"ग्रंथालयशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो "ग्रंथालय शास्त्र" हे पान "ग्रंथालयशास्त्र" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
छोNo edit summary
ओळ ७०: ओळ ७०:


{{विस्तार}}
{{विस्तार}}
[[वर्ग:ग्रंथालय शास्त्र]]
[[वर्ग:ग्रंथालयशास्त्र]]


[[am:የመጻሕፍት ቤትና የመረጃ ጥናት]]
[[am:የመጻሕፍት ቤትና የመረጃ ጥናት]]

२१:०५, १७ मे २०११ ची आवृत्ती

ग्रंथालयातील पुस्तके आणि त्या अनुषंगिक शास्त्राला ग्रंथालयशास्त्र असे म्हणतात. यामध्ये

  • ग्रंथालयातल्या पुस्तकांच्या आणि इतर साहित्यांच्या व्यवस्थापन
  • ग्रंथपाल प्रशिक्षण
  • पुस्तकांची मांडणी
  • साठवण
  • माहितीचा योग्य पुरवठा
  • पुस्तक हाताळणीची तंत्रे

हे शिकवले जाते.

या क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानानुसार पुस्तकांसोबतच सीडीज, मायक्रोफिल्म्स, व्हीडिओज, कॅसेट्स, स्लाइड्स, संशोधनपत्र, संदर्भग्रंथ अशा अनेक गोष्टी अंतर्भूत असतात. पारंपरिक ग्रंथालयाची कल्पना आता बदलली असून इंटरनेट, र्व्हच्युअल बुक्स इथपर्यंत त्याचा विस्तार झालेला आहे. त्यात शाळा, महाविद्यालये, इन्स्टिट्युट्स यासारख्या संस्थांमधल्या ग्रंथालये सांभाळण्यासाठी व्यवस्थापकांना ग्रंथपालांची आवश्यकता असते. यामध्येही सार्वजनिक आणि खासगी लायब्ररी असे प्रकार असतात.

इतिहास

भारतात स्वातंत्र्यपूर्व कालखंडात भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी फार मोठे योगदान दिले असे मानले जाते. त्यांनी पाच सूत्रे सांगितली होती ती म्हणजे

  • ग्रंथ हे उपयोगासाठी आहेत
  • प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ मिळाला पाहिजे
  • प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे
  • वाचकांचा व सेवकांचा वेळ वाचला पाहिजे
  • ग्रंथालय ही वधिर्ष्णू संस्था आहे.

पुणे विद्यापीठात, अनेक वर्षांपूर्वीच ग्रंथालयशास्त्राचा अभ्यासक्रम विद्यापीठाचे पहिले ग्रंथपाल श्री. हिंगवे यांनी सुरू केला. श्री. हिंगवे, हे भारतीय ग्रंथपालनाचे जनक डॉ. रंगनाथन यांच्या मोजक्‍या शिष्यांपैकी एक होत. महाराष्ट्रात सार्वजनिक ग्रंथालयांची उपयुक्तता ध्यानात घेऊन १९६७ साली 'महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम' हा कायदा अमलात आला. महाराष्ट्रात मान्यताप्राप्त ग्रंथालय संघांना ग्रंथालय संचलनालय महाराष्ट्र राज्य यांचे मार्फत अनुदान देण्यात येते.

शिक्षण आणि पात्रता

आधुनिक शिक्षणात आधुनिक ग्रंथालय व माहिती शास्त्रज्ञास संगणक; तसेच आंतरजालाचा योग्य वापर , ग्रंथालयातील कामकाजासाठी योग्य संगणक प्रणाली वापरणे या तांत्रिक कौशल्यांबरोबरच वाचकांच्या माहितीच्या बदलत्या व गुंतागुंतीच्या गरजांचा मानसशास्त्रीय अभ्यास करून माहितीचे संकलन व विश्‍लेषण करून ती तत्काळ पुरविणे ही कौशल्ये महत्त्वाची मानली जातात. या मध्ये बी.लिब. एस्सी. व एम.लिब.एस्सी. असे अभ्यासक्रम आहेत. ग्रंथालय शास्त्र (लायब्ररी सायन्स कोर्स) पारंगत होण्यासाठी कमीत कमी पदवीधर असणे आवश्यक असते. या नंतर ग्रंथालय शास्त्र (लायब्ररी सायन्स)चा एका वर्षाचा कोर्स करून मास्टर कोर्स करता येतो. त्यानंतर आवडीनुसार उच्च शिक्षण पीएचडी किंवा एमफील घेता येते. यामध्ये डिप्लोमा आणि सटिर्फिकेट कोसेर्सही उपलब्ध असतात. यामध्ये लायब्ररी सिस्टिम मॅनेजमेण्ट, वगीर्करण पद्धती, बिबिलिओग्राफी, डॉक्युमेण्टेशन अशा गोष्टी शिकवल्या जातात.

पुणे विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रम

या लेखातील किंवा विभागातील काही मजकुर जाहिरातसदृष्य आहे.अथवा विशीष्ट वस्तुचे मुल्य नमूद केले गेले आहे. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.
मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे,त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे साधन नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.

मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा.



आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! कृपया या संबंधीची चर्चा, या लेखाचे चर्चापानावर पहावी.

संदेश = कृपया या बाबतचे आपले मत या लेखाचे चर्चापानावर नोंदवा.

पुणे विद्यापीठातील हा पदव्युत्तर अभ्यासक्रम हा एक इंग्रजी माध्यमातील अभ्यासक्रम आहे. हा चार सत्रात पूर्न होतो. त्याचे स्वरूप पुढील प्रमाणे आहे.

स्वरूप

सत्र पहिले

  • ग्रंथालये- इतिहास व प्रकार.
  • ग्रंथालयशास्त्री मूलतत्वे- संप्रेषणाची या शास्त्रातील महत्त्व
  • माहितीशास्त्र- आंतरविद्याशाखीय स्वरूप.
  • माहितीचे स्रोत व वाचकांच्या गरजांचा अभ्यास
  • संगणकशास्त्र- संगणकाची व इंटरनेटची ओळख, मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा वापर.
  • ग्रंथालयाचे विविध विभाग व त्यांचे व्यवस्थापन या खेरीज प्रथम सत्रात इंग्रजी संवाद कौशल्ये विकसित करण्यावर विशेष भर दिला जातो.

सत्र दुसरे

  • ज्ञान साधनांचे वर्गीकरण व तालिकीकरण

(तात्विक व प्रात्यक्षिक)

  • संदर्भ सेवा- विविध संदर्भ साधने व त्यांचा प्रत्यक्ष वापर
  • माहिती केंद्रे व संस्था
  • माहिती / ज्ञानाचे व्यवस्थापन व धोरण
  • ग्रंथालयांचे संगणकीय जाळे (ङळलीरीू पशीुींज्ञी)

सत्र तिसरे

  • संशोधन- प्रकार व पद्धती
  • ग्रंथालय व माहितीशास्त्रातील आधुनिक संशोधन तंत्रे
  • ग्रंथालयाचे संगणकीकरण
  • इंटरनेटवरून माहिती शोधण्याची आधुनिक तंत्रे व कौशल्ये
  • डिजिटल ग्रंथालये, कंटेंट मॅनेजमेंट, वेब पेज डिझाइनिंग इ.

सत्र चौथे

  • माहितीचे परिप्रेषण, इंडेक्‍सिंग, अब्स्ट्रक्‍टिंग, शब्दकुलकोश
  • आधुनिक ग्रंथालये / माहिती केंद्राचे व्यवस्थापन व्यवस्थापनाची मूलतत्वे, प्लानिंग, बजेटिंग, मार्केटिंग, मनुष्यबळ विकास इ.
  • व्यवस्थापनाची आधुनिक तंत्रे-
  • मॅनेजमेंट ऑफ चेंज, टीक्‍यूएम, सिक्‍स सिग्मा इ.
  • पूर्व अभ्यासित ज्ञानाचा यथोचित वापर करून प्रकल्प / शोधनिबंध.
  • या व्यतिरिक्त विविध माहिती प्रणाली, मल्टी मीडिया विकसन, ग्रंथालय व माहितीशास्त्रासाठी प्रशिक्षित शिक्षक विकसन यापैकी एक वैकल्पिक विषय.

हेही पाहा

बाह्य दुवे