"सदस्य चर्चा:V.narsikar" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ ४३१: ओळ ४३१:


मी आपण सांगितलेली माहिती मिळवण्याचा प्रयत्न करेन. कांबळे ०७:०२, ६ नोव्हेंबर २०११ (UTC)
मी आपण सांगितलेली माहिती मिळवण्याचा प्रयत्न करेन. कांबळे ०७:०२, ६ नोव्हेंबर २०११ (UTC)

==निर्देश==

माझ्या सदस्य पाना बाबत आपण काही सदस्यांना निर्देश देण्याचे वाचले. आता कुणी जैन ह्याने पान काढा पण लिहिले आहे. '''हा काय प्रकार आहे....?''' [[सदस्य:Meshram|Meshram]] ०८:१०, ७ नोव्हेंबर २०११ (UTC)

१३:४०, ७ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती

१४:४९, १३ नोव्हेंबर २००९ (UTC)

'Archives'
जुन्या दप्तरदाखल चर्चा खाली आहेत
पासून पर्यंत
चर्चा १ (Archive 1) ९/०६/२००६ ०३/०८/२००९
चर्चा २ (Archive 1) ०४/०८/२००९ १२/११/२००९
चर्चा ३ (Archive 1) १३/११/२००९ ३१/१२/२००९
चर्चा ४ (Archive 1) ३१/१२/२००९ ०५/०६/२०१०
चर्चा ५ (Archive 1) ०६/०६/२०१० ३१/०७/२०१०
चर्चा ६ (Archive 1) ०१/०८/२०१० २४/०९/२०१०
चर्चा ७ (Archive 1) २५/०९/२०१० २९/०७/२०११

दिनविशेष

नरसीकर,

दिनविशेष घालण्याची कल्पना चांगली आहे. दोन सूचना (सुझाव) --

  • या दिवशी साजरे केले जाणारे सण व उत्सव हा उपविभाग असावा.
  • दुसरा दिनविशेष हा उपविभाग असावा. यात जयंत्या, पुण्यतिथ्यांची नोंद असावी. असे करताना उल्लेखनीयतेबद्दल दक्षता घ्यावी. तसेच, ज्या जयंत्या, इ. इंग्लिश तारखेनुसार पाळल्या जातात त्यांचा सहसा उल्लेख करू नये, उदा. लो.बा.गं.टि.पु. - १ ऑगस्ट. अर्थात, याला अपवादही आहेत, उदा. शिवाजी महाराजांची जयंती.

अभय नातू १४:००, ३० जुलै २०११ (UTC)

  • नार्सिकारजी नमस्कार,

दिनविशेष हे फार मोठे काम आहे असे मला वाटते. जर ह्यावर मेहनत घायचीच असेल तर थोडा विचार पूर्वक योजना आखायला हवी जेणे करून हि मेहेनत बहुआयामी स्वरुपात वापरता यावी म्हणून मनात होते.

  • कारणे
  1. दिनविशेष अनेक ठिकाणी वापरता येऊ शकते
  2. लेखात टाकल्यास सारी मेहनत अटकून पडणार
  3. दिनविशेष डायन्यामिक असल्याने (म्हणजे काळानरूप बदलत/वाढत असल्याने) त्याचे सवर्धन, संगोपन एकाच ठिकाणाहून करणे सोपे पडेल. लेखां मध्ये जाऊन ते करणे कटकटीचे होईल.
  4. बनवण्यास पण सोपे पडेल आणि वापरण्यास हि सोपे होईल
  5. माहितीचा वापर वाढेल/ अनेक ठिकाणी उपयोगात आणता येईल

सध्या माझ्या कडील हाती घेतलेली कामे सरली नसल्याने मी आपणाशी बोललो नाही पण मानत होते. कारण आपले काम थांबून ठेवायचे मला येग्य वाटले नाही. आसो पण आता तुम्ही विषय सुरु केलाच आहेत तर मला काही माहिती त्वरित सांगता येईल का.

  1. साचा किवा तत्सम कल्पना योग्य वाटते का
  2. दिनविशेष मध्ये तुम्हाला काय द्यावे असे अपेक्षित आहे (अभय चे निर्देश धरून )
  3. सर्व साधारण माहिती किती असणार आहे (३६० दिवस/ १२ महिने / ??)
  4. जर आपणास थांबवले तर आपण किती दिवस वाट पाहू शकाल
  • (वेळेच्या नियोजनाच्या दृष्टीने )
  1. आपण पण साचे बनवता का? साच्या बरोबर आपली जवळीकता !
  2. ह्या कमी अजून कोणी सोबत आहे का?
  3. आणि वेळो वेळी त्रास द्यायला आपण उपलब्ध असाल का !!!!

साचा बनवणे लवकर होईल, पण मला संपूर्ण विदा एकाच ठिकाणावरून नियंत्रित करण्याची प्रणाली विकसित करायची होती त्या साठी लागणारे DPL ला मिडियाविकी सपोर्ट करते पण अजून विकिपीडियाने ते स्वीकारले नाही. तरी काहीतरी वेगळी शक्कल लढवावी आणि काही प्रमाणात तरी सामान्य करण करता येते का ते पाहावेसे वाटते. कधीतरी हे करावेच लागे मग ते आताच का नाही. पण हा अट्टहास मुळीच नाही. राहुल देशमुख ०८:०६, ३१ जुलै २०११ (UTC)

नार्सिकार जी धन्यवाद..!

मलाच कामे आवरण्याची घाई असते ( त्याचा लोकांना बरेचदा त्रास होतो ) त्यामुळे असे विचारले होते. मी आता अधिक माहिती विचारतो आपण उत्तरे आपल्या कल्पने प्रमाणे द्या आणि आपण पण ह्या दिशेने ( थोडा वेगळा ) विचार करून पहा(एक विदा अनेक माहिती). त्यातूनच अंतिम आराखडा तयार होईल.

  1. दिनविशेष मध्ये दिलेल्या प्रत्येक नोंदीचे भविष्यात लेख बनवण्याचा विचार असुशाकेल का ?\ आहे का ?
  2. हि माहिती वेग वेगळ्या प्रकारे ग्रुप करावी लागेल का? जसे पोर्णिमा, द्वितीय, (यात सर्व १२ हि आल्या ) ह्याचे दिनविशेष
  3. हि माहिती महिन्या प्रमाणे पण ग्रुप करवी अशी गरज पडेल का ? जसे श्रावण - ह्या महिन्यातील सर्वे दिनविशेष
  4. हि माहिती कोणत्या नामविश्वात साठवावी असे आपणास वाटते ( वैकल्पिक )

आपल्याला मला कुठून निरोप दिला असे तर वाटत नाही ना !!! राहुल देशमुख ०९:०४, ३१ जुलै २०११ (UTC)


नमस्कार नार्सिकर जी ,

>>>प्रत्येक तिथी ठराविक वेळेत बदलत नाही.तसेच याचा इंग्रजी तारखांशी काहीच संबंध नाही

मि हे जाणतो आणि म्हणुन स्वयंचलित साचा बनवण्याचा मझा उद्देश बिलकुल नाही. पण माहिती मात्र पहिजे ति आणि पाहिजे तशि वेगवेगळ्या लेखांमध्ये त्याच लेखाचा भाग असल्यासारखी आपोआप दिसावी (आभासी) हा प्रयत्न आहे. (जादू ...!)

दिनविशेष हे प्रकल्प हिंदू धर्माला जोडून काम उरकावी का ?

मी दिनविशेष साठी तांत्रिक प्रस्ताव देलेलाच आहे. हे काम मोठे आहे ते असे दिसते.

  • अपेक्षित पाने
  1. याद्या पाने
    1. महिने पाने १२
    2. तिथी पाने - ३००
      1. तिथी जयंती - ३००
      2. तिथी पुण्यतिथी ३००
      3. तिथी सण ३००
      4. तिथी इतर ३००
  • एकून अंदाजे १५०० पाने
  1. लेख
    1. १५०० याद्या पानावर प्रत्येकी सरासरी ३ नोंदी पकडल्या तरी त्याचे (१५०० * ३)= ४५०० म्हणजेच @ ५०००

थोडक्यात पाच हजार लेखांचे कमीत कमी धेय्य येथे गाठता येईल राहुल देशमुख १७:०३, १ ऑगस्ट २०११ (UTC)

प्रस्ताव

नार्सिकार जी नमस्कार, मी सदर कामाचे तंत्र शोधले आहे. प्राथमिक चाचण्या पण यशस्वी झाल्या आहेत. ह्या बाबतचा प्रस्ताव चावडी तात्रिक प्रश्न वर पण मांडला आहे. हिरव्या कंदिलाची वाट आहे. धान्यवाद

राहुल देशमुख १४:३०, ३१ जुलै २०११ (UTC)

मराठी शब्दलेखनकोश

नमस्कार नरसीकर !

प्रा. यास्मिन शेख यांनी संपादलेल्या 'मराठी शब्दलेखनकोश' या कोशातील इ.स. २००७ सालातल्या आवृत्तीच्या पृ.क्र. २९-३०वरील नोंदीनुसार 'अमावास्या' असे लेखन प्रमाण आहे. प्रचलित माध्यमांमध्ये आढळणारे अमावस्या हे लेखन लेखनभेद म्हणूनही ग्राह्य धरण्याचा कल असला, तरीही मराठी शब्दलेखनकोशात (एकमेव) प्रमाण लेखन म्हणून हे लेखन नोंदवले आहे, हे विशेष.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:४२, १ ऑगस्ट २०११ (UTC)


एकला चलो रे!

नमस्कार नार्सिकार जी ,

आपण मागे मझा एका प्रश्नाला उत्तर देतांना एकला चलो रे! असे उत्तर दिले होते म्हणून मी दिनविशेष साठी काही ग्राउंड वर्क केले आणि छोटा संघ तयार करण्याचे ठरवले,

सद्या स्थिती

  1. निनादने पण ह्या कामास प्रकल्प हिंदू धर्म मध्ये समाविष्ट करण्याचे आजच मला कळवले आहे. त्याचा ह्या कामासाठी संपूर्ण पाठिबा त्याने व्यक्त केला आहे.
  2. मनोज ह्यांनी सहभागास तयारी दाखवली आहे
  3. मंदार ह्याच कामावर अगोदरच काम करतो आहे (मी त्याच्या उत्ताची प्रतीक्षा करतो आहे)
  4. आपण ह्या कामाची धुरा सांभाळण्यास पहिलेच तयार आहेत.

अजून एक दोन सदस्य ह्या कामात जोडण्याच्या मी प्रयत्नात आहे. आपणही आपल्या परीने काही प्रयत्न करावे हि विनती. .......अवघे धरु सुपंथ !

थोडे काम अजून पढे गेले कि संपूर्ण योजना मी माडतो तोपर्यत मी आपणास अधून मधून उपडेट देतच जाईल. आपणही आपल्या सूचना/विचार/मते/कल्पना कळवावे राहुल देशमुख ०६:०९, ३ ऑगस्ट २०११ (UTC)

धन्यवाद

नमस्कार नार्सिकरजी,

आपला स्वागत संदेश मिळाला धन्यवाद. मला कशा मध्ये योगदान करायचे ह्याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे. सागर:मराठी सेवक ११:४३, ३ ऑगस्ट २०११ (UTC)

अपडेट

नमस्कार नार्सिकार्जी,

  1. हिंदू धर्म प्रकल्पास नातूंचा हिरवा कंदील
  2. तांत्रिक प्रारुपाच्या प्रयोगास संकल्पच हिरवा कंदील
  3. दोन नावगत सदस्यांचे दिनविशेषवर काम करण्याची तयारी

आपण आपल्या कडील प्रोग्रेस कळवावा. धन्यवाद राहुल देशमुख ०७:४६, ४ ऑगस्ट २०११ (UTC)

चैत्र शु प्रतिपदा

लेख पाहिले.

१. सण व उत्सव लिहिताना हे कोठे किंवा कोणत्या समाजात साजरे केले जातात याचा उल्लेख शक्यतो द्यावा, उदा. गुढीपाडवा - मराठी नवीन वर्ष. उगादी - आंध्र प्रदेश. मौनी एकादशी - जैन सण.

१. शक्यतो global relevance असलेले आणि स्थानिक महत्व असलेले दिनविशेष वेगवेगळ्या उपविभागांत द्यावे. उदा. चैत्र शुद्ध प्रतिपदा मध्ये श्री शालिवाहन शक प्रारंभ आणि चैत्री नवरात्रारंभ हे एक उपविभागात तर निंबादेवीची यात्रा, निंबोळा,बुलढाणा जिल्हा आणि योगी माधवनाथ महाराज जन्मोत्सव चित्रकूट हे दुसर्‍या उपविभागात द्यावे.

२. स्थानिक दिनविशेष देताना उल्लेखनीयतेकडे विशेष लक्ष द्यावे. प्रत्येक दिवशीच्या प्रत्येक गावा/पाड्यातील जत्रेचा येथे उल्लेख पाहिजेच असे नाही :-)

३. इंग्लिश तारखांच्या लेखांप्रमाणे प्रत्येक तिथीला आधीच्या एक-दोन आणि नंतरच्या एक-दोन अशा तिथ्यांचे दुवे द्यावे. हे साच्यातून करता येईल. मी बघतो जमते का मला हे.

अभय नातू १४:३४, ४ ऑगस्ट २०११ (UTC)

त्वरित

नार्सिकार जी, बिमार सोडून देण्यात तुमचा हातखंडा असला तरी...., माहितीगारास प्रशासकाच्या जबाबदारीसाठी मी अभय नातूंना केलेल्या विनंतीस आपण त्वरित अनुमोदन द्यावे हि विनंती. राहुल देशमुख १८:२५, ७ ऑगस्ट २०११ (UTC)


गैरसमज

नार्सिकार जी, थांबा थांबा ...! मराठी कळफलकावर काना हा नेहमीच डोके दुखीचा ठरतो. येथे मला बिमार नसून बीमर म्हणायचे होते. मध्यंतरी आपण चर्चेत क्रीकेटी शब्दांचा वापर करीत होतो तेव्हा बीमर म्हणजे बाउन्सर असे मला म्हणायचे होते. तेव्हा आपण कुपया गैर समाज नसावा.

आता हा संदेश आपणास का - तर माहितगार हे आपले विकी गुरु आहेत असे आपण म्हणतात (संदर्भ- आपल्या मागील संदेश) तेव्हा त्याच्या नावाला अनुमोदन देण्यासाठी आपल्या पेक्षा उत्तम जुना आणि जाणकार समर्थक मलातरी दिसला नाही.

माहितीगारांचे नाव मी प्रस्तावित केल्यानंतर त्यांनी स्वतःच त्यास पर्याय सुचवला तेव्हा आपण आपले वजन खर्ची घालून प्रशासक पदाची डोकेदुखी माहितीगाराच्या डोकी लादण्याच्या पापकृत्यात थोडा पापाचा वाटा उचलावा म्हणून हि विनंती होती.

आता बीमर कुठून आला ? सर्वसाधारण पणे खेळण्यास कठीण आणि खेळण्यास भाग पडणारा चेंडू असे बाउन्सर ला म्हटले जाते. आपली विपी वरील प्रतिमा हि अतिशय सोज्वळ आणि विवादा पासून दूर राहणारी आहे. ह्या प्रस्तावाची सुरुवात मूळतह मनोज आणि अभय नातू ह्यांचातील मुखपृष्ठ ह्या वादतून वरून सुरु झाल्याने साहजिकच आपण ह्या वादात पडण्याचे टाळाल असे गृहीत धरून मी आपणास ह्यामध्ये भाग घेण्यास भाग पडतो आहे म्हणून त्यास बीमर म्हटले.

बीमर चुकून बिमार टाकल्या गेला आणि आपण त्याचा काय अर्थ घेतला हे मला कळले नाही. तरी माझ्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमस्व. आपण वयाने, अनुभवाने आणि कार्यानेही मोठे आहात तेव्हा आपण गैर समज करणार नाहीत असे वाटते राहिला प्रश्न विदर्भाचा तर मी पण तिकडलाच आणि भेटी बाबत म्हणाल तर पुढील नागपूर दौर्यात मीच तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न करीन. आपल्या सर्ख्याची विपिला गरज आहे माझ्या सारख्या कोण्या एका सदस्याच्या टीका टिपणीने जर आपण अशी टोकाची भूमिका घेतली तर कसे चालायचे. आसो पुन्हा एकदा माफी मागतो आणि आपल्या गोड संदेशाची वाट पाहतो ..... राहुल देशमुख ०७:०१, ९ ऑगस्ट २०११ (UTC)

नमस्कार

नमस्कार, आपला परीचय अल्प आहे. पण आपल्याशी संवाद रहावा अशी इच्छा आहे. राहुलच्या पानावर आपण सोडून जाण्या विषयी वाचल्याने धक्का बसला. कृपया असे काही करू नये ही आग्रहाची आणि कळकळीची विनंती. आपला कृपाभिलाषी निनाद ११:१५, ११ ऑगस्ट २०११ (UTC)

आमंत्रण

नरसीकरजी, विकिप्रकल्प हिंदू धर्म येथे सदस्य होण्यासाठी आपल्या आमंत्रण आहे! विकिपीडिया:विकिप्रकल्प हिंदू धर्म/सदस्य येथे सदस्य सूची मध्ये आपले नाव वाचण्यास उत्सुक आहे. निनाद ११:१९, ११ ऑगस्ट २०११ (UTC)

Invite to WikiConference India 2011


Hi V.narsikar,

The First WikiConference India is being organized in Mumbai and will take place on 18-20 November 2011.
You can see our Official website, the Facebook event and our Scholarship form.

But the activities start now with the 100 day long WikiOutreach.

Call for participation is now open, please submit your entries here. (last date for submission is 30 August 2011)

As you are part of Wikimedia India community we invite you to be there for conference and share your experience. Thank you for your contributions.

We look forward to see you at Mumbai on 18-20 November 2011

ही तर मदत!

अहो, ही तर मदत आहे. माझे चर्चा पान नेटके केल्याबद्दल धन्यवाद! अशा ढवळाढवळीचे मनापासून स्वागत आहे. नव्हे तुम्हाला मुक्तद्वार आहे :) कधीही या घर तुमचेच आहे. आपला विनित निनाद २२:५२, १२ ऑगस्ट २०११ (UTC)

नांदी

नार्सिकार्जी नमस्कार, आपण सर्वच दृष्टीने जेष्ठ आहात तेव्हा आपण माफी मंगणे योग्य नाही पण आपला गैर समज दूर झाला ह्याचा मला आनंद आहे. कार्यालयीन व्यस्ततेमुळे मी बाहेर असल्याने उत्तर देण्यास उशीर होत आहे. मध्यंतरी झाल्या प्रकाराने मी पण अस्वस्थ होतो आणि त्यामुळे दिनविशेषचे काम ठप्प झाले आहे. आता आपण आला आहात तर आशा करूया कि हाती घेतलेले काम शक्य तितक्या लवरकर धसास लाऊ. झाल्या गैरसमजास पुढील घनिष्ट समंधाची नांदी समजूया राहुल देशमुख ०९:४३, १९ ऑगस्ट २०११ (UTC)

दिनविशेष

Namsakar, me दिनविशेष sathi kam karnyas aatur aahe. Adeshachi vat pahat.... !!!मंदार कुलकर्णी ०४:१६, २१ ऑगस्ट २०११ (UTC)


खालील प्रस्तावावर तुमचे मत हवे

mw:Extension:TitleBlacklist हे एक्सटंशन मराठी विकिपीडियावर अलरेडी आहेच त्याच्या अनुषंगाने विकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न#Blocking of article titles in roman script by anon and new users हा प्रस्ताव मांडला आहे. प्रस्तावावर तुमचे मत हवे आहे. धन्यवाद माहितगार १५:३१, ११ ऑगस्ट २०११ (UTC)

पानकाढा साच्या लावण्याचे कारण समजले नाही.

Chameli.jpg‎; Savar khoda.jpg‎; Savar khod2.jpg‎;Aaghada leafs.jpg‎;Aaghada leaf reverse.jpg‎; Ruichi pane2.jpg‎, Ruichi pane2.JPG‎, Karlyaacha vel.jpg‎; Karlyaachi pane va fule.jpg‎; Karlyaache ful.jpg‎; Karlyaache ful.jpg‎; P1020718.JPG‎;

पानकाढा साच्या लावण्यापे़क्षा त्या संचिकांचा योग्य वापर केला तर छान होईल असे मला वाटते. या संचिका स्वतः काढलेले छायाचित्र वाटतात मग त्या काढण्याचा उद्देश्य कळाला नाही, शेवटी आपण सिनिअर आहात...... सचिन ०८:५८, २४ ऑगस्ट २०११ (UTC)

अनुवादात सहाय्य हवे


विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमूवर थोडेफार काम केले आहे, कसे वाटते ते लिहावे....J १७:२६, १ सप्टेंबर २०११ (UTC)

नमस्कार!

नमस्कार नरसीकरजी! बरं केलंत मला हे कळवून की असे संदेश दिल्याने नोटिफिकेशन्स मिळतात. ह्या गोष्टी शिकण्यास मला थोडा वेळ लागेलच... एक विचारायचे होते; असे संदेश सोडताना संवाद एका प्रवाहात वाटत नाही, त्याने काही हरकत नाही का? आपले मार्गदर्शन व प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद! --सिद्धांत भवरे १४:०५, २ सप्टेंबर २०११ (UTC)

बरंय. असं नवं बरंच काही शिकायचंय मला... :P धन्यवाद!

धन्यवाद

धन्यवाद! आपण साच्या बद्द्ल जी माहिती दिली तिचा यापुढे वापर करण्याचे मी लक्षात ठेवेन. सध्या एलईडी लेखात जास्त काम करण्याची शक्यता कमी असल्याने साचा लावत नाही. एक माहिती हवी होती, की एखाद्या लेखास उद्योनमुख लेख अथवा मुखपृष्ठाचा लेख म्हणुन कसे निवडतात. त्यांचे नामांकण / निवड कोठे होते. सध्या आपल्या मुखपृष्ठावरील उद्योनमुख लेख व मुख्य लेख बरयाच दिवसापासुन बदलल्याचे माझ्या पाहण्यात नाही, काही माहिती मिळेल का? Vishal1306 ०७:५४, ८ सप्टेंबर २०११ (UTC)


हुशंगाबाद, शिवपुरी आणि शेवपूर कलाण

मध्य प्रदेशात या तिन्ही नावांचे जिल्हे आहेत. मुरारजीचे स्पेलिंग जसे Morarji करतात तसे हुशंगाबादचे Hoshangabad आणि शेवपूर कलाणचे Sheopur Kalan. पण आता गुजराथीत जसे मोरारजी लिहिले तरी चालते तसे हिंदीत होशंगाबाद असेही लिहिलेले/छापलेले सापडते. मराठीत मात्र अजूनही मुरारजी आणि हुशंगाबाद....J ०९:४३, ९ सप्टेंबर २०११ (UTC)

हुशंगशाह

हुशंगाबाद हे पंधराव्या शतकात हुशंगशाह नावाच्या राजाने स्थापलेले म्हणून मुळात हुशंगाबादच होते. इंग्रजीत 'उ'चे स्पेलिंग 'ओ'ने करावे लागत असल्याने उमरखाडी, उस्मानाबाद, उमर खय्याम, उंबरगांव, उटकमंड, मुरारजी, हुशंगाबाद, उडिसा, दुड़्ड़ामणी वगरे शब्दांत 'यू'ऐवजी 'ओ'हे इंग्रजी अक्षर येते. स्पेलिंग 'यू'ने केले असते तर यूमरखाडी, अस्मानाबाद, वगैरे फारच चुकीचे उच्चार झाले असते. चूक करावीच लागणार असेल तर ती तुलनेने कमी असावी(error to the safer side) हे धोरण इंग्रजी स्पेलिंगकर्त्यांनी पाळले....J १०:१२, ९ सप्टेंबर २०११ (UTC)

नरसिंगपूर आणि नरसिंहपूर

नरसिंगपूर महाराष्ट्रात आहे, नरसिंहपूर मध्य प्रदेशात .इंग्रजीत सिंहचे स्पेलिंग Sing, Singh, Sinh, Sinha अशा चार प्रकाराने केले जाते. त्यांतले Singh आणि Sinha हे जास्त योग्य समजले जाते. उद्देश असा की गाणे हा, किंवा चिन्हासारखा सिन्ह असा अर्थ होऊ नये. बंगालीत तर, सिंह या शब्दाचा उच्चारच् सिंघो असा करतात. संस्कृतमसधून न आलेल्या हिंदी शब्दातल्या शब्दारंभी नसलेल्या 'ग्'चे स्पेलिंग 'जीएच्'ने आणि 'ड्'चे स्पेलिंग 'आर्'ने करतात. म्हणून खडकी, रुडकेला, रुडकी यांची स्पेलिंगे अनुक्रमे Kirkee, Rourkela, Roorkee वा Roorkhee अशी केली जातात...J १०:४७, ९ सप्टेंबर २०११ (UTC)

राणी पद्मिनी

ही राणी पद्मिनी नावाची नटी जेव्हा हिंदी चित्रपटांत कामे करायची तेव्हा तिचे नाव 'पद्मिनी' होते, असे मला वाटते. राज कपूरच्या 'जिस देस में गंगा बहती हैं' मध्ये नायिका पद्मिनी होती. तिच्या बहिणीचे नावही रागिणी होते. तीच जर ही मल्याळम नटी 'राणी पद्मिनी' असेल तर पानाचे शीर्षक नुसते 'पद्मिनी' करायला पाहिजे. आणि शिवाय पद्मिणीतला णी निखालस चुकीचा आहे. ...J ०६:०८, १३ सप्टेंबर २०११ (UTC)

विकीवर शोधले

पद्मिनी आणि राणी पद्मिनी(अभिनेत्री) या दोन वेगळ्या नट्या आहेत. मी राणी पद्मिनी(अभिनेत्री) वर केलेले बदल उलटवायला पाहिजेत....J ०६:१९, १३ सप्टेंबर २०११ (UTC)

धन्यवाद

नमस्ते.
आपण माझे केलेले अभिनंदन म्हणजे मराठी विकिपिडीयाचे अभिनंदनच आहे. आपण देत असलेल्या योगदानाबद्दल सर्वांना माहिती आहेच. मराठी विकिपिडीयाने ज्ञानाबरोबरच आपल्याला बालपणीच्या आठवणींचा जो वेगळा आनंद दिला तसाच इतर विकिपिडीया वापरकर्त्यांना घेता यावा म्हणून आपणा सर्वांना योगदानासाठी वेळ मिळावा हिच सदिच्छा.
संतोष दहिवळ १२:५७, २१ सप्टेंबर २०११ (UTC)

विकिपीडिया कॉन्फरन्स

नमस्कार नार्सिकार जी विकिपीडिया कॉन्फरन्स बाबत आपण चावडीवर वाचलेच असेल. आपण त्यास उपस्थित राहणार आहेत का ? सदर कार्यक्रमात मराठी विकिपीडिया साठी काय काय आणि कसे करावे असे आपणास वाटते ? कळवावे राहुल देशमुख ११:२८, २४ सप्टेंबर २०११ (UTC)

चित्रांबद्दल मदत

नमस्कार, कृपया एक माहिती हवी होती. विकिपिडियाच्या इंग्रजी आवृतीत असलेली सर्वच चित्रे मराठीत वापरता येत नाहीत का? म्हणजे मला ती केवळ फाईलनेम देउन वापरता येतात की मला त्या माझ्या संगणकावर डाउनलोड करुन पुन्हा विकिपिडियाच्या मराठी आवृतीत अपलोड कराव्या लागतील. मला मार्गदर्शन करा.

Vishal1306 १०:४३, २६ सप्टेंबर २०११ (UTC)


Vishal, the images in commons can be used in any languag with the same file name. If at all, the images are in english wikipedia, your way can be used only the activity needs to be duplicated for every language where as if image is there in commons, it becomes very easy.....मंदार कुलकर्णी ११:०२, २६ सप्टेंबर २०११ (UTC)

धन्यवाद आणि माहितीचौकट विमानअपघात

नमस्कार नरसीकर !

परवा तुम्ही विचारपूस केलीत, तेव्हा बरे वाटले.. अर्थात त्यावेळी लगोलग उत्तर लिहू शकलो नाही, याबद्दल क्षमा मागतो. तेव्हा काही कामे उरकून झोपी जाणे, या अजेंड्यामुळे झपाटलो होतो :).

बकी, माहितीचौकट विमानअपघात या साच्यातल्या पॅरामीटरांचे मराठीकरण त्या साच्याच्या चर्चापानावर नोंदवल्यास, मागाहून सारे पॅरामीटर मराठीत आणता येतील, आणि ज्या लेखांमध्ये सध्या इंग्लिश पॅरामीटरांसह साचा वापरला गेला आहे, तिथे तिथे सांगकाम्ये चालवून मराठीकरण घडवून आणता येईल. त्यामुळे मुख्य काम मराठीकरण केलेला साचा बनवणे हे होय. त्यासाठी तुम्ही त्या साच्याचे च्र्चापान किंवा तुमच्याच सदस्यनामविश्वातले एखादे उपपान वापरून बघू शकता. अजून काही मदत लागल्यास जरूर कळवा.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०२:२८, २७ सप्टेंबर २०११ (UTC)

चहाबद्दल धन्यवाद ! :) --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:०६, १ ऑक्टोबर २०११ (UTC)

फॉर्म्युला वन साच्यात किरकोळ दुरुस्ती केली आहे. आता सर्व ठीक दिसत आहे. :)
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:२५, २ ऑक्टोबर २०११ (UTC)
)) .. हा हा! हो ना; सकाळी सकाळी केलेल्या नाष्ट्यामुळे, आज अंगी बळ संचरले आहे :).

काम चालु साचा

धन्यवाद नरसीकर. मुळात माझा काम चालु साच्याबद्दल जरा गोंधळ झाला होता. त्या साच्यात जे स्पष्टीकरण दिले आहे त्यावरुन मला वाटले की केवळ संपादन प्रत्यक्ष चालु असतांना इतरांनी तत्काळ काही बदल न करावे या हेतुने तो लावायचा आहे. असो , आता माझा गोंधळ दुर झाला असुन मी नक्की काळजी घेईन. बरे ," सांगकाम्या " म्हणजे नेमका काय प्रकार आहे. ती कोणी व्यक्ती आहे की कोणता समुह. त्यांकडे मदत कशी आणि कोणत्या प्रसंगात मागता येईल. कृपया माहिती द्यावी. Vishal1306 ०९:०४, २८ सप्टेंबर २०११ (UTC)

वर्ग:मराठी आडनावे

वर्ग:मराठी आडनावे हा वर्ग पाहिला. त्या मधील बऱ्याच आडनाव लेखात त्या आडनावाची प्रसिध्द व्यक्तींची यादी आहे. मी ज्या लेखात पानकाढा हा साचा लावला आहे, त्यात असे काहीही नव्हते. मराठी आडनावे हा वर्ग व त्यातले लेख मी साचा लावल्या नंतर पहिला त्यामुळे माझ्या मनात थोडा संभ्रम आहे. आपण (साचा काढणे बाबत) योग्य तो निर्णय घ्यावा. - प्रबोध (चर्चा) ११:३०, ३० सप्टेंबर २०११ (UTC)

You are welcome!! :) - प्रबोध (चर्चा) १६:४१, ३० सप्टेंबर २०११ (UTC)

सोवियत संघाचे राष्टाध्यक्ष

नमस्कार, मी अमेरिकन राष्ट्राध्यक्षाचे काम करतांना कोणाला तरी पहिले आहे. पण त्यांनी सोवियत संघाचे राष्टाध्यक्ष पण का नाही घेतले हे कळले नाही. मी सोवियत संघाचे राष्ट्राध्यक्ष लेख साठी काही साचे बनवण्याचा प्रयत्न केलाला, तुम्ही चेक करून सांगू शकाल का ? कोणी तरी हे लेख पण अनुवादित करायला हवेतना. - मेघनाथ १२:५५, २ ऑक्टोबर २०११ (UTC)

पान काढणे बाबत

व्यक्ती आणि वल्ली मधील व्यक्ति रेखा विभागातील आंतरिक दुवे पहावेत. ह्या लेखात काहीच मजकूर नासाल्याने, मी १-२ ओळींचा मजकूर टाकण्याच्या विचारात होतो. परंतु, नारायण (स्थानांतरीत१) हे नजरेस पडले. प्रताधिकार उल्लंघना मुळे हा लेख वगळण्यात आला आहे. ह्या सर्व व्याक्तीरेखांबाबतही असेच होण्याची शक्यता आहे. हे लेख ठेवावे का? - प्रबोध (चर्चा) १५:०१, २ ऑक्टोबर २०११ (UTC)

धन्यवाद

स्वागता साठी तुला धन्यवाद तात्या ०५:२१, ६ ऑक्टोबर २०११ (UTC)

तुला विजया दशमीच्या शुभेच्या आणि अनेक आशीर्वाद. तात्या ०५:३७, ६ ऑक्टोबर २०११ (UTC)

क्षमस्व

तुमच्या अडचणीच्या निवारणासाठी शोध घेण्याचा प्रयत्न केला पण समाधान सापडू शकले नाही. क्षमस्व. संतोष दहिवळ ११:४०, ६ ऑक्टोबर २०११ (UTC)

नरसीकर, २००६ बहरैन ग्रांप्री‎‎ या लेखातील अमराठी मजकूर वगळावा लागला, त्याबद्दल क्षमस्व. परंतु आपण जुन्या-जाणत्या सदस्यांनी इंग्लिश विकिपीडियावरील महिती कॉपीपेस्ट मारून मराठी विकिपीडियावर ओतण्याचे मोहक शॉर्टकट न मारता, मराठीतून दर्जेदार वाचनीय आशय आणून नवागत सदस्यांसमोर आदर्श घालायचे काम करायला हवे, असे प्रकर्षाने वाटते (किमान मुख्य नामविश्वातल्या लेखांमध्ये तरी हे कटाक्षाने पाळायला हवे.). माझे हे बोलणे उणे-अधिक वाटल्यास, त्यावर न जाता, त्यामागचा हेतू समजून घ्याल अशी आशा बाळगतो.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:२६, ८ ऑक्टोबर २०११ (UTC)
नमस्कार नरसीकर ! काही हरकत नाही. तूर्तास मी साचा:माहितीचौकट ग्रांप्री शर्यत माहिती/doc येथे व २००६ चिनी ग्रांप्री येथे केलेले बदल पाहिल्यास, मी केलेल्या किरकोळ दुरुस्त्या व त्याचे दृश्य परिणाम दिसतील.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:३४, ८ ऑक्टोबर २०११ (UTC)

टूलबार

तुमच्या vector.jsमध्ये आवश्यक ते बदल करावे लागतील. तुमच्या व्यक्तिगत monobook.js (सदस्य:V.narsikar/monobook.js)मधील आवश्यक ते विभाग काढून तुमच्या vector.js (सदस्य:V.narsikar/vector.js)मध्ये घालावे लागतील.

पूर्ण monobook.js cut-paste करून पहा एखादेवेळेस त्याने तुम्हाला अपेक्षित बदल होतील. माझ्या vector.js मध्ये डोकावून पहा -- (सदस्य:अभय नातू/vector.js)

अभय नातू १४:४८, ६ ऑक्टोबर २०११ (UTC)

राम के नाम पर

Czeror ह्या सदस्याने ग्रांप्री वरील कोरे लेख बनवण्यात मोठा वाट उचलला आहे. ग्रांप्री ह्या शब्दाची यालार्जी होईल इतकी कोरी किमया केलेली आहे, त्याला हे म्हणणे आहे हो. पण जर आपण केलेले लेख कोरे नसतील तर आपणा का चिंता करता आणि या टोळी युद्धात पडता. तुम्हीही राम राम गाडीत चढणार का ? राजाराम

नमस्कार

विचारपुस केल्या बद्दल धन्यवाद. सध्या विकी साठी जास्त वेळ देउ शकत नाही आहे. अधुन मधुन येत असतो.

जानेवारी नंतर कदाचीत जास्त वेळ देउ शकेल.

Maihudon ०७:०६, १० ऑक्टोबर २०११ (UTC)

मलाही केवळ डॉनांचे सारे शब्द जसेच्या तसे कॉपी पेस्ट करावे लागताहेत व्यक्तिगत जिवन व्यस्त झाले आहे.विचारपुस केल्या बद्दल धन्यवाद. सध्या विकी साठी जास्त वेळ देउ शकत नाही आहे. अधुन मधुन येत असतो.

जानेवारी नंतर कदाचीत जास्त वेळ देउ शकेल. माहितगार १७:५८, १२ ऑक्टोबर २०११ (UTC)

प्रश्न

नमस्कार, माझ्या सदस्य पानावर कोणीतरी पान/विभाग वगळा असा काही लिहिला आहे. काय आहे हे नक्की? माझा account delete करणार आहे का मराठी विकिपीडिया?? Bhimraopatil १३:५९, १३ ऑक्टोबर २०११ (UTC)

धन्यवाद

नार्सिकार नमस्कार ...!

मी आपली भूमिका आणि परिस्थिती समजू शकतो. पण मला एक कळत नाहीये कि अभय नातू फक्त एकच मागणी कि संकल्पच्या इतर सदस्यांशी सव्वाद साधताना वापरात असलेल्या बेधुंद, उर्मट आणि प्रक्शोधक उपदेशान बाबत त्याला समाज न देता विनाकारण शब्दांनी शब्द वाढवतो आहे. आपल्याला कोणी अपशब्द बोलला तर कसा तिळ पापड होतो मग इतर नवीन सदस्यांना काय म्हणून ह्यांनी असे बोलावे? ... असो आपण अभयला पण कारवाई करण्यास जर समजू शकले तर पाहावे, मी त्वरित वाद थांबवण्यास तयार आहे. नाहीतर उगाच चावडीस वेठीस धरण्याचे फलित काय ? आपल्या निरोपाची प्रतीक्षा आणि तो पर्यंत आपला मानराखून माझ्या कडून काही काळ चावडीवर एकतर्फी विवाद बंदी. धन्यवाद. - मी राजाराम बोलतोय

धन्यवाद

नरसिकरजी,काम हातात घेतल्या बद्दल मनःपुर्वक धन्यवाद

माहितगार ०८:०१, २३ ऑक्टोबर २०११ (UTC)

सध्याची पातळी गाठून दिल्या बद्दल धन्यवाद, अर्थात इम्प्लीमेंटेशन पुर्वी अजून काही पातळ्या गाठणे शिल्लक आहे. ते लवकरच करु माहितगार ०३:३२, २४ ऑक्टोबर २०११ (UTC)
जरूर. --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:४४, २३ ऑक्टोबर २०११ (UTC)

नमस्कार

सदस्य गिरीश यांनी अमिताभ आणि इतर दोन लेखांची जी माझ्या वगळण्या नंतर आणि चावडीवरील चर्चे नंतर केलेली पुर्निर्मिती स्वतःच्या भाषेत केली असल्यास कॉपीराइटचा प्रश्न उद्द्भवत नाही, अर्थात मी ती तपासून पाहिली आहेत असे नाही माहितगार ११:४५, १ नोव्हेंबर २०११ (UTC)

दुसर्यांदा लेख वगळण्याचे कारण कळेल काय ?

माहितगार यांनी वगळलेले काही लेख मी पुनर्लिखित करून व इतर संदर्भ वापरून टाकले होते. केवळ वर्गीकरण / विकिकरण या कारणासाठी आपण ते वगळले आहेत कि दुसरे काही कारण ? तसे असल्यास वर्गीकरण / विकिकरण नसलेले इतर लेख मी देखील वगळू शकतो काय ? मराठी विकीपिडीयास जास्त गरज लेख लिहिणार्यांची आहे कि वगळणार्यांची ?

Girish2k १५:५७, १ नोव्हेंबर २०११ (UTC)

देऊळ (चित्रपट) लेख

नमस्कार नरसीकर ! आपण देऊळ (चित्रपट) बनवल्याचे पाहिले. त्यात आपण माहितीचौकट साचा भरून वर्गीकरण टाकल्याचे दिसते. मात्र त्यात मुख्य "वाचनीय" मजकूर (म्हणजे माहितीचौकटीतील माहिती वगळता पूर्ण वाक्यात लिहिलेला आशय) आपण लवकरात लवकर भराल, अशी आशा आहे. नुकत्याच झालेल्या विकिपीडिया:चावडी#राम राम घ्यावा आमचा येथील चर्चा/वादविवादांच्या पार्श्वभूमीव हा लेख वगळण्याची विनंती होऊ शकते किंवा हा लेख अजूनही कसा वगळला नाही, याबद्दल विवाद झडू शकतात. त्यामुळे या लेखात प्रस्तुत विषयाची किमान प्रस्तावना करणारा वाचनीय मजकूर लिहून काढावा, अशी विनंती.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:०५, २ नोव्हेंबर २०११ (UTC)

उत्तर दिवाळी आतिषबाजी

नार्सिकार,

एव्हाना आपली दिवाळी संपली असेलच. आपण स्वताहून अभय नातू बरोबरील विवादात मध्यस्थी करण्यासाठी पुढाकार घेतला होता, त्याकामी आपण जेष्ठ असल्याचे आपण म्हणाला होता आणि मी पण आपल्या वडिलतेचा आदर राखून दिलेल्या शब्दा प्रमाणे एकतर्फी शांती पाळली आहे. आता आपण काय ते लवकर सांगावे. नातू जर आपणास ऐकत नसतील तर तासेपण स्पष्ट करावे. अन्यता आपण नकेवळ मराठी विकी वरील आपली विश्वशार्ता गमवाल पण त्याच बरोबर भविष्यातील सर्वच मध्यास्थाना बालिश असण्याचे संशय निर्माण होण्याचा धोका संभवेल. आपल्याकडून जेष्ठान प्रमाणे जबादार भूमुकेची अपेक्षा नाहीतर उत्तर दिवाळी आतिषबाजी लवकरच सुरु करावी लागेल. - मी राजाराम बोलतोय

  • नार्सिकार,

आपण मधात पाडूनाये असा सल्ला फार पूर्वी आपणास मी दिला होता तरी आपण मधात पडलात आपला उद्देश शुद्ध असावा असे मला वाटते पण केवळ गुमराह करून प्रश्न सुटत नसतात तर ते चिघळतात. नातुंसमोर आपणपण तोंड उघडू शकत नाही यातच त्याच्या दहशतीची आणि आपल्या मर्यादांची कल्पना आली.

>>>काळ गेला असता भांडणात जोर रहात नाही

हो पण येथे भांडण मुळीच नाही. येथे प्रश्न आहे तत्वांचा, अस्मितेचा, गुंडांना पायाबाद घालण्याचा, अरेरावी थांबवण्याचा, मराठी विकी वरील हुकुम शाही संपवून लोकशाही नांदवण्याचा, भाबड्या मराठी संपादकांवर होणार्या अन्यायाचा आणि जो पर्यंत हे साध्य होत नाही तो पर्यंत लढण्याचा.

चला गुलामांना गुलामगिरीची जाणीव करून देऊ .... - मी राजाराम बोलतोय

नमस्कार

मी आज एक मेल फॉर्वर्ड केली आहे त्यात टंकलेखनाच्या संदर्भाने धडे pdf (अटॅचमेंट) फॉर्मॅट मध्ये आहेत . त्यातील धडे विकिपीडिया:धूळपाटी/fontpracticepreload येथे आपल्या आवडी आणि सवडी प्रमाणे टंकलिखीत करून देता आल्यास पाहवे हि नम्र विनंती माहितगार ०९:१३, ३ नोव्हेंबर २०११ (UTC)

मौन

तुम्ही हा लेख सुरू केलेला पाहिला. तो मी वाचेन.

अभय नातू ०४:०३, ४ नोव्हेंबर २०११ (UTC)

उत्सर्ग मिथुने चैव प्रस्त्रवे दन्तधावने। श्राद्धे भोजन काले च षट्सु मौनं समाचरेत्।।

हा मूळ श्लोक आहे पण कोणत्या धर्मग्रंथातून आला आहे कल्पना नाही. (धर्मग्रंथाचे नाव आणि लेखक मिळालेतर मूळ संदर्भ देणे सोपे होईल) :जेवतांना, दात घासतांना, शरीरस्रावांचे वेळी (शौच/ लघवी करतांना), मैथुन करतांना हे उल्लेख बरोबर आहेत.प्रस्त्रवे चा अर्थ काय होतो याची मला कल्पना नाही पण यात आपण म्हणतातसा स्नान अथवा आंघोळीचा किंवा उच्चार करण्यापूर्वी(बोलण्यापूर्वी), या दोनचे उल्लेख आहेत का या बद्दल शंका वाटल्यामुळे आपल्याशी संवाद साधला. माहितगार १६:३०, ६ नोव्हेंबर २०११ (UTC)


जब मौन बोलने लगता है

तो अनकही से एक कहानी शुरू होती है

एक ख्वाब की हकीकत से टक्कर होती है

एक लब्ज की नज्म से यारी होती है

.

पर ये मौन जब खामोश रहता है

मन ही मन में तकरार शुरू होती है

सच और झूठ में दीवार खड़ी होती है

एक मुस्कान में आसुंओ की लड़ी बुनी होती है

.


इसीलिए मौन बोले तो अच्छा है

उसका साज छेड़ना ही सच्चा है

एक जिन्दगी बीतने के लिए ये बहाना अच्छा है

ओम शांती ..शांती ..शांती

लकी ०२:२६, ७ नोव्हेंबर २०११ (UTC)

प्रयत्न

जय भिम नर्सिकर,

मी आपण सांगितलेली माहिती मिळवण्याचा प्रयत्न करेन. कांबळे ०७:०२, ६ नोव्हेंबर २०११ (UTC)

निर्देश

माझ्या सदस्य पाना बाबत आपण काही सदस्यांना निर्देश देण्याचे वाचले. आता कुणी जैन ह्याने पान काढा पण लिहिले आहे. हा काय प्रकार आहे....? Meshram ०८:१०, ७ नोव्हेंबर २०११ (UTC)