"व्हर्गीज कुरियन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छो विकिकरण / इतर भाषा दुवे
ओळ १: ओळ १:
{{विकिकरण}}

भारतीय दुग्ध क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे वर्गिज कुरियन यांचा जन्म [[केरळ]] राज्यातील कोझीकोड गावातील सिरियन ख्रिस्ती कुटुंबात [[२६ नोव्हेंबर]], [[इ.स. १९२१|१९२१]] रोजी झाला. त्यांचे काका जॉन मथाई भारताचे पहिले रेल्वे मंत्री होते तर १९४९-५१ या काळात ते भारताचे वित्त मंत्री देखील होते.
भारतीय दुग्ध क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे वर्गिज कुरियन यांचा जन्म [[केरळ]] राज्यातील कोझीकोड गावातील सिरियन ख्रिस्ती कुटुंबात [[२६ नोव्हेंबर]], [[इ.स. १९२१|१९२१]] रोजी झाला. त्यांचे काका जॉन मथाई भारताचे पहिले रेल्वे मंत्री होते तर १९४९-५१ या काळात ते भारताचे वित्त मंत्री देखील होते.


ओळ १८: ओळ २०:
[[वर्ग:पद्मविभूषण पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:पद्मविभूषण पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:मॅगसॅसे पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:मॅगसॅसे पुरस्कारविजेते]]

[[en:Verghese Kurien]]
[[fr:Verghese Kurien]]
[[hi:वर्गीज कुरियन]]
[[ml:വർഗ്ഗീസ് കുര്യൻ]]
[[ta:வர்கீஸ் குரியன்]]

१७:०३, २८ एप्रिल २०११ ची आवृत्ती

भारतीय दुग्ध क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे वर्गिज कुरियन यांचा जन्म केरळ राज्यातील कोझीकोड गावातील सिरियन ख्रिस्ती कुटुंबात २६ नोव्हेंबर, १९२१ रोजी झाला. त्यांचे काका जॉन मथाई भारताचे पहिले रेल्वे मंत्री होते तर १९४९-५१ या काळात ते भारताचे वित्त मंत्री देखील होते.


वर्गिज कुरियन १९४० साली मद्रास येथील लोयोला कॉलेज येथून पदवीधर झाले. त्यानंतर त्यांनी मद्रास विश्वविद्यालयातून बी. ई. मेकॅनीकल ची पदवी संपादन केली. त्यापुढे वर्गिज कुरियन यांनी टाटा स्टील टेक्नीकल इंस्टीट्युट, जमशेडपूर येथूनही पदवी प्राप्त केली. उच्च शिक्षणासाठी वर्गिज कुरियन सरकारी शिष्यवृत्ती मिळवून अमेरिकेतील मिशिगन विश्वविद्यापीठ येथे दाखल झाले. तेथे ते विशेष गुणवत्ता श्रेणीत उत्तीर्ण होत एम. ई. मेकॅनीकल झाले.


भारतात परतल्यावर कुरियन यांची नेमणूक सरकारी डेअरी मध्ये आणंद, गुजरात येथे झाली. त्या सुमारासच खेडा डिस्ट्रीक्ट को-ऑपरेटीव्ह मिल्क प्रोड्युसर्स युनियन लि. (KDCMPUL) ही संस्था बाल्यावस्थेत होती आणि तेव्हाच्या बाजारपेठेत मक्तेदारी असलेल्या पोलसन कंपनी विरुद्ध आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करीत होती. त्यावेळी पोलसनने स्थानिक दूध विक्रेत्यांना कमी भाव देणे, मालाचा दर्जा कमी असल्याबाबत कायम तक्रार करणे, जमा केलेले दूध मुंबई सारख्या दूरच्या ठिकाणी विकणे, स्थानिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष्य करणे, असे प्रकार करीत बाजारपेठेत आपला वेगळा ठसा उमटविल्याने स्थानिकांची नाराजी, रोष पोलसनला जड जात होता. या कंपनी विरुद्ध चांगले काम करणे, स्थानिकांच्या रोजगाराच्या समस्या, योग्य भाव आणि बाजारपेठ अशा समस्या घेऊन KDCMPUL ही नवी संस्था उभी राहण्याचा प्रयत्न करीत होती. KDCMPUL चे तेव्हाचे अध्यक्ष त्रीभूवनदास पटेल, वल्लभभाई पटेल आणि मोरारजी देसाई यांनी नव्या जोमाने काम सुरू करण्याचे ठरविले.


वर्गिज कुरियन यांनी आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन KDCMPUL मध्ये काम करण्याचे ठरविले. गुजरात को-ऑपरेटीव्ह मिल्क मार्केटींग फेडरेशन लि. (GCMMF) या पालक संस्थेने दि. १४ डिसेंबर १९४६ रोजी KDCMPUL चे नाव बदलून आणंद मिल्क युनियन लि. (AMUL) असे नाव ठेवले. नव्या जोषात नव्या संस्थेचे काम सुरू झाले. त्यांनी स्थानिकांना रास्त भाव देत, गावोगावी फिरून लोकांना संस्थेत भागीदारी देऊ केली. त्यामुळे लोकांना दुधाच्या दर्जाप्रमाणे भाव तर मिळू लागलाच पण संस्थेच्या कामात प्रत्यक्ष सहभागी होता आले. आता सर्वसामान्य विशेषतः महिला वर्ग आपली डेअरी म्हणून अमूलकडे पाहू लागले. लोक सहभागातून संस्थेचे व्यवस्थापन (Participatory Management) ही गोष्ट तेव्हा पूर्णपणे नवी होती. वर्गिज कुरियन यांनी गावोगावच्या लोकांना गोळा करत अमूलचे काम उभे केले. देशात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले. तसेच आपणही कोणपेक्षा कमी नाही असा आत्मविश्वास लोकांमध्ये वाढू लागला.

तेव्हाची सगळ्यात मोठी कंपनी होती नेस्ले. ही कंपनी युरोपातील असल्याने ती गाईच्या दुधापासून तयार करण्यात आलेल्या वस्तु (कंडेंस्ड मिल्क, दूध पावडर) विकत असे. भारतात म्हशीचे प्रमाण जास्त असल्याने येथे त्या दुधाच्या वस्तु तयार करणे जास्त योग्य होते. त्यात तांत्रिक अडचणी होत्या आणि म्हशीच्या दुधापासून पावडर तयार करणे तेव्हा अशक्य वाटत होते. पण कुरियन यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. त्यांनी म्हशीच्या दुधापासून पावडर तर तयार केलीच शिवाय त्यापासून अनेक वस्तु तयार करण्यात अमूलला यश आले. अमूलने हळूहळू बाजारपेठेत आपले स्थान पक्के केले. येथील लोकांच्या आवडी निवडी विचारात घेऊन दूध आणि त्यापासून तयार करण्यात आलेल्या वस्तु विक्रीसाठी उपलब्ध झाल्या. आज घडीला अमूल भारतासह ऑस्ट्रेलिया, चिन, सिंगापूर, हाँगकाँग, अमेरिका, बांगलादेश, मॉरिशियस, आखाती देश आणि आफ्रीकेतील काही देशांमध्ये पोहोचले आहे. या यशाचे श्रेय वर्गिज कुरियन यांना जाते.