"गोगलगाय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: frp:Lemace
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: el:Σαλιγκάρι
ओळ २७: ओळ २७:
[[cdo:Ngù-mō̤-ngù-giāng]]
[[cdo:Ngù-mō̤-ngù-giāng]]
[[cv:Шуйсем]]
[[cv:Шуйсем]]
[[el:Σαλιγκάρι]]
[[eml:Lumèga]]
[[eml:Lumèga]]
[[en:Snail]]
[[en:Snail]]

१५:४४, १५ डिसेंबर २०११ ची आवृत्ती

जमीनीवरील गोगलगाय

गोगलगाय हा मृदुकाय आणि उदरपाद वर्गात येणारा प्राणी आहे. गोगलगायींच्या शरीरावर कवच असते. यालाच शंख असेही म्हणतात. नात्र बिना शंखांच्या कवच नसलेल्या गोगलगायी आढळतात. गोगलगायींच्या अंदाजे ३५,००० जाती आहेत. या प्राण्यांमध्ये राहण्याची ठिकाणे आकार, वर्तन, बाह्यरचना आणि अंतर्रचना यांमध्ये विविधता आढळते. श्वसन संस्थेतील प्रकारानुसारदेखील दोन प्रकार आहेत. जमिनीवर राहणार्‍या गोगलगायी फुफ्फुसाद्वारे, तर गोड्या पाण्यात अथवा समुद्रात राहणार्‍या गोगलगायी कल्ल्यांद्वारे श्वास घेतात. शंखातली गोगलगाय आपले शरीर शंखात आक्रसून घेऊ शकते. गोगलगायी उभयलिंगी असतात परंतु स्वफलन होत नसल्याने त्यांना प्रजननासाठी दुसर्‍यांशी गोगलगायींशी संभोग करावा लागतो. जमिनीवर किंवा गोड्या पाण्यात राहणार्‍या बहुतेक गोगलगायी अंडी घालतात व त्यातून डिंभ अवस्थेतून न जाता प्रौढ प्राणी निर्माण होतात. पाण्यातील गोगलगायी जल-वनस्पती आणि काही वेळा मृत प्राण्यांवर जगतात. शंकूसारख्या दिसणार्‍या गोगलगायी विषारी असतात. आपल्या विषारी दंशाने ते मासे वा इतर लहान जिवांना भक्ष्य बनवतात.

उपयोग

काही ठिकाणी गोगलगायींचा खाद्य म्हणून उपयोग केला जातो. युरोपात अनेक समुद्री गोगलगायींच्या जातींपासून पदार्थ तयार करतात. गोगलगायींच्या काही जाती विषारी असतात.

  • शंख - हिंदू धर्म पुरातन काळापासून शंखाचा उपयोग करत असल्याचे आढळते. हिंदू संस्कृतीत शंखनाद हा पूजेचा एक भाग असतो.

उपद्रव

शेतीमध्ये गोगलगायींचा प्रादुर्भाव झाल्यास, रात्रीच्या वेळी बाहेर पडलेल्या गोगलगायींनी रोपांची पाने खाल्ल्याने शेताचे नुकसान होते. महाराष्ट्रातील गोगलगायी जून ते सप्टेंबर या काळात अत्यंत सक्रिय असतात व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. हा उपद्रव टाळण्यासाठी एकाचवेळेस सामूहिकरीत्या गोगलगायीचे निर्मूलन करणे आवश्‍यक आहे. एका शेतकऱ्याने उपाययोजना करून हा उपद्रव पूर्णतः दूर होत नाही.

  • शेताभोवती सुमारे दोन मीटरच्या पट्ट्यात राख पसरवावी. त्यावर मोरचूदकळीचा चुना दोनास तीन प्रमाणात मिसळून त्याचा पातळ थर राखेवर द्यावा त्यामुळे गोगलगाय तेथे येत नाही.
  • उन्हाळ्यात जमिनीची खोलवर नांगरट केल्याने त्या मरतात.
  • कोंबड्या पाळाव्यात त्या गोगलगायी खातात.
  • शेतामध्ये ठरावीक अंतरावर उचलता येण्यासारखे गवताचे ढीग ठिकठिकाणी करावेत. त्यांखाली गोगलगायी मोठ्या संख्येने जमतात. लपलेल्या गोगलगायी सकाळीसकाळी गोळा करून त्यांचा नाश करावा. तसेच पिकांच्या मुळाशेजारी मातीमध्ये त्यांनी घातलेली पिवळट पांढर्‍या रंगाची साबुदाण्याच्या आकाराची अंडी गोळा करून नष्ट करावीत.

अधिक माहिती

बाह्य दुवे