"भारतीय नीलपंख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ca:Gaig blau indi
ओळ २८: ओळ २८:
[[bn:নীলকণ্ঠ পাখি]]
[[bn:নীলকণ্ঠ পাখি]]
[[br:Korag India]]
[[br:Korag India]]
[[ca:Gaig blau indi]]
[[cs:Mandelík indický]]
[[cs:Mandelík indický]]
[[de:Hinduracke]]
[[de:Hinduracke]]

०४:१३, ३ मे २०१२ ची आवृत्ती

चित्रदालन


मराठी नाव : चास, निळकंठ
हिंदी नाव : नीलकंठ
संस्कृत नाव : चाष, अपराजित
इंग्रजी नाव : Indian Roller
शास्त्रीय नाव : Coracias benghalensis



चास ह्या पक्ष्याला निळकंठ असे म्हणतात परंतु याचा कंठ निळा नाही.

चास साधारणपणे ३१ सें. मी. आकाराचा, स्थानिक निवासी पक्षी असून हा स्थिर बसल्यावर याचा पिसारा गडद निळा दिसतो, उडतांना पंख व शेप्टी निळे दिसतात, छातीचा आणि पाठीचा रंग तपकिरी, पंख, शेपूट निळी, चोच काळ्या रंगाची असून चास उडतांना याच्या पंखावरील गडद व फिके निळे स्पष्ट दिसतात. नर-मादी दिसायला सारखेच असतात.

चास भारतात सर्वत्र आढळून येतो. तसेच बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार येथेही याचे वास्तव्य आहे. रंग आणि आकारावरून याच्या किमान तीन उपजाती आहेत.

चास खुल्या मैदानी भागात, पानगळीच्या जंगलात, शेताच्या जवळ, रस्त्याच्या कडेने असलेल्या विद्युत तारांवर दिसतो. याचे खाद्य कीटक, बेडुक, पाली हे आहे.

मार्च ते जुलै महिना हा काळ चासचा वीण हंगामाचा काळ असून गवत, काड्या वगैरे वापरून झाडाच्या ढोलीत किंवा भिंतीतील छिद्रात चास आपले घरटे बांधतो. मादी एकावेळी ४ ते ५ चमकदार पांढऱ्या रंगाची अंडी देते.