"सूर्यसिद्धान्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो →‎बाह्य दुवे: removing साचा:हिंदू कालमापन where not directly relevant using AWB
छो →‎बाह्य दुवे: removing साचा:हिंदू धर्म where not directly relevant using AWB
ओळ १९: ओळ १९:
* {{संकेतस्थळ|http://users.hartwick.edu/hartleyc/hindu/suryahistory.html|सूर्यसिद्धान्ताचा इतिहास|इंग्लिश}}
* {{संकेतस्थळ|http://users.hartwick.edu/hartleyc/hindu/suryahistory.html|सूर्यसिद्धान्ताचा इतिहास|इंग्लिश}}
{{विस्तार}}
{{विस्तार}}

{{हिंदू धर्म}}


[[वर्ग:हिंदू कालमापन]]
[[वर्ग:हिंदू कालमापन]]

१९:१०, ६ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती

सूर्यसिद्धान्त हा खगोलशास्त्रावरील संस्कृत भाषेतला प्राचीन ग्रंथ आहे. हा ग्रंथ स्वतः सूर्याने मयासुराला कृतयुगाच्या शेवटी कथन केला, अशी एक पौराणिक समजूत आहे. याचा अर्थ असा की सूर्यसिद्धान्त नेमका कुणी लिहिला ते माहीत नाही. या ग्रंथाचा काळ इ.स पूर्व ६०० असावा असे मानले जाते. म्हणून या ग्रंथावर, 'ग्रीक किंवा मेसापोटेमिया येथील तत्त्वज्ञांच्या ग्रंथांची भारतीय आवृत्ती' असा शिक्का मारता येत नाही. इसवी सनपूर्व तिसर्‍या शतकातील बौद्ध ग्रंथात याचे उल्लेख आहेत. पैतमाह सिद्धान्त, पौलिश सिद्धान्त आणि रोमक सिद्धान्त या ग्रंथांतही सूर्यसिद्धान्ताचा उल्लेख आहे. अर्थात वराहमिहीर आणि आर्यभट्ट यांच्या लेखनात या ग्रंथाचे संदर्भ आढळणारच.

स्वरूप

एका वर्षात पृथ्वीच्या भ्रमणाला लागणारा काळ, याची अचूक माहिती या ग्रंथात नोंदवलेली आहे, ती ३६५.२५६३६२७ दिवस अशी आहे. ही माहिती आजच्या मान्यतेनुसार जवळपास अचूक आहे.

या ग्रंथात ग्रहगोल आणि त्यांचे आकारमान यांची माहिती आहे.

ग्रहांचे आकारमान -

  • शुक्र - सूर्यसिद्धान्तानुसार शुक्राचा व्यास ३००८ मैल आहे. आधुनिक खगोलशास्त्राची सद्य मान्यता म्हणते की शुक्राचे आकारमान ३०३२ मैल आहे.
  • शनी - त्याचप्रमाणे सूर्यसिद्धान्तानुसार शनीचा व्यास ७३८८२ मैल आहे. सध्याचा अंदाज ७४५८० मैलाचा आहे. म्हणजे दोन्ही आकड्यांत केवळ १ टक्क्याचा फरक आहे.

तसेच सूर्यसिद्धान्ताच्या गणित शाखेत ज्याजीवा यांचे संदर्भ किंवा मूळ दिसून येते. ग्रहणे आणि त्याची कारणे याचा ऊहापोहही या ग्रंथात आहे. एकूणच सूर्यसिद्धांत हा खगोलशास्त्रातील आद्य आणि अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे. शेकडो वर्षांपासून बनणारी भारतीय पंचांगे या ग्रंथांतील तत्त्वांवर आधारलेली असतात. असे असले तरी, या ग्रंथाचा आवाका वैश्विक मितीचा आहे. या संस्कृत ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर बर्जेस या अभ्यासकाने सूर्य-सिद्धान्त अ टेक्स्ट-बुक ऑफ हिंदू अ‍ॅस्ट्रोनॉमी (इंग्लिश: Surya-Siddhanta: a text-book of Hindu astronomy ;) या नावाने इ.स. १८५८ साली केले.

बाह्य दुवे