट्रातील प्रमुख ७ शहरांतील निवडक शाळांमध्ये मराठी ‘विकिअकादमी’ स्थापन करण्याचीही घोषणा मराठी विकिपीडियाने केली आहे. जेणेकरून, शिक्षक आणि विद्यार्थी या चळवळीशी जोडून घेतला तर दोघांच्याही ज्ञानकक्षा अधिक रुंदावत जातील. ‘विकिस्रोत’ ह्या बंधुप्रकल्पाची घोषणा, संस्कृत विकिपीडियाशी सहयोग, इतर माहिती आणि संपर्क माध्यमांचा वापर इत्यादी गोष्टींद्वारे मराठी विकिपीडिया चळवळ अधिक व्यापक करण्याचा उदेश जाहीर करण्यात आला. प्रसिद्धी माध्यमांनी मराठी विकिपीडियास मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिल्याचे संमेलनादरम्यान जाणवले.

* विकिप्रकल्पांकरीता प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते हवे आहेत..!

मराठी विकिपीडिया विकिसंमेलन भारत २०११ जाहीरनामा

  • महाराष्ट्रातील ७ प्रमुख शहरामधील निवडक शाळांमध्ये मराठी विकी अकादमीची आखणी करणे आणि तेथील शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या पर्यंत मराठी विकिपीडियाचे रीतसर प्रशिक्षण पोहोचवणे आणि मराठी विकिपीडियामध्ये भर घालणे.
  • संस्कृत विकिपीडियाशी सहयोग करून त्यांना प्रशिक्षण/ विकी शिकवणी आणि तांत्रिक गोष्टी या मध्ये मदत करणे.
  • मराठी विकिपिडीयावर "विकी स्रोत" ह्या बंधू प्रकल्पास सुरवात करणे.
  • मराठी विकिपीडिया इतर संपर्क माध्यमांद्वारे उपलब्ध करणे जसे मोबाईल, टॅब, सी डी आदी.
  • मराठी विकिपीडिया समविचारी मंडळींनी एकत्र येऊन माहितीचे आदान प्रदान करणे.
विकिपत्रिका प्रकाशक...
मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा...! * विकीपत्रिका संपादन मंडळात सहभागी व्हा !


पुनर्निर्देशन सदस्य चर्चा:अभिजीत साठे

आपल्या चर्चा पानावर खालीलप्रमाणे सुचना येत आहे

"अभिजीत साठे" सदस्य खाते नोंदीकॄत नाही.कृपया हे पान तुम्ही संपादीत किंवा नव्याने तयार करू इच्छिता का या बद्दल विचार करा.


वरील सुचनेचा अर्थ आपणास येथे दिलेले संदेश दिल्याचे तातडीने न लक्षात येता, जेव्हा केव्हा आपले स्वतःच्या चर्चा पानावर येणे होते तेव्हाच दृष्टीस पडणार.श्री.अभय नातूंशी चर्चा करून दोन्ही खात्यांचे एकत्रीकरण करावयाचे झाल्यास काय करावयास लागते याची माहिती उपलब्ध होऊ शकेल.निर्णय आपलाच असेल पण इतर सदस्यांशी आपणास संवाद पूर्ण होण्यास वेळ लागू शकतो या दृषीने लक्ष वेधणे एवढाच उद्देश आहे.


माहितगार १५:३१, १७ ऑगस्ट २०१० (UTC)

सर्व सदस्यांसाठी

तुम्ही पाने वगळण्याबद्दल बोलत आहात. पाने वगळतात म्हणजे तुम्ही एकप्रकारे सदस्यांचा अपमान करतात. प्रत्येक सदस्याचे ज्ञान हे प्रांत, भाषा आणि संस्कृती नुसार वेगळे असते. विकीपेडिया वर प्रत्येकजण आपल्या ज्ञानानुसार माहिती समाविष्ट करत असतो. आणि सदस्यांची पाने वगळण्याआधी आपण स्वतः काय दिवे लावले आहेत ते तपासून पहावे. विकीपेडिया म्हणजे जर तुम्ही तुमची जहागीर समाजात असाल तर तशी पूर्वसूचना सदस्यांना देऊन द्यावी. विकीपेडिया पेक्षा अनेक उत्तम वेबसाईट उपलब्ध आहेत. इथे येऊन स्वतःचा अपमान करून घेण्यापेक्षा ब्लॉग तयार करून लेख लिहिणे कधीही चांगले. वेगवेगळ्या विषयांवर लिहीलेले माझे अनेक लेख तुम्ही डिलीट केले आहेत. ४-४ तास घालून लिहिलेले तुमचे लेख जर कोणी वगळले तर कस डोकं फिरत याचा अनुभव एकदा घेऊन बघा.

जपानी राजकीय विभागांची रचना

नमस्कार अभिजित !

विद्यमान संरचनेनुसार इंग्लिश भाषेत ज्यांना 'रीजन' व 'प्रीफेक्चर' म्हटले जाते, तश्या दोन स्तरांमध्ये जपानाची प्रशासकीय विभागणी केली जाते. त्यातील 'रीजन' या शब्दाला प्रांत या संज्ञेपेक्षा 'प्रदेश' ही मराठी संज्ञा अधिक चपखल वाटते. प्रीफेक्चर ही संज्ञा जपान व चीन या दोन देशांमध्ये तुलनेने अधिक प्रचलित असून तिचे फ्रान्सातल्या डिपार्टमेंट व्यवस्थेशी बर्‍याच अंशी साधर्म्य जाणवते.. त्यामुळे त्यासाठी सध्या तुम्ही वापरलेली 'विभाग' ही संज्ञा किंवा 'प्रभाग' ही अजून एक पर्यायी संज्ञा चपखल ठरू शकते.

या संज्ञा योग्य वाटतात किंवा कसे, याबद्दल आपले मत जरूर कळवा.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:४०, १ जून २०११ (UTC)

माझ्या म्हणण्याचा सारांश : जपानात असलेल्या 'रीजन' स्तरावरील राजकीय विभागांना मराठीत 'प्रदेश' अशी संज्ञा वापरणे चपखल ठरेल. आणि 'प्रीफेक्चर' या संज्ञेला 'प्रभाग' (किंवा 'विभाग') अशी संज्ञा देणे अधिक योग्य ठरेल. कारण 'प्रांत' ही संज्ञा प्रामुख्याने राज्य/प्रॉव्हिन्स व्यापतीच्या राजकीय विभागांना उल्लेखण्यासाठी वापरली जाते. प्रीफेक्चर ही संज्ञा मात्र प्रॉव्हिन्स आणि डिस्ट्रिक्ट या दोन स्तरांच्या मधोमध बसेल, अश्या व्याप्तीची आहे. त्यामुळे त्याला प्रदेश (किंवा प्रांत) व जिल्हा या दोन स्तरांमध्ये फिट बसेल, अशी 'प्रभाग' (किंवा विभाग) अशी संज्ञा चपखल ठरते.
तुम्हांला ही सुचवणी पटत असल्यास, कृपया त्या अनुषंगाने दुरुस्त्या करू शकाल काय ?
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:४६, ५ जून २०११ (UTC)
हो. संबंधित लेखांमध्ये 'रीजन' स्तरातील लेखांना 'प्रदेश' अशी संज्ञा, तर 'प्रीफेक्चर' स्तरातील लेखांना 'प्रभाग' अशी संज्ञा वापरायला मला सांगकाम्या वापरून बदल करता येतील. उद्या रात्री केल्यास, चालेल काय ?
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:१५, ६ जून २०११ (UTC)
>>>>> मी ह्या पुढील लेखांमध्ये प्रिफेक्चर हा शब्द वापरेन. <<<<<
:)) काहीतरी गोंधळ झालेला दिसतोय - तुम्ही 'प्रदेश' आणि 'प्रभाग' अश्याच संज्ञा येथून पुढे वापरा.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:३३, ६ जून २०११ (UTC)

थोडे अधिक

नमस्कार अभिजित

आपण साचा निर्मिती करतच असाल तर तो सर्वसमावेशक व परिपूर्ण व्हावा ही सद्इच्छा, जेणेकरून भविष्यात इतर ठिकाणी त्याचा वापर चपखल बसावा ह्या दृष्टीने थोडी अधिक माहिती साच्यात समाविष्ट करावी असे वाटते.

'लोकेशन म्याप' ह्या साच्यात समुद्र सपाटी पासूनची उंची आणि प्रमाण वेळ इत्यादी बद्दल पण माहिती असावी का ? जर आपणास येग्या वाटले तर त्या कुपया अंतर्भूत कराव्या.

धन्यवाद

राहुल देशमुख ०२:४९, ३ जून २०११ (UTC)


विषय: साचा:अमेरिकेतील संस्थाने

मी या साच्यातील संस्थानांच्या नावांचे लिखाण दुरुस्त केले होते, ती दुरुस्ती तुम्ही परतवून नावे मुळात जशी चुकीची होती तसी केली आहेत असे दिसते आहे.

उदा० मी Arizona हा शब्द जसा लिहिला होता तो माझ्या संगणकावर(मोझिला फ़ायरफ़ॉक्स/इन्टरनेट एक्सप्लोरर-८) अ वर चंद्र काढून पुढे रिझोना असा दिसत होता(अ‍ॅ). तो आपण बदलवून अ नंतर एक गोळा आणि गोळ्यावर चंद्र असा(अॅ) केला आहे. हे चेंडूवर चंद्र काढलेले अक्षर मराठीत नाही.

Utah चा अमेरिकन उच्चार ju:tah म्हणजे यूटा असा आहे, मराठीत तो शब्द (अल्लाह प्रमाणे) उटाह असा लिहितात. आपण बदलवून युटा केला आहे, ही दुरुस्ती निखालस अयोग्य आहे. केंटकी, हाउलँड हे शब्द असे लिहिले तर त्यांचे उच्चार अनुक्रमे केण्टकी व हाउलॅण्ड असे होतील. इंग्रजीत ण नाही, तेव्हा केन्टकी आणि हाउलॅन्ड हेच लिखाण बरोबर आहे.

मिनिसोटा, लुइझियाना(मराठीत उपान्त्यपूर्व अक्षरे र्‍हस्वच असतात, आणि इंग्रजीतही!), ग्वाम(Compare, Guava), मरियाना, यू(यु नाही!) एस व्हर्जिन इत्यादी लिखाणेच बरोबर आहेत Porto Rico चे अस्सल उच्चार प्युएर्टो रिको किंवा पॉऽटयुरीकौ असे होतात. मराठीत पोर्टो रिको असेच लिहितात. पोर्तुगीज या शब्दाचा अपवाद सोडला तर T चे लिखाण ट असेच होते. पोर्टोरिकोसाठी कुठलेही भूगोलाचे मराठी पुस्तक काढून खात्री करून घ्यावी.

तेव्हा आपण परतवलेली आवृत्ती पुनःपरतवून पूर्ववत करावी हे विनंती....J १७:३५, १५ जून २०११ (UTC)

J, अभिजित,
तुमच्या चर्चेत दखल देत आहे म्हणून आधीच क्षमा मागतो.
युटा, मिनेसोटा, लुईझियाना, तसेच इतरही सगळ्याच स्थळनामांना मराठी व्याकरण, शुद्धलेखनाचे नियम बिलकुल लावू नयेत. यावर अनेकदा चर्चा झालेली आहे आणि ते पुन्हापुन्हा उगाळण्यात मला स्वारस्य नाही. व्यक्तिनाम, स्थळनाम हे या नियमांतून पूर्णपणे वगळण्यात यावे.
चेंडूवर चंद्र काढलेले अक्षर मराठीत नाही.
चेंडूवर चंद्र हा तुमच्या संगणकाचा किंवा संगणकाचा दोष असावा. अभिजितप्रमाणे मलाही अॅरिझोना व्यवस्थितच दिसत आहे.
अभय नातू ००:५६, १६ जून २०११ (UTC)
धन्यवाद, अभय! कधीकधी व्याकरणाचा कीस न पाडता प्रचलित नावेच वापरावीत असे माझेही मत आहे. इंग्लिशमध्ये मिनिसोटा असा उच्चार कधीही केला जात नाही. तसेच स्पॅनिश भाषेमध्ये ट हे अक्षर वापरात नाही. पोर्तो रिकोच (पोर्टो रिको नव्हे) योग्य आहे.
हा वाद आता संपुष्टात आला असे समजायला हरकत नाही तर...
अभिजीत साठे ०१:१४, १६ जून २०११ (UTC)

शब्दकोशांत, उच्चारकोशांत आणि आंतरजालावरील मिनिसोटा

ऑक्सफ़र्ड, अमेरिकन हेरिटेज कोश, डॅनियल जोन्ज़चा एकमात्र जगन्मान्य उच्चारकोश आणि आंतरजालावरील अनेकानेक संकेतस्थळे (उदा० इंगोलो, अ‍ॅप, फ़ॉर्व्हो, ऑडियोइंग्लिश वगैरे) मिनिसोटाचा उच्चार मिनिसोटा असाच दाखवतात. तीच कहाणी मी दुरुस्त केलेल्या सर्व उच्चारांची! पहा:

Phonetic Pronunciation: mih-nuh-SOE-tuh...Ingolo

ˌmɪnɪˈsəʊtə ....forvo

Minneota Min-ee-oh'-tuh ...ap.org

Pronunciation (US): mˡInIsoʊtə ...auduoenglish.net

...J ०७:२५, १६ जून २०११ (UTC)


मी स्वतः मिनेसोटामध्ये वास्तव्य केलेले आहे. तुम्ही उद्धृत केलेले शब्दकोश चुकलेले आहेत.
इतर कहाण्यासुद्धा याचप्रकारे चूक ठरतात.
अभय नातू १३:२७, १६ जून २०११ (UTC)

पोर्टो रिको

पोर्टो रिकोचे दोन उच्चार मी अगोदर दिलेच आहेत. आणखीही काही उच्चार सापडले. अमेरिकन हेरिटेज शब्दकोशात पोर्टो रिकोचे उच्चार: प्वेर्टऽ रीकोऽ(pwěr'tə) (rēkō), पोर्टऽ(pŏrtə) रीकोऽ, पोऽर्टऽ(pōrtə) रीकोऽ, प्वेर्टोऽ(pwěr'tō,) रीकोऽ असे दिले आहेत. पोर्तो रिको हा उच्चार शब्दकोशात सापडला नाही. पोर्टो रिको अमेरिकेचा भाग असल्याने स्पॅनिश उच्चारापेक्षा त्याचे अमेरिकन उच्चार प्रमाण मानायला पाहिजे. पोर्तो रिको जर बरोबर समजायचा असेल तर मराठीतली सर्व भूगोलाची पुस्तके, नकाशासंग्रह आणि प्रवासवर्णनांतील त्या शहराचे उल्लेख बदलायला पाहिजेत....J १२:३९, १६ जून २०११ (UTC)

पोर्तो रिको जर बरोबर समजायचा असेल तर मराठीतली सर्व भूगोलाची पुस्तके, नकाशासंग्रह आणि प्रवासवर्णनांतील त्या शहराचे उल्लेख बदलायला पाहिजेत
अगदी बरोबर. आपण पूर्वापार स्वतःच्या समजानुसार केलेली अनुमाने बदलण्याची वेळ आलेली (नव्हे कधीच येउन गेलेली) आहे.
जगात मिसळून राहण्यासाठी इतरांच्या चालीरीती समजून घेउन आपले समज बदलणे ही खूप महत्वाची गरज आहे.
अभय नातू १३:२९, १६ जून २०११ (UTC)

स्रोत बातमी साच्यांचे मराठीकरण

नमस्कार अभिजित !

साचा:स्रोत बातमी व तत्सम स्रोत साचे काही महिन्यांपूर्वी मराठीकरण करून सर्वत्र बदलले होते. याचे मुख्य कारण मराठी विकिपीडियावर संपादन करताना वरचेवर लिपी बदलावी लागणे संपादण्याच्या प्रक्रियेत अडथळ्यासारखे ठरते. त्यामुळे त्यातील सर्व पॅरामीटरांचे मराठीकरण करून बॉट चालवून मोठे काम पार पाडावे लागले.

इंग्लिश विकीवरून संदर्भ कॉपी करताना त्याचे मराठीकरण करणे ही जबाबदारी येत असली, तरीही त्यामागे मराठी विकीची प्रधानभाषा मराठी राखण्याचे तत्त्व व दूरगामी उद्दिष्ट असल्यामुळे थोडे कष्ट क्षम्य मानावेत.. त्यासाठी इंग्लिश पॅरामीटरांची उपलब्धता शक्यतो करून देऊ नये, असे माझे मत आहे. कारण एकदा या पहिल्या पायरीवर आळस झाला, की मग स्रोत नोंदींच्या इंग्लिश शीर्षकांचे (आणि प्रकाशक, दिनांक, वर्ष, आणि महत्त्वाचे म्हणजे भाषा पॅरामीटराची नोंद) मराठीकरण करण्याच्या दुसर्‍या पायरीवरही आळस घडतो. तो समूळ टाळण्यासाठी इंग्लिश पॅरामीटर उपलब्ध न करून देणे हे उत्तम !

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १७:०६, १९ जून २०११ (UTC)

प्रताधिकार ?

नमस्कार !

गेल्या काही दिवसांत तुम्ही चढवलेल्या संचिकांच्या प्रताधिकारांविषयी खुलासा नसल्यामुळे, त्या तुम्ही काढलेल्या/बनवलेल्या संचिका नसव्यात व प्रताधिकारित असाव्यात असे वाटते. तूर्तास त्या संचिकांवर मी साचा:प्रताधिकारित हा साचा लावून ठेवत आहे. भविष्यात त्यावरून संबंधित संस्थांचे/कंपन्यांचे/व्यक्तींचे/अन्य कुणाचे प्रताधिकारविषयक आक्षेप आल्यास, त्या संचिका वगळाव्या लागतील.

दरम्यान तुमच्याकडे यासंदर्भात काही प्रताधिकारविषयक अधिकृत परावानापत्र असल्यास, त्याची नोंद त्या-त्या संचिकेवर करावी.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:३१, २० जून २०११ (UTC)

मुखपृष्ठ सदर

नमस्कार,
अलीकडेच मी मुखपृष्ठ सदर महिनोन्महिने बदलावीत असे मत विकिचावडीवर मांडली आहे... तर ह्यावर अभय नातूंची प्रतिक्रिया आपण चावडीवर वाचू शकता. तर त्यांनी नोंदविल्याप्रमाणे मूठ्भर लोक सोडल्यास अनेकजण उदासिन आहेत. त्यामुळे मी काही बेत आखले आहेत. हा महिना संपण्यास अजून तरी ८ दिवस आहेत... अनेक लेखांची भर घालतानाच आपण दुसर्‍या बाजूने काही लेख विकसित/प्रगल्भीत केले तर? उदा. अलीकडे तुम्ही काम करीत असलेले मेक्सिको/मेक्सिकोची राज्ये हे लेख विकसित करायला घेतले तर? मी मला जमेल तशी भरपूर माहिती घालण्याचा प्रयत्न करीन... त्यात अशुद्धलेखन आढळले तर तो सांभाळून दुरुस्त करून घ्या. असे लेख विकसित करण्यासंदर्भात मी आण्खी काही विकिसदस्यांना सांगायचा प्रयत्न करतो. मी स्वतः आणखी काही लेख विकसित करता येईल का हे बघतो. आपले सहाय्य लाभल्यास खूप बरे होईल.

अनिरुद्ध परांजपे ०४:४२, २२ जून २०११ (UTC)

सॉर्ट-सक्षम सारण्या

अभिजित, तांत्रिक अडचणी काय आहेत हे पाहतो आणि त्यावर काही पर्याय आहे का तेही चाचपून कळवतो. दरम्यान अभय किंवा अन्य कुणा लोकांना काही उपाय माहीत आहे का, तेही एकदा विचारून बघू शकता.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०१:१३, २ जुलै २०११ (UTC)

सहयोगी सहभाग आणि भूगोल प्रकल्प आरंभण्याविषयी

नमस्कार अभिजित !

भूगोलविषयक लेखांची निर्मिती व संपादन तुम्ही सातत्याने करत आहात. तुमच प्रयत्न कौतुकास्पद आहेतच. परंतु राजकीय भूगोल या विषयाची व्याप्तीच एवढी प्रचंड आहे, की मराठी विकिपीडियावरील भूगोलविषयक किंवा किमान राजकीय-भूगोलविषयक लेखांना आकार देण्यासाठी व त्यातून दर्जेदार, माहितीपूर्ण लेख घडवण्यासाठी विकिप्रकल्प उभारून त्यातून विशिष्ट कामांचे प्रस्ताव तडीस नेणे (निवडक लेखांची सूची बनवून त्या लेखांमध्ये माहितीची भर टाकणे; त्या कामावर मेहनत घेणार्‍या कार्यगटाने कामांचे ठराविक टप्प्याने पाठपुरावा करत संकल्पित मुदतीत काम पुरे करणे; थोडक्यात प्रकल्प व्यवस्थापनाची कॉर्पोरेट तंत्रे योजून काम करणे) आवश्यक बनले आहे. विकिप्रकल्पाची संकल्पना जाणून घ्यायला विकिपीडिया:चरित्र प्रकल्प व त्यावरील विकिपीडिया:चरित्र प्रकल्प/प्रस्तावित कामे हे पान जरूर पाहा.

तुम्हांला या विषयात रुची आहे; त्यामुळे याबाबत पुढाकार घेऊन भूगोलविषयक किंवा किमान राजकीय भूगोलविषयक विकिप्रकल्प सुरू करण्याबाबत आपण प्रयत्न करू शकाल काय ? मलादेखील भूगोलविषयक लेखांमध्ये संपादने करायचा उत्साह असल्यामुळे आरंभीच्या काळात प्रकल्पव्यवस्थापनात व कार्यप्रस्तावांवर काम करण्यासाठी मी मदत करू शकतो. मात्र प्रचालकीय कामे, सर्वसाधारन व नैमित्तिक संपादने आणि मी पुढाकार घेऊन चालू केलेल्या विकिपीडिया:चरित्र प्रकल्प/प्रस्तावित कामे येथील कामांच्या व्यवस्थापनातून भूगोलविषयक विकिप्रकल्प चालू करायला काही जमले नाहीय. त्यामुळे ही कल्पना तुमच्यापाशी मांडून बघत आहे. तुमची मते जरूर कळवा.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०२:४१, ९ जुलै २०११ (UTC)

नमस्कार अभिजित ! कट्यारे (निनाद) यांच्या पुढाकाराखाली विकिपीडिया:विकिप्रकल्प हिंदू धर्म असा प्रकल्प नुकताच सुरू केलाय (म्हणजे प्रकल्प व त्याची कामे काही दिवसांत सुरू होतील; किमान आवश्यक पायाभूत सुविधा बनवल्या आहेत.). तुम्ही समन्वयक म्हणून काम पाहायला उत्सुक असाल, तर विकिप्रकल्प भूगोलदेखील आरंभता येईल. तुमचे विचार जरूर कळवा.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:१६, १ ऑगस्ट २०११ (UTC)

विकिप्रकल्पाचे फायदे

सध्या कदाचित दोन-तीन नेहमीचेच लोक असतील; पण कालांतराने ते वाढतीलही. विकिप्रकल्पाचा मुख्य फायदा असा की त्यामुळे लेखांचे पद्धतशीर विस्तारीकरण करणे सुलभ ठरते. करायच्या असलेल्या कामाचा पाठपुरावा करून सामूहिक पातळीवर व्यवस्थापन करणे सोपे ठरते. नाहीतर तुम्ही तुमची स्वतःची लेखांची सूची अनुसरणार, मी माझ्या अजेंड्याने काम करणार आणि मराठी विकिपीडियावर भूगोलविषयक लेखांची नमेकी सद्यस्थिती काय, त्यात कोणती कामे झाली, कोणती करणे अत्यावश्यक आहे, कोणती कामे आवश्यक नसली, तरीही पूरक आहेत इत्यादी गोष्टींचे भान राखणे अवघड ठरते. त्यामुळे विकिपीडियावरील आपल्या सर्व नेहमीच्या सदस्यांच्या प्रयत्नांची हळूहळू सहयोगी सांगड घालत पस्तीस हगारी लेखांच्या कोशप्रकल्पाच्या व्यवस्थापनाची घडी घालून घ्यायला हवी.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:४४, १ ऑगस्ट २०११ (UTC)

कोडे कसे सोडवायचे ?

संकल्पचे म्हणणे बरोबर आहे. पण तरी प्रकल्प सुरुकार्ण्यासाठी किमान स्वरुपाची विशिष्ट विषयावर रुची ठेवणारी काही मंडळी (डेडीकेटेड) असावी म्हणजे ते प्रकल्पास आकार देऊ शकतील. काही जुने आणि काही नवे अशी सांगड घातली तर दुग्ध शर्करा. आता हिंदू धर्म प्रकल्पासाठी ४ जुने आणि ४ नवीन अशी ८ लोक केवळ दिनविशेष ह्या कामा साठी सहयोग करायला आज तयार झाली आहे. तेव्हा प्रकल्प पहिले कि सदस्य पहिले हे कोडे कसे सोडवायचे ? मला वाटते मूळ नियमा प्रमाणे किमान ४ सदस्य तरी असावेत. अन्यथा आपणास भविष्यात आजारी प्रकल्पांचा वर्ग निर्माण करावा लागेल. राहुल देशमुख १६:४१, ३ ऑगस्ट २०११ (UTC)

नवीन प्रकल्प

मराठी विकिपीडियावर प्रकल्प बावन्नकशी पासून दालननिर्मितीपर्यंतचे अनेक प्रकल्प धूळ खात पडलेले आहेत. त्यात अजून एक भर घालण्यापेक्षा असलेल्या गोळा झालेल्या चमूने एखाद्या प्रकल्पावर थोडेसे का होईना काम करावे असे माझे मत आहे. याने प्रकल्पउभारणीसाठी काय लागते हे लक्षात येईल, प्रत्येकास आपापल्या संपादनक्षमतेबद्दल अधिक चांगला अंदाज येईल, टीमवर्क करण्याचा सराव होईल आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे अडगळीत पडलेल्या एखाद्यातरी प्रकल्पाची सुटका होईल.

अभय नातू १६:५९, ३ ऑगस्ट २०११ (UTC)

आजारी प्रकल्प

  • >>>>भूगोल प्रकल्पसंकल्प,
आपण सुचवल्याप्रमाणे भूगोल प्रकल्प सुरु करण्यास व पुढाकार घेण्यास माझी काहीच हरकत नाही. मला ह्या विषयात रुची आहे. प्रश्न असा आहे की इतर असे किती सदस्य आहेत जे ह्यामध्ये महत्वपूर्ण योगदान देउ शकतील. ४-५ जरी interested मेंबर्स असतील तरी चालेल परंतु केवळ आपण, मी व इतर नेहमीचेच लोक काम करणार असतील तर त्यासाठी प्रकल्प कशाला हवा असे वाटते. नाहीतरी सध्या लेख विस्तारणे (मंदगतीने का होईना) सुरूच आहे.
अभिजीत साठे १६:२६, १ ऑगस्ट २०११ (UTC)


  • प्रकल्प हिंदू धर्म हा संकल्पनि सुरु करूनच दिला आहे, निनाद त्याचे काम पाहायला तयार आहे तेव्हा ह्या कामास आता मोडता न घालता त्यावरच लक्ष केंद्रित करावे असे वाटते. अभिजितने व्यक्त केलेली शंका रास्त आहे. तसेच नवीन प्रकल्पाला काही किमान उद्दिष्ट आणि काही ढोबळ कालमर्यादा पण आखून ध्यावी आणि दर ठराविक कालावधीने प्रकल्पाच्या कामाचा आढावा चावडी प्रगतीवर मांडावा असे वाटते. ह्यामुळे आपण आजारी प्रकल्पाच्या आजारपणा पासून वाचू शकू. राहुल देशमुख १८:४५, ३ ऑगस्ट २०११ (UTC)
येथे माझा किंवा अभिजितचा उद्देश कामास मोडता घालण्याचा नसून पूर्वी झालेल्या चुका (खंडीभर प्रकल्प सुरू करुन ते अडगळीत टाकणे) नजरेस आणून देण्याचा आहे. नवीन प्रकल्प त्याच वाटेने जाऊ नये ही आशा. तसेच, नेहमीचे २-३ सदस्यच काम करणार असतील तर मग प्रकल्प वगैरेचे ओव्हरहेड कशाला?
असो. नवीन प्रकल्पाला शुभेच्छा आणि जमेल तशी मदत करण्याचे आश्वासन. तांत्रिक मदत लागल्यास तत्परतेने मदत करण्याचेही आश्वासन.
ही चर्चा चावडीवर लिहिल्याप्रमाणे प्रकल्प पानावर हलवता येईल?
अभय नातू २०:३६, ३ ऑगस्ट २०११ (UTC)

विकिप्रकल्प भूगोल

नमस्कार अभिजित ! विकिपीडिया:विकिप्रकल्प भूगोल हे पान बनवले आहे. आता विकिपीडिया:चरित्र प्रकल्प या विकिप्रकल्पात जशी विकिपीडिया:चरित्र प्रकल्प/चालू कामेविकिपीडिया:चरित्र प्रकल्प/प्रस्तावित कामे ही पाने बनवून तिथे एकेक कार्यप्रस्ताव (कामे/टास्क) नोंदवले आहेत, त्याप्रमाणे विकिपीडिया:विकिप्रकल्प भूगोल/चालू कामेविकिपीडिया:विकिप्रकल्प भूगोल/प्रस्तावित कामे येथे आपण आपल्या प्रस्तावित मनसुब्यानुसार काही लेखांची सूची बनवून कार्यप्रस्ताव म्हणून ठेवू शकता. मग त्या कामात काय-काय गोष्टी करायच्या आहेत, ते मुद्दे/निकष नोंदवून ढोबळमानाने प्रस्तावित मुदत लिहू शकता किंवा अन्य सदस्यांना आवाहन करून मुदतीविषयी मते मागवू शकता. नंतर काम चालू असताना त्याच कार्यप्रस्तावाच्या सारणीत झालेल्या कामांबद्दल अद्यतन टाकून एकंदरीत कामाचा नियमित पाठपुरावा करता येईल.

यासंदर्भात काही मदत लागल्यास जरूर कळवा.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:३८, ९ ऑगस्ट २०११ (UTC)


चर्चेचा मतितार्थ

वरील चर्चेचा मतितार्थ नवीन व्रकल्प सुरुकरूनये असा असताना (मला उमगलेला ) हा प्रकल्प सुरु करण्याचे कारण काय ? प्रकल्पास विरोध मुळीच नाही पण मग चर्चेचा आर्थ काय ? भविष्यातील धोरण काय ? राहुल देशमुख २३:११, ९ ऑगस्ट २०११ (UTC)

Collapsible list

अभिजित,

या साच्याच्या कागदपत्रांवरतरी तो नीट चालत असल्याचे दिसत आहे (लपलेल्या अवस्थेत प्रथमावतीर्ण होणे). इतर ठिकाणी काय चालले आहे ते बघतो. कोणेते विशिष्ट पान तुम्ही संपादित आहात?

अभय नातू २०:२५, २२ जुलै २०११ (UTC)

आग्नेय आशिया
दोन पॅरामीटर घालायचे होते. ते घातल्यावर नीट दिसत आहे.
अभय नातू २१:४१, २२ जुलै २०११ (UTC)

दिसामाजी काही तरी ते लिहावे

अभिजित,

तुमचे रोजचे ३-४ लेख पाहून दिसामाजी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे या समर्थांच्या शिकवणीची आठवण होते.

अभय नातू १९:५६, २७ जुलै २०११ (UTC)

अभय म्हणतो ते खरंय. तुमच्या सातत्यपूर्ण सहभागाबद्दल तुम्हांला चहा/कॉफी/सरबत/बियर - जे हवे असेल, ते ! :)
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०४:४०, ३० जुलै २०११ (UTC)

इ.स., स्रोत संकेतस्थळ साचा इत्यादी

नमस्कार !

निकोलॉ माक्याव्हेल्ली या लेखात काही सुधारण केल्या; त्यावरून काही किरकोळ (पण नेमकेपणा आणि मांडणीच्या दॄष्टीने उपयुक्त) अश्या सूचना नोंदवाव्याश्या वाटतात :

  • व्यक्तिपर लेखात पहिल्या वाक्यात त्या व्यक्तीच्या नावाचे मराठीतील लेखन, नंतर कंसात स्थानिक भाषेतील/स्थानिक लिपीतील लेखन, त्यानंतर स्वतंत्र कंसात जन्मदिनांक व मॄत्युदिनांक अशी अत्यावश्यक माहिती नोंदवावी.
  • जन्मदिनांक, मृत्युदिनांक आणि अन्य दिनांक इसवी सनात असल्यास आकड्यांअगोदर शक्यतो 'इ.स.' असे लिहावे; जेणेकरून कालमापन पद्धतीचा नेमकेपणा अधोरेखित होतो.
  • बाह्य दुवे किंवा <ref>...</ref> टॅग वापरताना शक्यतो साचा:स्रोत संकेतस्थळ हा साचा वापरावा; जेणेकरून प्रकाशक, दिनांक, भाषा इत्यादी बाबी सुव्यवस्थित रीतीने लिहिता येतात.

बाकी, विकिपीडिया:विकिप्रकल्प भूगोल या नावाने विकिप्रकल्पाची पाने बनवायला सुरुवात करेन. आपण या विकिप्रकल्पात समन्वयक म्हणून पुढाकार घ्यावा ही विनंती. या प्रकल्पात मलाही व्यक्तिशः रस असल्याने मीही कार्यप्रस्तावांवर काम करायला हजर असेन.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:५०, ९ ऑगस्ट २०११ (UTC)

Invite to WikiConference India 2011


Hi Abhijitsathe,

The First WikiConference India is being organized in Mumbai and will take place on 18-20 November 2011.
You can see our Official website, the Facebook event and our Scholarship form.

But the activities start now with the 100 day long WikiOutreach.

Call for participation is now open, please submit your entries here. (last date for submission is 30 August 2011)

As you are part of Wikimedia India community we invite you to be there for conference and share your experience. Thank you for your contributions.

We look forward to see you at Mumbai on 18-20 November 2011


  • अभिजित मेल चेक करा आणि उत्तर द्यावे. राहुल देशमुख २०:०२, २२ सप्टेंबर २०११ (UTC)

खालील प्रस्तावावर तुमचे मत हवे

mw:Extension:TitleBlacklist हे एक्सटंशन मराठी विकिपीडियावर अलरेडी आहेच त्याच्या अनुषंगाने विकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न#Blocking of article titles in roman script by anon and new users हा प्रस्ताव मांडला आहे. प्रस्तावावर तुमचे मत हवे आहे. धन्यवाद माहितगार ०६:००, २१ ऑगस्ट २०११ (UTC)

एक किरकोळ दुरुस्ती

नमस्कार अभिजित ! टेनिस स्पर्धांविषयीच्या पानांवर तुम्ही संपादन करत असताना "हे ही पहा" असा उपविभाग लिहिला गेल्याचे आढळले. शुद्धलेखनाच्या नियमांनुसार "ही" हा शब्दयोगी अव्यय असल्यामुळे तो आधीच्या शब्दाला जोडून लिहितात. त्यामुळे त्या उपविभागाचे शीर्षक हेही पाहा असे लिहिणे योग्य आहे.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ००:५५, २३ सप्टेंबर २०११ (UTC)

"ऐतिहासिक लोकसंख्या" साच्यात वर्षांना "इ.स." टाकणे अधिक योग्य ठरेल, असे वाटते. मात्र त्यात त्या स्तंभाची रुंदी वाढत नसल्यामुळे "इ.स." आणि इसवी सनाचे आकडे वेगवेगळ्या ओळींवर दिसत होते. तुम्ही तूर्तास तो बदल परतवलेला पाहिला. या संदर्भात काही करता येईल काय ?
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०६:५४, ४ नोव्हेंबर २०११ (UTC)
थँक्स. भूगोलावर जोमदार काम चालले आहे. :) तुमचे काम पाहून माझ्यातही उत्साह संचरतो. :D --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १७:१५, ४ नोव्हेंबर २०११ (UTC)

रोमन आकडे

नमस्कार अभिजित !

२००९ विंबल्डन स्पर्धा या लेखात व अन्य काही लेखांमध्ये सामन्यांचे सेट-विश्लेषण लिहिताना रोमन आकडे घातलेले दिसत आहेत. विकिपीडियावर सर्वत्र वापरल्या जाणार्‍या मराठी देवनागरीतल्या अंकांना अनुसरून तेथील आकडे मराठी देवनागरीत लिहिणे योग्य ठरेल. कृपया योग्य तेथे बदल करावेत, अशी विनंती.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०२:३६, २७ सप्टेंबर २०११ (UTC)

हरकत नाही. सांगकाम्या चालवून या दुरुस्त्या करता येतील; पण त्यासाठी या लेखांचे व्यवस्थित वर्गीकरण केले गेले असेल, तर सांगकाम्यास तसे लेख हुडकणे सोपे ठरते. तुम्हांला कोणत्या ट्प्प्यावर (म्हणजे नेमके कधी) या दुरुस्त्या करणे योग्य ठरेल असे वाटते, ते कळवा. म्हणजे त्यावेळी मी सांगकाम्या चालवून एकदमच हे काम उरकून टाकेन.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १३:५२, २७ सप्टेंबर २०११ (UTC)
आता सांगकाम्या लावून बदल करू काय ?
बाकी, तुमच्या सदस्यपानावर पुनर्निर्देशन आहे, त्यामुळे गोंधळ उडत आहे. तुम्ही अभय नातूंना विचारून सदस्यनावच बदलून घेता येत असेल, तर तसे घेणे सोयीस्कर पडेल.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:०९, ६ ऑक्टोबर २०११ (UTC)
अभिजित, सांगकाम्या लावून रोमन आकडे बदलायला काही तांत्रिक अडचणीमुळे सध्या मर्यादा पडल्या आहेत. कारण एडब्ल्यूबी (ऑटोविकिब्राउझर) वापरून रोमन आकड्यांचे देवनागरीकरण करायला काही अडचणी येताहेत. त्यातील काही अवजारे (टूल) सर्च-अँड-रिप्लेस करायला वापरल्यास, त्यामुळे आंतरविकी दुवे/चित्रांची पिक्सेल रुंदी/साचे यांमधील रोमन आकडेही टिपले जाताहेत, असे आढळले. त्यामुळे तूर्तास रोमन आकडे मजकूर प्रत्यक्ष संपादतानाच बदलणे इष्ट ठरेल.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:४२, १७ ऑक्टोबर २०११ (UTC)
अभिजित, वर लिहिलेल्या कारणांमुळे रोमन आकड्यांचे मराठीकरण सोपी बाब नाही. तू सध्या बनवत असलेल्या १९३६ उन्हाळी ऑलिंपिक वगैरे लेखांमध्ये पदकतक्त्यांत रोमन अकडे राहून गेल्याचे दिसते. तसे शक्यतो होऊ देऊ नकोस. --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ००:११, ७ डिसेंबर २०११ (UTC)

झालेला घोळ

सांगकाम्याने केलेला घोळ काय झाला आहे ते सांगण्याची कृपा व्हावी. साच्यातील रोमन अंक मराठी झाल्यावर लेखात कोणताही परीणाम झाल्याचे दिसले नाही फक्त रोमन आकडे मराठीत आले आहे हे दिसल्यावरच जतन केले. घोळ घालायचा असता तर सगळ्या लेखात झाला असता. पण सांगकाम्या फक्त प्रयोग करून पाहत आहे. संतोष दहिवळ १९:४५, ७ ऑक्टोबर २०११ (UTC)

धन्यवाद

संतोष दहिवळ १८:५३, १० ऑक्टोबर २०११ (UTC)

भाषांतरात सहाय्य हवे

नमस्कार भाषांतर प्रक्रीयेत आपण नेहमीच अग्रनी राहीला आहात.प्रताधिकाराचा क्लिष्ट विषय सुसह्य होण्याच्या दृष्टीने जे काही लेख इंग्रजी विकिपीडियातून मराठी विकिपीडियावर अनुवादीत करून हवे आहेत त्यात en:Free content या लेखाचाही समावेश आहे . आपण पुढाकार घेऊन en:Free content लेखाचे भाषांतर घडवून आणावे ही आग्रहाची विनंती माहितगार ०८:३०, २१ ऑक्टोबर २०११ (UTC)

प्रचालकत्वासाठी नामांकन

अभिजित, माझ्या चर्चापानावर नरसीकर व दहिवळ यांनी तुझे नाव प्रचालकपदासाठी नामांकित करावे, अशी सूचना लिहिली आहे. व्यक्तिशः माझाही त्यांच्याप्रमाणेच विचार आहे. सध्या मराठी विकिपीडियाला तांत्रिक बदल, नेहमीची देखभालीची कामे व मार्गदर्शन अश्या सर्व बाबींसाठी अनुभवी सदस्यांची आवश्यकता आहेच. अनुभव, दर्जेदार योगदान व संयत/सहयोगी कार्यशैली उत्तमपणे जमणार्‍या सदस्यांना प्रचालकत्वाचे अधिकारही लाभले, तर त्यांच्या योगदानाचा अधिकाधिक लाभ मराठी विकिपीडियास होतो. त्यामुळे तू ही सूचना मनावर घ्यावीस, अशी तुला विनंती आहे. तुझी काही हरकत नसल्यास, मी उद्या माझ्या सकाळी तुझे नामांकन विकिपीडिया:कौल/प्रचालक येथे मांडेन.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १७:०५, ११ नोव्हेंबर २०११ (UTC)

अभिजित, तुम्हाला प्रचालकत्व देण्यात यावे, असा प्रस्ताव मी विकिपीडिया:कौल/प्रचालक येथे मांडला आहे. धन्यवाद. --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०३:१८, १२ नोव्हेंबर २०११ (UTC)

location map

आपल्या सवडीवर हिरोशिमात location map टाकून देता येईल काय? संतोष दहिवळ १८:२४, १५ नोव्हेंबर २०११ (UTC)

येथील योगदानासाठी कार्यरत राहिल्याबद्दल समस्त विकिपिडियन्सतर्फे हा तारा - माहितगार ०३:३४, २९ नोव्हेंबर २०११ (UTC)

ऑटोविकिब्राउझर

नमस्कार अभिजित ! "ऑलिंपिक खेळात अमुकतमुक" ह्या लेखांवर तुम्ही ऑटोविकिब्राउझर लावून काही बदल केल्याचे पाहिले. त्यात "वर्ग:ऑलिंपिक खेळात देश" या वर्गातून लेख काढले गेले आहेत. त्याचे काही खास कारण होते काय, हे जाणून घ्यावेसे वाटते.

खेरीज हे लेख कोरे (मार्गक्रमण साचे सोडल्यास) असल्यामुळे यात नेमके विकिकरण काय करावे, हे स्पष्ट झाले नाही. हे साचे बरेच महिने कोरे असल्यामुळे खरे तर "पानकाढा" साचा लावणे अधिक योग्य ठरेल.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०६:१४, १ डिसेंबर २०११ (UTC)

ता.क.: या लेखांची शीर्षके "ऑलिंपिक खेळांत अमुकतमुक" अशी असणे योग्य ठरेल; कारण Olympic games (/Olympics) या अनेकवचनी रूपातील शीर्षकाचे मराठी भाषांतर "ऑलिंपिक खेळ" असे होत असले, तरीही त्यातील "खेळ" हे रूप प्रथमा विभक्तीतील एकवचनातील नसून अनेकवचनातील आहे. "खेळ" या नामाची अनेकवचनातील अन्य विभक्त्यांतील रूपे "खेळांना" (द्वितीया/चतुर्थी), "खेळांनी"(तृतीया), "खेळांचा/खेळांची/खेळांचे" (षष्ठी), "खेळांत" (सप्तमी) अशी होतात. त्यामुळे प्रस्तुत लेखांची शीर्षक सप्तमी विभक्तीच्या अनेकवचनी रूपानुसार "ऑलिंपिक खेळांत अमुकतमुक(देश)" अशी व्हायला हवीत.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०७:५४, १ डिसेंबर २०११ (UTC)

प्रचालकपद

अभिजित,

प्रचालकपद मिळाल्याबद्दल व्यक्तिशः शुभेच्छा आणि अभिनंदन. तुम्ही मराठी विकिपीडियावर दिलेल्या योगदानात अधिकाधिक भर पडो ही आशा.

अभय नातू ०२:१३, २ डिसेंबर २०११ (UTC)

रोमन आकडे

अभिजीत,

नुकताच १९७६ उन्हाळी ऑलिंपिक#पदक तक्ता येथे रोमनचे मराठी आकडे केले आहेत. हे करताना manual editing केलेले नाही. find and replace many या पद्धतीची query वापरून एका क्लिकमध्ये हे केले आहे. मला वाटते त्यामुळे पिक्सल आणि साच्याच्या कोणत्याही पॅरामीटरमध्ये बदल झालेत असे मला तरी दिसत नाही. तरीही आपण यावर नजर टाकून मला कळवावे म्हणजे अशा पद्धतीचे सगळे बदल मला माझ्या मोकळ्या वेळेत करता येतील किंवा या पद्धतीची तुम्हालाही माहिती देता येईल. आणि ही पद्धतही चुकलीच असेल तर बदल उलटवावा व मला क्षमा करावी. संतोष दहिवळ १३:१९, ८ डिसेंबर २०११ (UTC)

मी ही हे नवीनच पाहिले आहे. थोडा अधिक अभ्यास करतो आणि आपल्याला कळवतो. तूर्तास सॉफ्टवेअरचा स्नॅपशॉट पाठवित आहे. संतोष दहिवळ १४:१४, ८ डिसेंबर २०११ (UTC)
सध्या तरी एक पान उघडून एक क्लिक करावी लागतेय एकदमच सगळी पाने घेता येतील की नाही शंकाच वाटतेय. बघू यात तोपर्यंत पाने वाढवली तरी चालतील. संतोष दहिवळ १७:४९, ८ डिसेंबर २०११ (UTC)
ऑलिंपिक स्पर्धांविषयीच्या लेखांवर तुटून पडलाय जणू! भले शाब्बास. :) --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:२०, १५ डिसेंबर २०११ (UTC)


सांगकाम्या

अभिजित,

सांगकाम्या चालवण्या साठी वेगळे खाते तयार करावे. ह्या खात्यास बॉट फ्ल्याग साठी अभय कडे विनंती करावी आणि सांगकाम्या खात्यातूनच AWB चालवावे. तुमच्या कडे अशा स्वरूपाचे खाते नसल्याने अलीकडील बदल मध्ये बॉट नोंदी दिसतात त्यांना टाळता येईल आणि बॉट कार्यात समजा चुकून काही तृटी आढळल्या/झाल्या तर त्यांना एकत्रित उलटवणे पण शक्य होईल.

धन्यवाद

राहुल देशमुख १७:०३, १७ डिसेंबर २०११ (UTC)

विशेष पृष्ठे

येथे बघावे व त्यातील पाने एकदा नजरेखालून घालावीत.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १५:०३, १६ डिसेंबर २०११ (UTC)

.

विकीपत्रिका सभासद नोंदणी ....!
नमस्कार, Abhijitsathe

मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय रहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्‍या कामांची सर्वाना माहिती व्हावी आणि सद्द घटनांबद्दल आढावा ह्या उद्देशाने मराठी विकिपीडिया विकीपत्रिका दि. १ जानेवारी २०१२ पासून सुरू करीत आहोत.

पत्रिका इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये सदस्यांना त्यांच्या चर्चापानावर पोहचविण्यात येईल.

मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.

आपल्या माहिती आणि पुढील योग्य कार्यवाहीसाठी सादर.

कळावे - खबर्या (विकीपत्रिका)


संपर्क

नमस्कार अभिजित ! तुमच्या चर्चापानावर राहुल देशमुखांनी लिहिले आहे, त्याच हेतूने आपले संपर्काचे तपशील कळवावेत. माझा ई-मेल आयडी मी माझ्या सहीनंतर कमेंटेड स्वरूपात (जो तुम्हांला हे चर्चा पान संपादन करताना दिसेल, अन्यथा दिसणार नाही) कळवला आहे. धन्यवाद !

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:२०, २६ डिसेंबर २०११ (UTC)

विपी

नमस्कार अभिजित,

विचारपूस केल्याबद्दल धन्यवाद. मध्यंतरी माझे योगदान कमी होण्यामागे झालेली वादावादी हे एक कारण होतेच, शिवाय इतर कामांतही व्यस्त असल्यामुळेही येथे फारसे काम करता येत नाही आहे. अधूनमधून वेळ मिळाला की येत असतो.

अभय नातू ०१:२४, २८ डिसेंबर २०११ (UTC)

नवीन कामे

अभिजित, आम्ही काही मंडळी गेल्या २ -३ महिन्यापासून (विकी कॉन्फरन्स पासून) एकत्र भेटून बरीच कामे मार्गी लावत आहोत. हे करण्यासाठी सर्वांचे इ मेल आणि मोबाईल क्रमांक असणे गरजेचे आहे. तरी राहुल आणि संकल्प च्या विनंती प्रमाणे आपण आपला इ मेल आणि मोबाईल क्रमांक त्वरेने कळवावा. आपण प्रचालक मंडळींना बरीच कामे वाटून घेऊन करायची आहेत आणि त्यासाठी आपली मदत आणि संपर्क आवश्यक आहे. मराठी विकिपीडियाच्या विकासासाठी रोजच्या मराठी विकिपीडियाच्या संगणकाच्या बैठकीबरोबर अनेक बाहेरची कामे होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांचा सहभाग हवा आहे. मला अशा आहे की तुम्ही यात नक्की मदत कराल... Mvkulkarni23 १५:५८, २८ डिसेंबर २०११ (UTC)

येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी

नमस्कार ! चावडीवर येथे येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी काही प्रस्ताव मांडले आहेत. त्याविषयी कृपया आपली मते/कल्पना मांडावीत, अशी विनंती.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:५९, १ जानेवारी २०१२ (UTC)

पान वगळण्याविषयी व पानकाढा साचा

नमस्कार अभिजित ! आज पाने वगळण्याचा धडाका लावलात :), ते पाहून एक-दोन गोष्टी कळवायच्या होत्या :

  • सहसा पानकाढा साचा लावल्यावर किमान दोन आठवडे थांबायचा शिरस्ता पाळण्याचा संकेत आहे. काही लेख अगदीच धडधडीत वगळण्याजोग्या चुका (स्पॅम/उत्पाती शीर्षक वगैरे) असतील, तर तात्काळ उडवल्यास हरकत नाही.. पण एरवी काही दिवसांचे मार्जिन द्यावे.
  • विकिपीडिया:वगळण्याविषयीचे धोरण येथे मी याविषयीची धोरणे व संकेत लिहिण्यास काही दिवसांपूर्वी सुरुवात केली आहे. त्यात तुम्हांस जमेल, तशी तुम्हीही भर घालावीत.
  • सध्या साचा:पानकाढा या साच्यात तो साचा कधी लावला आहे, त्यानुसार वगळण्याजोग्या लेखांचे महिन्या-महिन्यांच्या बॅचांमध्ये वर्गीकरण होत नाही. म्हणजे असे बघा, की समजा अबक लेखावर मी आज पानकाढा साचा लावला.. आणि समजा आपल्या संकेतांनुसार लेखावरील पानकाढा सूचनेस आक्षेप घ्यायचे/लेख वाचवायचे प्रयत्न करायचे असल्यास महिन्याभराचा अवधी देण्याचा संकेत लागू असेल, तर पानकाढा साचा लावण्यामुळे त्या लेखाचे वर्गीकरण "वर्ग:फेब्रुवारी, इ.स. २०११मध्ये वगळावयाचे लेख" असे वर्गीकरण झाल्यास कामांची पाइपलाईन सोयीस्कर राहील. तसेच आक्षेप घेऊ इच्छिणार्‍यांनाही पुरेसा अवधी मिळेल. मी व अभय नातू याविषयी थोडे प्रयत्न करू बघत होतो, पण आम्हांला ते घडवून आणता आलेले नाही. तुम्हांला इंग्लिश विकिपीडीयावरील संबंधित साचे न्याहाळून आपल्या पानकाढा साच्यात योग्य ते बदल करता येतील का ?

--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) १८:२४, ५ जानेवारी २०१२ (UTC)


तुम्ही साच्यात केलेले बदल पाहिले. हे काम धसाला लावण्याबद्दल धन्यवाद. तुमच्या बदलांनंतर हा साचा एखाद्या लेखात लावल्यावर लेखात ज्या महिन्यात शेवटचा बदल असेल त्याच महिन्यात वगळण्यासाठी मार्क करीत आहे. ते बदलून पुढील महिन्यात करावे का? म्हणजे १५ जानेवारीला केलेल्या बदलानंतर फेब्रुवारीत काढण्याजोगा लेख असे वर्गीकरण होईल आणि साचा लावणे व पान काढणे यात थोडी मुदत आपोआप मिळेल. अर्थात, ३१ जानेवारीला साचा लावला (किंवा बदल केला) तर तो लेख लगेच १ दिवसात काढण्यासाठी पात्र होईल.
हे निवारण्यासाठी शेवटच्या बदलाचा वर्ष, महिना आणि तारीख घेउन महिना, वर्ष नंतर काढण्याजोगा लेख असे वर्गीकरण केले तर? त्याचबरोबर कोणत्या दिवशी यात शेवटचा बदल होता हे सुद्धा लिहिता येईल म्हणजे प्रचालकांना योग्य ती मुदत मोजण्यास मदत होईल.
या अधिक एक योजना करता येईल की speedy deletion requests वर्गातील सगळ्या पाना-वर्गांवर AWB चालवून शेवटच्या बदलाला दोन आठवडे (किंवा जी काही योग्य मुदत असेल तितका वेळ) होउन गेला असला तर आता मुदत होउन गेलेली आहे आणि हा लेख/पान आता प्रचालक कोणत्याही क्षणी काढू शकतात. या अर्थाचा अधिक कडक इशारा देणारा साचा लावावा. असा इशारा असलेली पाने काढायला प्रचालकांना जास्त विचार करावा लागणार नाही.
अभय नातू २३:२७, ५ जानेवारी २०१२ (UTC)
>>तुम्ही साच्यात केलेले बदल पाहिले. हे काम धसाला लावण्याबद्दल धन्यवाद. तुमच्या बदलांनंतर हा साचा एखाद्या लेखात लावल्यावर लेखात ज्या महिन्यात शेवटचा बदल असेल त्याच महिन्यात वगळण्यासाठी मार्क करीत आहे. ते बदलून पुढील महिन्यात करावे का? म्हणजे १५ जानेवारीला केलेल्या बदलानंतर फेब्रुवारीत काढण्याजोगा लेख असे वर्गीकरण होईल आणि साचा लावणे व पान काढणे यात थोडी मुदत आपोआप मिळेल. <<
अभय म्हणतो, तो मुद्दा रास्त वाटतो. मला खरे तर तेच अभिप्रेत आहे. दोन गोष्टी करता आल्या तर अधिक बरवे :
  • पानकाढा साच्यात साचा लावणार्‍याची सही दिनांकासह आपोआप उमटल्यास.
  • आणि ५ जानेवारीस साचा लावल्यास तश्या लेखांचे वर्गीकरण (जानेवारी+१) = फेब्रुवारी महिन्यात वगळायचे लेख म्हणून केल्यास.
विकिपीडिया:वगळण्याविषयीचे धोरण येथे आपण संकेत नोंदवू शकतो, की पानकाढा लावलेले लेख १ महिनाभर अवधी देऊन राखले जाणार आहेत; त्यानंतर मात्र सहमती न मिळाल्यास ते वगळले जातील.
बाकी, एडब्ल्यूबीविषयक मुद्द्याबद्दल अभय म्हणाला, त्यात थोडी दुरुस्ती सुचवाविशी वाटते - एडब्ल्यूबी वापरून एखाद्या उपवर्गातील लेखातल्या मूळ कर्त्याच्या/नॉनबॉट संपादकांच्या चर्चा पानावर पानकाढा साचा लावल्याची सूचना लिहिता येईल. त्या सूचनेत लेख वाचवायचा असल्यास काय करावे व आक्षेप/सहमती मिळवण्यास काय करावे, याविषयीचे मार्गदर्शन करता येईल. किंबहुना सदस्यचर्चापानावर अश्या नोटिसा लावायला अजून एक संदेशसाचा बनवता येईल. त्यादृष्टिकोनातून तारखेनुसार वगळायच्या वर्गांचा उपयोग होईल.
--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) २३:४२, ५ जानेवारी २०१२ (UTC)

चित्र

जॉर्ज पहिला व जॉर्ज दुसरा चित्रे सारखीच दिसताहेत काही त्रुटी आहे काय? पहावे.संतोष दहिवळ १७:४६, ६ जानेवारी २०१२ (UTC)

एक विनंती

जमत असल्यास, जलद वाहतूक या लेखातील मेट्रोसंबंधी असलेले लाल दुव्यांचे लेख बनविता आल्यास बघावे. मी काम तर सुरू केले परंतु,व्यस्ततेमुळे हवा तसा वेळ देउ शकत नाही. बघा, कसे जमते ते.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०७:१६, ७ जानेवारी २०१२ (UTC)

साच्यात बदल

कन्व्हर्ट साच्यात नेमके काय दोष दिसताहेत, कुठे पाहता येतील ? मला तुमच्या संदेशाचा संदर्भ नीटसा उमगला नाही. --संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) १५:५७, १९ जानेवारी २०१२ (UTC)

Bot block

सांगकाम्या अभिजीत does not seem to be blocked. What is the error message you're seeing within AWB?

अभय नातू ०८:४४, २२ फेब्रुवारी २०१२ (IST)[reply]

फोटोथोन

मराठी विकिपीडिया मराठीभाषा दिवसाच्या निमित्याने दिनांक २० ते २९ फेब्रुवारी २०१२ दर्म्यान फोटोथोन आयोजित करीत आहे. आपण आपल्या जवळील चित्रे (आपली स्वतःची अथवा प्रताधिकार मुक्त) विकिपीडियास लोक वापरासाठी दान करून ह्या कार्याकामात योगदान द्या.

Some useful tips for typing in new Input method (transliteration mode)

Keyboard input Converted to
rya र्य
rrya ऱ्य
rha र्ह
rrha ऱ्ह
nja
nga
a^
shU/// शूऽऽ
Ll
Lll
hra ह्र
hR हृ
R
RR
ka` क़
k`a क़
\.
\.\

वर्ग:पुणे निवासी

पुणे निवासी असा वर्ग आसणे मला आयोग्य वाटते. आपले मत हावे.-- . Shlok talk . ०८:५७, २५ मार्च २०१२ (IST)[reply]

Rendering

You may like to check http://silpa.org.in/Render?text=अॅ%20व%20ॲ%20व%20कॅ

You may also like to check following url. http://silpa.org.in/Render?text=आॅ%20अॉ%20ऑ (This will probably be useful when one tries to write Orange)

Also, http://silpa.org.in/Render could be useful.

मी वैयक्तिक आरोप वगळत आहे. ते चूक आहे काय?

Image licensing

Hello Abhijitsathe, I saw that you are uploading pictures to the Marathi Wikipedia, like this one or this one without a clear source and license given. Please notice that on Wikimedia projects (if not stated otherwise, which is not the case for this wiki) only Free Content Licensed images are allowed. If images aren't under a free license (I'm pretty sure the ones listed above aren't) and/ or you aren't able to state the source, please delete them. Please enter up all missing sources and license tags for the images you uploaded and get the ones you can't do that for deleted, thanks. Further information - Hoo man (चर्चा) ०६:५३, २३ मे २०१२ (IST)[reply]