"शंकर दाजीशास्त्री पदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: महाराष्ट्राचे सुपुत्र असणारे आणि ‘महामहोपाध्याय’ ही पदवी धारण क...
 
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ४: ओळ ४:
<big>लेखक आणि संपादक</big> :
<big>लेखक आणि संपादक</big> :
* वयाच्या बाराव्या वर्षी पदेशास्त्रींनी बालमित्र मासिक सुरू केले.
* वयाच्या बाराव्या वर्षी पदेशास्त्रींनी बालमित्र मासिक सुरू केले.
* ‘सयाजी विजय’ या बडोद्यातील मासिकांचे संपादन (वयाच्या पंधराव्या वर्‍षी).
* ‘सयाजी विजय’ या बडोद्यातील मासिकांचे संपादन (वयाच्या पंधराव्या वर्षी).
* वयाच्या सोळाव्या वर्षी ‘राजवैद्य’ मासिकाचे संपादन. या मासिकात तत्कालीन आयुर्वेदाची सद्यस्थिती प्रकट करून उज्ज्वल भूतकाळ व भविष्यकाळाची चित्रे रेखाटली.
* वयाच्या सोळाव्या वर्षी ‘राजवैद्य’ मासिकाचे संपादन. या मासिकात तत्कालीन आयुर्वेदाची सद्यस्थिती प्रकट करून उज्ज्वल भूतकाळ व भविष्यकाळाची चित्रे रेखाटली.
* १९८८मध्ये आयुर्वेदाचा प्रभावी प्रचार करण्यासाठी व सखोल अभ्यासासाठी ‘आर्यभिषक्‌’ मासिक सुरू केले.
* १९८८मध्ये आयुर्वेदाचा प्रभावी प्रचार करण्यासाठी व सखोल अभ्यासासाठी ‘आर्यभिषक्‌’ मासिक सुरू केले.

२२:०२, १२ जुलै २०११ ची आवृत्ती

महाराष्ट्राचे सुपुत्र असणारे आणि ‘महामहोपाध्याय’ ही पदवी धारण करणारे वैद्य शंकर दाजीशास्त्री पदे यांचा जन्म ३० मार्च १८६७ रोजी झाला. गोरगरिबांना सुलभतेने औषधोपचार करण्यासाठी मुंबईत नागपाड्यात शेजारी राहणार्‍या वैद्य भानू कुलकर्णी यांच्याकडून त्यांनी वैद्यशास्त्र शिकून घेतले व अनेक ग्रंथांचा अभ्यास केला. पुढे आयुर्वेद प्रचार व प्रसार हेच त्यांचे जीवितकार्य ठरले.

लेखक आणि संपादक :

  • वयाच्या बाराव्या वर्षी पदेशास्त्रींनी बालमित्र मासिक सुरू केले.
  • ‘सयाजी विजय’ या बडोद्यातील मासिकांचे संपादन (वयाच्या पंधराव्या वर्षी).
  • वयाच्या सोळाव्या वर्षी ‘राजवैद्य’ मासिकाचे संपादन. या मासिकात तत्कालीन आयुर्वेदाची सद्यस्थिती प्रकट करून उज्ज्वल भूतकाळ व भविष्यकाळाची चित्रे रेखाटली.
  • १९८८मध्ये आयुर्वेदाचा प्रभावी प्रचार करण्यासाठी व सखोल अभ्यासासाठी ‘आर्यभिषक्‌’ मासिक सुरू केले.
  • ‘विद्या प्रकाश’, ‘नेटिव ओपिनियन’ इ. तत्कालीन नियतकालिकांतून शंकर, पिताकी, भ्रमर या टोपणनावांनी लिखाण.
  • गुजराथीतून आर्यभिषक्‌ व हिंदीतून सद्वैद्य कौस्तुभ हे नियतकालिक सुरू केले.

संघटक : ठिकठिकाणी संघटना स्थापन होऊन एकत्रित कार्य करणे हे वैद्यकशास्त्रातील संशोधनाचे गमक आहे असे त्यांनी मानले व त्यानुसार १८९० साली ‘मुंबई वैद्य सभा’ या संघटनेची स्थापना त्यांच्या प्रेरणेने झाली. डॉ. अण्णा कुंटे, सर भालचंद्र भाटवडेकर, वैद्य जटाशंकर, डॉ. खेर, वैद्य वासुदेवशास्त्री ऐनापुरे इ. भिन्न वैद्यक व्यवसायी मंडळींनी राष्ट्रीयतेने एकत्र येऊन काम करावे ही पदेशास्त्रींची इतक्या जुन्या काळी मनात आणलेली संकल्पना अचंबित करण्यासारखीच होती.

शिक्षण व संशोधन -

  • मुंबईमध्ये आयुर्वेद महाविद्यालयाची स्थापना, * आयुर्वेद अभ्यासक्रम, शिक्षण- परीक्षापद्धती, ग्रंथनिर्मिती संशोधन इ. कामे करणाऱ्या आयुर्वेद विद्यापीठ संकल्पनेचे जनक,
  • १९०६ साली नाशिक येथे सयाजीराव गायकवाड आयुर्वेद विद्यापीठाची स्थापना (नंतर हेच विद्यापीठ- अखिल भारतवर्षीय आयुर्वेद विद्यापीठात परिणीत झाले.)
  • १९०७ साली पहिले अखिल भारतीय वैद्य संमेलन नाशिक तर १९०८ मध्ये पनवेल येथे भरवले.

मृत्यू : इ.स. १९०९ मध्य अवघ्या ४२ व्या वर्षी, त्यांच्या ३० मार्च या वाढदिवसादिवशीच या युगपुरुषाचा विषमज्वराने अंत झाला. असे म्हटले जाते की, भारतात पदेशास्त्रींसारखा माणूस जन्मलाच नसता तर आज आयुर्वेद व आयुर्वेदीय चिकित्सक या देशात औषधालाही उरले नसते.