"गूगल शोध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.5.4) (सांगकाम्याने बदलले: te:గూగుల్ శోధన
छो सांगकाम्याने वाढविले: simple:Google Search
ओळ ४०: ओळ ४०:
[[pt:Google Search]]
[[pt:Google Search]]
[[ru:Google]]
[[ru:Google]]
[[simple:Google Search]]
[[sv:Google (sökmotor)]]
[[sv:Google (sökmotor)]]
[[te:గూగుల్ శోధన]]
[[te:గూగుల్ శోధన]]

१५:००, १८ जानेवारी २०११ ची आवृत्ती

गूगल शोध (इंग्लिश : Google Search) हे आंतरजालावरील सर्वांत जास्त लोकप्रिय शोधयंत्र संकेतस्थळ आहे. गूगल कंपनीचे हे संकेतस्थळ रोज अनेक कोटी शोध प्रश्नांसाठी उत्तरे पुरवते.[१] इंटरनेट शोधयंत्रांच्या जागतिक वापरापैकी अंदाजे ६०% वापर एकट्या गूगल शोधयंत्राद्वारे होतो. लॅरी पेज आणि सर्गे ब्रिन ह्या संस्थापकांनी विकसवलेल्या सॉफ्टवेअरावर आधारित हे शोधयंत्र सन २००० नंतर अल्पावधीतच अधिकाधिक लोकप्रिय होत गेले. गूगलच्या ह्या सुरवातीच्या यशाचे बरेचसे श्रेय त्यांच्या 'पेजरँक' ह्या सॉफ्टवेअर तंत्राला व वापरायला सोप्या व जलद संकेतस्थळाला दिले जाते.

चित्र:Google marathi.png
गूगल संकेतस्थळाचे मराठीतले मुखपृष्ठ

गूगल शोधयंत्र साध्या शब्दशोधाव्यतिरिक्त इतर अनेक प्रकारांची माहिती शोधण्याची सोय पुरवते. यांत शब्दकोश , हवामान, बातम्या, समभागांच्या किमती इत्यादींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे काही साध्या आकडेमोडी (जसे गुणाकार/भागाकार), वेगवेगळ्या देशांच्या चलनी किमतींची गणिते (उदा. १ अमेरिकन डॉलर म्हणजे किती भारतीय रुपये, इत्यादी) गूगल शोधयंत्रावरून करता येतात.

पेजरँक हे तंत्र लॅरी पेज आणि सर्गे ब्रिन यांनी सन १९९७ मध्ये विकसित केले. एखाद्या वेबपानावरील माहिती कोणत्याही विशिष्ट शब्दाच्या दृष्टीने किती उपयुक्त आहे हे ठरवताना, ढोबळमानाने इतर किती व कोणती वेबपाने त्या वेबपानाचा संदर्भ (म्हणजे त्या वेबपानाचा दुवा) देतात, या माहितीचा पेजरँक प्रामुख्याने विचार करते. अश्या प्रकारे अनेक वेगवेगळ्या वेबपानांची उपयुक्तता ठरवून, त्या उपयुक्ततेनुसार त्यांची क्रमवारी लावली असता, एखाद्या वेबपानाचा जो क्रमांक निघेल, त्या क्रमांकाला त्या वेबपानाचे 'पेजरँक' म्हटले जाते. मग, कोणत्याही शोधासाठी माहिती देताना वरचे 'पेजरँक' असलेले वेबपान, हे खालचे पेजरँक असलेल्या वेबपानाच्या अगोदर दाखवले जाते. उदाहरणार्थ कल्पना करा, की दोन वेबपाने एखाद्या विशिष्ट 'अ' शब्दासंदर्भात माहिती पुरवतात. परंतु त्यातील एका वेबपानाचा इतर ५० संकेतस्थळे संदर्भ देतात, तर दुसऱ्या वेबपानाचा संदर्भ केवळ ५ संकेतस्थळे देतात. अश्या वेळेस, पहिल्या वेबपानाचा संदर्भ जास्त संकेतस्थळे देत असल्याने, त्या पानाचे 'पेजरॅँक' वरचे गणले जाईल. दुसरे उदाहरण म्हणजे, एखाद्या जास्त विश्वासार्ह संकेतस्थळाने (जसे विकिपीडिया किंवा एखाद्या वर्तमानपत्राचे संकेतस्थळ) कोणत्याही वेबपानाचा संदर्भ दिला, तर त्या वेबपानाचे पेजरँक वाढण्यास मदत होते.

पेजरँकचे स्वरूप ढोबळमानाने सर्वसाधारणपणे प्रसिद्ध असले तरी, त्याच्या महत्त्वाच्या बारकाव्यांची माहिती व खरे सॉफ्टवेअर ही गूगल कंपनीची बौद्धिक मालमत्ता आहे. ही माहिती अथवा सॉफ्टवेअर सार्वजनिकपणे माहीत झाले तर, त्या माहितीचा वापर करून लोक आपल्या स्वतःच्या संकेतस्थळांचे पेजरँक कृत्रिमपणे वाढवतील व त्यामुळे खरी उपयुक्त वेबपाने शोधणे, हे शोधयंत्राचे उद्दिष्ट धोक्यात येईल. त्यामुळे ही माहिती गुप्त असून आणि काळजीपूर्वक सुरक्षित ठेवली जाते.

संकेतस्थळ स्वरूप व कार्यपद्धती

इंग्लिश भाषेव्यतिरिक्त, गूगल शोध संकेतस्थळ अनेक देशांच्या आवृत्त्यांमध्ये व अनेक भाषांमध्ये वापरता येते. इतर देशांतल्या/भाषांमधील ही संकेतस्थळे, त्या ठिकाणासाठी महत्त्व असलेल्या गोष्टींबरहुकूम बनवली जातात. उदा. भारतामध्ये गूगलची http://www.google.co.in/ ही वेबसाईट आहे, जी सर्व मुख्य भारतीय भाषांमध्ये बघता येते. इंग्लिश भाषेतील http://www.google.com/ ही गूगलचे मुख्य संकेतस्थळ जगातील सर्वांत जास्त वापरले जाणारे संकेतस्थळ आहे. गूगल शोधाचे वेबपान त्याच्या साधेपणासाठी प्रसिद्ध आहे. या वेबपानावर सर्वसाधारणपणे फक्त शोध प्रश्न लिहिण्यासाठी एक मोकळी जागा (टेक्स्टबॉक्स) आणि (मराठी संकेतस्थळावर) 'गूगल शोध' व 'आलिया भोगासी' (इंग्लिश भाषेमध्ये "Google Search" व "I'm Feeling Lucky") अशी दोन बटणे असतात. ज्या विषयासंबंधात माहिती शोधायची आहे, ती शोधप्रश्नाच्या जागेत टाईप करून 'गूगल शोध' बटण दाबले असता, संबंधित सर्व वेबपेपानांची यादी , पेजरँकांच्या क्रमवारीनुसार दाखवली जाते. 'आलिया भोगाली' बटण दाबले, तर, या यादीतील पहिले वेबपान उघडले जाते.

संदर्भ

  1. ^ http://searchenginewatch.com/showPage.html?page=3630718. Missing or empty |title= (सहाय्य)