"शिपाई बुलबुल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: {{पक्षीचौकट| |चित्र = 150px |मराठी नाव = {{लेखनाव}} |हिं...
 
छोNo edit summary
ओळ ३३: ओळ ३३:


{{विस्तार}}
{{विस्तार}}
{{वर्ग:पक्षी}}
[[वर्ग:पक्षी]]
{{DEFAULTSORT:बुलबुल, शिपाई}}
{{DEFAULTSORT:बुलबुल, शिपाई}}



०९:२६, २२ एप्रिल २०११ ची आवृत्ती

शिपाई बुलबुल
[[चित्र:|220px]]
शास्त्रीय नाव Pycnonotus jocosus
कुळ वल्गुवदाद्य (Pycnonotidae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश वल्गुवदाद्य (Pycnonotidae)
संस्कृत गोवत्सक
हिंदी कमेरा बुलबुल, पहाडी बुलबुल

वर्णन

शिपाई बुलबुल हा पक्षी साधारण २० सें. मी. (८ इं) आकाराचा आहे. पाठीकडून तपकिरी-बदामी रंगाचा, पोटाकडून पांढरा, डोके काळे त्यावर मोठा, टोकदार, काळा तुरा, डोळ्यांजवळ लाल कल्ले तसेच गालावर पांढरा पट्टा, लाल रंगाचे बुड. नर-मादी दिसायला सारखेच. हा पक्षी लाल बुडाचा बुलबुल सारखा वाटतो मात्र डोक्यावरील मोठा तुरा आणि डोळ्यांजवळ असलेले ठळक लाल आणि पांढरे भाग हा या दोन पक्ष्यांमधील फरक आहे.

वास्तव्य

राजस्थानच्या वाळवंटी भागाखेरीज संपूर्ण भारतभर तसेच बांगलादेश, म्यानमार या देशांमध्ये शिपाई बुलबुलचे वास्तव्य आहे तर ऑस्ट्रेलिया देशात १८८० साली आणि हवाई बेटांवर, मॉरिशियस आदी ठिकाणी शिपाई बुलबुल पक्षी मुद्दाम सोडण्यात आला.

प्रजाती

रंग आण इतर थोड्या फरकांनी याच्या किमान पाच उपजाती आहेत.

आढळस्थान

सर्व प्रकारच्या जंगलात विशेषतः जंगलांच्या बाह्य भागात तसेच बागा, उद्याने, शेतीचे प्रदेश या ठिकाणी शिपाई बुलबुल आढळतो.

प्रजनन काळ

फेब्रुवारी ते ऑगस्ट हा काळ या पक्ष्यांचा प्रजनन काळ असून यांचे घरटे द्रोणाच्या आकाराचे असते. सहसा घरटे एखाद्या झुडपात किंवा बांबूच्या रांजीत असते तसेच कडे-कपारीत किंवा एखाद्या ओसाड घराच्या छताला लागून असलेलेही दिसून येते. मादी एकावेळी २ ते ४ अंडी देते. पिलांचे संगोपन वगैरे सर्व कामे नर-मादी मिळून करतात.

चित्रदालन