"लेओपोल्ड फॉन रांक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Typo fixing, replaced: {{PAGENAME}} → {{लेखनाव}} (3) using AWB
छो Typo fixing, replaced: 18px → using AWB
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट साहित्यिक
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = [[चित्र:Flag of Germany.svg|18px]] {{लेखनाव}}
| नाव = {{लेखनाव}}
| चित्र = Leopold Von Ranke 1877.jpg
| चित्र = Leopold Von Ranke 1877.jpg
| चित्र_रुंदी = 200px
| चित्र_रुंदी = 200px

२०:३८, १९ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती

लेओपोल्ड फॉन रांक
लेओपोल्ड फॉन रांक
जन्म नाव लेओपोल्ड फॉन रांक
जन्म २१ डिसेंबर, इ.स. १७९५
थ्युरिंगेन, जर्मनी
मृत्यू २३ मे, इ.स. १८८६
बेर्लिन, जर्मनी
राष्ट्रीयत्व जर्मनी
कार्यक्षेत्र जर्मनी
भाषा जर्मन
साहित्य प्रकार इतिहास लेखन

लेओपोल्ड फॉन रांक (मराठी लेखनभेद: लेओपोल्ड फॉन रांके; जर्मन: Leopold von Ranke) (२१ डिसेंबर, इ.स. १७९५; वीह, थ्युरिंगेन, जर्मनी - २३ मे, इ.स. १८८६; बेर्लिन, जर्मनी) हा जर्मन इतिहासकार होता.

जीवन

याचे शिक्षण हालेबर्लिन येथे झाले. इ.स. १८१८ साली त्याने फ्रांकफुर्ट येथील एका शाळेत शिक्षकाची नोकरी स्विकारली. त्यानंतर इ.स. १८२५ साली रांकप्रशियन शासनाच्या सेवेत दाखल झाला. त्याचवेळी त्याची बर्लिन येथे इतिहासाचा प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. नेबूरचा रोमन इतिहास वाचल्यानंतर उत्सुकता व विश्वासार्ह माहिती मिळवण्यासाठी रांक याने हिरोडोटस, थुसिडाडस, झेनोफीन, डायनोसिस, लिव्ही, सिसिरो या इतिहासकारांचे साहित्य अभ्यासले.

इ.स.च्या १९व्या शतकातील शास्त्रशुद्ध इतिहास संशोधन व इतिहास लेखन याचा लेओपोल्ड फॉन रांक प्रणेता आहे. त्याने इतिहासाला बुद्धिवादी विषय बनवून व्यावसायिक प्रशिक्षण व पुराभिलेख संशोधन कार्यपद्धतीची जोड दिली. शास्त्रोक्त संशोधन करून व पुराव्यांची काटेकोर छानणी करूनच त्यावर इतिहास लेखन करण्याचा नवा पायंडा त्याने पाडला.

साहित्य

लेओपोल्ड फॉन रांक याच्या समग्र साहित्याचे ५४ खंड आहेत. त्यांपैकी हिस्ट्री ऑफ पोपस, हिस्ट्री ऑफ रिफर्मेशन इन जर्मनी, फ्रेंच हिस्ट्री, इंग्लिश हिस्ट्री, प्रशियन हिस्ट्री हे ग्रंथ महत्त्वाचे होत. या ग्रंथांमध्ये त्याने इ.स.च्या १५ व्या शतकापासून ते इ.स.च्या १८ व्या शतकापर्यंतची युरोपातील घटनांची माहिती दिलेली आहे. लॅटिन व ट्युटॉनिक राष्ट्रांचा इतिहास या ग्रंथात त्याने युरोपीय संस्कृती हा रोमन व जर्मन घटकांचा संयुक्त अविष्कार आहे, असे दाखवून दिले.

अन्य साहित्य

  • हिस्ट्री ऑफ द रोमानिक अॅंड जर्मनीक पीलल्स फ्रॅाम १४९४-१५१४,
  • सर्बियन रिवोल्युशन
  • प्रिन्सेस अॅंड पीपल्स ऑफ साऊदर्न युरोप इन द सिक्स्टीन्थ अॅंड सेव्हन्टीन्थ सेंच्युरीज
  • द रोमन पोप्स इन द लास्ट फोर सेंच्युरीज १८३४-१८३६
  • मेमरीज ऑफ द हाऊस ऑफ ब्रॅंडेंन्बर्ग अॅंड हिस्ट्री ऑफ पर्शिया ड्युरींग द सेव्हन्टीन्थ अॅंड एटिन्थ सेंच्युरीज
  • सिवील वार्स अॅंड मोनार्की इन फ्रान्स
  • द जर्मन पावर्स अॅंड द प्रिन्सेस लीग
  • ओरिजीन अॅंड बिगीनिंग ऑफ द रिवोल्युशनरी वार्स
  • वर्ल्ड हिस्ट्री: द रोमन रिपब्लिक अॅंड इट्स वर्ल्ड रूल

बाह्य दुवे