"कालिदास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Robot: Automated text replacement (-र्या +ऱ्या)
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: az:Kalidasa
ओळ ३३: ओळ ३३:
[[ar:كاليداسا]]
[[ar:كاليداسا]]
[[as:কালিদাস]]
[[as:কালিদাস]]
[[az:Kalidasa]]
[[bat-smg:Kalėdasa]]
[[bat-smg:Kalėdasa]]
[[be:Калідаса]]
[[be:Калідаса]]

०५:०८, २१ मे २०१२ ची आवृत्ती

राजा रविवर्म्याने काढलेले शकुंतलेचे एक चित्र काटा रुते कुणाला

कालिदास हा प्राचीन भारतातील एक संस्कृत नाटककार आणि कवी होता. मेघदूत, रघुवंशम्, कुमारसंभवम् आदि संस्कृत महाकाव्यांचा कर्ता म्हणून तो सुपरिचित आहे. सुमारे चौथे शतक ते सहावे शतक या काळात अथवा गुप्त साम्राज्याचा कालखंडात तो होऊन गेला असावा, असे मानले जाते. विक्रमोर्वशीयम्, मालविकाग्नीमित्रम्, आणि अभिज्ञानशाकुंतलम ही त्याने लिहिलेली संस्कृत नाटकेदेखील प्रसिद्ध आहेत.

जीवन

कालीदास हा बालपणी न शिकलेला व कमी बुद्धी असलेला होता.त्याची पत्नी ही प्रकांड पंडिता व विदुषी होती.पत्नीचे बोलणे असह्य होऊन त्याने जंगलाची वाट धरली आणि तेथे काली देवीची प्रार्थना व तपस्या करून वरदान मिळविले.परत आल्यावर त्यास त्याचे पत्नीने विचारले:अस्ति कश्चित वाग्विशेषः?( वाङमयाबद्दल काही विशेष आहे काय?). ते एकुन त्याने या तीन शब्दांनी सुरु होणारे साहित्य रचले,अशी आख्यायिका आहे. विदर्भ देशाची राजकन्या इंदुमती हिचे स्वयंवर मांडले आहे. देशोदशी राजेमहाराजे या स्वयंवरात भाग घेण्यासाठी आपापल्या लवाजम्यासह दाखल झाले आहेत. प्रत्यक्ष स्वयंवराला प्रारंभ झाल्यावर तो विस्तीर्ण राजप्रासाद देशोदेशींच्या राजेरजवाडय़ांनी आपापली आसने भूषविल्यानंतर अधिकच शोभायमान झाला आहे. पृथ्वीवरचे सगळे ऐश्वर्य, शौर्य, सौंदर्य जणूकाही अतिविशाल स्वयंवर मंडपात एकवटले आहे. स्वरूपसुंदर इंदुमती कोणाला माळ घालील याची उत्सुकता सर्वांच्या चेहऱ्यावर दाटून राहिली आहे. इंदुमती आपली प्रिय सखी सुनंदा हिच्यासोबत त्या मंडपात दाखल झाली. हातात वरमाला घेतलेली इंदुमती एकेका राजाचे सूक्ष्म निरीक्षण करीत सावकाश एकेक पाऊल टाकत पुढे पुढे जाऊ लागली. चतुर सुनंदा मोठय़ा मार्मिक शब्दांत एकेका राजाचे वर्णन करू लागली. हा प्रसंग रंगवून सांगतांना महाकवी कालिदासाने एक अतिरम्य अशी उपमा वापरली आहे. उपमा कालिदासस्य असे म्हणतातच. ते सार्थ आणि समर्पक वाटावे, अशी ही उपमा आहे. मूळ श्लोक असा आहे -

संचारिणी दीपशिखेव रात्रौ यं यं व्यतीयाय पतिंवरा सा। नरेंद्रमार्गाट्ट इव प्रपेदे विवर्णभावं स स भूमिपाल :।।'

रात्रीच्या वेळी राजमार्गावरुन एखादी दिव्याची ज्योत कोणीतरी पुढे पुढे नेत असावे आणि त्या ज्योतीचा प्रकाश राजमार्गावर असलेल्या मोठमोठय़ा इमारतींच्या दर्शनी भागावर पडत राहावा. ज्योत पुढे गेली की मागच्या इमारतींचा दर्शनी भाग अंधारात अदृश्य व्हावा. ज्योत ज्या महालासमोरुन चालली असेल तेवढाच महाल प्रकाशमान व्हावा, त्याचप्रमाणे इंदुमती ज्या ज्या राजाच्या पुढून जाई त्याचा त्याचा चेहरा त्या वेळेपुरता उजळून निघे आणि इंदुमती पुढे गेल्यावर ती निराशेने काळाठिक्कर पडे. किती योग्य उपमा आहे पाहा ! इंदुमती तिच्या हातातील वरमाला आपल्या गळ्यात घालील, अशा आशेने त्या त्या राजाचा चेहरा फुलून येई आणि इंदुमती पुढे जाताच त्याचे वदनकमल म्लान होई. या उपमेवरुन कालिदासाला दीपशिखा कालिदास असे गौरविले जाते.

वर्षाचे ३६५ दिवस सूर्य असाच एकेका तिथीच्या समोरून जात असतो. आकाशात सूर्य नसेल तर साम्राज्य काळोखाचेच. चांदणी रात्र असली तरीही त्या चांदण्याला सूऱ्याच्या प्रकाशाची सर कशी येणार ? सूर्य ज्या ज्या तिथीला प्रकाशित करून पुढे पुढे जातो ती ती तिथी आनंदाने आणि तेजाने उजळून निघते. आषाढ शुद्ध प्रतिपदा म्हणजे आजची तिथी ही महाकवी कालिदास जयंती म्हणून मानली जाते. कालिदास जयंती म्हणून ओळखली जाणारी ही तिथी कालिदासाच्या स्मरणाने आणि कालिदासाच्या कीर्तितेजाने अशीच उजळून निघते. फरक एवढाच की, स्वयंवरात इंदुमती ज्या ज्या राजाच्या पुढून चालली होती त्याच्या पुढून ती पुन्हा तशी कधीही चालण्याचा योग नव्हता. इथे मात्र प्रतिवर्षी एकेका तिथीला धन्य करीत सूर्य पुढे जात असतो आणि अशा प्रकारे प्रत्येक तिथीला वर्षातून एक दिवस सूर्य उजळून टाकतो. हा दिवस आषाढ शुद्ध प्रतिपदा म्हणजे कालिदास जयंतीचा. नाहीतरी कालिदास हा संस्कृत वाङमयवितानातील जणू स्वयंप्रकाशी सूर्यच. त्याला कविकुलगुरू म्हणून गौरविले गेले. महाकवी म्हणून सन्मानिले गेले. अजूनही कितीतरी प्रकारांनी त्याचा मोठेपणा सांगण्याचा प्रयत्न झाला. संस्कृत वाङमयाच्या प्रांतात कालिदासासारखा कालिदासच !

काव्ये

उपमा कालिदासस्य । साहित्यातील 'उपमा' द्यावी तर ती कालीदासाने असे विद्वान म्हणतात.

बाह्य दुवे