"विकिपीडिया:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ६४२: ओळ ६४२:


:सचिन, साच्यात काय काय माहिती देण्यासाठी पॅरामीटर लागतील, याविषयी कृपया लिहाल काय ? त्यावरून अपेक्षित स्वरूपाची कल्पना येईल. --[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] ([[सदस्य चर्चा:Sankalpdravid|चर्चा]] | [[विशेष:योगदान/Sankalpdravid|योगदान]]) १८:१२, ४ नोव्हेंबर २०११ (UTC)
:सचिन, साच्यात काय काय माहिती देण्यासाठी पॅरामीटर लागतील, याविषयी कृपया लिहाल काय ? त्यावरून अपेक्षित स्वरूपाची कल्पना येईल. --[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] ([[सदस्य चर्चा:Sankalpdravid|चर्चा]] | [[विशेष:योगदान/Sankalpdravid|योगदान]]) १८:१२, ४ नोव्हेंबर २०११ (UTC)

::माहिती देण्यासाठी पॅरामीटर अपेक्षित आहेत. '''शीर्षनाव, विकी कॉमन्स वरील चित्र, लॅटिन नाव, ग्रे'ज अँनॅटॉमी यासंदर्भातील क्रमांक,[http://education.yahoo.com/reference/gray/ 1] एंब्रिऑलिजिकल उदय स्थान, शरीरसंस्था, शरीर शास्त्रातील स्थान, रक्तपुरवठा- रोहिणी, नीला, मज्जासंस्था पुरवठा, लिंफ, एन.आय.एच. संकेतस्थळावरील Medical Subject Headings, डॉरलँड क्रमांक''' सचिन ०२:०७, ६ नोव्हेंबर २०११ (UTC)


== भौ भौ ==
== भौ भौ ==

०७:३७, ६ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती

(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा

साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा

दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)

प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा


तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा

ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा

प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा


सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा








  • विकिपीडिया समाज कसा आहे.

विकिपीडियाचे वापरकर्ते मतांबद्दल सहमत नसतात तेव्हासुद्धा एकमेकांचा व त्यांच्या विरोधी मतांचा आदर करतात. एकमेकांबद्दल असाधारण विधाने तसेच वैयक्तिक आरोप करण्याचे टाळतात. सभ्य आणि शांत रहातात. शक्य तेथे संपादनाकरिता योग्य संदर्भ उद्धृत करून देतात. विचार जुळले नाहीत तर [1]संपादनास संघर्षाचे स्वरूप न देता, दर २४ तासात एकापेक्षा अधिक वेळा आधीची आवृत्ती बदलण्याचे टाळतात[2] फक्त चर्चापानावर चर्चा करतात. येथील संपादन व्यक्‍तिगत विश्वासार्हतेने होणे अपेक्षित असते. त्यासाठी इतरांबद्दल विश्वास दाखवणे देखील अपेक्षित असते. आपला मुद्दा पटवण्याकरिता [3]विकिपीडियास संत्रस्त न करता, सभ्यपणे विकिपीडियातील उपलब्ध मार्गांची योग्य माहिती व शोध करून घेऊनच मार्ग काढणे व आपले वेगळे मत नोंदवणे अपेक्षित असते. वृत्ती सतत सर्वांना साभाळून नेणारी, मनमोकळी व स्वागतेच्छू ठेवावी ही अपेक्षा आहे.

  • विकिपीडिया समाज काय नाही.
    • आचार अथवा विचारांची युद्धभूमी नाही. कोणतेही मतभेद कमी करण्याकरिता विशिष्ट पद्धती अवलंबणे अपेक्षित आहे. विकिपीडियाचा उपयोग विकिपीडियास किंवा कोणत्याही वापरकर्त्यास कोणत्याही प्रकारची त्रास/ धमकी देण्यासाठी होणे अपेक्षित नाही.
    • विकिपीडिया अनियंत्रित नाही. येथे बहुसंख्य निर्णय चर्चा करून एकमताने घेतले जातात.
    • विकिपीडिया राजकीय किंवा लोकशाहीचा प्रयोग नाही. निर्णय परस्पर विचारविमय करून होतात. सहमती चर्चेद्वारे घडवले जाते पण बहुमत असणे ही आवश्यक बाब नाही.
    • विकिपीडिया हा नियम बनवण्याचा चाकोरीबद्ध कार्यक्रम नाही. नियमांचा उपयोग केला जातो पण त्यांना घट्ट कवटाळून बसणेही अपेक्षित नाही.



साचा:उपग्रह मध्ये काही बदल करून हवे आहेत...

साचा:उपग्रह मध्ये काही बदल करून हवे आहेत.. मी हा साचा केविलवाणा प्रयत्न केला होता, परंतु तो फसलेला दिसत आहे. कृपया कोणी अनुभवी सदस्य त्यात सुधार करून देईल का ? त्यात अपेक्षित मुद्दे साच्यात दिसत नाहीत. मला किमान जीसॅट-८ लेखातील माहिती दिसणे अपेक्षित आहे.

सचिन १७:३४, १५ सप्टेंबर २०११ (UTC)

  • डॉ.सचिन,
साचा:उपग्रह पहिला. भारतीय राष्ट्रीय उपग्रह ह्या वर्गातील इतरही लेख पहिले कोठेच साचे नाहीत. उपग्रहा साठी अजतायग आपल्या कडे साचा नसल्याचे जाणवते. नवीन साचा तत्काळ बनवता येईल आपण साच्यात अंतर्भूत करावयाच्या माहितीच्या मथळ्याची यादी गटवार द्यावी. तसेच साच्यास कृत्रिम उपग्रह असे नाव द्यावे असे वाटते. राहुल देशमुख १८:२२, १५ सप्टेंबर २०११ (UTC)
राहुलजी मला वाटते पुढील मथळ्यांचा किमान समावेश आसावा. चित्र, उपग्रह नाव, प्रक्षेपक देश, मालक देश/कंपनी, अवकाशात प्रक्षेपण-, प्रक्षेपक यान -, प्रक्षेपक स्थान -, काम बंद दिनांक -, वजन, आकार, विद्युत पुरवठा, उपग्रहावरील यंत्रे , उपग्रह कक्षा -, कार्यकाळ -, उद्देश्य -, शोध, संकेतस्थळ.
सचिन १८:५४, १५ सप्टेंबर २०११ (UTC)

कृत्रिम उपग्रह

  1. साचा क्रमपरिवर्तन आणि संयोजनद्वारे तपासले असता व्यवस्थित चालतो आहे असे दिसते.
  2. साचा वापराचे दस्तावेज उपलब्ध करून दिलेली आहे.
  3. उदाहरणा दाखल वापरलेल्या लेखाची माहितीही उपलब्ध करून दिलेली आहे.
  4. आपण साचा वापरावा आणि काही मदत/सुधारणा लागल्यास कळवावे आणि अभिप्राय द्यावा.

राहुल देशमुख २२:०२, १५ सप्टेंबर २०११ (UTC)

साचा उत्तम झाला आहे. हा लगेच आवश्यक लेखात वापरायला सुरुवात करावी असे वाटते....मंदार कुलकर्णी १३:४३, १७ सप्टेंबर २०११ (UTC)
अत्तीउत्तम साचा ! सर्व बाबी पूर्ण करत आहे .

काही गोष्टी जरूर सामावल्या जाव्यात असे वाय्क्तीत मत आहे १. उपनाभी बिंदू २. अपनाभी बिंदू धन्यवाद !

सागर:मराठी सेवक १६:०४, २२ सप्टेंबर २०११ (UTC)

पण हे खरे आहे..!

ग. श्री. खैर लेख पहिला, आपण पण अवश्य ह्या पानास भेट द्या.

  1. सदर पान २००७ ला बनवण्यात आले.
  2. आजतायग त्यास ५दा संपादित करण्यात आले आहे
  3. आता अस्तित्वात असलेली हि ६ वी आवृत्ती आहे.
  4. सांगकामे वगळता ह्याकामी ४ सदस्यांनी योगदान दिले आहे.
  5. ४ वर्षांनी लेखात एकाही शब्द नाही

काही काळापूर्वी संकल्पनि एकाही शब्द नसलेल्या लेखांबाबत चावडीवर लिहिले होते असे आठवते. मला असे वाटते कि निव्वळ खोके बनवण्यास अटकाव व्हावा आणि त्यासाठी नवीन लेख निर्मितीस किमान शब्दांची मर्यादा घालावी का ? (ती किती असावी, कोणत्या नामविश्वास असावी वैगरे नंतर ठरवता येईल.) आपणाकडे असलेल्या आणि माहितीगाराने इतक्यातच वापरलेल्या पुरवणीचा त्यासाठी उपयोग करता येईल असे वाटते. राहुल देशमुख १३:३५, १७ सप्टेंबर २०११ (UTC)

हे खरेच आहे :-)

नुसते खोके असलेले लेख बनवू नयेत व त्यासाठी आपण इतर सदस्यांना उद्युक्तही करावे पण मज्जाव बिलकूल करू नये. ज्याला जे लिहायचे ते त्याने लिहावे (काही मर्यादांमध्ये राहून) हा विकिपीडियाचा मुख्य संकेत पाळण्याचा शक्यतो प्रयत्न करावा. एखाद्याचे चुकले तर ते (आधी) सुधारून घेउन मग त्या सदस्यास सूचना द्याव्यात.

असे विश्लेषण करणे चांगलेच, पण विश्लेषण आणि त्यानंतरच्या चर्चा करत बसण्यापेक्षा त्या लेखात चार शब्द घातले तर? आत्तापर्यंत दिसत आलेले आहे की चर्चांमधून फारसे काही साध्य होत नाही, वेळ उगीचच वाया जातो, वादावाद्या होतात आणि फुकट कटुता निर्माण होण्याची शक्यता होते.

अभय नातू १५:५३, १७ सप्टेंबर २०११ (UTC)

  • नवीन लेख निर्मितीस किमान शब्दांची मर्यादा घालावी का ? राहुल देशमुख १६:१८, १७ सप्टेंबर २०११ (UTC)
नवीन लेख लिहिताना इतके शब्द लिहावे असे जरूर सुचवावे आणि त्यासाठी काही directivesही द्यावे, उदा. नवीन लेखात किमान चार ओळी लिहाव्या, वर्गीकरण करावेच करावे, लेख पूर्ण नसल्यास विस्तार साचा लावावा, लेखावर स्वतःच काम करणे अपेक्षित असेल तर कामचालू साचा लावावा, आंतरविकी दुवे द्यावे, इ.
या सूचना संपादनखिडकीखाली/वर सुद्धा घालता येतील.
अभय नातू १६:३३, १७ सप्टेंबर २०११ (UTC)
मला वाटते मुख्य नामविश्वात किमान चार शब्दांची एक ओळदेखील न लिहिता बनवलेल्या नव्या लेखांची निर्मिती नुकत्याच बसवलेल्या मीडीयाविकी पुरवण्यांच्या लॉगर सुविधेत बसवण्याची काहीतरी सोय करायला हवी.
खेरीज अभय म्हणतो, तसे संक्षिप्त मार्गदर्शनही उपयोगी पडू शकेल.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:४६, १७ सप्टेंबर २०११ (UTC)
केले.
अभय नातू १७:०३, १७ सप्टेंबर २०११ (UTC)
  • धन्यवाद अभय,
तपासले असता हे काम करते आहे. मर्यादा काय घातल्यात आणि कोणत्या नामविश्वांवर लागू केले हे कळवणे. राहुल देशमुख १७:१४, १७ सप्टेंबर २०११ (UTC)
अभय, धन्यवाद ! मात्र सध्याच्या पुरवणीमुळे अब्यूझ लॉगांमध्ये पुनर्निर्देशन केलेल्या नव्या पानांचीही नोंद होत आहे, असे दिसते. असे बदल न टिपल्यास बरे होईल. --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०३:०६, १८ सप्टेंबर २०११ (UTC)
होय, असे होत होते, पण आता ते बदलेले आहे. बदल होण्यापूर्वीचे फिल्टरमध्ये पकडले गेलेले बदल दिसत राहतील असे वाटते.
अभय नातू ०४:३८, १८ सप्टेंबर २०११ (UTC)
मुख्य नामविश्वात पुनर्निर्देशने नसलेले लेख ज्यांत बदल केल्यावर आकार १०० बाइट पेक्षा लहान आहेत असे लेखबदल यात पकडले जातील.
सध्या अशा संपादनांची फक्त नोंद होईल. जर असे बदल खूप होत आहेत असे आढळले तर आपोआप हालचाल होईल अशी योजना करता येईल (संपादकास सूचना, लेखबदल न होऊ देणे, संपादकास बॅन करणे, इ.)
अभय नातू १७:२८, १७ सप्टेंबर २०११ (UTC)

मराठी शब्द सूचवा

मेमरी कार्ड साठी कुठला मराठी प्रतिशब्द वापरता येईल? संतोष दहिवळ १३:३०, २० सप्टेंबर २०११ (UTC)

माझे मत - मेमरी कार्ड हाच शब्द वापरला तरी चालेल. अजून काही आठवणीतलं .... जुळवून ते परत आठवणीत ठेवायला लागेल... :)मंदार कुलकर्णी १७:१७, २० सप्टेंबर २०११ (UTC)

विकी कॉन्फेरंस - मुंबई (भाषांतरासाठी मदत)

कृपया खालील इमेल वाचून शक्य तेवढी मदत हवी आहे....

Bishaka said: In the last year, I've attended meetups in Pune which were entirely in Marathi, in Kerala which were entirely in Malayalam, and in Kolkata which were entirely in Bengali. Those present were able to participate because the meetups were not in English

The meetups at Pune/Kannur/Kolkata were language specific wiki meetups. So it is perfectly alright to conduct that in the respective language since the focus is on the respective language wiki projects. But since WCI is the get together of wikimedians from various Indian languages, we are not in a position to conduct common sessions in a specific Indic language due to obvious reasons.

Is any other provision being made for translation? Technically it is not feasible to translate each program to several Indic languages. But the speakers of the respective language who are good in English can assist fellow speakers (who has language issues) in this. Already Bala from Tamil wiki has come forward to assist any Tamil speakers who has language issue. Same way others can also help.

In fact WCI is giving an opportunity to the Indian State where the event is happening. Since WCI is happening in Maharashtra, Marathi wiki community should be one of the immediate beneficiary of this. Will Marathi wiki community make use of this opportunity?

For Wikimania at Israel I remember the organizers (Hebrew Wikimedians) conducted a special track (in Hebrew) with various programs targeting the Hebrew speaking people. In addition they had provided some assistance to translate the English programs to Hebrew. Last year I saw the same phenomenon in Gdansk also.

According to me Marathi wiki community need to take up this opportunity to address the speakers Marathi (It is perfectly alright to have a special track in Marathi if Marathi wiki community can plan and execute it.). Translation of all English programs to Marathi (or for that matter to any other Indian language) will not be feasible as of now. But it is definitely a good idea to reach out to more Marathi people through various programs using WCI as a platform. From my experience with Malayalam community, I should say if ever Malayalam community host WCI in Kerala, Malayalam community will make sure there will be special separate track and special programs targeted towards the speakers of Malayalam. - Shiju

तुमचे मत इमेल पाठवला तरी चालेल. ...wheredevelsdare@hotmail.com, "Pradeep" <pradeep.mohandas@gmail.com>, "Shiju Alex" <shijualexonline@gmail.com>, "Gmail Mandar" <mvkulkarni23@gmail.com> - मंदार कुलकर्णी १७:१७, २० सप्टेंबर २०११ (UTC)

मराठी विकिपीडियाचा झेंडा - मुंबई विकिकॉन्फरन्स मध्ये..

नमस्कार मंडळी, दिनांक १८ ते २० नोव्हे. २०११ या काळात मुंबई येथे "WikiConference India 2011" भरवली जात आहे. याची माहिती आपणापर्यंत आत्तापर्यंत पोहोचली असेलच. अधिक माहिती http://meta.wikimedia.org/wiki/WikiConference_India_2011 येथे आहेच. या कॉन्फरन्सच्या संयोजन समितीकडून काही दिवसापूर्वी एक निवेदन आपल्याला आले आहे. कॉन्फरन्स "मुंबई" (महाराष्ट्रात) मध्ये असल्यामुळे साहजिकच मराठी मंडळीचा भरणा येथे असेलच. त्याच बरोबर "मराठी विकिपीडिया" च्या सदस्यांना आणि "मराठी विकिपीडिया" संदर्भातील विषयाला येथे निश्चितच प्राधन्य मिळेल असे त्यांच्याकडून सूचित करण्यात आले आहे. या विषयी मी आणि राहुल देशमुख यांनी कॉन्फरन्सच्या संयोजन समितीशी चर्चा सुरु केली असून "मराठी विकिपीडिया" साठी वेगळा Track देण्याला त्यांची मान्यता आहे.

या कॉन्फरन्स मध्ये "मराठी विकिपीडिया" चा झेंडा पुढे नेण्याचे मला सुचलेले काही निश्चित उद्देश असे:

  1. आपण सारे "मराठी विकिपीडिया" मधेच भेटतो, भांडतो, चर्चा करतो पण प्रत्यक्ष भेटीचा आनंद काही औरच.
  2. "मराठी विकिपीडिया" जास्तीत जास्त नवीन लोकांपर्यंत पोहोचवणे
  3. "मराठी विकिपीडिया" च्या प्रगतीसाठी दिलेल्या वेळात काही साधक बाधक चर्चा करणे
  4. "मराठी विकिपीडिया" मध्ये असलेल्या मंडळींच्या अडचणींची चर्चा करून उपाय योजना तयार करणे
  5. काही विशिष्ठ विषय घेऊन परिसंवाद घडवून विचारांना चालना देणे
  6. बाकीच्या भारतीय भाषांबरोबर आपली नाळ जोडून काही चांगल्या गोष्टींचे आदान प्रदान करून सर्व भारतीय भाषा "विकिपीडिया" वर समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करणे... इत्यादी इत्यादी.

या साठी आपणा सर्वांचा सहभाग नुसता आवश्यकच नव्हे तर अत्यावश्यक आहे. येत्या काही काळात संयोजन समितीशी विस्ताराने चर्चा करून निश्चित आराखडा तयार होईल. तेव्हा आपल्या मौल्यवान सूचना आणि त्याहीपेक्षा मौल्यवान वेळ या कॉन्फरन्ससाठी बाजूला काढून ठेवूया.

या विषयी अधिक माहिती आम्ही आपणापर्यंत पोहोचवूच. धन्यवाद..... मंदार कुलकर्णी १८:४०, २३ सप्टेंबर २०११ (UTC)

मंदार,राहुल, चांगली बातमी दिल्याबद्दल धन्यवाद ! विकिपरिषदेसाठी प्रत्यक्ष येऊ शकणार्‍यांसाठी व प्रत्यक्ष येऊ न शकणार्‍यांसाठी काय काय करणे शक्य आहे, याबद्दल काही मार्गदर्शक सूचना लिहू शकाल काय ?
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:१६, २४ सप्टेंबर २०११ (UTC)

. सादरीकरणासाठी निमंत्रण .

नमस्कार मंडळी,

मुंबई विकिकॉन्फरन्स चे दर्म्यान मराठी विकिपीडियाच्या मंचाकावरून आपले विचार मांडण्यासाठी, मराठी विकिपीडिया समुदायास मार्गदर्शन करण्यासाठी, प्रशिक्षण देण्यासाठी किंवा तत्सम सादरीकरणासाठी आणि तांत्रिक कार्यशाळेसाठी प्रस्ताव देण्यास सदस्यांना नम्र आव्हाहन.

आपण आपले सादरीकरणाचे प्रस्ताव खालिल आराखड्यात marathiwikipedia@gmail.com वर १५ ऑक्टोबर २०११ पर्यत इमेल द्वारे इमेल विषयाच्या रकान्यात speaker -2011 असे नमूद करून सादर करावीत. निवडक प्रस्तावास सादरीकरणास निमंत्रित करण्यात येईल. ज्यास्तीत ज्यास्त सभासदांना सामाऊन घेण्याचे धोरण ठरवण्यात आले असल्याने शक्य तितक्या लवकर प्रतिसाद द्यावा. निमंत्रित सदस्यांच्या भाडे आणि मुंबईतील वास्तव्याचा आर्थिकभार आयोजकांतर्फे उचलण्याचा प्रयत्न आहे . आपल्या भरीव सहभागाची अपेक्षा. राहुल देशमुख १९:५२, २३ सप्टेंबर २०११ (UTC)



 १  सदरीकरणाचे शीर्षक   

 २  सदस्याचेनाव      
 
 ३  विपत्र (इमेल) पत्ता 
 
 ४  सदस्य नाव (मराठी विपी वरील )
 
 ५  संपूर्ण पत्ता 

 ६  दूरध्वनी/भ्रमण दूरध्वनी 

 ७  संस्था 

 ८  आपल्या सादरीकरणाचा 
    ५०० शब्दात सारांश

 ९  सादरीकरण (वैकल्पिक)
राहुल,

गेल्या काही तासात बऱ्याच मंडळींनी वरील विषयावर मत प्रदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. या सर्वांचा धागा सुटून जाऊ नये म्हणून मला एक गोष्ट सुचवावीशी वाटते. या चावडीवरच "मुंबई विकिकॉन्फरन्स- मराठी विकिपीडिया" असे पान किंवा तत्सम पान बनवून त्यात चर्चा करता येतील काय? म्हणजे बाकी संपादकांना विनासंकोच त्यावर मत प्रदर्शन करता येईल आणि त्यांच्या सूचनांचा मुंबई विकिकॉन्फरन्सला उपयोगही होईल.....मंदार कुलकर्णी १७:३०, २४ सप्टेंबर २०११ (UTC)

केले.
  • मंदार,
सदर पान सुरु करून साचा सुचालन मध्ये पण बसवले आहे.
तूर्त प्रकल्प ह्या दुव्यास संमेलन दुव्याने बदलले आहे. काही मदत लागल्यास कळवावे. राहुल देशमुख १८:३१, २४ सप्टेंबर २०११ (UTC)

नवीन विभाग केल्याने बरे झाले आभारी !!

सागर:मराठी सेवक १८:५७, २४ सप्टेंबर २०११ (UTC)

आनंदाने सहभाग घ्यायला आवडेल

  • आनंदाने सहभाग घ्यायला आवडेल. सध्या मी विकिपीडिया इंडिया एड्युकेशन प्रोग्राम मध्ये, मराठी विकिपीडिया प्रसारित करत आहे. अनुभव मांडण्यास संधी मिळाली तर उत्तम. AbhiSuryawanshi १७:४१, २४ सप्टेंबर २०११ (UTC)


देवनागरी साचा

मी साचा:देवनागरी हा बनवलेला साचा रोमन आकडे देवनागरीत लिहिण्यासाठी उपयुक्त आहे. साचा:ग्रॅंडस्लॅम माहिती ह्या साच्यामध्ये देवनागरीचा वापर केला आहे.

{{देवनागरी|1234}}

= १२३४.
Abhijitsathe १७:२२, २४ सप्टेंबर २०११ (UTC)

  • अभिजित, साचाचे नाव देवनागरी अंक जर केले तर अधिक उत्तम होईल असे वाटते. साचा वापरात जाण्या आधीच हा बदल केल्यास उत्तम. राहुल देशमुख १७:३२, २४ सप्टेंबर २०११ (UTC)

मराठी लेखन संकेत

शुद्धलेखनाच्या नियमात समाविष्ट न झालेले काही लेखन संकेत मराठीत आहेत. त्यांतले काही असे :

  • उच्चारित अनुस्वार असलेल्या शब्दांमधले इ-कार, उ-कार र्‍हस्व असतात. उदा० चिंच, लिंबू, डाळिंब, सडाफटिंग, उंच, कुंपण, जुंपणे, तुरुंग वगैरे. हा नियम अनुच्चारित अनुस्वारांना लागू नाही, उदा० कांहीं, केलीं, हळूंहळूं वगैरे. हल्ली मराठीत अनुच्चारित अनुस्वार द्यायची पद्धत नसल्याने असले शब्द विचारात घेण्याची आता गरज उरलेली नाही. .
  • एका शब्दात ट-ठ-ड-ढ ह्यांपैकी एकच अक्षर येऊ शकते. त्यामुळे ठोठो हा शब्द मराठीत ठो ठो असा आणि बाय-बाय याअर्थीचा टाटा, हा 'टा टा` असाच लिहायला पाहिजे. अपवाद परकीय भाषेतून मराठीत आलेले शब्द : टाटा(आडनाव), बटाटा, डाटा, डेटा, टोर्टिला, टिट फॉर टॅट, टाडा वगैरे.
  • जर दोन ट-वर्गीय एका शब्दात आलेच तर त्यांतला पहिला त-वर्गीय होतो. त्यामुळे ताट, ताठा, तोड, तिढा, थाट, थोडा, दाट, देठ, दोडका, दाढ, धीट, धाड वगैरे शब्द अस्सल मराठी वाटतात. टात, पटौदी वगैरे शब्द मराठी नाहीत.
  • श-ष-स यांतले फक्त ष हे अक्षर क-ट-ठ-ण-म वगैरेंना जोडता येते. त्यामुळे अक्सा, रिक्शा कश्ट, काश्ठ, उश्ण असले शब्द मराठीत नसतात. रिक्षा हा मूळचा इंग्रजी शब्द जर पूर्णपणे मराठीकरण झालेला असेल तर तो रिक्षा असाच लिहायला पाहिजे. याच रीतीने स हे अक्षर त-थ-यांना, श हे अक्षर च, न यांना वगैरे.

पूर्वी डाळिंब या नावाने असलेला लेख डाळींब या नावाकडे, आणि पतौडी हा लेख पटौदी या नावाकडे पुनर्निदेशित करणे योग्य नव्हते, हे वरील निवेदनामुळे लक्षात यावे....J २०:२७, २४ सप्टेंबर २०११ (UTC)

मनापासून पटले :) Kaajawa १७:४८, १४ ऑक्टोबर २०११ (UTC)

साचा:माहितीचौकट गायक

नमस्कार मंडळी! साचा चर्चा:माहितीचौकट गायक येथे झालेल्या चर्चेनुसार साचा:माहितीचौकट भारतीय शास्त्रीय गायक व अन्य पुनर्निर्देशित साच्यांऐवजी संबंधित लेखांमध्ये साचा:माहितीचौकट गायक हा साचा वापरण्यात आला आहे. सांगकाम्या चालवून हे बद्ल करण्यात आले आहेत.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०५:४०, २५ सप्टेंबर २०११ (UTC)

धन्यवाद... पण परत एकदा विनंती करतो कि हि "जादू" आम्हा पामराला कळवावी... :)मंदार कुलकर्णी १०:१८, २५ सप्टेंबर २०११ (UTC)

मासिक सदर

मुख्यपानावरचे वार्षिक (अर्ध-वार्षिक तरी नक्कीच) सदर कॉरल समुद्राची लढाई आता बदला राव.... अनेक लेख जे मुखपृष्ठ नामांकनासाठी पडून आहेत त्यातील एखादा निवडावा. प्रत्येक लेखात काही तरी कमतरता असतेच, परंतु मासिक सदर द्वैमासिक तरी असावे ह्यासाठी त्यातीलच एखादा लेख नाही का चालणार?
Abhijitsathe ०१:१५, ३० सप्टेंबर २०११ (UTC)

बदलण्यास हरकत नाही, पण अशुद्धलेखन, अपूर्ण, असंदर्भित माहिती असेलेले लेख आपल्याला मुखपृष्ठ सदर लेख म्हणून चालतील का?
जरा नेट लावून त्या यादीतील एखादा लेख परिपूर्ण बनवूया का? एकदा लेख नीट झाला की मग १ तारखेची वाट पाहण्याचीही गरज नाही. त्यातून जर सगळ्यांचे मत असेल तर सदर या वीकांतास बदलूयात.
अभय नातू ०२:३६, ३० सप्टेंबर २०११ (UTC)
त्यातल्यात्यात मायक्रोसॉफ्ट विंडोज हा सगळ्यात जास्त प्रगल्भ वाटत आहे. त्याला करुयात का सदर?
अभय नातू ०२:३९, ३० सप्टेंबर २०११ (UTC)
चालेल. मायक्रोसॉफ्ट विंडोज improve करू.
Abhijitsathe १८:०७, ३० सप्टेंबर २०११ (UTC)
काही विभाग रिकामे राहिले आहेत. ते पूर्ण झाले की सदर करता येईल.
अभय नातू १४:२८, १ ऑक्टोबर २०११ (UTC)
कुठलाच लेख सर्वार्थाने पूर्ण होऊ शकत नाही. काही महिन्यांनी किंवा वर्षांनी त्यात भर घालावीच लागते. त्यामुळे बऱ्यापैकी तयार झालेले लेख मासिक सदर म्हणून टाकावेत असे वाटते. जेणे करून नंतर पण ते सर्वार्थाने पूर्ण करता येतील. शुद्धलेखनाच्या चुका असतील त्या दुरुस्त करून लगेचच संपादन करता येईल. पण त्या साठी लेख "मासिक सदर" मध्ये टाकण्यासाठी थांबू नये. आता राहिला प्रश्न संदर्भ देण्याचा. आज किती संपादक संपादन करताना 'संदर्भ' देतात? शिवाय आपणही संपादकांना 'संदर्भ' देण्यास सक्ती करत नाही. जर अशी सक्ती (शब्दश: जाऊ नका नाहीतर लगेच या विषयावर सूचनांचा पाऊस पडेल...) केली तर लेख तयार होतानाच परिपूर्ण होण्यास मदत होईल. या संदर्भात लेख लिहिण्यासंबंधी काही ठोस आचार संहिता लगोलग तयार करता येईल का? मागे या विषयावर चावडी वर चर्चा झाली पण काही निर्णय झाल्याचे ऐकिवात नाही. या संदर्भात "इंग्रजी" चे Benchmarking[मराठी शब्द सुचवा] करता येईल का? मला सुचलेले काही मुद्दे असे -
  1. नवीन लेखामध्ये कमीतकमी चार ओळी किंवा दोन परिच्छेद असावेत
  2. नवीन लेखामध्ये कमीतकमी एक किंवा दोन संदर्भ असायला हवे
  3. नवीन लेख कमीतकमी एका वर्गा मध्ये समविष्ट करण्यात यावा
  4. याच लेखाचा इतर भाषांमध्ये लेख असेल तर आठवणीने त्या भाषेची लिंक देणे आणि मराठी लेखाची लिंक त्या भाषेत देणे. कंटाळा करू नये.
  5. नवीन लेख लिहिताना जर त्या संदर्भातील छायाचित्र (प्रताधिकाराचा भंग न होणारे) लेखकाकडे असेल तर लगेचच Commons वर टाकून मुख्य लेखात आणि इतर भाषिक लेखात डकवणे.
यामुळे छोट्या लेखांची होणारी भरमसाठ वाढ आटोक्यात येईल. आणि अभय म्हणतात त्याप्रमाणे लेख परिपूर्ण होण्यास सुरुवातीपासून हातभार लागेल आणि वेळ कमी लागेल. या विषयी इतर संपादकांनी आपले मत होय/ नाही प्रकारे देऊन पुढील कार्यवाहीस आग्रही राहावे. प्रचालक अशी आचार संहिता लागू करण्यासाठी मदत करतीलच याची मला खात्री आहे.....मंदार कुलकर्णी
मासिक सदर होण्यासाठी --
लेख सर्वार्थाने परिपूर्ण होणे अपेक्षित नाही. आत्तापर्यंतच्या सगळ्या सदर लेखांत भर घालण्यात आलेली आहे.
अशुद्धलेखन असेलेले लेख मासिक सदर पाहून वाचणार्‍याचा रसभंग होतो. सदर लेखांमध्येतरी असे करू नये. हे लेख म्हणजे आपण केलेल्या प्रयत्नांतील चांगलेचुंगले जगाला दाखवण्यासाठीचे मासले आहेत. ते शुद्ध ठेवण्यात हलगर्जीपणा असू नये.
आत्तापर्यंतच्या मासिक सदरांमध्ये भरपूर संदर्भ दिलेले आहेत. हे कटाक्षाने पाळण्यात येते.
वर दिलेले बेंचमार्किंग चांगली सुरुवात आहे यात भर --
शक्यतो वेळ साधून मासिक सदर लेख निवडावे, उदा. क्रिकेट विश्वचषक संपल्यासंपल्या त्याबद्दलचा लेख. १ मेच्या आसपास संयुक्त महाराष्ट्र चळवळ, इ.
लेखातील लाल दुवे शक्य तितके घालवून तेथे छोटे तरी का होईना (अगदी खोकी नव्हे) लेख तयार करावे.
अभय नातू ०६:४६, १ ऑक्टोबर २०११ (UTC)


नवे मासिक सदर लेख करिता सुयोग्य पर्याय उपलब्ध नसल्यास गरजे प्रमाणे जुने मासिक सदर लेख पुन्हा एकदा लावण्याच्या पर्यायाचाही विचार करता येईल किंवा कसे ? माहितगार १४:३८, १ ऑक्टोबर २०११ (UTC)
उत्तम पर्याय आहे. याने विकिपीडियाचे मुखपृष्ठ बदलत असल्याचे दिसून येईल.
अभय नातू १४:५६, १ ऑक्टोबर २०११ (UTC)
मराठी विकिपीडिया मध्ये ३५६५४ लेख असताना आपल्याला महिन्याला एक चांगला लेख सापडू नये / तयार करता येऊ नये? मराठी विकिपीडिया साठी हे अजिबात आशादायक चित्र नाही असे मला वाटते. पूर्वीचे 'मासिक सदर' म्हणून आलेले लेख परत या सदरात दाखवण्यात काय हशील आहे? ज्यांना ते लेख पाहायचे असतील तर त्यांनी विकिपीडिया:मासिक सदर/मागील अंक संग्रह वर जाऊन ते पाहावेत. आज कित्येक संपादक अहोरात्र लेख लिहित असताना किंवा भर घालत असताना मासिक सदरासाठी लेख मिळू नयेत याचे फारच आश्चर्य वाटते. मला वैयक्तिक असे वाटते की आपल्याकडे असे अनेक चांगले लेख असू शकतात, पण ते सापडत नाहीयेत. मागे कोणीतरी त्यात भर घातली आहे पण केवळ "अलीकडील बदल" मध्ये ते दिसत नाहीत म्हणून ते कोणाच्या नजरेस पडत नसतील. प्रचालक यात मदत करू शकतील का? चांगले लेख शोधायचे काही मार्ग त्यांच्याकडे नक्कीच असतील. अगदी सहज सुचले म्हणून उदाहरण देतो. रायगड किल्ला हा लेख 'मासिक सदर' म्हणून विचारात घेतला जाऊ शकतो का? नसेल तर त्यात योग्य ती सुधारणा करून तर येईल ना? राहिला प्रश्न शुद्धलेखनाचा. अनेक संपादक आणि 'जे' सारखे असंख्य लक्षात येईल तेंव्हा दुरुस्त्या करतोच ना? मग 'मासिक सदरच्या' लेखाला असा कितीसा वेळ लागेल? आपण प्रत्येक विभागातील १० -१० लेख जरी हुडकून काढले तरी २ ते ३ वर्षाचे 'मासिक सदर' चे काम होईल.
मंदार कुलकर्णी १६:५६, १ ऑक्टोबर २०११ (UTC)
मंदार,
मराठी विकिपीडिया मध्ये ३५६५४ लेख असताना आपल्याला महिन्याला एक चांगला लेख सापडू नये / तयार करता येऊ नये
कटू असली तरी ही वस्तुस्थिती आहे.
पूर्वीचे 'मासिक सदर' म्हणून आलेले लेख परत या सदरात दाखवण्यात काय हशील आहे?
मुखपृष्ठ सतत बदलत राहिले तर त्यात थोडे का होईना नावीन्य राहील. तेचते पान पाहून कंटाळा येणे साहजिक आहे.
ज्यांना ते लेख पाहायचे असतील तर त्यांनी विकिपीडिया:मासिक सदर/मागील अंक संग्रह
आजच्या आधी किती लोकांना हे पान ठाउक होते? दुसरे म्हणजे ज्यांना पाहिजे त्यांच्यासाठीची ही चर्चा नाही. आपण मुखपृष्ठात बदल करीत राहण्याचे उपाय शोधीत आहोत. जुने सदर लेख पुन्हा घालणे म्हणजे कदाचित शिळ्या कढीला पुन्हा उत आणण्यासारखे होईल पण तसे करणे हे महिनोनमहिने पान न बदलण्यापेक्षा बरे असे वाटते (म्हणजे ती कढी इतके दिवस उघड्यावर पडून राहते की तिला साय धरते...:-D)
प्रचालक यात मदत करू शकतील का? चांगले लेख शोधायचे काही मार्ग त्यांच्याकडे नक्कीच असतील.
यासाठी विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन हे पान आहे आणि त्यासाठी मुखपृष्ठावरुन दुवाही आहे. चांगले लेख मिळण्याचे दुसरे ठिकाण म्हणजे विशेष:मोठी पाने.
मग 'मासिक सदरच्या' लेखाला असा कितीसा वेळ लागेल?
सखेद म्हणावे लागते की खूप वेळ. वरील नामनिर्देशन पानावरील अनेक सुचवण्यांतील लेखांत अशुद्धलेखन आणि व्याकरणाच्या चुकांची भरमार आहे पण ती अनेक महिने अजूनही पडून आहे. अनेक वेळा याकडे लक्ष वेधलेलेही आहे, आता आशा आहे की या चर्चेच्या संदर्भाने आपण तेथे हवे ते बदल करुन टाकूयात.
अभय नातू १६:२४, १ ऑक्टोबर २०११ (UTC)

मासिक सदर लेखरांग

वर माहितगारांनी सुचवल्याप्रमाणे मुखपृष्ठ सदर करण्यासाठी नवीन लेख बदलांच्या प्रतीक्षेत असताना पूर्वी मुखपृष्ठ सदर असलेल्या लेखांना पुन्हा एकदा संधी देण्याबद्दल तुमचे मत नोंदवा.

दरम्यान मी विकिपीडिया:मासिक सदर/मागील अंक संग्रह हे पान अद्ययावत केले आहे. यात अधिक बदल करता येतील, उदा. तक्ते लावून पान compact करता येईल, प्रत्येक लेखासमोर इवलेसे चित्र लावता येईल, इ. यासाठी मदत हवी आहे.

  1. यातील जानेवारी २००६ पासूनच्या, म्हणजे अल्बर्ट आईनस्टाईनपासून उलट क्रमाने यावे असा प्रस्ताव (शिवाजी महाराज सोडता या आधीचे लेख यथातथाच आहेत).
  2. असा लेख पुन्हा सदर करण्याआधी त्यावरुन पुन्हा एकदा हात फिरवावा (माहिती अद्ययावत करणे, शुद्धलेखन, व्याकरण सुधारणे, इ.)
  3. यादीत नसलेला एखादा लेख मुखपृष्ठ सदर करण्याजोगा झाला आणि त्यास सदस्यांचे अनुमोदन मिळाले तर तो लेख क्रमात मध्येच घुसवावा. त्यानंतरच्या महिन्यात यादीतील पुढचा लेख निवडावा.

तुमचे मत कळवावे.

१५:२२, १ ऑक्टोबर २०११ (UTC)

गोंधळात गोंधळ

हो, हे जरी प्रसिद्द्ध मराठी चित्रपटाचे नाव असले आणि मी चित्रपटानवर काम करीत असलो तरी मंडळी हा गोंधळ मराठी विकितील चित्रपटाच्या लेख नवा बाबतचा आहे. त्यामुळे मीपण गोंधळून गेलो आहे. गेल्या २४ तासात मला अनेक मान्यवर सदस्याच्या अनेक सूचना माझ्या चर्चा पानावर आल्या. आपल्या सूचना आणि सहकार्य साठी मी आपला आभारी आहे.

गोंधळ असा आहे कि चित्रपटांची नवे विकी वर नाव (चित्रपट) अथवा नाव (साल चित्रपट ) अथवा नाव (भाषा चित्रपट)' अथवा नाव (साल भाषा चित्रपट ) अशा विविधतेने दिलेले आढळते. उदा. अगर तुम ना होते (चित्रपट) , अनामिका (२००८ चित्रपट) , आखरी रास्ता (हिंदी चित्रपट), कुँवारा बाप (१९७४ हिंदी चित्रपट) . नेमके नामकरण कसे असावे हाच तो गोंधळ आहे. मराठी चित्रपटांना तर नाव (चित्रपट) उदा. अशी ही बनवाबनवी (चित्रपट) भूतौशी दिलेली आहेत. काय सांगकाम्या वैगरे वापरून हे सुरळीत करता येईल का ? तसे झाले तर मला चित्रपटांची कामे पुढे नेतांना अधिक अडचणी निर्माण होणार नाही थोडे वर्गनाम बाबतही गोंधळ आहेतच. मराठी विकीवरील अशी हि बनवा बनवि म्हणजे गमत जम्मतच आहे तेव्हा अजून गोंधळात गोंधळ होऊ नये म्हणून कुपया मदत करावी.

मि राजाराम बोलतोय २ ऑक्टोबर २०११ (UTC)

गोंधळ

राजाराम,

तुम्ही म्हणता तसे येथील चित्रपटांवरील लेखांमध्ये गोंधळ आहे खरा. गेल्या अनेक वर्षांत अनेक संपादकांनी वेगवेगळ्या वेळी हे लेख तयार केले व ते करताना प्रमाणीकरण न केले गेल्यामुळे असे झाले खरे.

तर मग आता यापुढे काही संकेत ठरवून ते पाळण्याचा प्रयत्न करुयात.

लेखनाव --
जर चित्रपटाच्या नावाशी इतर काही संदिग्ध नसेल (पुस्तक, दूरचित्रवाणीमालिका, स्थळनाम, व्यक्तिनाम, इ.) तर नुसते नाव हे शीर्षक म्हणून ठीक आहे, उदा. गोंधळात गोंधळ.
जर अशी संदिग्धता असेल तर (चित्रपट) असा प्रत्यय लावावा, उदा. निवडुंग (चित्रपट)
जर एकाच नावाचे अनेक भाषांतील चित्रपट असतील तर (मराठी चित्रपट) असा प्रत्यय लावावा, उदा. बाजी (मराठी चित्रपट)
जर एकाच नावाच्या चित्रपटाच्या एकाच भाषेत अनेक आवृत्त्या असतील तर त्याला (२००८/२००९/... चित्रपट) असा प्रत्यय लावावा, उदा. फादर ऑफ द ब्राइड (१९८९ चित्रपट)
जर एकाच नावाच्या चित्रपटाच्या अनेक आवृत्त्या असतील तर त्याला (२००८/२००९/१९७२/... हिंदी/मराठी/इंग्लिश... चित्रपट) असा प्रत्यय लावावा, उदा. डॉन (२००९ हिंदी चित्रपट)
इतर नावांकडून मूळ शीर्षकाकडे योग्य ती पुनर्निर्देशने तयार करावी, उदा. गोंधळात गोंधळ कडे गोंधळात गोंधळ (मराठी चित्रपट), गोंधळात गोंधळ (१९८८ चित्रपट), गोंधळात गोंधळ (१९८८ मराठी चित्रपट), इ.
इतर काही नियम/संकेत सुचल्यास येथे लिहावे, नंतर संकलन करून दालन:चित्रपट सारखे एखादे पान तयार करून तेथे ते लिहून ठेवावे.
अभय नातू ००:४१, २ ऑक्टोबर २०११ (UTC)
ता.क. वरील नावे फक्त उदाहरणे आहेत. चित्रपटांची नक्की प्रकाशनवर्षे माझ्या आत्ता ध्यानात नाहीत.
अभय, मला असे वाटते की इतके नियम करण्यापेक्षा सोपे दोनच नियम अमलात आले तर पाहावे. ते असे -
नवीन चित्रपटांच्या नावाच्या शीर्षकात भाषेचा उल्लेख अत्यावश्यक असावा. उदा. बाजी (मराठी चित्रपट) , निवडुंग (मराठी चित्रपट) डॉन (हिंदी चित्रपट)
जर एकाच नावाचे दोन चित्रपट वेगवेगळ्या काळात आले तर मात्र वर्षाचा उल्लेख अवश्य करून पुनर्निर्देशन करावे. डॉन (२००९ हिंदी चित्रपट)
हे दोनच नियम लावले तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतील असे वाटते. सुरुवातीला जर वरील शिस्त लावली तर पुढील प्रश्न, दुरुस्त्या आणि पुनर्निर्देशने वाचतील..मंदार कुलकर्णी १७:१४, ६ ऑक्टोबर २०११ (UTC)


बरोबर सांगितलेस, अभय! आधीच्या लेखांमध्ये प्रमाणीकरण करण्यासाठी पद्धतशीर कार्यप्रस्ताव हाती घेऊन पाठपुरावा करावा, अशी परिस्थिती आहे.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०४:४३, २ ऑक्टोबर २०११ (UTC)

सजगता संदेश

विकी कॉन्फरन्सचे सजगता संदेश एका पानावर एकाखाली एक तीन-तीन येणार नाहित यासाठी काही करता येईल काय?

संतोष दहिवळ १७:५९, २ ऑक्टोबर २०११ (UTC)
  • तुम्ही विकी कॉन्फरन्सला नोंदणी करा म्हणजे ... !!! - मेघनाथ ०१:३७, ३ ऑक्टोबर २०११ (UTC)
  • सजगता संदेशावरील उजव्या कोपर्यातील फुलीवर (X) क्लिक करा. - मी राजाराम बोलतोय
विकी कॉन्फरन्स सजगता संदेशाविषयीची अडचण चावडीवर मांडल्याबरोबर अवघ्या काही मिनिटात विकीपिडीया प्रचालक प्रणालीने तांत्रिक सुचालन व्यवस्था ठिक केल्याबद्दल धन्यवाद. संतोष दहिवळ १२:३७, ३ ऑक्टोबर २०११ (UTC)

विकिपीडिया:चरित्र प्रकल्प अमेरिकन राष्ट्राध्यक्षविषयक लेखांचे प्रस्तावित काम पूर्ण

नमस्कार्‍अ मंडळी! विकिपीडिया:चरित्र प्रकल्प/पूर्ण कामे#अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या पानांचे किमान पातळीपर्यंत विस्तारीकरण येथे मांडलेले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांविषयीचे लेख विस्तारण्याचे प्रस्तावित काम पुरे झाले आहे.:) वाढीव मुदतीनंतरही हे काम पुरे होण्यास ५ दिवस अधिक लागले असले, तरीही या कामाचे स्वरूप व उपलब्ध मनुष्यबळाचा तुटवडा लक्षात घेता, ४४ लेख उदयोन्मुख लेख सदरात झळकवण्यालायक स्तरापर्यंत आणणार्‍या या कामाचे महत्त्व उणावत नाही. या कामी संतोष दहिवळ, तसेच इतरही अनेक विकिसदस्यांचा व सांगकाम्यांचा वाटा आहे; त्या सर्वांचे या कामाच्या पूर्तीनिमित्त अभिनंदन ! :)

आगामी काळात चरित्र प्रकल्पावर व न्य प्रकल्पांवरही कामाचे प्रस्ताव पद्धतशीर रित्या पाठपुरावा करून हातावेगळे केले जातील, यात शंका नाही.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:२९, ४ ऑक्टोबर २०११ (UTC)

छान! नेट (मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेत..:-}) लावून सातत्याने एखाद्या विषयाचा पाठपुरावा केल्यास काय फळ मिळू शकते याचे हे एक उदाहरणच आहे. एकमेकांच्या कामावर लक्ष ठेवून लागेल तेथे मदत, दुरुस्ती, भर घालणे हे केल्याने एकमेकांच्या प्रयत्नांची बेरीजच नव्हे तर त्यावर व्याजही मिळते हे ही येथे दिसते.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे, एकमेकांच्या चुकांवर दहा दिवस आणि तीन पाने भरुन चर्चा आणि वाद-तंटे न करता त्या चुका सुधारुन घेउन माहितीत भर घातल्याने आपल्या कष्टांचे फळ अधिक गोड होते याची ही प्रचिती आहे.
संकल्प, संतोष आणि येथे उद्धृत न केलेल्या इतर सदस्यांचे मनःपूर्वक धन्यवाद आणि कौतुक.
अभय नातू १७:०८, ४ ऑक्टोबर २०११ (UTC)


  • प्रकल्प गुंडाळण्याची घाई करूनका राव. कामात प्रोब्लेम आहेत. माहिती चौकट साचा ओरीजनलच्या ऐवजी शोर्टकट साचा बनवून काम लपेटले तर पुन्हा येरेमाझ्या मागल्या. - मेघनाथ ०४:०१, ५ ऑक्टोबर २०११ (UTC)
माहिती चौकट साचा ओरीजनलच्या ऐवजी शोर्टकट साचा बनवून काम लपेटले
म्हणजे?
अभय नातू ०४:१३, ५ ऑक्टोबर २०११ (UTC)
  • They did not use the senator Sacha which has lot many fields (used in many articles in same category – check Obama ,Bush ..) instead they prepared a small Sacha with 3-4 fields and wind up the work. In future if one has to modify this then he has to redo the work. - मेघनाथ ०४:३१, ५ ऑक्टोबर २०११ (UTC)
मेघनाथ, विकिपीडिया:चरित्र प्रकल्प/पूर्ण कामे#अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या पानांचे किमान पातळीपर्यंत विस्तारीकरण येथील निकषांनुसार काम पूर्ण झाले आहे. काम लपेटले नाही, हे तुमच्या लक्षात येईल. तुमच्यासह आपणा सर्वांना अजून काम करायला वाव कायमच आहे. :)
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०६:३४, ५ ऑक्टोबर २०११ (UTC)


मेघनाथ, आपण म्हणता आहात

प्रकल्प गुंडाळण्याची घाई करूनका राव.

आता हेच पहा 'अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या पानांचे किमान पातळीपर्यंत विस्तारीकरण' हा विकिपिडीया चरीत्र प्रकल्प अंतर्गत प्रकल्प सुरु झाला १ मे २०११ ला आणि संपला ५ ऑक्टोबर २०११ ला म्हणजे तब्बल १५८ दिवस हा प्रकल्प चालू होता. (चालू होता म्हणजे प्रकल्पाच्या निकषानुसार, यापुढेही तो चालूच आहे फक्त प्रकल्पाचे निकष पूर्ण झाले आहेत.) विकिपिडीयाच्या सदस्यांना मेघनाथ म्हणतात तसा जर प्रकल्प लपेटायचाच असता तर त्याला १५८ दिवस कशाला पाहिजेत? आणि हा प्रकल्प तीन मुदतवाढी घेऊन सदस्यांनी पूर्ण केलेला आहे त्यामुळे लपेटण्याचा प्रश्नच येत नाही. (आणि लपेटून लपेटणारांचा फायदा काय?)

माहिती चौकट साचा ओरीजनलच्या ऐवजी शोर्टकट साचा बनवून काम लपेटले तर पुन्हा येरेमाझ्या मागल्या. In future if one has to modify this then he has to redo the work.

भविष्यात येथील पानांवर एखादा सदस्य कोणत्या माहितीची भर टाकणार आहे ते आजच सांगता येत नाही. कुणाला जर पूर्वीच्या पानात बदल करायचा असेल, संपादन करायचे असेल वा अनेक पानात काही ठराविक नमुन्यात माहिती टाकायची असेल तर त्या सदस्याला त्या माहिती चौकटिचा साचा बनवावा लागतो. आणि आयत्याच साचांचा वापर करायचा असेल तर वर्ग:साचे किंवा वर्ग:व्यक्तिविषयक माहितीचौकट साचे येथे विकिपिडीयाच्या सदस्यांनी तयार केलेले अनेक आयते माहितीचौकट साचे उपलब्ध आहेत त्याचा कुणीही सदस्य वापर करु शकतो. इतर सदस्य, अनामिक सदस्य आणि मेघनाथांनीही येथील साचा:माहितीचौकट सेनेटर वापरावा आणि त्यांना हा साचा वापरून अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या पानांचे संपादन पूर्ण झाले हा संदेश चावडीवर टाकण्याचा सुदिन लवकरच मिळावा ही अपेक्षा.

संतोष दहिवळ १४:२०, ५ ऑक्टोबर २०११ (UTC)

सांगकामे आवरा...

सांगकामे अनेक लेखांमध्ये घोळ घालत सुटले आहेत, त्यांना थांबवा.
Abhijitsathe १९:३२, ७ ऑक्टोबर २०११ (UTC)

झालेला घोळ

सांगकाम्याने केलेला घोळ काय झाला आहे ते सांगण्याची कृपा व्हावी. साच्यातील रोमन अंक मराठी झाल्यावर लेखात कोणताही परीणाम झाल्याचे दिसले नाही फक्त रोमन आकडे मराठीत आले आहे हे दिसल्यावरच जतन केले. घोळ घालायचा असता तर सगळ्या लेखात झाला असता. पण सांगकाम्या फक्त प्रयोग करून पाहत आहे. संतोष दहिवळ १९:४६, ७ ऑक्टोबर २०११ (UTC)

नोव्हाक जोकोविच, आना इव्हानोविच, अमेली मॉरेस्मो हे लेख पहावेत. टेबलचे रंग hexadecimal मध्ये असतात त्यात मराठी आकडे चालत नाहीत. तसेच
{{WTA}}
ह्या साच्याला रोमन आकडेच लागतात. हे सर्व बदल करण्यासाठी पुन्हा अधिक वेळ घालवावा लागला तर सांगकाम्याच्या वापराला काय अर्थ आहे? Abhijitsathe १९:५४, ७ ऑक्टोबर २०११ (UTC)


राम राम घ्यावा आमचा

लिखाण बंद करत आहे असे जाहीर करत आहे.

कोणतीही चर्चा न करता केवळ हुकुम शाही चालू असल्याप्रमाणे लेख वगळले आहेत.

आणि मला जमल्यास केलेले सर्व लिखाण पुसून टाकण्यास मदत करावी.

संकल्प आपण कोणाच्या विचाराने लेख वगळले याची पुष्टी द्याल तर उपकार होतील माझ्यावर आणि मराठी विकी वर

नातू साहेब ! तुम्ही सांगितल्या प्रमाणे माहिती भरणे चालू केले होते आणि (अयोग्य शीर्षक: मजकूर होता) असे कारण देण्यात आले आहे आणि हे समजण्या पलीकडे आहे सागर:मराठी सेवक १७:३२, ८ ऑक्टोबर २०११ (UTC)

सागर, मला वाटते वगळलेल्या लेखात लेखाचे नाव सोडून काहिही मजकूर नाहि. असे लेख महिनोन महिने ठेवण्यात काही अर्थ नाही. अनेक लेखात पान काढा विनंत्याही लावलेल्या होत्या. बर्याच लेखांना speedy deletion request होत्या असे दिसते. मग हे लेख काढण्याअगोदर या सगळ्या विनंत्यांचा आपल्यासारख्या (म्हणजे विकिपिडीयाचे सर्व सदस्य) सदस्यांनी विचार करून ही पाने वाढवायला किंवा त्यात भर घालायला पाहिजे होती. आपल्या रागयुक्त संदेशातून असे जाणवते आहे की आपण ही पाने वाढवायच्या विचारात होता पण अजूनही काही बिघडलेले नाही या नावांनीच तुम्ही परत पाने तयार करू शकता फक्त पान मोकळे नको काय मजकूर पानाला जोडायचा आहे ते मनाशी आधी पक्के ठरवूनच पान बनवले म्हणजे ते मोकळे राहणार नाही व येथे फेरफटका मारणार्यांना निराशा होणार नाही (जी निराशा वगळलेल्या लेखांबाबतीत आजवर अनेकांची झाली असेल.) आपल्या योगदानाची विकिपिडीयाला गरज आहे. विचार कराल अशी अपेक्षा. संतोष दहिवळ १७:५३, ८ ऑक्टोबर २०११ (UTC)
>>> महिनोन महिने ठेवण्यात काही अर्थ नाही... संतोष महाराज, मी साचा लावून लेख भरण्यास चालू केले होते आणि हे सगळे मी आताच तयार केलेले होते
>>> लेख काढण्याअगोदर या सगळ्या विनंत्यांचा आपल्यासारख्या (म्हणजे विकिपिडीयाचे सर्व सदस्य) सदस्यांनी विचार करून ही पाने वाढवायला...कुठे केली आहे जरा दाखवून द्यावेत
>>> वगळलेल्या लेखांबाबतीत आजवर अनेकांची झाली असेल... हि दुसरी वेळ आहे... आणि मी हवे असल्यास भरपूर लेखांचे पाने दाखवून देवू शकतो जे कित्येक महिने रिकामेच पडले आहेत आणि काही तासा पूर्वीचे लेख कसे काय वगळले ???
>>> नावांनीच तुम्ही परत पाने तयार करू शकता.........माझ्या कडे २४ तासांचे घड्याळ आहे. परत परत तेच करत बसायला सवड नाही आहे
>>>विचार कराल अशी अपेक्षा............ आणि विचार करा असे मला सांगण्यापेक्षा जुन्या जाणत्या सदस्यांना जरा धीराने काम करण्याची गरज आहे. हा मुक्त ध्यान कोश आहे. त्यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे.नुसत्या उंटावरून शेळ्या हाकाण्याने काही साध्य होणार नाही आहे

सागर:मराठी सेवक १८:१३, ८ ऑक्टोबर २०११ (UTC)

>>> महिनोन महिने ठेवण्यात काही अर्थ नाही... संतोष महाराज, मी साचा लावून लेख भरण्यास चालू केले होते आणि हे सगळे मी आताच तयार केलेले होते
गेल्या चोवीस तासात वगळलेल्या लेखांची सांख्यिकी पाहिली असता २४९ लेख वगळल्याचे दिसते मला नाही वाटत हे सगळे लेख आपण आत्ताच तयार केले असतील. कारण बर्याच लेखांची शीर्षके इंग्रजी दिसली. आणि मी जेव्हापासून इथे बघतोय इंग्रजी शीर्षकाने नवीन लेख विकिपिडीयावर तयार झाल्याचे स्मरत नाही. त्यामूळे आत्ताच लेख बबनवले होते या तुमच्या मताशी मी सहमतच नाही. त्यामुळे आपल्या पुढच्या मुद्द्यांचा मी विचारच केला नाही.
संतोष दहिवळ १८:३०, ८ ऑक्टोबर २०११ (UTC)


संतोष,जमत असेल तरच लक्ष घालावे! मी ४ ते ५ तासापूर्वी पाने तयार केली होतीत
                           # मराठी चित्रपट : असला नवरा नको ग बाई
                           # मराठी चित्रपट : मुंबईचा फौजदार
                           # मराठी चित्रपट : झुंज
                           # मराठी चित्रपट : एक डाव भुताचा
                           # मराठी चित्रपट : चंदनाची चोळी अंग अंग जाळी
                           अशी त्यांची नवे आहेत. आणि ती वगळल्यावर तुम्ही कोठे त्याचा इतिहास बघितला कोणास ठावूक!
                           असो !
                           चर्चेस पूर्णविराम 
                           राम राम !!  सागर:मराठी सेवक  १८:३९, ८ ऑक्टोबर २०११ (UTC)
मार्कळ साहेब,
नातू साहेब ! तुम्ही सांगितल्या प्रमाणे माहिती भरणे चालू केले होते आणि (अयोग्य शीर्षक: मजकूर होता) असे कारण देण्यात आले आहे आणि हे समजण्या पलीकडे
मी नुसते तुम्हाला सांगून थांबलो नाही तर तुम्हाला मदतही करणे सुरू केले होते. तुम्ही तयार केलेले दोन लेख जे अयोग्य शीर्षक म्हणून काढले, त्यांच्या शीर्षकात शुद्धलेखन चुका असल्यामुळे ती काढले. त्याआधी ती पाने योग्य ठिकाणी हलवली होती आणि काढलेली ती पुनर्निर्देशने होती.
वर दिलेली शीर्षके चुकीची आहेत हे प्रथमदर्शनीच ध्यानात येईल. त्यातील (थोडी तरी) मी योग्य ठिकाणी हलवली आणि उरलेली कदाचित काढली असतील.
अभय नातू २२:४२, ८ ऑक्टोबर २०११ (UTC)
सागर, तुम्ही 'मराठी चित्रपट : XXXXXXXX' अश्या नावांनी पाने बनवली होती; जी विकिपीडियावरील शीर्षकलेखनसंकेतांनुसार अभयने योग्य नावांकडे पुनर्निर्देशित केली. त्यानंतर आधीच्या नावांच्या नोंदी अयोग्य असल्यामुळे, मी ती पुनर्निर्देशित नावे वगळली. चित्रपटाचे मूळ लेख अजूनही अबाधित आहेत.
>>> आणि मी हवे असल्यास भरपूर लेखांचे पाने दाखवून देवू शकतो जे कित्येक महिने रिकामेच पडले आहेत आणि काही तासा पूर्वीचे लेख कसे काय वगळले ??? <<<
कित्येक महिन्यांपासून पडून असलेल्या निरुपयोगी पानांची साफसफाईदेखील चालू असते; तसेच नजीकच्या काळात घडलेल्या काही चुकांची दुरुस्ती किंवा साफसफाई करणेदेखील चालू असते. काही लोकांना कल्पना नसेल, की ही कामे किती वेळखाऊ, तरीही अटळ असतात. अश्या कामांची जबाबदारी प्रामुख्याने वगळण्याची सुविधा उपलब्ध असलेल्या सदस्यांवर असते; त्यात उपलब्ध वेळेनुसार संबंधित सदस्य भूतकाळातल्या आणि अगदी अलीकडल्या संपादनांमध्ये दुरुस्त्या किंवा साफसफाई करत असतात. किंबहुना मंदार कुलकर्णी, प्रबोध यांच्यासारखे सक्रिय सदस्यदेखील दुरुस्त्यांसाठी गस्त घालत असतात, साफसफाई करण्याजोग्या लेखांवर सूचना लावून या कामास त्यांच्या उपलब्ध वेळेनुसार हातभार लावत असतात. यात कुठल्याही व्यक्तीवर वैयक्तिक आकस असण्याचा काही मामला नाही. खुद्द मी पूर्वी बनवलेल्या लेखांमधील चुका लक्षात आल्यावर, स्वतः बनवलेले लेखही वगळले आहेत.
या दैनंदिन कामांमध्ये मराठी विकिपीडियाची गुणवत्ता टिकवण्यासाठीच तुमच्या-माझ्यासारखे सर्व सदस्य काम करत असतात. यात सदस्यानुरूप डावे-उजवे करण्याचा प्रसंग उद्भवत नाही - कारण ज्या काही दुरुस्त्या/साफसफाया चालतात, त्या सर्व त्या-त्या लेखांच्या तत्कालीन गुणवत्तेनुसार/कमतरतांनुसार चालतात. या क्रियांमागील हेतू तुम्ही समजून घ्यावा, अशी विनंती आहे. व्यक्तिशः तुम्ही यापूर्वीही काही लेखांमध्ये माहितीची चांगली भर घातली आहे, तशीच उत्साहवर्धक कामगिरी करत राहाल, अशी आशा आहे.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०३:०७, ९ ऑक्टोबर २०११ (UTC)
नमस्कार मंडळी, 'मी मागेही चावडीवर या संदर्भात लेख लिहिण्यासंबंधी काही ठोस आचार संहिता लगोलग तयार करता येईल का? असे लिहिले आहे. या संदर्भात "इंग्रजी" चे Benchmarking करावे असे वाटते. माझे आधी सांगितलेले मुद्दे असे -
      1. नवीन लेखामध्ये कमीतकमी चार ओळी किंवा दोन परिच्छेद असावेत
      2. नवीन लेखामध्ये कमीतकमी एक किंवा दोन संदर्भ असायला हवे
      3. नवीन लेख कमीतकमी एका वर्गा मध्ये समाविष्ट करण्यात यावा
      4. याच लेखाचा इतर भाषांमध्ये लेख असेल तर आठवणीने त्या भाषेची लिंक देणे आणि मराठी लेखाची लिंक त्या भाषेत देणे. कंटाळा करू नये.
      5. नवीन लेख लिहिताना जर त्या संदर्भातील छायाचित्र (प्रताधिकाराचा भंग न होणारे) लेखकाकडे असेल तर लगेचच Commons वर टाकून मुख्य लेखात आणि इतर भाषिक लेखात डकवणे.
यामुळे छोट्या लेखांची होणारी भरमसाठ वाढ आटोक्यात येईल. आणि अभय म्हणतात त्याप्रमाणे लेख परिपूर्ण होण्यास सुरुवातीपासून हातभार लागेल आणि वेळ कमी लागेल. या विषयी इतर संपादकांनी आपले मत होय/ नाही प्रकारे देऊन पुढील कार्यवाहीस आग्रही राहावे. प्रचालक अशी आचार संहिता तातडीने लागू करण्यासाठी मदत करतीलच याची मला खात्री आहे. प्रचालक यावर काम करीत आहेत हे पण मला ज्ञात आहे . आता राहिला प्रश्न साफसफाईचा. तर ते आपण करायलाच हवे. आपणही आपले घर अधून मधून करतोच की. घरातील निरोपयोगी, न लागणारे सामान, अयोग्य, अनावश्यक वस्तू बाहेर टाकतोच की. सर्वांनी शांततेने आणि थंड डोक्याने येथे काम करण्याची गरज आहे. लेख नुसता तयार करण्यापेक्षा तो भरला जाणे आणि आणि वाचकांना कसा उयोगी पडेल हे आपण सारे पाहूया. ...मंदार कुलकर्णी (चर्चा | योगदान)

धिंगाणा थांबवा मराठी विकिपीडिया वाचवा

मराठी सेवकाचे लेख बनवत असतांनाच वगळले जाणे (पान काढा साचा, कारणे, चर्चा आदी पद्धती सोडुन ) हि कृती अतिशय लाजिरवाणी आहे. त्याचा जाहीर निषेध. ह्या कृती मागे व्यक्तिगत द्वेषाचे कारण नाकारता येत नाही. काही काळा पूर्वीच ह्याचे मध्ये झालेला विवाद सर्वश्रुत आहे त्या धर्तीवर हि कृती अक्षम्य आहे. व्यक्तिगत द्वेष आणि भांडणे ह्या साठी मराठी विकिपीडियाचा वापर करणे दुर्दैवी आणि चीड आणणारे आहे.

संकल्प द्रविड या विवादीत सदस्याच्या बेधुंद वागण्याला आवर घाला !!! सदस्यांना प्रक्षोभक भाषेत लिहणे, अपमान करणे, वाद घालणे, आपणच मराठी विकीचे मालक आणि इतर सारे फुकटचे नौकर अशा तोर्यात वागणे अशा एक न अनेक घटना आणि तक्रारी फक्त ह्याच सदस्या बाबत होत आहेत. त्यामुळे मराठी विकीची प्रतिमा डागाळत आहे. नवीन सदस्यांना ह्यातून काय संदेश जातो आहे ? सदस्यांना समजून घेणे त्यांना प्रोत्साहन देणे सोडून त्यांचेशी वारंवार वाद घालणे अपशब्द वापरणे हा दखलपात्र आणि गंभीर अपराध आहे. अनेक सदस्य चूक आणि द्रविड तो बरोबर, तेही नेहमीच? आणि विवाद फक्त ह्याचेच का व्हावे बाकी लोक का नाही भांडत ?

संकल्पला योग्य समज देण्याचे सोडून येथील प्रचालक मंडळी राजकीय पक्षाच्या प्रवक्त्या प्रमाणे त्यावर फाटके पांघरूण टाकण्याचा अयशस्वी प्रयोग नेहमी करतांना दिसतात . संकल्पचे कसे बरोबर आणि बाकी कसे मूर्ख हे समजवण्याचा पुन्हा प्रयत्न हि मंडळी हे पोस्टिंग आल्या नंतर करणारच त्याची मजा सर्वांनी पहावी आणि विवादास्पद सदस्य संकल्पवर कारवाई नझाल्यास इतरांनीही लवकरच राम राम ठोकायचा का ते ठरवावे - मेघनाथ १८:४८, ८ ऑक्टोबर २०११ (UTC)

मेघनाथ,
आपण येथे काही दिवसांपूर्वी आलात. याआधी किती सदस्यांनी येथे धिंगाणा घातला आहे याची आपल्याला कल्पना नसेल. बेधुंद लिखाण, संपादने करणार्‍या या सदस्यांच्या या उपद्व्यापामुळे भीक नको पण कुत्रे आवर असे म्हणण्याची पाळी अनेकदा आली आहे. तरी येथे अनेक वर्षे सातत्याने विकिपीडियाची सेवा करीत असलेल्या सदस्यांचा फ्युझ कमी वेळात उडाला तर त्यात नवल नाही. यात नवीन-जुने असा भेदभाव करण्याचा हेतू नव्हे तर कधीकधी असलेल्या संकेतांची आठवण करताना नेहमीच गरजेपेक्षा जास्त ढील का दिली जात नाही याचे कारण. नवीन सदस्यांनी सुद्धा येथील संकेत थोडेसे समजून घेऊन मगच डोक्यात राख घालून घ्यावी.
आता "संकल्पला योग्य समज देण्याचे सोडून येथील प्रचालक मंडळी राजकीय पक्षाच्या प्रवक्त्या प्रमाणे त्यावर फाटके पांघरूण टाकण्याचा अयशस्वी प्रयोग नेहमी करतांना दिसतात" हा तुम्ही केलेला व्यक्तिगत आरोप मी तुमचा अननुभव समजून घेउन सोडून देतो. संकल्प आणि माझे अनेकदा कडाक्याचे वाद झालेले आहेत. त्यात रिकामे/छोटे लेख असावे कि नाही हा सुद्धा मुद्दा अनेकदा आला. माझे आत्तापर्यंतचे म्हणणे होते की सदस्यांवर कमीतकमी निर्बंध घालावे पण गेल्या काही महिन्यातील संपादने पाहता मला माझ्या मताला थोडीशी मुरड घालावीशी वाटते.
संकल्पची बाजू घेउन भांडण्यासाठी मला वेळ नाही. संकल्प त्याचे मुद्दे मांडण्यात कमी पडणार नाही याची मला खात्री आहे आणि त्यातील मला न पटणारे मुद्दे खोडून काढण्यास मी सुद्धा कमी करणार नाही. इतर सदस्यही कमी करत नाहीत हे मी पाहिलेले आहे.
विवाद फक्त ह्याचेच का व्हावे बाकी लोक का नाही भांडत
माझी आणि संकल्पची (किंवा संकल्प आणि माहितगार/संतोष किंवा माहितगार आणि मी) कितीही भांडणे झाली तरी शेवटी आपण सगळेच येथे मराठीची सेवा करण्यास आलो असल्यामुळ आपला अहंकार बाजूला ठेवून पुन्हा एकत्र येउन काम करुयात हा खाक्या आपल्या सर्वांचा आहे. तुमचाही तोच असणार याची मला खात्री आहे (नसता तर तुम्ही तुमचा वेळ येथे दिलाच नसतात की!)
असो. तुम्ही शांतपणे विचार कराल आणि प्रतिक्षिप्तक्रियेने योगदान थांबवणार नाहीत अशी आशा आहे.
अभय नातू २३:००, ८ ऑक्टोबर २०११ (UTC)
मंडळी, मी गेली काही वर्षे येथे contribute करीत आहे व शक्यतो वादांमध्ये पडत नाही. परंतु गेल्या काही दिवसांमधील भांडणे बघून राहावले नाही. कोरे लेख तयार करायचे व विस्तार विनंती लावून मोकळे व्हायचे ही कृती बंद व्हावी असे मी अनेकदा लिहिले आहे. इंग्लिश शीर्षके असलेले, आंतरविकि दुवा वर्ग इत्यादींचा संपूर्ण अभाव असलेले लेख तयार करणे अत्यंत चुकीचे आहे व ते delete केले गेल्यावर चिडणे देखील बरोबर नाही. इंग्लिश विकिपीडियावर असे लेख काही तासांमध्ये उडवले जातात. असे कोरे लेख तेथे तयार करून बघा, काही दिवसांत खाते बंद केले जाईल. विकिपीडिया हा मुक्त ज्ञानकोश आहे हे खरे असले तरी काही तरी administration हवेच की. बरेचदा administrators बदनाम होतात कारण ते दर्जा maintain करण्यासाठी काही निर्णय घेतात जे अप्रिय देखील असू शकतात (शेवटी प्रत्येक ठिकाणी घाणीत हात घालणारा हवाच ना). पण ह्याला व्यक्तिगत द्वेषाचे कारण मानले जावे हे हास्यास्पद आहे. आपण एकमेकांना कधी भेटलेलो नाही की आपण प्रतिस्पर्धी नाही. मग द्वेष कसला? जरा शांतपणे विचार करा की. Abhijitsathe ०३:२८, ९ ऑक्टोबर २०११ (UTC)

आपला तो बाळ्या, दुसर्याचे ते कार्टे

मेघनाथ ह्याच्या म्हणण्यात दम आहे. एक तिसरा व्यक्ती म्हणून मलाही मराठी विकीवर लॉबिंग असल्याचे जाणवते. अभय - संकल्प आणि त्याचे २-४ समर्थक हे एकमेकांना (विना कारण ) समर्थन देतांना एकमेकाचे कौतुक करतांना दिसतात. आपण जर निष्पक्ष विश्लेषण केले तर अभयने लिहिले कि संकल्प लगेच त्यास समर्थन देणार (दुजोरा, अनुमोदन, हो हो अभय ....) आणि संकल्प ने काही हि केले तरी वर मेघनाथ ने लिहिलेच आहे. हे लॉबिंग थांबायला पाहिजे. हि मंडळी दुसर्यांच्या काहीच सूचना ऐकायलाच तयार नाही. सदस्याच्या विचारांना शाब्दिक, तात्रिक कोट्या अथवा युक्तिवाद करून खोडून काढण्यावरच जोर देतात ह्यात विकीचे भले कसे होणार ? एक बाहेरील व्यक्ती म्हणून तरी असे जाणवते.

मेघनाथ च्या वरिल अमेरिकन राष्ट्राध्यक्ष प्रकल्पाचे उदाहरण पहा त्याचा मुद्दा बरोबर आहे. येथे गायकांच्या साच्याला ४० -४० फिल्ड्स असलेले साचे बनवण्याच्या चर्चा आणि त्याचे सामाइकरण बाबत इतक्यातच मी वाचले. गायकास ४० आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षास ४ फिल्डच्या साच्यात बांधणे म्हणजे मंडळी आपणच समजा ...! काही लेख (४-५) मध्ये ३० फिल्डचा साचा वापरला आहे पण बाकी ठिकाणी तोच पुनरप्रस्तापित करण्यास काय हरकत होती? पण इगो ...! मेरी मुर्गीकी एक हि टांग ...! बसले युक्तिवाद करत आणि त्यातही अभय मुग गिळून ???? खरच भविष्यात कोणी शहाणपण शिकवेल का ? झोपलेल्याला उठवणे शक्य आहे पण जर ......

असो त्रयस्थ म्हणून - मराठी विकिपीडिया वर उभरून येणारे हे व्यक्तिगत साट्या लोट्याचे राजकारण आज विकिस गृहयुद्धाच्या कडेवर नेते आहे. एकापेक्षा अनेक सदस्य जेव्हा वागणुकीस आक्षेप घेतात तेव्हा बाब गंभीर आहे असे समजावे आणि कठोर निर्णय घ्यावे. युक्तिवाद करू नये सफाया देऊनये कार्यवाही हवी.

मि राजाराम बोलतोय

राजाराम,
तुम्ही वरील मजकूर नीट न वाचता व्यक्तिशः आरोप करीत आहात असे वाटते. पुन्हा एकदा सांगतो -- संकल्प आणि माझे अनेक वेळा अनेक वाद झालेले आहेत. तसेच माझे आणि इतर अनेक सदस्यांचे. त्याचप्रमाणे इतर सदस्यांचे आणि अजून इतर सदस्यांचेही. बहुतेक वेळा दोघांही पार्टीने दुसर्‍याच्या म्हणण्यातील तथ्य जाणून घेउन त्याला झुकते माप दिले आहे. क्वचित आपले बरोबर वाटत असताना देखील इतरांचे बरोबर म्हणून त्यामताप्रमाणे काम केलेले आहे.
तुमची संपादने जी खोडण्यालायक होती आणि तुमची मते, जी खोडण्यालायक होती, ती खोडल्यामुळे तुम्हीच तर येथील लोकांचा द्वेष करीत नाही ना? असे करताना इतर सदस्यांना भडकावण्याचेही काम यथास्थित करीत आहात असा एखाद्याचा ग्रह होईल अशीच विधाने वर केलेली आहेत. आता बघा तुम्ही कसे मेघनाथांच्या बाजूने बोललात...याचा अर्थ तुमचे दोघांचे साटेलोटे आहे असा होतो का? असा अर्थ काढता येईल, पण तो काढणे हे साफ चूक हे मला माहिती आहे. तुम्हीही असाच सुज्ञ विचार करीत असाल असे गृहीत धरतो.
तुम्ही आत्ता आलात...गेली ४-५-६ वर्षे येथे काम केल्याने मला संकल्प बरोबरच इतरही अनेक सदस्य माहिती आहेत. त्यांना भेटलो नसलो तरीही त्यांची काम करण्याची पद्धत, बोलण्याची लकब, इ. मला चांगल्या माहिती आहेत. हेच अभिजीत, मंदार, संतोष, माहितगार, J, नरसीकर तसेच सध्या कार्यरत नसलेल्या अनेक संपादकांबद्दल. त्यांच्याबद्दल मला आपुलकी वाटते? हो वाटते (अगदी J यांच्याबद्दलही...त्यांच्याशी तर माझी खूप वेळा खडाजंगी झालेली आहे). त्यांच्या कामाबद्दल कौतुक वाटते? हो जरूर वाटते. त्यामुळे मी त्यांची चूक उघडकीस आणून देणे टाळणार? मुळीच नाही.
मला तुम्ही, सागर मार्कळ, मेघनाथ, आणि इतर असंख्य संपादकांबद्दल असेच वाटते? जरूर वाटते. अगदी आत्ता आपण भांडत असले तरीही ते विकिपीडियाच्या प्रेमापोटीच हे माहिती असल्यामुळे मला तुमच्याबद्दलही तितकेच कौतुक आणि आदर आहे. आपण तो वृद्धिंगत करण्यास संधी द्याल अशी मनापासून आशाही आहे.
जेथे बरोबर तेथे बरोबर म्हणणार आणि जेथे चूक तेथे चूक हेच म्हणणार हा माझा खाक्या आहे आणि मी तो कोणाच्याही बाबतीत इकडेतिकडे केलेला नाही.
६ वर्षे काम केलेल्या सदस्याचे योगदान जितके महत्वाचे तितकेच नवख्याचेही. दोघांच्या चुका एकाच तागडीत तोलल्या जातात आणि त्यांचे कामही.
तुमचे व्यक्तिगत योगदान आपल्याला (आम्हाला नव्हे) हवेच आहे. ते करताना तुम्ही येथे काम करीत असलेल्या लोकांशी आडवेच जाण्याचे ठरवले तर ते मराठी विकिपीडियाचे कमनशीबच...
अभय नातू ०५:४१, ९ ऑक्टोबर २०११ (UTC)

ता.क. युक्तिवाद करू नये सफाया देऊनये कार्यवाही हवी. -- कशासाठी आणि काय कार्यवाही पाहिजे हे कृपया विषद करावे.

राजाराम, वर लिहिल्याप्रमाणे विकिपीडिया:चरित्र प्रकल्प/पूर्ण कामे#अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या पानांचे किमान पातळीपर्यंत विस्तारीकरण येथील निकषांनुसार काम पूर्ण झाले आहे. यात कुठलाही अहंकार नाही.
बाकी विकिकरहो, राजाराम नावाचे सदस्य कामांवर टिप्पणी करण्यापेक्षा माझ्यावर अहंकाराचे व राजकारण करण्याचे दोषारोप करून चिखलफेक करीत आहेत. हा प्रकार मलातरी अयोग्य वाटतो.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:४३, ९ ऑक्टोबर २०११ (UTC)

चौकडी चे धमकी वजा संदेश

Czeror ह्या सदस्याने ३० सप्टेबर ला ८:०८ ते ८:३१ ह्या अवघ्या १९ मिनिटे कालावधीत फक्त ९२ कोरे लेख बनवले. त्यात वर्ग सुद्धा नाहीत त्यावर येथील लॉबीने काय केले ? अगदी सौम्य प्रतिक्रिया दिली. आज १० पेक्षा जास्त दिवसानिहि हे कोरे लेख डौलाने मराठी विपीवर कर्यरत आहेत.मग Vishal1306, मराठी सेवक ह्यास काम करीत असतानाच सारखे सारखे धमकी वजा संदेश हि चौकडी देऊन काही लोकास जाणून टार्गेट तर करत नाही ना ? त्यातूनच लोक विकिस जय महाराष्ट्र करीत आहेत. ह्याने विकीचे नुकसानच होणार ....! मि राजाराम बोलतोय

  • ता. क. :- हजारो ग्रांप्री वरील कोरे लेख आहेत आणि बनतात हि आहेत त्याचे काय ?
Czeror ह्या सदस्याने ३० सप्टेबर ला ८:०८ ते ८:३१ ह्या अवघ्या १९ मिनिटे कालावधीत फक्त ९२ कोरे लेख बनवले; त्यांच्यावर मी सदस्य:सांगकाम्या संकल्प हा सांगकाम्या चालवून दुसर्‍याच दिवशी, म्हणजे १ ऑक्टोबरास 'पानकाढा' साचे लावून ठेवले आहेत. त्यातील काही लेख प्रत्यक्षात वगळलेदेखील आहेत. (आता यावर माझ्यावर आकस ठेवणारे लोक म्हणतील, की ते लेख तुम्ही तेव्हाच का उडवले नाहीत? तर यावर उत्तर असे, की किमान पानकाढा साचे लावून ठेवणे हे काम मी माझ्या उपलब्ध वेळेत प्राधान्याने केले; ते सर्वच्या सर्व लेख वगळण्यासाठी मी रात्रभर जागून काम केले पाहिजे, अशी सक्ती माझ्यावर कोणी करू नये.)
बाकी कोणत्या चौकडीबद्दल आपण बोलत आहात? म्हणजे आपला माझ्याशिवाय अजून कुणावर बोट ठेवत आहात तेही स्पष्ट होईल.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:४३, ९ ऑक्टोबर २०११ (UTC)
या संवादात अधिक दखल न देता सांगतो की {{पानकाढा}} संदेश लावणे हा प्रचालकांचा किंवा जुन्या सदस्यांचाच मक्ता नाही. अगदी नवीन सदस्य सुद्धा हे करू शकतात. तुम्हाला जो लेख अर्थहीन वाटतो त्यावर लावा खुशाल हा साचा, मग तो ग्रां प्री वर असो, की अजून कुठले डौलात मिरवणारा असोत.
अभय नातू १७:००, ९ ऑक्टोबर २०११ (UTC)
ता.क. Vishal1306 या सदस्याचे चर्चा पान पाहिले. कोणाशीही त्यांचा वाद झालेला दिसत नाही. उलट अनेकांनी त्यांना मदत केल्याचे तसेच त्यांच्या कामाचे कौतुकच केलेले आढळते. मग त्यांचे नाव येथे काढून संबंध नसलेल्या सदस्यांना चिथावण्याचा तर उद्देश नाही ना?
  • विशालचा संबंध : अभय नातू तुमची टोळी भाभड्या मराठी सदस्यांना कोणत्या कोपर्यांत नेऊन दम भरते ते आपणास माहित नसावे म्हणजे आश्चर्य ? तुम्ही येड घेऊन पेड गावला तर जात नाही ना ? "पाल्नेकी औकात नही तो पैदा क्यू करते हो ..." अशा फिल्मी स्टाइलचे डायलॉग आणि गुंडगिरीचे नमुने चर्चा:पल्सार येथे आहेत -मि राजाराम बोलतोय

सर्वांना सादर नमस्कार

अभय/संकल्प/राजारामजी ! कोणीतरी मोठेपणा घेउन व कोणीतरी लहानपणा घेउन ही चर्चा आता संपवुन टाकावी अशी माझी सर्वांना अत्यंत आदरपूर्वक व अत्यंत नम्रतापूर्वक विनंती आहे.काय झाले ते झाले. आता यापुढे नको. आशा करतो कि कोणीही माझी विनंती टाळणार नाही.आधीच सर्वांना धन्यवाद देतो.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १३:४४, १० ऑक्टोबर २०११ (UTC)

रामाची सीता कोण

नार्सिकार,

कोत्या मनाच्या अट्टल राजकारणी अभय नातू कडून तुम्ही काय मोठेपणाची अपेक्षा करता. अगदी सुरुवातीलाच म्हटल्या प्रमाणे ....

 युक्तिवाद करू नये सफाया देऊनये कारवाई हवी.

असेच अपेक्षित होते पण आपल्याच टोळीतील चेल्या चपाट्याना गुंडागर्दीचे आपल्या नावाप्रमाणे अभय दिलेल्या नातूंना असे करणे अश्यक्य दिसते. आजवर त्यांनी केवळ इतरांना बौद्धिक दिले आहे चेल्यांना समज देतानांना ते कधी दिसले नाही. हा त्यांचा एकवर्णी पक्षपाती खाक्या प्रचाल्काच्या गरिमेस काळिमा फासणारा आहे. त्यांनी आत्मपरीक्षण करावे. आरोपींवर योग्य कारवाई व्हावी एवढीच माफक अपेक्षा. वाद थांबवण्याची मलाच घाई आहे. पण रामायणा नंतर रामाची सीता कोण असे अभय नातू यांनी म्हणू नये म्हणजे मिळवले...! - मी राजाराम बोलतोय

वाद थांबवण्याची मलाच घाई आहे. असे दिसत तरी नाहीये. २-३ दिवसांनंतर तुम्हीच पुन्हा हा वाद उकरून काढला आहे. तुमचा problem काय आहे ते सर्वांना स्पष्टपणे सांगाल काय? येथे तुमचे contribution कमी आणि उपद्रवच जास्त होतो आहे असे कोणाला वाटले तर नवल नाही.
Abhijitsathe ११:१९, १२ ऑक्टोबर २०११ (UTC)
कोत्या मनाच्या अट्टल राजकारणी
जरा लेखणी/कळपट सांभाळा, राजाराम. नरसीकरांच्या विनंतीनंतर मी मुद्दामहून चर्चेत भाग घेतला नाही तर तुम्ही वाहवत चाललेला दिसत आहात. आरोपी, गुंडागर्दी, काळिमा, इत्यादी मोठे शब्द वापरण्याआधी थोडेसे perspective घ्या. येथे मी किंवा इतर कोणी तुमचे नोकर नाहीत. तुम्ही मला उपदेश पाजू नका. मी तुमच्या अपशब्दांना उत्तर देऊ इच्छित नाही. राजकारण कोणी चालवलेले आहे हे दिसते आहेच.
प्रचाल्काच्या गरिमेस
कोणत्या प्रचालकांशी तुम्ही याआधी बोलला आहात आणि कोणत्या गरिमेबद्दल बोलता आहात? येथील प्रत्येक प्रचालकाला तुम्ही नालायक ठरवले आहेत ना? मग कोणती गरिमा? इंग्लिश विकिपीडियावरील? तेथे जाउन येथे लिहिल्याच्या एक दशांश अपशब्द वापरुन पहा. तेथे संपादकांना, विशेषतः संकेत न पाळणार्‍या संपादकांना, किती ढील मिळते याची तुम्हाला कल्पना असेलच.
अभय नातू १४:१२, १२ ऑक्टोबर २०११ (UTC)
मी तर आता गुंड वर्गात गणला जात आहे. आता काही दिवसांत काही लोक वर्ग:गुंड नावाचा वर्ग काढून त्या वर्गात सदस्य:Sankalpdravid पानाला दाखला मिळवून देतील की काय, अशी शंका मनी डोकावतेय. :)
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:५६, १२ ऑक्टोबर २०११ (UTC)
राजाराम,सागर आणि मेघनाथ,
तुम्ही विकिपीडियावर करत असलेल्या योगदाना बद्दल मनःपूर्वक आभार! रिकाम्या लेखांबद्दल चावडीवर अनेकवेळा चर्चा झाली आहे आणि त्यातून असे मत झाले आहे की असे कोरे लेख नवीन सदस्यांना निराश करतात त्यामुळे अशा लेखा तयार न करणे हे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे, विशेषतः प्रचालक वर्गातील लोकांनी असे लेख काढून टाकण्यासाठी विशेष प्रयत्न करणे जरुरीचे आहे. संकल्प यांनी याबद्दल केलेले काम वाखाणण्याजोगे आहे. त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाचा इतिहास पाहता फक्त वैयक्तिक हेव्यादाव्यातून काही लेख वगळले असणे अशक्य वाटते. त्यामुळे कृपया त्यांच्यावर तसले विचित्र आरोप कृपया करू नका.
जर तुम्हाला खोकेवजा लेखांतून मराठी विकिपीडियाचे भले होते आहे असे वाटत असेल तर कृपया ते कसे हे समजावून सांगण्याचा कृपया प्रयत्न करा. आणि आतापर्यंत विकिपीडियावर असलेले रिकामे लेख कसे लोकांना उपयोगी पडले आहेत हेही समजावून सांगितले तर बरे होईल.
अभय, संकल्प,
जर काही सदस्यांना रिकामे लेख करून नंतर त्यात भर घालायची असेल तर त्यासाठी आता देतो त्यापेक्षा थोडा जास्त वेळ द्यावा का? असे रिकामे लेख जे २/३/क्ष दिवस रिकामे राहिले तर त्यांना वगळले जावे. हा कालावधी सदस्यांचा कौल घेऊन ठरवता येईल.
कोल्हापुरी १७:४२, १२ ऑक्टोबर २०११ (UTC)

सांगकाम्या तडकाफडकी थांबवण्यासाठीचा साचा आणि नियम

तांत्रिक चावडीवरील चर्चा पहा

श्री गणेशा

नमस्कार सागर सर आणि राहुल सर, तुम्ही आज घेतलेल्या मरठी विकी शिकवणीचा फायदा झाला आम्हा सर्वाना. नक्की कसे काम करावे या बद्दल सांगितलेल्या टिप्स खूप छान होत्या, परंतु ह्या विभागावरची हि चर्चा वाचून काम चालू करू कि नको असा मला तरी प्रश्न पडला आहे. आज ५ ते ८.३० मराठी विकी चे चांगले रूप पहावयास मिळाले आणि त्या बदल तुम्हा दोघांचे आभारी आहोत. पण आता कामाच्या स्वरूपा बदल शाशंक आहे. जर तुमच्या योगदानाबद्दल अशी प्रतिकिया असेल तर आमच्या सारख्या नवख्यांनी कोण उभे देखील करणार नाही. मग तुमचा मराठीसाठी इतका आटापिटा का? आम्ही सर्वांनी आता पुढे काय करावे ? कृपया मार्गदर्शन करावे.

कामाची सुरवात अशा शब्धाने करावी लागत आहे नाईलाज आहे.Tusharmumbai1985 १७:४६, ९ ऑक्टोबर २०११ (UTC)

नमस्कार तुषार,
खेद आहे की तुम्हाला अशा संदेशाने सुरुवात करावी लागत आहे. परंतु खात्री बाळगा की येथे कितीही भांडण-तंटे सुरू असले (तसे नाही झाले तर आम्ही मराठी कसले? :-}) तरीही कोणीही कोणाही बद्दल वैयक्तिक आकस धरुन नाही. येथे सर्वजण फक्त विकिपीडियाची प्रगती उरात बाळगून आहे.
तुम्हाला असलेले प्रश्न बेधडक विचाराल अशी आशा आहे.
अभय नातू १७:५०, ९ ऑक्टोबर २०११ (UTC)

नमस्कार नातू सर, इथे असे कोणाबरोबर होत असेल हे आजच्या मराठी शिकवणी मध्ये जाणवले नाही, राहुल सर आणि सागर सर दोघेही गेले कित्येक दिवस facebook आणि twitter च्या माध्यमातून खूप प्रचार करत आहेत. facebook वर तर मराठी विकी account वरून सगळ्यांशी संपर्क साधला जात आहे. आज दोघांनीही busy schedule मधून वेळ काढून आम्हा ८-९ जणांना खूप चांगल्या प्रकारे मरठी विकी ची ओळख करून दिली. त्याचेच फलित म्हणून मी इथे आता सुरवात करणार होतो.पण आता काय करावे काय नको ह्याबद्दल शंका आहे. आणि माझे बाकीचे सहकारी पण हे वाचून किती सहभाग घेतील माहित नाही. मराठी typing साठी राहुल सरांनी दिलेली tamilcube website खूप मदत करत आहे. मी इतके मराठी लिहू शकतो यावर माझाच विश्वास बसत नाही आहेTusharmumbai1985 १८:०२, ९ ऑक्टोबर २०११ (UTC)

तुषार,
सर्वप्रथम, मला सर, बिर म्हणू नका...उगीचच डोक्यावर पांढरी टोपी आणि नाकावर काळा चष्मा आल्याचा भास होतो... :-)
सागर (बहुधा मार्कळ तुम्हाला अभिप्रेत असावेत) आणि राहुल यांचे येथील योगदान नक्कीच स्पृहणीय आहे. त्यांचे ऑफलाइन काम तर लाखमोलाचे आहे.
मला वाटते की येथे आत्ता जे दिसून येत आहे ते आपल्या (सगळ्यांच्याच) स्वभावांचे/लकबींचे कंगोरे एकमेकांत अडकण्याची प्रक्रिया. येथे असलेले बव्हंश सदस्य यातून गेलेल आहेत, मी सुद्धा. आशा आहे की एकदा हे कंगोरे एकमेकांत अडकले की ते इतके घट्ट बसतील की आपले सगळे प्रयत्न एकजूटच होतील.
असो...हे झाले तत्त्वज्ञान. अगदी (अगदी त्रयस्थ नसलात तरी) नवीन सदस्य म्हणून प्रामाणिकपणे तुम्हाला विचारतो - तुमचे trepidation[मराठी शब्द सुचवा]{{रुखरुख/भिती) घालवण्यासाठी काय करावे?
अभय नातू १८:१०, ९ ऑक्टोबर २०११ (UTC)


मराठी विकी शिकवणी - १

नमस्कार, मराठी विकी शिकवणीचे - १ चलचित्र पहिले. सागर सर आणि राहूल सर खूप छान उपक्रम चालू केला आहात. चलचित्र मध्ये तुषार अमित,हरीश, नितीश झळकत आहात. सर्वांचे अभिनंदन.वरील वादामध्ये पडल्यास नवीन सदस्याचे म्हणणे कोण कितपत ऐकणार? न बोलून शहाणे व्ह्यवे अशी तरा आहे. आपल्या पुढील कामास लाख लाख शुभेच्या. जयंत साळगावकर ह्याची माहिती गोळा करण्याचे काम चालू आहे. अजून काही करण्याजोगे असल्यास कळावे.

Bhimraopatil १२:४९, १३ ऑक्टोबर २०११ (UTC)


लय भारि Anandaaghav १७:०७, १४ ऑक्टोबर २०११ (UTC)

विकिसंमेलनातील मराठी सत्रे

विकिसंमेलनातील मराठी सत्रांबद्दल महत्वाची नोंद पहा

विजयालक्ष्मी पंडित लेखातील साचा

विजयालक्ष्मी पंडित लेखातील साचा साचा:महाराष्ट्र मुख्यमंत्री आहे, परंतु खाली राज्यपालांच्या नावाचा उल्लेख दिसत आहे. संपादन करता वेळी तो साचा मुख्यमंत्र्यांची नावे दाखवतो. याला काय पर्याय काढता येईल. सचिन ०९:१५, १३ ऑक्टोबर २०११ (UTC)

डॉ. सचिन यांनी या साच्यातील मी नजरअंदाज केलेले शीर्षक बदलले आहे.
धन्यवाद.
अभय नातू १४:५६, १३ ऑक्टोबर २०११ (UTC)

माहितीचौकट भारतीय जिल्हा संबंधीत..

माहितीचौकट भारतीय जिल्हा साचात संकेतस्थळ मधे कार्यालयीन शब्द जोडला जातो त्यामुळे दुवा पान व्यवस्थित जोडले जात नाही. उदा. रतलाम जिल्हा मध्ये दुवा असा येत आहे. http://ratlam.nic.in/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A5%80%E0%A4%A8 यात कोणी बदल करील काय?

सचिन १५:४७, १४ ऑक्टोबर २०११ (UTC)

  • केले मेघनाथ १७:०३, १४ ऑक्टोबर २०११ (UTC)
मला वाटते आपल्याला आवश्यक बदल मी साच्यात केले आहेत आता आपण जोडलेले दुवे व्यवस्थित जोडले जात असतील. दुसरे असे की आपल्याला मध्यप्रदेश मधील जिल्ह्यांना माहितीचौकट भारतीय जिल्हा टाकायची असेल तर सांगकाम्या चालवून एकाच वेळी मध्यप्रदेयमधील जिल्ह्यांना ही माहितीचौकट टाकून देता येईल जेणेककरून आपला बराचसा वेळ वाचेल. असे वाटल्यास कळवावे.संतोष दहिवळ १७:०५, १४ ऑक्टोबर २०११ (UTC)

हातभार लावा

मराठी विकिपीडियावरील नवीन चित्र संचिका चढवण्याची प्रक्रीया प्रताधिकारपूर्ण करण्याच्या दृष्टीने विकिमीडिया कॉमन्स आणि इंग्रजी विकिपीडियाच्या धर्तीवर काही पानांची निर्मिती प्रस्तावीत आहे. त्या अंतर्गत en:Wikipedia:Files for upload हे पान त्यातील साचे आणि प्रक्रीया पूर्ण करावयास लागणार्‍या संबंधीत सर्व पानांची विकिपीडिया:चढवून हवी असलेली छायाचित्रे येथे निर्मिती करून हवी आहे. हे कुणा एका कडून होणारे काम नाही सर्वांनी थोडा थोडा हातभार लावावा. माहितगार ०८:२१, २१ ऑक्टोबर २०११ (UTC)

सदस्य:Vagobot ला bot flag

सदस्य:Vagobot ला bot flag देता येईल का? हा एक सांगकाम्या आहे व अलीकडील बदल हे पान या सांगकाम्याच्या बदलांने भरलेले असते.

वाक्-यूद्धात जिंकले कोण हरले कोण?

या चावडीवर तुम्हा लोकात अचानक वाक्-यूद्धा पेटतात आणि अचानक शांतता पसरते असे दिसते. युद्धस्य कथा रम्या असे म्हणतात शेवटी वर झालेल्या वाक्-यूद्धात जिंकले कोण हरले कोण? रायबा ०४:२७, २४ ऑक्टोबर २०११ (UTC)
ही वाक्-यूद्धे करण्याची जागा नाही. जिंकण्या हरण्यासाठी ही वाक्-यूद्धे नसतात. आलेल्या अडचणी येथे मांडून विकिपिडीयाचे सदस्य त्यावर चर्चा करुन मार्ग काढतात आणि एकदा मार्ग सापडला की आपण म्हणता तशी शांतता पसरते. संतोष दहिवळ ०९:२७, २४ ऑक्टोबर २०११ (UTC)

कॉपीराईट आणि प्रयोजन विषयक आव्हाने

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचा विश्वकोश सिडॅकच्या संकेतस्थळावर उपलब्ध झाल्याचे दिसते.या त्यांच्या प्रगतीचे मनःपुर्वक स्वागतच करावयास हवे.अर्थात हे स्वागत करताना या संकेतस्थळावर महाराष्ट्र शासन जनतेला मोफत उपलब्ध करुन देत आहे. विश्वकोश महाराष्ट्र शासनाच्या वतीने जगास अर्पण करेल हे शब्द जिथ पर्यंत कॉपीराइटचा संबंध आहे तिथ निव्वळ बिनउपयोगाचे आहेत हे सर्व मराठी विकिपीडियन्सनी पक्के ध्यानात ठेवावयास हवे. जिथे कॉपीराईटचा संबंध आहे तिथे कॉपीराइट © २०११ --- महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित हे वाक्यच कायदेशीर दृष्ट्या प्रभावी आहे. सोयीचे तर आहे शासनाची मोफत योजना तर आहे असा दृष्टीकोण बाळगणे अत्यंत रिस्की आहे. महाराष्ट्राचा अलिकडील राजकीय इतिहास लोकांच्या भावना विवीधकारणानी सोयीस्करपणे भडकतात आणि लोकशाहीभिमूख( कि दबणारी) शासनव्यवस्था सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीत कुठेही मागे राहात नाही असा इतिहास आहे.अशा परिस्थितीत नको असलेलेली मांडणी मराठी विकिपीडियावर आढळली आणि घटनादत्त अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे कारवाईचे मार्ग उपलब्ध नसल्यास आपल्या संपादकांकडून कळत न कळत झालेली कॉपीराईट उल्लंघने शासकीय बाबूंना आयते कोलीत उपलब्ध करून देणारच नाहीत असे नाही. असे होईलच असे नाही पण काळजी घेतेलेली बरी.

आंतरजालावरील इतरत्रच्या मजकुरावर व्यक्तीगतता, विशेषण आणि वार्तांकन शब्द वगळून मजकुर विकिशैलीत आणणे आणि कोपीराईट चे प्रश्न निवळणे थोडे सोपे आहे ; मंडळाच्या विश्वकोशाचे तसे नाही त्यातील विवीध प्रकरणे आणि परिच्छेद वेगवेगळ्या तज्ञ लेखकांच्या व्यक्तिगत लेखन शैली त्याच वेळी त्यांच्या लेखनाचे स्वरूपात अलंकारीतता कमी असल्यामुळे केवळ काही शब्द वगलून किंवा बदलून कॉपीराईटचा प्रश्न सुटण्याची शक्यता फार कमी असेल.विकिसदस्यांना स्वभाषेत लेखन करून केवळ संदर्भदेण्या पुरता मडळाच्या विश्वकोशाचा उपयोग करावा हे अधिक उचीत असेल

कॉपीराईट, मराठी विश्वकोश व मराठी विकिपीडियाची भूमिका

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ व महाराष्ट्र शासनाच्या वतीने मराठी विश्वकोशाचे संपूर्ण १ ते १८ खंड युनिकोड माध्यमातून जगास मोफत अर्पण झाले आहेत., असे त्यांच्या संकेत स्थळावर जाहीर झाले आहे. हि खरे तर मराठी विकिपीडिया साठी पर्वणीच समजायला हवी. आधीच कोणत्याही ज्ञान शाखेचे मराठीत उपलब्ध असलेले साहित्य तुटपुंजे आहे. त्यातच Digital स्वरूपातील माहितीचा पूर्ण अभाव. अशा स्थितीत केवळ तळाशी दिलेल्या त्यांच्या कॉपीराईट नोंदीला घाबरून , या खजिन्याकडे दुर्लक्ष्य करणे हे करंटे पणाचे ठरेल. उलट या बाबतीत विकिपीडियनस नी थोडा Practical दृष्टीकोन ठेऊन , त्यातील माहितीत थोडी भर घालून, थोडे बदल करून, माहिती अद्ययावत करून , recycled स्वरूपात विकिपीडियावर कशी आणता येईल हे पाहणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ अध्याक्ष्या विजयाताई वाड या अत्यंत सकारात्मक भूमिका असलेल्या विदुषी आहेत. व महाराष्ट्र शासनाची यातली भूमिका हि अत्यंत चांगली आहे. म्हणून विकिपीडिया प्रशासकांनी कॉपीराईट विषया बद्दल विश्वकोश निर्मिती मंडलाशी पत्र वा भेटीद्वारे विकिपीडिया व विश्वकोश यांच्यातील सहकार्याची गरज व कॉपीराईट मुक्त करण्याबाबत आग्रह करणे हे जास्त महत्वाचे आहे.

आज वरच्या सर्व भाषेतील विकिपीडियांचा आढावा घेतल्यास स्पष्ट दिसून येते कि ज्या भाषांमधील ज्ञान हे आंतर जालावर Digital स्वरूपात आलेले आहे, त्यांचेच विकिपीडिया जास्त समृध्द व अद्ययावत आहेत. Optical Character recognition , Machine translation , इ. तंत्रा मूळे अत्यंत छोट्या भाषांतील विकिपीडिया हे मराठी विकिपीडिया च्या कित्येक पट पुढे आहेत. याचाच स्पष्ट अर्थ असा कि उपलब्ध माहितीचेच येथे recycling होत असते. मराठीत यांचाही अभाव आहेच. म्हणूनच मराठी विकिपीडिया प्रशासकांनी येथे थोडी Proactive भूमिका घेऊन मराठी विकिपीडिया ची केवळ गुणात्मक नव्हे तर संख्यात्मक वाढ कशी होईल याकडे जास्त लक्ष्य द्यावे. अन्यथा जी अवस्था मराठी विश्वकोशाची झाली , तीच मराठी विकिपीडिया ची हि होईल. Girish2k ०८:५९, १ नोव्हेंबर २०११ (UTC)


>>महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ व महाराष्ट्र शासनाच्या वतीने मराठी विश्वकोशाचे संपूर्ण १ ते १८ खंड युनिकोड माध्यमातून जगास मोफत अर्पण झाले आहेत.,

मोफत आहेत मुक्त नव्हे हे येथे अधोरेखीत करणे महत्वाचे आहे.सरकारचे असंख्य प्रकल्प अर्पण होत असतात याचा अर्थ सरकारचा त्यावरचा अधिकार संपला असा होत नाही.मोफत उपलब्ध होणे ही मराठी जनांच्या दृष्टीने उपयोगी गोष्ट आहे पण 'अर्पण होणे' हे व्यावहारीक उपयूक्तता नसलेला (फसवे?) शब्द आहे.

>> हि खरे तर मराठी विकिपीडिया साठी पर्वणीच समजायला हवी.

संदर्भ मूल्य चांगल आहे पण कॉपी-पेस्ट करण्यास अद्यापतरी कायद्याचा आडथळा कायम आहे.

>>तळाशी दिलेल्या त्यांच्या कॉपीराईट नोंदीला ...

विकिमीडिया फाऊंडेशन आणि विकिपीडिया संस्कृती सर्वंकश पद्धतीने कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन टाळण्यावर भर देते. प्रश्न केवळ घाबरण्याचा नाही कायद्याच्या पालनाचा आहे . विकिपीडिया , मराठी विकिपीडिया त्याची उपयूक्तता कॉपीराईट फ्री असण्याचे फायदे आणि कॉपीराईट फ्री नको असणे याची व्यवस्थीत कल्पना संबधित प्रकल्पाचे संगणीकरण सल्लागार मार्गदर्शन: माननीय श्री. माधव शिरवळकर – सदस्य, विश्वकोश मंडळ . माननीय श्री. महेश कुलकर्णी – सहायक निर्देशक व विभाग प्रमुख, सी-डॅक जिस्ट, पुणे. यांना आहे शिवाय मंडळातील इतरही काही मडळींना याची कल्पना आहे तरी सुद्धा त्यांनी कॉपीराईटचा केलेला उल्लेख स-उद्देश आहे हे ओघानेच येते.

>>महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ अध्याक्ष्या विजयाताई वाड या अत्यंत सकारात्मक भूमिका असलेल्या विदुषी आहेत. व महाराष्ट्र शासनाची यातली भूमिका हि अत्यंत चांगली आहे.

भूमिकेच्या सकारात्मकते बद्दल किंवा चांगली असण्या बद्दल वाद नाही. ती कॉपीराईट मुक्त करणारी आहे का ? तर सध्यातरी याचे उत्तर नकारात्मक आहे.

>> म्हणून विकिपीडिया प्रशासकांनी कॉपीराईट विषया बद्दल विश्वकोश निर्मिती मंडलाशी पत्र वा भेटीद्वारे विकिपीडिया व विश्वकोश यांच्यातील सहकार्याची गरज व कॉपीराईट मुक्त करण्याबाबत आग्रह करणे हे जास्त महत्वाचे आहे.

असे करण्यास माझा विरोध नाही पाठींबा सुद्धा आहे. (पण महाराष्ट्र शासन त्यास कॉपीराईट फ्री करत नाही तो पर्यंत सरसकट कॉपी पेस्टींग ला माझा विरोधच आहे. संदर्भा करता उपयोगी आहे हे खरे. संदर्भ देणे आणि कॉपी पेस्टींग मधला फरक कृपया सर्व विकिपीडियन्स नी समजून घेणे महत्वाचे आहे .)

>>Optical Character recognition , Machine translation

या गोष्टींचाही मी खंदा समर्थक आहे

>> म्हणूनच मराठी विकिपीडिया प्रशासकांनी येथे थोडी Proactive भूमिका घेऊन मराठी विकिपीडिया ची केवळ गुणात्मक नव्हे तर संख्यात्मक वाढ कशी होईल याकडे जास्त लक्ष्य द्यावे. अन्यथा जी अवस्था मराठी विश्वकोशाची झाली , तीच मराठी विकिपीडिया ची हि होईल.

हा मुद्दा चर्चेस अयोग्य आहे असे नाही पण कॉपीराईटच्या मुख्य मुद्द्याचे विषयांतर होऊ नये म्हणून या क्षणी टाळतो आहे
माहितगार ०९:३२, १ नोव्हेंबर २०११ (UTC)

प्रताधिकार उल्लंघन कटाक्षाने टाळावे

खरे आहे. "कॉपीराइट © २०११ --- महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित " असे वाक्य असणे प्रताधिकार कायद्याच्या दृष्टीने महत्त्वाचे. कारण त्या खंडांसाठी विश्वकोश मंडळाच्या तज्ज्ञांनी मेहनत घेतली असून महाराष्ट्र शासनाने (व संलग्न संस्थांनी/महामंडळांनी) आर्थिक पाठबळ पुरवले; त्यातून त्या खंडांतील आशय निर्मिला गेला आहे. त्यामुळे त्या मेहनतीवर प्रकाशनाचे अधिकार व प्रताधिकार असलेल्या संस्थांशिवाय अन्य कुणाचाही कायदेशीर हक्क शाबीत होऊ शकत नाही. त्यामुळे मराठी विश्वकोशातील लेखांतला मजकूर मराठी विकिपीडियावर कॉपीपेस्ट मारून प्रताधिकार उल्लंघू नये. तसे कारणे कायद्याचा, तसेच विकिपीडिया धोरणांचा भंग ठरते.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:०९, १ नोव्हेंबर २०११ (UTC)

मुखपृष्ठ सदर लेख

"मुखपृष्ठ सदर लेख" या विषयावर मागे भरपूर चर्चा झाली पण निर्णय काही झालेला दिसत नाही. कॉरल समुद्राची लढाई हा लेख १ मे पासून तेथे आहे. आज त्याला ६ महिने होऊन गेले. या संदर्भात मी दिलेल्या अनेक सूचना फारश्या कोणी मनावर घेतलेल्या दिसत नाहीत. माझी आता अगदी छोटी सूचना - जर हा लेख बदलणार नसाल तर " मासिक सदर" हे नाव बदलून "वार्षिक सदर" केले तर योग्य होईल..... मंदार कुलकर्णी १६:३३, १ नोव्हेंबर २०११ (UTC)

सहसा मुखपृष्ठ सदर १ तारखेस बदलले जाते. त्याप्रमाणे मी आज बदलले आहे. अर्थात अजून माझी १ तारीखच आहे :-)
अभय नातू १६:३८, १ नोव्हेंबर २०११ (UTC)

अतिशय समकालीन अशा विषयावरचा मुखपृष्ठलेख पाहून आनंद वाटला. या लेखाच्या इतिहासात नाव नोंदले गेलेल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन. केवळ इतिहासात रमण्यापेक्षा आजच्या आणि उद्याच्या दृष्टीने महत्वाचे असे विषय निवडावेत तयार करावेत आणि मुखपृष्ठ लेख म्हणून झळकवावेत, त्यासाठी योगदानास तयार. येथेच विषयाची चर्चा सुरु करता येईल. चला डिसेंबर ११ चा मुखपृष्ठलेख असा कोणता असावा? - मनोज १०:०३, २ नोव्हेंबर २०११ (UTC) ता. क. (आज थ्रीजी या लेखाची सुरवात केली आहे)

मनोज,
विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन येथे चक्कर टाकून निर्देशित लेखांची यादी पहा, असलेल्या लेखांत सुधारणा करा आणि वाटल्यास नवीन लेखही सुचवा.
सदर करण्यासाठी शक्यतो त्या त्या महिन्याला संबंधित असे लेख करण्याचा आपला प्रयत्न असतो - उदा - नोव्हेंबर - विंडोझ - सर्वप्रथम आवृत्ती प्रकाशित झाली. मे - कारगिल युद्ध - विजयदिन, बराक ओबामा - फेब्रुवारी - पदग्रहण. इ.
अभय नातू १७:४२, २ नोव्हेंबर २०११ (UTC)

माहितीचौकट साचा करून हवा आहे.

माहितीचौकट साचा अवयवाची माहिती (Infobox Anatomy) सारखा तयार करून पाहिजे आहे. हा विविध अवयवांकरिता वापरता येईल. कोणी तज्ञ सदस्याने तयार केल्यास विविध अवयवांच्या लेखात वापरता येईल. सचिन १५:४७, ३ नोव्हेंबर २०११ (UTC)

सचिन, साच्यात काय काय माहिती देण्यासाठी पॅरामीटर लागतील, याविषयी कृपया लिहाल काय ? त्यावरून अपेक्षित स्वरूपाची कल्पना येईल. --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १८:१२, ४ नोव्हेंबर २०११ (UTC)
माहिती देण्यासाठी पॅरामीटर अपेक्षित आहेत. शीर्षनाव, विकी कॉमन्स वरील चित्र, लॅटिन नाव, ग्रे'ज अँनॅटॉमी यासंदर्भातील क्रमांक,1 एंब्रिऑलिजिकल उदय स्थान, शरीरसंस्था, शरीर शास्त्रातील स्थान, रक्तपुरवठा- रोहिणी, नीला, मज्जासंस्था पुरवठा, लिंफ, एन.आय.एच. संकेतस्थळावरील Medical Subject Headings, डॉरलँड क्रमांक सचिन ०२:०७, ६ नोव्हेंबर २०११ (UTC)

भौ भौ

चावडीवर समद्याना टिप्याचा भौ भौ