"सदस्य चर्चा:कोल्हापुरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
विकीपत्रिका फेब्रुवारी २०१२ अंक वाटप using AWB
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{विकिपीडिया:विकिपत्रिका/अंक/फेब्रुवारी २०१२}}
{{विकिपीडिया:विकिपत्रिका/अंक/फेब्रुवारी २०१२}}

{{विकिपीडिया:विकिपत्रिका/अंक/जानेवारी २०१२}}



* [[User talk:कोल्हापुरी/जुनी चर्चा १|जुनी चर्चा १]]
* [[User talk:कोल्हापुरी/जुनी चर्चा १|जुनी चर्चा १]]

११:४७, ३ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती


मराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक दुसरा - (फेब्रुवारी २०१२ )

चांदणे शिंपित जा ...!
मराठी विकिपीडिया गौरव समितीची
मराठी विकिपीडियावर अनेक मंडळी अहोरात्र काम करत आहेत. काही नवीन आहेत तर काही जुनी झाली, काम करणार्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच कामाची कदर करण्यासाठी गौरवासारखे दुसरे साधन नाही. कामाच्या वाढत्या व्यापाबरोबरच त्याची योग्य रीतीने कदर पण करण्याच्या उद्देशाने एक आधारभूत संरचना मराठी विकिपीडियावर असावी ह्या उद्देशाने "मराठी विकिपीडिया गौरव समिती" ची स्थापना करण्यात येत आहे.

सदर समिती तर्फे दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपादन योगदानाचे गौरव जसे - १००० संपादने, २००० , ५००० संपादने आणि काही इतर गौरव (सदस्यांचे काम तपासून) प्रदान करण्यात येतील तसेच इतरांनी शिफारस केलेले अथवा समितीस योग्य वाटलेले/सुचलेले विशेष गौरवही प्रदान करण्यात येतील. अर्थात व्यक्तिगत बार्नस्टार देण्याच्या जुन्या पद्धतीला पूरक म्हणून ही समिती कार्य करेल.

"मराठी विकिपीडिया गौरव समितीची " सुरुवात होत असतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्ही आशा करतो की भविष्यात सदर समिती ही मराठी विकिपीडियाच्या उज्ज्वल भविष्यात मोलाचा वाट उचलण्यात उपयोगी ठरेल. आपणही ह्या उपक्रमात भरीव सहभाग द्यालच ही अपेक्षा.


जानेवारी २०१२ मधील सक्रिय सदस्यांचा आलेख
२०१२ जानेवारी महिन्यात जवळ जवळ एक हजार नवीन सदस्य नोंदणीकृत झाले त्याचा आलेख
जानेवारी २०१२ मध्ये मराठी विकिपीडियाने एक लाख पानांचा टप्पा गाठला त्याचा आलेख
पाने सांख्यिकी
लेख ३४,५४४
पाने

(चर्चा पाने, पुनर्निर्देशने, साचे, इ. सह एकूण पाने)

१,०९,५३४
चढवलेल्या संचिका ३,१९२
संपादन सांख्यिकी
एकूण संपादने ९,६८,६९३
प्रतिपान संपादने ८.८४
सदस्य सांख्यिकी
नोंदणीकृत सदस्य २२,०८४
कार्यरत सदस्य

(गेल्या ३० दिवसांत एक तरी कृती केलेले सदस्य)

१९०
सांगकामे ६०
प्रचालक १२
स्वीकृती अधिकारी
१८:३८ १ फेब्रुवारी २०१२ ची आकडेवारी


कार्यक्षेत्रातील प्रत्यक्ष कार्यक्रम
  • टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई येथे ६ ते ८ जानेवारी दरम्यान मराठी विकिपीडियाचे स्टॉल लावण्यात आले होते, त्यास उत्तम प्रतिसाद लाभला. 'टेक फेस्ट २०१२' ला एक लाखाहून जास्त लोकांनी भेट दिली.
  • १५ जानेवारी २०१२ ला W - 11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि टेक्याथॉन, मुंबई आय. आय. टी बॉम्बे येथे आयोजित करण्यात आली होती.
टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई
टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई

त्या दरम्यान मराठी विकिपीडिया मोबाइल तसेच टॅबलेट वरून वापरण्यासाठी 'अँड्रॉईड अ‍ॅप' निर्माण करण्यात आल्या.

  • * ८ जानेवारी २०१२ - मराठी विकिपीडिया (एडिट ट्रेनिंग/ प्रशिक्षण/ मार्गदर्शन) शिबिर टेक मराठी महामेळावा, पुणे. १०० प्रशिक्षणार्थीनी ह्यात भाग घेतला.
  • * १५ जानेवारी २०१२ - W11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि विकी शिकवणी, ज्ञान प्रबोधिनी, पुणे येथे आयोजित करण्यात आली.
  • * १३ जानेवारी २०१२ - आबासाहेब अत्रे शाळा, रास्ता पेठ, पुणे येथे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विकी शिकवणी आयोजित करण्यात आली होती. ५० शाळकरी विद्यार्थ्यांनी ह्यात हिरीरीने भाग घेतला.
  • * २९ जानेवारी २०१२ - शाहीर अमर शेख सभागृह, चर्चगेट मुंबई, मराठी अभ्यास केंद्राच्या विद्यार्थी आणि शिक्षक महामेळाव्यात "मराठी विकिपीडिया आणि मराठी भाषेकरिता उपलब्ध होत असलेल्या तंत्रज्ञानाचा परिचय" यावर व्याख्यान तसेच विकिपीडियावर संपादन कसे केले जाते याचे सोदाहरण प्रात्यक्षिक दिले गेले. कार्यक्रमास १२५ मराठीप्रेमींची उपस्थिती होती.

२०१२ फेब्रुवारी महिन्यातील आयोजित कार्यक्रम

  • ३ फेब्रुवारी - "माहिती तंत्रज्ञान, विकिपीडिया आणि मराठी भाषा" चर्चासत्र, मराठी विभाग पुणे विद्दापीठ.
  • १० फेब्रुवारी २०१२ - विकी शिकवणी, L&T इनस्टीट्युट ऑफ टेक्नोलॉजी, साकीनाका मुंबई.
  • १० ते १२ फेब्रुवारी - हॅक्याथॉन, (Gnunify) SICSR पुणे आणि मराठी विकिपीडिया - परिचय,
  • १७ फेब्रुवारी - मराठी विकिपीडिया - परिचय, COE, Pune
  • १८ फेब्रुवारी - विकी कार्यशाळा, आय आय टी मुंबई.
  • २० ते २७ फेब्रुवारी - फोटोथॉन, मुंबई.
  • २५ फेब्रुवारी - मराठी भाषा दिवस कार्यक्रम, रानडे इन्स्टिट्यूट, पुणे.
.
ठळक घडामोडी आणि आढावा
  • मराठी विकिस्रोतला प्रशासकीय मान्यता

मराठी विकिस्रोत हा बंधू प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव विकी मीडियाकडे बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होता. विकी संमेलन २०११, मुंबईच्या जाहीरनाम्यात ह्या प्रकल्पास सुरुउ करण्याच्या घोषणेनंतर प्रस्तावाचा पाठपुरावा आणि इतर अनिवार्य गोष्टींची पूर्तता मराठी विकिपीडिया समाजाने केल्याने,. लॅंग्वेज कमिटीने मराठी विकिस्रोत ह्या बंधू प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिली आहे. लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होईल.

विकिस्रोत म्हणजे विकी समुदायाने उभारलेले व देखभाल केले जाणारे, प्रताधिकारमुक्त दस्तऐवजांचे इंटरनेटवरील खुले ग्रंथालय आहे. ऐतिहासिक काळापासूनचे ललितेतर व ललित साहित्य, चित्रे/कलाकॄती यांच्या अस्सल प्रकाशनाबरहुकूम विश्वासार्ह विकिआवॄत्त्या सर्वांसाठी गोळा करून देणे हे विकिस्रोताचे उद्दिष्ट आहे. नवीन पिढीस जुने प्रताधिकारमुक्त मराठी ग्रंथ वाचण्यास इंटरनेटवर युनिकोड फॉर्ममध्ये सहज उपलब्ध करून देणे तसेच संदर्भ देणे आणि पडताळणे सोपे करण्यासाठी सदर प्रकल्प उपयोगात येईल.

मराठी विकिस्रोत' हे एक आंतरजालावर असलेले मुक्त पुस्तकालय आहे. यामध्ये वाचकांसाठी मोफत वाचनाची सोय आहे. आपल्याला या प्रकल्पात भर घालण्यासाठी निमंत्रण आहे. येथे प्राचीन तसेच प्रताधिकार नसलेले लेख आपण आणू शकता. मराठी विकिपेडियावर त्या लेखांची चर्चा होऊ शकते.

परंतु ते लेख मूळ स्वरूपात मराठी विकिस्रोत येथे साठवले जातात. उदा० ऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी. तसेच ऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने येथे संग्रहित करता येतील.


  • नवीन नियुक्ती
माहितगार - विकिसंमेलन भारत २०११, मुंबई

मराठी विकिपीडिया वरील दैनंदिन कामे, नवीन प्रस्ताव, तांत्रिक जबाबदाऱ्या, सुरक्षा, ध्येय धोरणे, प्रगती आदी अनेक आघाड्या अभय नातू हे एकटेच प्रशासक म्हणून कार्यभार सांभाळत होते. वाढत्या व्यापाबरोबरच खांदे वाढवावे जेणे करून कामाचा वैयक्तिक दबाव कमी होईल आणि सेवाही सुरळीत मिळतील या उद्देशाने प्रशासक (ज्याला आता स्वीकृती अधिकारी असे संबोधण्यात येते) या पदासाठी मराठी विकिपीडिया समाजाने एकमताने 'माहितगार' यांना ही जबाबदारी दिली आहे.

माहितगार हे कुशल संघटक आहेत, मराठी विकिपीडियावर ‎प्रचालक म्हणून ७ जून २००६ पासून ते कार्यरत आहेत. तांत्रिक तसेच धोरणात्मक विषयांवर त्यांनी नेहमीच त्याच्या व्यक्तिमत्त्वातील परिपक्वतेचा परिचय दिलेला आहे. प्रेमळ व्यक्तिमत्त्व, प्रत्यक्ष क्षेत्रातील त्यांचे काम आणि कार्यकर्त्यांशी त्यांचा थेट संपर्क हे वाखाणण्याजोगे आहे. तेंव्हा माहितगारांना 'स्वीकृती अधिकारी' (प्रशासक) पदाची जबाबदारी दिल्याने प्रशासकीय पातळीला अधिक बळकटी येईल.

'माहितगार' यांच्या पुढील कार्यास 'विकीपत्रिका' वाचकांतर्फे हार्दिक शुभेच्छा ...!!!

* विकिप्रकल्पांकरीता प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते हवे आहेत..!

वाचकांच्या प्रतिक्रिया

  • राहुल जी, सादर नमस्कार, मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचा आपल्या उत्कृष्ट संपादनाकरीता आपणांस व संपादक टीमचे हार्दिक अभिनंदन. या पत्रिकेमुळे मराठी विकिपीडिया विकास कार्याकरीता अनेक स्वयंसेवक जोडता येतील.--विजय नगरकर
  • नमस्कार राहुल, विकीचा अंक मस्त झाला आहे. आवडला. त्यात सांख्यिकी देण्याची कल्पना फार आवडली. हा अंक इतर संकेतस्थळांवर सादर केला तर चालेल का? निनाद
  • Superb effort ... Is there any away I can read in English -- Naveenpf
  • मला विकिपत्रिका नको आहे, त्यासंबंधीच्या लिंक किंवा मजकूर माझ्या सदस्य किंवा चर्चापानावर कृपया टाकू नये. धन्यवाद. मनोज
  • नमस्कार राहुल ! विकिपत्रिकेचा पहिला अंक प्रकाशित झाल्याबद्दल आपल्या सर्वांचे, आणि अधिककरून तुमचे, अभिनंदन ! अंक नेटका आणि देखणा (याबद्दल विशेष शाबासकी :) ) झाला आहे. संकल्प द्रविड
विकिपत्रिका प्रकाशक...
मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा...! * विकिपत्रिका संपादन मंडळात सहभागी व्हा !

नमस्कार, आपण तातडीने माझ्या विनंतीनुसार बदल केल्याबद्दल धन्यवाद. साचा बदल कसे केले हे जाणून घ्यायचे आहे. सदस्य असे बदल करू शकत नसल्यास आपल्यास तसे कळविता येईल काय? वणी, यवतमाळ ऐवजी नुसते वणी असा साचा बदल व्हावा. Gypsypkd ०९:३९, ४ जुलै २००९ (UTC)

Phonetic Devnagari

Sorry to write English. I don't know Marathi but I can read Devnagari. I am from Bengali Wikipedia and I am admin there. I am here for little help about Phonetic Devnagari typing aprroach. I copy all of you script in our Monobook.js and other setup configured. But no out put over come. Please check bn:Mediawiki:Monobook.js and bn:user:Zaheen/translit.jsJayantanth १८:०१, ४ जुलै २००९ (UTC)

Thank you कोल्हापुरी I must check and revert back to you our result. Happy editing. Jayantanth ०८:४३, ६ जुलै २००९ (UTC)

Dear after some setup and cleanup a icon near search activate as like देवनागरी your near search area and it works fine and I can typy Phonetic Bangla there. But I can't see anything on the top of edit window (देवनागरीत लिहीण्यासाठी डावीकडील डबीत टिचकवा.(परीक्षणकाल) लिपी बदलण्यासाठी Esc दाबा, (IE मध्ये Esc नंतर Ctrl+z दाबा.)) in Mozilla Firefox. But I can see (Phonetic Bangla Typing. Check/Uncheck box or use Esc as a toggle key to activate/deactivate. Go to WP:Typing for help)) on the top of edit window in IE.

I found an error in error console Error: [Exception... "Node was not found" code: "8" nsresult: "0x80530008 (NS_ERROR_DOM_NOT_FOUND_ERR)" location: "http://bn.wikipedia.org/w/index.php?title=-&action=raw&smaxage=0&gen=js&useskin=monobook Line: 1277"]Source File: http://bn.wikipedia.org/w/index.php?title=-&action=raw&smaxage=0&gen=js&useskin=monobook Line: 1277 at editform.insertBefore(element,textBox); Do you Know where Node has to be define? Jayantanth १७:५१, ६ जुलै २००९ (UTC)

नमस्कार, कोल्हापुरी आपण वनस्पती- किंवा वनस्पतीशास्त्र-विषयक लेखात जे योगदान केले आहे त्याबद्दल धन्यवाद. I'd like to invite you to become a part of WikiProject Plants, a विकिपीडिया:प्रकल्प aiming to improve coverage of plant-related articles on Wikipedia.

If you would like to help out and participate, please visit the project page for more information. Thanks! Mahitgar १२:५५, १६ जुलै २००९ (UTC)


नमस्कार, कोल्हापुरी आपण साचे- किंवा साचा-विषयक लेखनात जे योगदान केले आहे त्याबद्दल धन्यवाद. मी आपणास साचे सुसूत्रीकरण प्रकल्पात, सहभागी होण्याचे सादर निमंत्रण देत आहे. हा साचे सुसूत्रीकरण प्रकल्प मराठी विकिपीडियावर साचा संबधीत लेखात/पानात सुधारणा आणू इच्छित आहे..

जर आपण सहभागीहोऊन सहाय्य करू शकत असाल तर, कृपया प्रकल्प पानास प्रकल्प पानास अधिक माहिती करिता भेट द्यावी. धन्यवाद!

माहीतगार १४:३०, १९ ऑगस्ट २००९ (UTC)

सहाय्य:विस्तार:पृथकककारके

नमस्कार कोल्हापुरी,

सहाय्य:विस्तार:पृथकककारके या पार्सर फंक्शन्स बद्दलच्या मराठी सहाय्य पानावर वापरू इच्छित असलेल्या मराठी संज्ञा आपण एकदा पाहून आपले मत व्यक्त केल्यास मराठीकरण अधीक सुलभ होऊ शकेल.

धन्यवाद Mahitgar ०६:२२, १२ ऑक्टोबर २००९ (UTC)


इमेल कँपेनच्या दृष्टीने तांत्रीक सहाय्य हवे

काही इंटरनेट मित्रांकरवी email marathi font list कँपेन करवण्याचा मानस आहे. email marathi font list पानातील दाखवा-लपवा आणि विकिपीडिया धूळपाटीवर मराठीत टायपींग करून पहा बटन हे ईमेलवर जाऊ शकेल असे तांत्रीक सहाय्य हवे आहे.

माहितगार ११:०७, १ जानेवारी २०१० (UTC)

थँक्स, थोडे समजल्या सारखे वाटते आहे. मला वाटते याहू मेल HTML अपडेट करू देते तसा प्रयत्न करून पहाता येईल . मी केवळ कॉपी पेस्टने जो प्रयत्न केला होता होता त्यात् बटन कॉपी झाले पण त्यावर टिचकी मारल्या नंतर तोच विरोप पुन्हा उघडत होता . तुम्ही म्हणता त्या प्रमाणे करून पहातो. माहितगार ०६:३४, ५ जानेवारी २०१० (UTC)

नमस्कार,

बरेच दिवसांनी दिसलात. वि. नरसीकर (चर्चा) १०:५८, ८ जानेवारी २०१० (UTC)

पान काढा मदत

नमस्कार कोल्हापुरी,

माझे मराठी थोडे कच्चे असल्यामुळे माझ्या हातातुन काही चूका झालेल्या होत्या. त्या मी सुधारलेली आहेत, पण चूकिचे लेख व वर्ग तैयार झाले होते. ते लेख वगळण्यासाठी मी विनंती केलेली आहे. क्रुपया तुमच्या अमुल्य वेळेनुसार वेळ काढून हे लेख वगळावे ही विनंती.

  1. वर्गःस्टार ट्रेक कथानाकातील अंतराळ जहाज
  2. वर्गःस्टार ट्रेक कथानाकातील पात्र
  3. वर्गःस्टार ट्रेक कथानाकातील प्रजाती
  4. वर्गःस्टार ट्रेक कथानाकातील संस्था
  5. वर्गःस्टार ट्रेक:एंटरप्राईस
  6. स्टार ट्रेक: व्हॉयेजर

मदतीसाठी खूप खुप आभारी व तसदीबद्दल क्षमस्व.

--प्रशांत शिरसाठ (माझ्या बरोबर बोला!) १३:३४, २० जानेवारी २०१० (UTC)

मुखपृष्ठ सदर : उदयोन्मुख लेख

नमस्कार! विकिपीडिया:चावडी#मुखपृष्ठ सदर : उदयोन्मुख लेख येथे 'उदयोन्मुख लेख' या नव्या संकल्पित मुखपृष्ठ सदराबद्दल सर्व विकिकर सदस्यांना जाहीर आवाहन लिहिले आहे. त्या आवाहनाला आपणही सकारात्मक व उत्साही प्रतिसाद द्यावा, अशी विनंती.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०१:३८, २ फेब्रुवारी २०१० (UTC)

translatewiki.net

Hoi, I have given you translate rights at translatewiki.net ... Have fun !! Thanks, GerardM ०८:५१, १० मार्च २०१० (UTC)

मदत हवी

नमस्कार, मी एक नवा उपवर्ग करावयास गेलो, पण वर्गःविदर्भातील अष्टविनायक हे पान उपवर्ग मध्ये गेले नाही, काय चुकले कळत नाही. वर्ग:विदर्भातील अभयारण्ये सारखे वर्गःविदर्भातील अष्टविनायक करून हवे. Gypsypkd ०४:५१, १२ मार्च २०१० (UTC)

सूचना:
तुमच्याकरिता कुणी वाफाळलेला चहाचा कप भरला आहे .


प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद

नमस्कार कोल्हापूरी, आपण माझ्या कार्याची दखल घेऊन गौरविल्याबद्दल धन्यवाद.क.लो.अ. Pra.K. ०३:२८, २२ मार्च २०१० (UTC)


सूचना:

तुमच्याकरिता कुणी वाफाळलेला चहाचा कप भरला आहे .


नरसी

कृपया नरसी हा लेख वगळावा. त्यास पर्याय म्हणुन नरसी (नामदेव) हा लेख तयार केला आहे. धन्यवाद.

वि. नरसीकर (चर्चा) १०:१७, ७ एप्रिल २०१० (UTC)

चर्चापान

एखाद्या लेखात पानकाढा विनंती असेल तर त्या लेखाचे चर्चापानही वगळावयास हवे असे मला वाटते.यावर आपले मत कृपया कळवावे. या प्रकरणी विकिपीडियाची नीती काय आहे? माहिती दिल्यास योग्य होईल.माझ्या ज्ञानात भर पडेल.

वि. नरसीकर (चर्चा) ०३:५८, ८ एप्रिल २०१० (UTC)

जोडाक्षरे

अचानक जोडाक्षरे हलन्त दिसणे सुरु झाले आहे. हा माझ्या ब्राउजर चा दोष आहे वा विकिपिडियावरील दोष आहे हे कृपया कोणी तज्ञ तपासुन सांगेल काय? मी आभारी राहील.

वि. नरसीकर (चर्चा) ०६:१७, २३ मे २०१० (UTC)

मदत हवी

नमस्कार, नुकतेच विकिक्वोट येथे प्रचालक म्हणून काम पाहण्याची संधी (तीन महिन्यांकरिता) मला देण्यात आली आहे. विकिपीडिया प्रमाणेच विकिक्वोट येथेही सहजपणे मराठीतून काम करता यावे असे वाटत असल्याने माहीतगार यांच्याशी चर्चा करतांना त्यांनी तुमचे नाव सुचविले. विकिक्वोट वर मराठीत काम करण्यासाठी काय करावे लागेल या बद्दल जर कळवू शकलात तर एक मोठेच काम होईल. तसेच तेथे आणखी काय करावे हे ही माहीत नाही, मला यापैकी कोणत्याही कामाचा अनुभव नाही. Gypsypkd ०५:००, १० जुलै २०१० (UTC)

  • नमस्कार, येवढ्यात फार व्यस्त आहात का? तुम्ही आणि माहीतगार जी पाने विकिक्वोट येथे न्यावी म्हणता ती पाने तेथे नवीन तयार करून मराठी विकितील सगळा मजकूर नुसता कॉपी पेस्ट करायचा आहे की त्यासोबत आणखी काही करणे आहे? तुम्ही जर एक एक कृती सांगितली तर बरे होईल. सगळ्यांना थेट मराठीत लिहिण्याची सोय मिळेल. मला काहीच अनुभव नसल्याने सारीच पंचाईत. दिलेल्या पानावरील माहितीही पचायला जड आहे. Gypsypkd ०५:०७, १३ जुलै २०१० (UTC)
  • मी मिडियाविकी:Translit.js आणि विकिपीडिया:Input System हे पान तयार केले, एकदा पाहून घ्यावे, तसेच q:मिडियाविकी:Monobook.jsहेही पहावे. हे पान आधी तयार केले होते, नंतर वगळले असल्याची सूचना आहे. पुन्हा त्यात नव्याने माहिती टाकायची का? की आणखी काही? Gypsypkd ११:४८, १३ जुलै २०१० (UTC)

अलिकदील बदल मथळ्यातील नोंदी

अलिकडीलबदल मथळ्यात सदस्यांना काही विशीष्ट गोष्टी सुलभकरण्याच्या दृष्टीने काही महत्वपूर्ण बदल केले आहेत.आपले मत प्रार्थनीय आहेच

त्या शिवाय साचा:अलीकडील बदल लेख विनंत्या येथे मासिक सदर ,उदयोन्मूख लेख आणि प्रकल्प बावन्नकशीतील नोंदी संबधीत प्रकल्पाच्या सहमतीने, सहमती असलेले पुरेशी लेख नावे नसल्यास स्वतः प्रचालकांनी निर्णय घावयाचे अभिप्रेत आहे.

नवेलेख हवे/ भाषांतर हवे:/मराठी शब्द सुचवा हे तीन प्रकार शक्यतो साचा चर्चा:अलीकडील बदल लेख विनंत्या येथील सहमती नुसार घ्यावयाचे आहेत.

साचा:अलीकडील बदल लेख विनंत्या पान अती महत्वपूर्ण असल्यामूळे केवळ प्रचालकांकरिता सुरक्षीत केले आहे तर साचाचे चर्चा पान प्रवेशीत सदस्यांकरिता अर्ध सुरक्षीत केले आहे.

माहितगार ०७:५२, १६ जुलै २०१० (UTC)

वर्ग:Speedy deletion requests

Hello,

It seem there is some work for sysops at वर्ग:Speedy deletion requests ;o)

Regards

--Hercule २३:१९, २२ जुलै २०१० (UTC)

व्हेक्टर मध्ये इनपूट सिस्टीम

आज उद्यात व्हेक्टर स्किन इम्प्लीमेंट होईल, मराठी इनपूट सिस्टीम बद्दल विकिपीडिया चर्चा:Input System#transliteration problem येथे चर्चेचे एकत्रीकरण केले आहे.यातील तांत्रीक भाग मला पुरेसे न उमगणारे आहेत, आपण स्वतः हि चर्चा वाचून लक्ष घालू शकल्यास पहावे हि नम्र विनंती माहितगार ०६:०७, १ सप्टेंबर २०१० (UTC)

विकिपीडियाचा नवा चेहरा मोहरा

आपण देवनागरी लेखनव्यवस्था सुरळीत चालावी म्हणुन तातडीने सहकार्य पुरवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद विकिपीडियाचा नवा चेहरा मोहरा व्हेक्टर बद्दल प्रेस रिलीज पाठविण्याचा मानस आहे. विकिपीडिया:माध्यम प्रसिद्धी मजकुर येथे प्रेस रिलिजमध्ये सुयोग्य सुधारणा करण्यात सहकार्य हवे आहे.माहितगार ०७:५४, ६ सप्टेंबर २०१० (UTC)

धन्यवाद

आपण सर्वांनी निवडुन दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.असाच लोभ कायम ठेवा ही विनंती.काही सहकार्य लागल्यास संदेश देउ नं? वि. नरसीकर (चर्चा) ०८:३७, २७ सप्टेंबर २०१० (UTC)

१ मे, २००३

प्रतीक,

खूप दिवसांत येथे फिरकला नाहीस, सगळे ठीकठाकच असावे ही खात्री.

असो. संकल्प लिहित असलेल्या लेखासाठी मी मराठी विकिपीडियाचा जन्मदिवस निश्चित करण्याचा प्रयत्न करीत होतो. जुने लेख या रिपोर्टमध्ये मला जनगणना २००१ हा पहिला लेख असल्याचे दिसले पण त्याला तारीख आहे २१ जानेवारी, २००५ची. मला पूर्वी तू किंवा हर्षलने मराठी विकिपीडिया १ मे, २००३ रोजी सुरू झाल्याचे सांगितल्यासारखे आठवते. तुझ्याकडे याबद्दल काही दुवे (इमेल, ब्लॉगपोस्ट, मेटावरील चर्चा, इ.) आहेत काय? असल्यास कळवशील. मी मेटावरही संदेश टाकला आहेच.

क.लो.अ.

अभय नातू १७:४३, २५ जानेवारी २०११ (UTC)

Hello,

I think you should have a look at वर्ग:Speedy deletion requests, that contains many pages that should be deleted.

Regards

--Hercule २३:३३, ९ जुलै २०११ (UTC)

खालील प्रस्तावावर तुमचे मत हवे

mw:Extension:TitleBlacklist हे एक्सटंशन मराठी विकिपीडियावर अलरेडी आहेच त्याच्या अनुषंगाने विकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न#Blocking of article titles in roman script by anon and new users हा प्रस्ताव मांडला आहे. प्रस्तावावर तुमचे मत हवे आहे. धन्यवाद माहितगार ०५:५६, २१ ऑगस्ट २०११ (UTC)

Language support group for Marathi

The Wikimedia Foundation has brought together a new team of developers who are dedicated to language support. This team is to support all the languages and consequently it is not realistic to expect that the team members can provide proper support for your language. It is for this reason that we are looking for volunteers who will make up a language support team.

This language support team will be asked to provide us with information about their language. Such information may need to be provided either to us or on a website that we will indicate to you. Another activity will be to test software that will likely have an effect on the running of the MediaWiki software. We are looking for people who clearly identify their ability. Formal knowledge is definitely appreciated.

As much of the activity will be concentrated on translatewiki.net, it will be a plus when team members know how to localise at translatewiki.net. Thanks, Gmeijssen १२:५४, ३० सप्टेंबर २०११ (UTC)

सूचना:

तुमच्याकरिता कुणी वाफाळलेला चहाचा कप भरला आहे .


mediawiki-i18n mailinglist

Hoi, You have indicated that you are a member of the Language Support Team for your language. As far as I can see, you are not subscribed to the mediawiki-i18n mailing list.

We intend to use this mailing list to keep you informed on the activities of the Wikimedia Localisation Team and also use it for communications about language support. It is impossible for a small team to know all relevant things for the support of all languages and consequently it helps when people who are able to support their language share their knowledge with us.

We hope and expect that we will gain the critical mass necessary to at least support the languages that either have a project within the Wikimedia Foundation or are working towards such a project in the Incubator through our Language Support Teams. We hope that you will support us and that you subscribe to the mediawiki-i18n mailing list and help us with your expertise. Thanks, Gmeijssen २०:४३, १८ डिसेंबर २०११ (UTC)

PS when you are subscribed to the mailing list let me know.

https://translatewiki.net/wiki/Language_support_team
https://lists.wikimedia.org/mailman/listinfo/mediawiki-i18n

.

विकीपत्रिका सभासद नोंदणी ....!
नमस्कार, कोल्हापुरी

मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय रहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्‍या कामांची सर्वाना माहिती व्हावी आणि सद्द घटनांबद्दल आढावा ह्या उद्देशाने मराठी विकिपीडिया विकीपत्रिका दि. १ जानेवारी २०१२ पासून सुरू करीत आहोत.

पत्रिका इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये सदस्यांना त्यांच्या चर्चापानावर पोहचविण्यात येईल.

मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.

आपल्या माहिती आणि पुढील योग्य कार्यवाहीसाठी सादर.

कळावे - खबर्या (विकीपत्रिका)


येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी

नमस्कार ! चावडीवर येथे येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी काही प्रस्ताव मांडले आहेत. त्याविषयी कृपया आपली मते/कल्पना मांडावीत, अशी विनंती.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:२०, १ जानेवारी २०१२ (UTC)