"त्रिभुज प्रदेश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
[[Image:हुगळीत्रिभूजप्रदेश.jpg|frame|[[हुगळी]] नदीने बंगालच्या उपसागरात तयार केलेला त्रिभुज प्रदेश]][[Image:कृष्णात्रिभूजप्रदेश.jpg|thumb|[[कृष्णा]] नदीने तयार केलेला त्रिभुज प्रदेश]]
[[Image:हुगळीचा त्रिभुज प्रदेश.jpg|frame|[[हुगळी]] नदीने बंगालच्या उपसागरात तयार केलेला त्रिभुज प्रदेश]][[Image:कृष्णात्रिभूजप्रदेश.jpg|thumb|[[कृष्णा]] नदीने तयार केलेला त्रिभुज प्रदेश]]
'''त्रिभुज प्रदेश''' म्हणजे नदीच्या मुखाजवळ नदीने वाहून आणलेल्या गाळामुळे तयार झालेला प्रदेश होय. मोठ्या नद्यांचे त्रिभुज प्रदेश साधारणत: पात्राला अनेक प्रवाहांमध्ये विभागतात.
'''त्रिभुज प्रदेश''' म्हणजे नदीच्या मुखाजवळ नदीने वाहून आणलेल्या गाळामुळे तयार झालेला त्रिकोणी प्रदेश होय. मोठ्या नद्यांचे त्रिभुज प्रदेश नदीच्या पात्राला बहुधा अनेक प्रवाहांमध्ये विभागतात.


==त्रिभुज प्रदेशाची निर्मिती==
==त्रिभुज प्रदेशाची निर्मिती==

१८:५९, १३ जानेवारी २०१२ ची आवृत्ती

चित्र:हुगळीचा त्रिभुज प्रदेश.jpg
हुगळी नदीने बंगालच्या उपसागरात तयार केलेला त्रिभुज प्रदेश
चित्र:कृष्णात्रिभूजप्रदेश.jpg
कृष्णा नदीने तयार केलेला त्रिभुज प्रदेश

त्रिभुज प्रदेश म्हणजे नदीच्या मुखाजवळ नदीने वाहून आणलेल्या गाळामुळे तयार झालेला त्रिकोणी प्रदेश होय. मोठ्या नद्यांचे त्रिभुज प्रदेश नदीच्या पात्राला बहुधा अनेक प्रवाहांमध्ये विभागतात.

त्रिभुज प्रदेशाची निर्मिती

नदीच्या शेवटच्या टप्प्यात जेव्हा नदी समुद्राला मिळते त्यावेळी नदीच्या प्रवाहाचा वेग कमी होतो त्यावेळी प्रवाहातील वाळू, माती, खडी, दगड इत्यादी नदी मुखाशी टाकले जातात. सर्वात पहिल्यांदा खडी आणि वाळू जमा होतात कारण या गोष्टी जड असतात. माती हलकी असल्याने समुद्रात आतपर्यंत वाहून नेली जाते. जेव्हा खार्‍या पाण्यामुळे मातीच्या गुठळ्या तयार होतात, ती जड होते आणि खाली बुडते. अशा गाळाचे एकावर एक थर साठून त्रिभुज प्रदेश तयार होतो. नंतर या प्रदेशावर वनस्पती वाढून त्याला स्थैर्य देतात.

त्रिभुज प्रदेशाची निर्मिती ही नदीवर अवलंबून असते. त्रिभुज प्रदेशावर लाटा किंवा भरती-ओहोटी यांचा जास्त परिणाम होताना दिसत नाही. बर्‍याच वेळा त्रिभुज प्रदेशाचा आकार पक्ष्याच्या पायांप्रमाणे विविध फाटे पडल्यासारखा असतो. ग्रीक मुळाक्षर डेल्टा हे चिन्ह त्रिकोणाकृती आहे. यावरून त्रिभुज प्रदेशाला डेल्टा हे इंग्रजी नाव पडले आहे. त्रिभुज प्रदेश हा सखल मैदानी असून त्याची समुद्रसपाटीपासून उंची २० मीटर पेक्षा जास्त नसते. या प्रदेशातील जमीन गाळाची व बहुधा दलदलयुक्त असते. एखाद्या नदीच्या मुखाजवळ तयार होणाऱ्या त्रिभुज प्रदेशाची निर्मिती खालील घटकांवर अवलंबून असते. १) नदीतील गाळाचे प्रमाण २) नदीचा मुखाजवळील वेग ३) सागराची खोली ४) त्या प्रदेशातील हवामान, पर्जन्य ५) सागरप्रवाह

सर्वात प्रसिद्ध त्रिभुज प्रदेश नाईल नदीवर आहे. गंगा-ब्रम्हपुत्रा या नद्यांनी केलेले बांग्लादेशमधील त्रिभुजप्रदेश, कृष्णा, गोदावरी, कावेरी, अमेझॉन, मिसिसीपी, र्‍हाईन, डॅन्यूब इत्यादी नद्यांचे त्रिभुज प्रदेश प्रसिद्ध आहेत. मिसिसिपी नदीचा त्रिभुज प्रदेश हा जगातील सर्वात विस्तृत त्रिभुज प्रदेश आहे. त्याचे क्षेत्रफळ ३१,००,००० चौ.कि.मी. पेक्षा अधिक आहे.