"विकिपीडिया:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४७०: ओळ ४७०:
==विकिपीडिया:कौल==
==विकिपीडिया:कौल==
Previously there was a Small Wiki Monitoring Team and further Meta introduced Global Sysop system, Since we at Marathi Wikipedia and Marathi Wiktionary has got sufficieant routin patrol from Marathi Wikipedians and also we have sufficient numbers of local sysops available.Earlier I did discuss this issue with User Abhay Natu to opt out of unnecessary involvement of Global Sysops , besides if any mistake happens from them , since they do not know local Marathi Wikipedia languge and localy agreed conventions, it is difficult to contact and prove certain aspects and would be time consuming for avarage marathi wikipedian who does not know what is meta and how it functions.Following is the discussion at meta and it seems we will need support vote [[विकिपीडिया:कौल#Opting out of SWMT and Global Sysop Interferance|at विकिपीडिया:कौल]] page to opt out.[[सदस्य:Mahitgar|माहितगार]] ०६:३४, ३० जून २०१० (UTC)
Previously there was a Small Wiki Monitoring Team and further Meta introduced Global Sysop system, Since we at Marathi Wikipedia and Marathi Wiktionary has got sufficieant routin patrol from Marathi Wikipedians and also we have sufficient numbers of local sysops available.Earlier I did discuss this issue with User Abhay Natu to opt out of unnecessary involvement of Global Sysops , besides if any mistake happens from them , since they do not know local Marathi Wikipedia languge and localy agreed conventions, it is difficult to contact and prove certain aspects and would be time consuming for avarage marathi wikipedian who does not know what is meta and how it functions.Following is the discussion at meta and it seems we will need support vote [[विकिपीडिया:कौल#Opting out of SWMT and Global Sysop Interferance|at विकिपीडिया:कौल]] page to opt out.[[सदस्य:Mahitgar|माहितगार]] ०६:३४, ३० जून २०१० (UTC)

<!--विकिपीडिया चावडीवर स्वागत आहे, आपली मते शंका मनमोकळेपणाने मांडा लिहिल्या नंतर आपले मत या संपादन खिडकी खालील जतन करा येथे टिचकी मारून सेव्ह करण्याचे विसरू नका-->
*मला थोडी माहिती हवी आहे.
छायाचित्रे चढवताना ती विकीकॉमन्स वर चढवण्याचे काय फायदे होतात?
त्यासाठी इंग्रजी विकीवर सदस्यत्व असणे आवश्यक आहे का? की मला मराठी खात्यातूनच हे काम करता येईल?
माझे मराठीवरचे खाते मी हिंदी किंवा इंग्रजी विकीवर वापरु शकतो का? अशी खाती जोडता येतात का?
<!--हा सहाय्य मजकुर टिक आहे का ? काही बदल अथवा अधीक सहाय्य हवे असल्यास जरूर नमूद करा -->
<!--खालील महिरपी कंसातील तंरंग चिन्हे(~~~~) वगळू नयेत त्या तरंगचिन्हाने आपोआप आपले सदस्य नाव उमटते आणि सहाय्य उपलब्ध करणे सोपे जाते. या खिडकीच्या खाली जतन करणे लिहिले आहे तेथे आवर्जून टिचकी मारून आपले हे लेखन येथे सेव्ह करावे. शंका मांडल्या बद्दल धन्यवाद -->:धन्यवाद!
:माझे सदस्य नाव/टोपण नाव:
:{{{1|[[सदस्य:सौरभदा|सौरभदा]] १२:३६, ३० जून २०१० (UTC)<noinclude><nowiki>~~</nowiki></noinclude>}}}

१८:०६, ३० जून २०१० ची आवृत्ती

(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा

साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा

दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)

प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा


तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा

ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा

प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा


सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा








गप्पा

कामे पडली अनंत, वेळ मात्र मर्यादित । म्हणुनी व्यर्थ गप्पात, कालक्षेप करु नये ॥

वि. नरसीकर (चर्चा) ०६:५८, १९ मार्च २०१० (UTC)


चावडीवर हलवाहलव केल्यानंतर कुठे काय नेऊन ठेवलंय याची स्पष्ट सूचना दर्शनी भागात लावावी. नाहीतर नवीन संपादकांचा गोंधळ उडण्याची आणि ही मुद्दाम ढवळाढवळ केल्याची त्यांची भावना होण्याची शक्यता असते. विकीपीडिया हा सार्वजनिक मंच आहे, खासगी दिवाणखाना नव्हे, हे नम्रपणे सुचवावेसे वाटते. - मनोज २०:३४, २४ मार्च २०१० (UTC)

नवीन सदस्यांनी कळले नाही तर इकडेतिकडे बघून, थोडेसे संशोधन करुन मग येथील चालीरीतींना नावे ठेवावी. आत्तापर्यंत कोणत्याही नवीन सदस्याचा चावडीवरील (दर्शनी भागातच ठेवलेल्या आणि मराठीतच लिहिलेल्या) चौकटी वाचून गोंधळ झालेला नाही. विकिपीडिया कोणाची खाजगी मालमत्ता नाही हे लक्षात ठेवावे. आपल्याला न कळलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला समजावून देण्यासाठी कोणी बसलेले नाही. प्रश्न विचारल्यास उत्तरे मिळतील. अर्थात हे सगळे नम्रपणेच.
अभय नातू ००:३६, २५ मार्च २०१० (UTC)
मनोजराव,
जर गोंधळ उडत असेल तर जरूर प्रश्न विचारा, पण भाषा थोडी सौम्य ठेवण्यास हरकत नसावी. वाचल्या वाचल्या लोकांच्या डोक्यात तिरीप जाईल असे लिहीले तर लोकांचा वेळ वाया जाऊन विकिपीडियाचाच तोटा होणार आहे हे लक्षात असुद्या. - कोल्हापुरी ०३:५८, २५ मार्च २०१० (UTC)


१) खासगी दिवाणखान्यात आपण स्वतःला हवी तशी हलवाहलव केली तरी चालते, पण कुठल्याही सार्वजनिक व्यवस्थेत जर असे करायचे तर त्याबाबतच्या सूचना संबंधितांपर्यंत तरी पोहोचतील अशा पद्धतीने लिहायला नकोत? माझ्या पहिल्या पोस्टमधून हाच अर्थ निघत नाही का? विकीपीडियावरही सर्व बदल, संपादने करताना त्या बदलाचे स्वरूप आणि कारणे लिहीण्यासाठी व्यवस्था आहे, ती मूळ कर्त्यांनी कशासाठी केली असावी? कोल्हापुरी म्हणतात तसे डोक्यात तिरीप जाणारे त्यात काय आहे? ते खरोखरच तिरीप जाणारे आहे असे वाटत असेल तर अधिक सौम्य असे कसे लिहायचे याचे सोदाहरण मार्गदर्शन करावे असे, कोल्हापुरीजी, आपल्याला आणि आपल्या माध्यमातून इथल्या सर्व सदस्यांना आवाहन.

२) माझी भाषा स्पष्ट, थेट, संयमित आणि सार्वजनिक मंचाला सुयोग्य अशीच आहे. ती तशी नाही किंवा विकिपीडियावर अशी भाषा चालत नाही, अशी माहिती असणारांनी कृपया माझ्या चर्चापानावर येऊन मार्गदर्शन करावे. योग्य पद्धतीने पटवून दिलेले बदल करण्यासाठी मी - न रागावता, डोक्यात तिरीप न घालून घेता - नेहमीच तयार असतो.

३) मला स्वतःलाच चावडीवरच्या आधीच्या पोस्ट शोधायला सुमारे दहा ते तेरा मिनीटे लागली (प्रत्येकाचीच कुशाग्र आणि तैलबुद्धी नसते मंडळी). त्यानंतरच वरील पोस्ट मी लिहीली. आत्तापर्यंत कोणत्याही नवीन सदस्याचा चावडीवरील (दर्शनी भागातच ठेवलेल्या आणि मराठीतच लिहिलेल्या) चौकटी वाचून गोंधळ झालेला नाही. - हे वाक्य आपले श्रीमान प्रबंधक कोणत्या आधारावर लिहितात? आजपर्यंत कुणी लिहिले नाही, याचा अर्थ असे झालेलेच नाही असा घेतला जात आहे की काय? कुणी लिहीले नसेल तर लोक अशा गोष्टी मोकळेपणी का लिहीत नसावेत?

४) महाजालावरच्या बीटा टेस्टींगमध्ये किंवा वाहनांच्या प्रोटोटाईप टेस्ट करताना वापर करणारांच्या हातात देऊन त्यांची मते का घेतली जातात? कारण त्यामुळे त्या यंत्रणा वापर करणारांना किती सोयीच्या आहेत हे तपासता येते. अधिकारी आणि डिझायनरांच्या नजरेतून सुटलेल्या गोष्टी आणि अडचणी ही नवी मंडळीच सांगू शकतात. त्याने सिस्टीम व्यवस्थित बनवता येते, त्रुटी दूर करता येतात, वाढ न होण्याची कारणे आणि वाढ होण्यासाठीचे उपाय सापडू शकतात, हे जगभरात मान्य प्रबंधनाचे तत्व आहे. इथेही नव्यांचा उपयोग अशा पद्धतीने करता येणे शक्य आहे. पण तसे होत आहे, मराठी विकिपीडियावरचे प्रबंधक हे करीतच आहेत, अशी सर्वांची खात्री आहे का? का विधायक सूचनांनाही नावे ठेवणे म्हटले जाते, चालिरीती अशाच आहेत ( अपरिवर्तनीय आहेत ) हे सूचित केले जाते? इंग्रजीसह एकूण विकिपीडियाची वाढ झाली आहे त्यामागे परिवर्तनशील लवचिक तंत्र, वापर करणारांचा मुक्त सहभाग, आणि मुद्द्यांवरची निकोप चर्चा(फक्त भाषेबाबतचीच नव्हे) हीच कारणे आहेत असे माझे मत आहे. अशा तत्वांकडे आकर्षुनच मी इथे आलो आहे. आणि वरीलप्रमाणे विधायक सूचना मी यापुढेही करीत राहणार आहे, वैयक्तिक रागालोभांची पर्वा न करता. - मनोज ०६:२४, २५ मार्च २०१० (UTC)

हे वाक्य आपले श्रीमान प्रबंधक कोणत्या आधारावर लिहितात? आजपर्यंत कुणी लिहिले नाही, याचा अर्थ असे झालेलेच नाही असा घेतला जात आहे की काय?
रा.रा. मनोजराव,
हे वाक्य गेल्या ४-५ वर्षांच्या अनुभवावरुन लिहिले. जोपर्यंत लिहिले जात नाही तोपर्यंत काही होते कि नाही हे कसे कळणार, आँ? सगळेच काही मनकवडे नसतात बुवा.
मला स्वतःलाच चावडीवरच्या आधीच्या पोस्ट शोधायला सुमारे दहा ते तेरा मिनीटे लागली (प्रत्येकाचीच कुशाग्र आणि तैलबुद्धी नसते मंडळी).
आता काय बोलणार? उद्या कोणी येउन म्हणले की मला टंकलेखन करायला शिकवा, माझी तैलबुद्धी नाही तर मग? वाचकांच्या बुद्धीचा लसावि बघुन मगच एखादी प्रणाली तयार करावी हे बरोबर, पण प्रत्येक प्रणालीला आपल्या वापर करणार्‍यांत काहीतरी लघुत्तम बुद्धिमत्ता गृहित धरलीच पाहिजे नाहीतर मग अवघड आहे हे सुद्धा हे जगभरात मान्य प्रबंधनाचे तत्व आहे.
तुमचा नव्यांचा उपयोग अशा पद्धतीने करता येणे शक्य आहे या सूचनेचेच स्वागतच आहे पण नवीन मंडळींनी स्वतः situate होईपर्यंत थोडा धीर धरणे आवश्यक आहे नाहीतर फुकट वादावादी होण्याची शक्यता असते, जी आपल्या अनुभवावरुनच सिद्ध झाले.
पण तसे होत आहे, मराठी विकिपीडियावरचे प्रबंधक हे करीतच आहेत, अशी सर्वांची खात्री आहे का
येथे अनेक प्रबंधक आहेत (कोल्हापुरीसुद्धा प्रबंधक आहेत). माझ्या माहिती व अनुभवानुसार जवळजवळ सगळ्यांच नवोदितांच्या सूचनांचे आम्ही (प्रबंधकच नव्हे तर इतर सदस्य सुद्धा) स्वागतच करीत असतो. तुम्ही अपवाद असल्याचे तुम्हाला वाटत असले तर थोडेसे (अगदी किंचित) आत्मपरीक्षण करावे.
का विधायक सूचनांनाही नावे ठेवणे म्हटले जाते, चालिरीती अशाच आहेत ( अपरिवर्तनीय आहेत ) हे सूचित केले जाते?
कोल्हापुरींनी म्हणल्याप्रमाणे सूचना करताना भाषा सौम्य ठेवावी. तुमच्या सूचनेत दिवाणखाना वगैरे भाषा नसती तर अगदी बरे झाले असते. चालीरीती का आहेत हे विचारलेत? की सरळ त्यावर हल्लाच चढवलात? असलेल्या परंपरांना तुम्ही स्वतः विकल्प सुचवा, prototype करुन दाखवा आणि मग आपण तोसुद्धा चालवून बघू या. आहे हे असेच राहणार असे असते तर आत्तापर्यंत मराठी विकिपीडिया कधीच बाराच्या भावात गेला असता.
वरीलप्रमाणे विधायक सूचना मी यापुढेही करीत राहणार आहे
दिवाणखान्यात न शिरता सूचना केल्या तर त्यांचे स्वागतच आहे.
माझी भाषा स्पष्ट, थेट, संयमित आणि सार्वजनिक मंचाला सुयोग्य अशीच आहे....वरीलप्रमाणे विधायक सूचना मी यापुढेही करीत राहणार आहे
!!! ठीक.
अभय नातू ०६:५५, २५ मार्च २०१० (UTC)

वाचकांच्या बुद्धीचा लसावि बघुन मगच एखादी प्रणाली तयार करावी हे बरोबर,ठीक. -मनोज ०७:४४, २५ मार्च २०१० (UTC)

मुखपृष्ठ सदर लेख कौल आठवण

नमस्कार,

गेले ३-४ महिने मुखपृष्ठ सदर बदलले गेलेले नाही. कौलपानावर तुमचे मत जरुर नोंदवा. सध्या कारगिल युद्ध या लेखाला तीन सदस्यांनी पाठिंबा दिलेला आहे. हा लेख सदर करण्याआधी त्यात शुद्धलेखन, व्याकरण, सत्यतापडताळणी/fact-check, इ.च्या संदर्भाने योग्य ते बदल करावे लागतील. एप्रिल नाही तरी मे महिन्याचे (युद्धाला सुरुवात) किंवा जुलै महिन्याचे (विजयदिन) सदर करण्यासाठी मदत करावी.

अभय नातू ०१:२०, २५ मार्च २०१० (UTC)

निबंधाची पाने

हे इंग्रजी विकिपिडियावरचे पान पहा

Wikipedia:Ten things you may not know about Wikipedia

हा निबंध आहे असे त्यात वर म्हटले आहे. ही निबंधाची कल्पना मराठी विकिपीडियावर दिसली नाही. हे आणि अशी पाने यावीत असे वाटते मराठीच्या संवर्धनाबद्दलची आवाहने सारखे पानही निबंधाचे पान म्हणून ट्रीट करता येईल. काय म्हणता? -मनोज ०८:२३, २५ मार्च २०१० (UTC)

इंग्रजी विकिपीडियावरील निबंधसुद्धा विकिपीडियाच्या स्वतःबद्दल माहिती देण्या संदर्भापर्यंत मर्यादीत आहेत. विकिपीडिया:इतरांनाही सांगायचेय प्रकल्पात Wikipedia:Ten things you may not know about Wikipedia प्रमाणे काही मुद्दे घेतल्याचे आठवते पण नेमके पान शोधून निर्देशकरणे कार्य बाहूल्यामूळे जमेल असे दिसत नाही.
मूळ लेखन किंवा स्वतःच्या विचारांचे माहिती देणारे लेखन विकिपीडियास अभिप्रेत नाही कारण कोशांचा आधार विश्वासार्हता असावयास हवा म्हणजे आपण येथे लिहितो त्यास सहसा दुजोरा हवा.117.195.39.8 ०७:०२, २८ मार्च २०१० (UTC)
मराठीच्या संवर्धनाबद्दलची आवाहने हा विषय अनेक थोरा-मोठ्यांनी अनेकदा हाताळला असताना संदर्भांची वानवा भासण्याचे कारण नाही तो कोशिय स्वरूपात राहू शकतो.आपला स्वतःस निबंध किंवा व्यक्तिगत लेखना करिता असंख्य इतर मराठी संकेतस्थळे उपलब्ध आहेतच.117.195.39.8 ०७:०२, २८ मार्च २०१० (UTC) ~


Wikipedia:Ten things you may not know about Wikipedia येथील निबंध आपण आणत असाल तर ते स्वागतार्हच आहे.इंग्रजी विकिपीडियावरुन आणण्यालायक अजुनही बर्‍याच गोष्टी आहेत त्याचाही जरुर विचार करावा ही विनंती.आपल्या विकिपीडियावर महाराष्ट्रीय छायाचित्रांचीपण गरज आहे.त्यातही योगदान करता आले तर बघावे.

>मराठीच्या संवर्धनाबद्दलची आवाहने सारखे पानही निबंधाचे पान म्हणून ट्रीट करता येईल.<

मला वाटते हे प्रचालकाच्या कार्यक्षेत्रात येते. त्यांना वाटेल तर ते करतील.

वि. नरसीकर (चर्चा) ०८:५६, २५ मार्च २०१० (UTC)


विकिकरणात सहकार्य हवे

मराठी पारिभाषिक संज्ञा आणि संज्ञावली कोश हा चेतना प्रधान (विभागीय साहाय्यक संचालक, भाषा संचालनालय यांनी आपला हा निबंध "कोश वाङमय ज्ञानप्राप्तीचे प्रभावी साधन" या ऐक्यभारती संशोधन संस्था आणि पुणे विद्यापीठ पुणे यांच्या संयूक्तपणे आयोजित कार्यशाळेत दिनांक १७ जानेवारी रविवार २०१० रोजी वाचला गेला.सभेतच हा निबंध प्रताधिकार मुक्त स्वरूपात आंतरजालावर प्रसिद्धीस उपलब्ध करावा अशी विनंती केली होती ती त्यांनी मान्य केली.मराठी टंलकलेखीत मुद्रणाची आवृत्ती विजय पाध्ये यांनी utf8 यूनिकोडीत केली आंतरजालीय व इतरत्र मुक्त प्रकाशनास मान्यता पुन्हा एकदा नक्की केल्याचे कळवले. लेखाच्या प्राथमिक विकिकरणास श्री विजय नरसिकरयांनी हात भार लावला.

हा लेख मराठी विकिपीडीयावर विकिपीडिया:धूळपाटी२४ येथे उपलब्ध आहे.हा दुवे सांधणीनंतर मराठी विकिबूक्स(सध्या आपण मूळलेखन स्रोत विकिबुक्सवर ठेवत आहोत) आणि इतर मराठी संकेतस्थळांवर जसाच्या तसा लावावा असा मानस आहे.

यातील मंडळाचे परिभाषा निर्मितीचे काम कसे चालते हि माहिती विश्वकोशिय असल्यामुळे संबधीत विकिपीडिया लेखात घेण्या जोगी आहे.
पारिभाषिक शब्द का केव्हा आणि कसे योजावेत याबद्दलची लेखिकेची भूमिका समतोल विचाराची आहे त्यामूळे त्यातील काही चांगले मुद्दे मराठी विकिपीडियाची निती म्हणून स्विकारण्या संदर्भाने साधबाधक चर्चेनंतर सहमती घ्यावी असेही वाटते.
मी कार्य बाहूल्यामुळे व्यस्त आहे हे खरे आहे , विकिपीडिया:धूळपाटी२४ येथे लेखातील लाल दुव्यात नवे लेख बनवून मिळतील व अधिक चांगले विकिकरणात सगळ्यंनी थोडा थोडा हातभार लावल्यास इतर मराठी संकेतस्थळांवर ह लेख प्रकाशित करणे सोपे जाईल.माहितगार १८:४७, ३० मार्च २०१० (UTC)

नविन्

मि नविन आहे मला च्रर्चा पान वाचता येत नाहि

  • माझे मत शंका सूचना सहाय्य विनंती:
  1. ...
  2. ...





धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
INTARFELL १३:००, २८ एप्रिल २०१० (UTC)~~

महाराष्ट्रच्या जिल्हा

There is a very good collection of articles related to the districts of Maharashtra in Marathi at DES website. The files in pdf can be converted using webdunia conversion tool to convert CDAC (DVB TT Surekh) to unicode. I think these are very good reference materials to elaborate articles about the districts of Maharashta. --Eukesh १३:३३, ५ मे २०१० (UTC)

  • माझे मत शंका सूचना सहाय्य विनंती:
  1. ...
  2. ...





धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:prakash kulkarni mi aaj navin sabhasad zalo aahe pratham sarvana maza namskar
{{{1|Prakash kulkarni ०५:५३, ७ मे २०१० (UTC)~~}

लेखात लेखन योगदान हवे

आपल्या सवडीने अभिव्यक्त होणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य या आणि संबधीत लेखात लेखन/संपादन/भाषांतर योगदान हवे आहे.माहितगार ०८:४५, २० मे २०१० (UTC)


माहितगार १२:४५, २१ डिसेंबर २००९ (UTC)

मराठीच्या संवर्धनाबद्दलची आवाहने

मराठी विकिपीडीयावरील मराठीच्या संवर्धनाबद्दलची आवाहने लेखात संदर्भ रहित आणि मराठी विकिपीडीयाच्या सदस्यांचे स्वतःचे व्यक्तीगत मतांचे प्रतिबिंब अपेक्षीत नसूनही ते टाळण्याचा मागील संपादनातून प्रयत्न झाल्याचे दिसत नाही.लेख अजूनही अविश्वकोशिय स्वरूपात आहे. हा लेख मी पूर्णपणे नव्याने लिहू इच्छितो. सद्य स्थितीतील बराच मजकुर वगळला जाण्याची शक्यता आहे. ज्यांना कुणाला सध्याचा मजकूर हवा असेल त्यांनी तो इतरत्र हवा असेल त्यानी तसे लौकरात लवकर करून घ्यावे ही नम्र विनंती.
माहितगार ०९:१२, २५ मे २०१० (UTC)

एर इंडिया की एअर इंडिया

एअर इंडियाच्या लोगोवर एअर इंडिया असाच उल्लेख असताना येथे "एर इंडिया" असा प्रयोग का? शब्द उच्चारताना देखील एअर असाच उच्चारला जातो, एर असा नव्हे.

लोगोवरील उल्लेख हिंदीमध्ये आहे. इंग्लिश/इतर भाषेतील शब्दांचे मराठीत रुपांतर करताना हिंदी व मराठीत वेगळेपण आहे.
air शब्दाचा उच्चार एअर न होता दीर्घ वापरून एर असा होतो. कानडी लिपीत असा दीर्घ ए (तसेच दीर्घ ओ) आहे. देवनागरीत नाही.
अभय नातू १९:३८, ३ जून २०१० (UTC)

तमिळ चित्रपट नावातील हलंत शब्द

मराठीत हलंत शब्द लिहू नये असा नियम आहे. इतर भाषेतील शब्दांना हा नियम लागू होतो का? तमिळ भाषेतील अनेक चित्रपटांची नावे हलंत असल्याचे दिसते. त्यांबद्दलच्या लेखांची शीर्षके तशीच ठेवावी कि शब्दांती पूर्ण व्यंजने करावी?

अभय नातू १९:४७, ३ जून २०१० (UTC)

होय काही हरकत नाही,निदान लेखाचा शोध घेतांना शिर्षक पूर्ण व्यंजनातच असलेले बरे,लेखात नंतर योग्य उल्लेख होईलच,खरतरं हलंत व्यंजनांचा उच्चारादरम्यान स्थानिकांकडून विशेष उल्लेख होतांना दिसत नाही असा माझा अनुभव आहे.इथे एक गोष्ट आवर्जुन उल्लेख कराविशी वाटते ती म्हणजे अगदी प्राचीन काळापासून लेखी व बोली तमिळ मध्ये भिन्नता जपण्यात आली आहे,तसे त्यांचे व्याकरणाचे नियमही आहेत.त्यामुळे लेखी तमिळचे बोली भाषेशी साधर्म्य असेलच असे नाही.तेव्हा सद्य परिस्थितीत शब्द जशेच्या तसे लिहून त्यांचा उच्चार लेखात नमूद करु.Pra.K. ०३:०२, ४ जून २०१० (UTC)


चर्चेकरिता संदर्भ

शुद्धलेखनाचे नियम#नियम १४ प्रमाणे :

  • 'क्वचित्, कदाचित्,अर्थात्,अकस्मात्,विद्वान्,' यांसारखे मराठीत रूढ झालेले तत्सम शब्द अ-कारान्त लिहावेत.
    • उदाहरणार्थ : 'क्वचित, कदाचित,अर्थात,अकस्मात,विद्वान,'
  • कोणत्याही अन्य भाषेतील शब्द लिहिण्याची गरज पडेल तेव्हा त्या भाषेतल्या उच्चाराप्रमाणे लेखन करावे.
    • उदाहरणार्थ : 'डिक्शनरी,ब्रिटिश,हाऊस.
  • इंग्रजी शब्द ,पदव्या किंवा त्यांचे संक्षेप यांच्या शेवटचे अक्षर आता व्यंजनान्त म्हणजे पाय मोडके लिहू नये.
    • उदाहरणार्थ :'एम.ए. , पीएच.डी., अमेरिकन,वॉशिंग्टन .

संदर्भ: शुद्धलेखनाचे नियम#नियम १.४

अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी कधीकधी पर-सवर्ण जोडून शब्द लिहिणे योग्य ठरते.

  • उदाहरणार्थ:
    • वेदांत=वेदांमध्ये, वेदान्त= तत्वज्ञान,
    • देहांत=शरीरांमध्ये, देहान्त= मृत्यू.
लिहिण्याच्या पद्धतीमुळे अर्थात महत्वपूर्ण (अर्थाचा अनर्थ होण्या इतपत) तरच शुद्धलेखनाचे नियम#नियम १.४ पर-सवर्णा सहीत लवचीकता दाखवताना आढळतो. अशीच लवचिकता तत्वतः हलंतांच्या बाबतीत स्विकारण्यास हरकत नाही पण परकीय भाषेवर संपूर्ण प्रभूत्व असलेल्या व्यक्तींची उपलब्धता आपणास होण्याची शक्यता कमी असल्यामुळे गोची होऊ शकते. जाणीवपूर्वक हलंत लिहिणार्‍या व्यक्तीस उच्चारणांचा काहीसा अंदाज असण्याची शक्यता आहे.
  • तेव्हा मराठी,इंग्रजी, हिंदी, भाषा; मराठीत रूढ झालेले तत्सम शब्द सोडून इतर भाषातील हलंत उच्चारणांचे माहितीपूर्वक झालेले लेखन स्विकारावे असे वाटते,पण लेखन करताना येणार्‍या त्रूटीमुळे चुकीने हलंत येणार नाही येणार नाही याची दक्षता घेण्याकरिता हलंताचा उपयोग माहितीपूर्वक असल्यास तसे संबंधीत लेखाच्या चर्चा पानावर आवर्जून नमुद करावे (शिवाय लेख मथळ्यात ऊजवीकडे दिसणारा विशेष साचा बनवून घेतल्यास आणि वापरल्यास बरे) .
  • Pra.K. म्हणतात त्या प्रमाणे (तामीळप्रमाणे) एखाद्या भाषेत हलंत केवळ लेखनात शिल्लक असेल आणि उच्चारणात नसेल तर हलंत लेखन मराठीत करू नये पण त्या भाषेत तो शब्द लिहिताना केवळ लिहिताना हलंत येतो असे लेखाच्या पहिल्या परिच्छेदात नमुद करावे. (शिवाय लेख मथळ्यात ऊजवीकडे दिसणारा विशेष साचा बनवून घेतल्यास आणि वापरल्यास बरे).
असे माझे मत आहे. इतरांनी आपली मते मांडावीत

माहितगार


  • खालील साचे कसे वाटतात , त्यातील चित्र व्यंजनान्त अक्षराचे बनवून घ्यावे.
हे परभाषिय लेखशिर्षक/त्यातील संबंधीत शब्द, मराठी विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेतानुसार तत् भाषिय शब्दोच्चारणांमुळे, जाणीवपूर्वक व्यंजनान्त लिहिले आहे .असे लेखन मराठी,हिंदी आणि इंग्रजी भाषेकरिता टाळावयाचे आहे हे लक्षात घ्या
हे परभाषिय लेखशिर्षक/त्यातील संबंधीत शब्द, मराठी विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेतानुसार तत् भाषिय शब्दोच्चारण हलंत नाही म्हणून , जाणीवपूर्वक व्यंजनान्त लिहिले नाही.परंतु त्याभाषेत प्रत्यक्ष लेखन व्यंजनान्त होते .मराठीत व्यंजनान्त लेखन टाळावयाचे शुद्धलेखनाचे नियम#नियम १४ अनुसार


विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेतातील विसंगती

  • व्यंजनान्त नावाद्यांचे लेखन
महामंडळाचे शुद्धलेखनाचे नियम#नियम १४ अनुसार संक्षेपांचे लेखन व्यंजनान्त म्हणजे पाय मोडके लिहू नये असे सुचविले आहे. विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत येथे रोमन नावाद्यांचे मराठी देवनागरी लिप्यंतराच्या उदाहरणातून व्यंजनान्त(हलंत) रूपांतरणे दाखविली आहेत. या दोन गोष्टी परस्पर विसंगत वाटतात.जाणकारांनी मार्गदर्शन करावे.माहितगार १२:०३, ६ जून २०१० (UTC)

विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत:रोमन नावाद्यांचे मराठी देवनागरी लिप्यंतरा.... उदा.: MSN या नावाचे लेखन "एम्‌.एस्‌.एन्‌." असे करण्याऐवजी "एम्‌एस्‌एन्‌" असे करावे; मात्र "H. G. Wells" याचे लेखन मधल्या पूर्णविरामचिन्हांसह "एच्‌. जी. वेल्स" असे करावे. (रोमन लिपीतून मराठी देवनागरीत लिप्यंतर कराताना पाळायचे संकेत हा विषय खरे तर स्वतंत्र लेखाकरिता पात्र आहे. इथे त्या लेखाचा दुवेजोड देऊन संक्षेपाने आशय लिहिणे अपेक्षित आहे.)

व्यंजनान्त लेखन

मराठी शुद्धलेखनाच्या नियमांनुसार न्‌ आणि अन्‌ हे दोन शब्द सोडले तर दुसरा कुठलाही शब्द व्यंजनान्त लिहू नये. त्यामुळे ’कुर्यात सदा मंगलम’ किंवा ’वंदे मातरम’ मराठीत लिहिताना अन्त्य अक्षारांचा पाय न मोडता लिहावे लागतात. इंग्रजी शब्ददेखील पाय न मोडताच लिहायचे. नाही तर टंकलेखनाचा सगळा वेळ पाय मोडण्यातच जाईल. कॅट/कॅन असेच लिहायचे कॅट्‌/कॅन्‌ असे नाही. तमिळ शब्दही याला अपवाद नसावेत. MSN हा एम्‌एस्‌एन असाच लिहिला पाहिजे. एम ए पीएच्‌डी, एल्‌एल बी यांतल्या मधल्या अक्षरांचे पाय मोडले आहेत, शेवटच्या नाहीत.-J १९:१५, १२ जून २०१० (UTC)

साचा:माहितीचौकट विमानतळ‎

साचा:माहितीचौकट विमानतळ‎ हा साचा तयार करुन देण्यास कोणी मदत करा ही विनंती.या पानावर अपेक्षित मसुदा ठेवला आहे. वि. नरसीकर (चर्चा) ०९:५३, ६ जून २०१० (UTC)

मी सल्ला देणे सोपे

कोशांचे लेखन करताना आणि खासकरून विकिपीडिया:लेखनभाषा संकेतांनुसार अंलंकृत भाषा आणि विशेषणे टाळणे अभिप्रेत असते.मी स्वतः या संकेतांचा ठाम पुरस्करता असुनसुद्धा प्रत्यक्षात विकिकरण करताना किंवा मार्गदर्शन करताना प्रत्यक्षात खूप अडचणी येतात विशेषणे टाळणे बरेच अवघड जाते. उदाहरणार्थ en:Quebec City लेखाचे मराठी भाषांतर क्वेबेक सिटी पाहिले, भाषांतरकार विकिपीडिया संपादकांकडून आपसूकपणे विशेषणांचा वापर झाला आहे जसे खरोखरीच, प्रसिध्द्,अतिसुन्दर, रमणीय, अगदी . पण टाळावयाचे म्हटले तरी कसे ? आणि टाळले तर भाषा कृत्रीम आणि कदाचित तोच तो पणा येणारी रटाळ होईल का असे वाटते.अलंकृत भाषा आणि विशेषणे हि मराठी भाषेची अगदीच न टाळता येणारी वैशिष्ट्ये आहेत काय ? आपण (म्हणजे मराठी विकिपीडियाने) विशेषणांचा वापर आणि अलंकृत भाषा स्विकार्ह ठरवावी काय ? तुम्हाला काय वाटते ते जाणून घेण्यास आवडेल .

माहितगार ०७:५६, ८ जून २०१० (UTC)

याबाबत सहसा एक संकेत पाळता येईल - बहुसंख्य लोकांना मान्य होतील, अशी गुणवाचक विशेषणे 'माफक प्रमाणात वापरायला हरकत नाही. उदा.: रमणीय, प्रेक्षणीय, प्रसिद्ध इत्यादी. तर-तमभाववाचक विशेषणे पुराव्याशिवाय वापरणे टाळावे. म्हणजे, प्रमाण पुरावांनुसार अमुक एखादे शहर/देश लोकसंख्या/घनता वगैरे पैलूमध्ये सर्वोच्च स्थानी असेल, तरच 'सर्वोत्तम/सर्वाधिक/सर्वोच्च/उच्चतम' वगैरे तर-तमभाववाचक शब्दयोजना करावी; अन्यथा मोघम गुणवाचक विशेषणे वापरावीत उदा.: 'चांगले/अधिक/उच्च'.
व्यक्तिपर लेखांमध्ये आलंकृत भाषा व गैरवाजवी विशेषणे कटाक्षाने टाळावीत. वर नोंदवलेले मुद्दे तेथेही वापरता येतील.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:४७, ८ जून २०१० (UTC)
संकल्पच्या मताशी सहमत. मला वाटते की सर्वोत्तम, अत्युच्च, महान, इ. विशेषणांचा (मुबलक) उपयोग केल्यानेच भाषेत कृत्रिमपणा येईल. मग जसे गल्लोगल्ली थोर, परमपूज्य, लोकहृदयसम्राट नेते जसे उत्पन्न झाले आहेत, तसेच वाटायला लागेल... :-) जनरल जॉर्ज आर्मस्ट्राँग कस्टर याला अत्युत्तम/महान सेनापती म्हणता येईल पण नेपोलियन बोनापार्ट, पहिले बाजीराव, प्रतापराव गुजर, इतकेच काय जुलियस सीझरसमोर त्याचा पराक्रम फिकाच पडतो. असे असले तरी अमेरिकेत कस्टरला महानच म्हणले जाते.
विशेषणे लिहिताना एक बाब लक्षात घेणे आवश्यक आहे की मराठी विकिपीडिया विश्वकोष आहे तरी लावलेली विशेषणे वैश्विकदृष्ट्या valid असावी.
शिवाय अशी विशेषणे वापरताना व्यक्तिगत दृष्टिकोन/bias नक्कीच येईल, जो विकिपीडिया/विश्वकोषात मुळीच उपयोगाचा नाही. पुण्यातील ५०% (तरी) लोकांना पर्वती अतिसुंदर रमणीय स्थळ वाटते. महाबळेश्वरच्या माणसाला तेथे फक्त झोपडपट्टी आणि घाण वास आढळतात. तरी अशी विशेषणे वापरताना ती वादातीत असतील तरच वापरावी - उदा. पर्वती ऐतिहासिकदृष्ट्या अतिमहत्वाचे स्थळ आहे. याला महाबळेश्वरच काय, कोलकात्याच्या माणूसही आक्षेप घेऊ शकत नाही.
अभय नातू १८:३६, ८ जून २०१० (UTC)
प्रतिसादांबद्दल धन्यवाद, मला वाटते ह्या चर्चेत इतरही सभासद भाग घेतील आणि त्यांचे मत /प्रतिक्रीया नोंदवून पुढेही हि चर्चा चालू राहील.माहितगार

सयूक्तिकता ?

आर्या आंबेकर लेखात सदस्य:Prabodh1987 यांनी खालील मजकुर मथळ्यात जोडला आहे.अशा पद्धतीने मजकुर जोडणे सर्व सामान्य संपादकांना विनाकारण भांबावणारे आणि अनावश्यक आहे असे वाटते. आपण विकिपीडीयात मजकुरावर ऍक्यूरसीची अपेक्षा बाळगतो, मागत नाही आणि १००% खात्री केवळ copyright content च्याबाबतीतच अपेक्षीत ठेवतो.सर्व संपादने मॉडरेट होतात पण मॉडरेट होण्याची आपण खात्री देत नाही.त्याशिवाय सर्वात महत्वाचे उत्तरदायक्त्वास नकार (डिसक्लेमर) आणि टर्म्स ऑफ यूज मध्ये हि माहिती येतेचच आहे.असा स्वरूपाचे मजकुर सर्व लेखांना सामायिक असतात.आणि विकिपीडीयाच्या बाबतीत काही संपादक सरळ विभाग संपादन करतात त्यांच्याही नजरेस हा मजकुर पडणार नाही .सामायिक सर्व दर्शनी सुचनांअध्ये काही कमतरता असल्यास त्या दूर कराव्यात पण लेखाच्या मजकुर विभागात अशी सूचना लावू नये असे मला वाटते. त्या शिवाय will be removed पेक्षा लाईक्ली टू बी रिमूव्हड असे हवे. माहितगार ०६:०१, १२ जून २०१० (UTC)
<!--

Dear Editors, please edit this page only if you are 100 % sure of the information you are adding. The edit will be scrutinized and approved by the moderators of wikipedia around the world. Spam, illegal, objectionable and / or copyright content will be removed. Putting such content may invite for a judicial action. Please note that your IP Addresses are recorded with every edit you make.

-->

conflict of interestकरिता [मराठी शब्द सुचवा]

-- साटेलोटे? अभय नातू ०७:४३, १२ जून २०१० (UTC)


हितसंघर्ष

साटेलोटे म्हणजे स्वतःची कन्या एका वराला देऊन त्याची बहीण सून करून घेणे. थोडक्यात देवाणघेवाण. संगनमत. Conflict of Interest चा अर्थ बरोब्बर विरुद्ध. म्हणून हितसंघर्ष.--J १८:५९, १२ जून २०१० (UTC)

इंग्लिश मजकुराविषयी धोरण

नमस्कार मंडळी!

सध्या बर्‍याचश्या लेखांमध्ये इंग्लिश मजकूर भविष्यकाळात अनुवादण्यासाठी ठेवलेला दिसत आहे. सध्याच्या परिस्थितीत मराठी विकिपीडियावर अनुवादण्याच्या कामासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने असे इंग्लिश परिच्छेद महिनोन्महिने त्या लेखात पडून राहण्याचा आणि त्यामुळे मराठी विकिपीडियाच्या वाचनीयता/दर्जा वाचकांच्या/ अभ्यागतांच्या मनातून घसरण्याचा धोका संभवतो. त्यामुळे तूर्तास लेखांमध्ये इंग्लिश मजकूर ठेवू नये, अशी विनंती करावीशी वाटते. इंग्लिश विकिपीडियावरील लेखाचा आंतरविकी दुवा देणे/ संदर्भाचे दुवे नोंदवणे, एवढी तजवीज करणे, हे सध्या श्रेयस्कर राहील.


--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ११:०८, १५ जून २०१० (UTC)

आता साचा:भाषांतर मध्ये २% पेक्षा अधिक लेख भाषांतराच्या प्रतीक्षेत राहू नयेत असे नमुद केले आहे. गणिती प्रक्रीयेने हि संख्या साचातच दाखवता आली तर बरे होईल या बाबतीत सहाय्य हवे आहे. साचात अजून सुधारणा करावयास हवी आहे.

माहितगार ०५:२६, १६ जून २०१० (UTC)

लेखात इंग्लिश मजकूरामुळे विकिपीडियाच्या वाचनीयता/दर्जा वाचकांच्या/ अभ्यागतांच्या मनातून घसरण्याच्या संकल्पच्या मताशी सहमत. त्याचवेळी इंग्लिश मजकूर असल्याने लेखाचा दर्जा वाढवणे सोपे जाते हे सुद्धा मान्य.
यासाठी मध्यममार्ग सुचवावासा वाटतो की इंग्लिश मजकूर शक्यतो असूच नये, जरी ठेवला तरी तो कॉमेंटमध्ये <!--असे करून-->घालून ठेवावा म्हणजे वाचकांना दिसणार नाही पण संपादकांना दिसेल.
अभय नातू ०५:४४, १६ जून २०१० (UTC)
माझी मतभिन्नता :
  • धोरणात प्रथमतः साचे आणि सहाय्य विषयक सहाय्य आणि विकिपीडिया नामविश्वांतील पानांबद्दल खूप अधिक लवचिकता ठेवण्याची आवश्यकता आहे. एखादे सहाय्य पान मराठी विकिपीडियात नसण्या पेक्षा इंग्रजी मजकुरात असेल तरी चालेल , कारण सहाय्यपाने शोधत तेवढ्याकरिता मराठी विकिपीडियातून मला बाहेर जावयास लागू नये.

मुख्य लेख नामविश्वात मर्यादीत प्रमाणात (२% लेखात) इंग्रजीतील मजकुर येऊ द्यावा. वर्ग:इंग्रजी-मराठी भाषांतर हवे आणि वर्ग:भाषांतर या दोन्ही वर्गीकरणात मिळून ४००च्या वर लेख नाहीत. मराठी विकिपीडिया लेखांची एकुण लेख संख्या ३०,००० च्या घरात असल्याचे लक्षात घेता वाचकांच्या हाती असे लेख लागण्याची शक्यता (probability) ५० लेखांच्या मागे १ पेक्षाही कमी येते.मराठी विकिपीडियाच्या दर्जाबद्दलचे मत वाचक केवळ याच लेखांवर वलंबून बनवणार नाहीत तर ते इतर ४९ लेखांवरही अवलंबून असेल. इतर ४९ लेख व्यवस्थित असतील तर वाचक हा एक लेख का नाही खपवून घेणार ? आणि इतर ४९ लेख व्यवस्थीत होण्यापूर्वीच तुम्हाला जाणवणारा हा प्रश्न संपलेला असेल कारण अशा स्थितीत आपल्या कडे पुरेसे संपादक लेखक आणि भाषांतरकार उपलब्ध असतील. (त्यामुळे खरा प्रश्न अधिक संपादक बळ मिळवण्याचा आहे आणि तो वेगळ्या स्तरावर निपटावा लागेल)

अर्थात अतिरेक टाळण्याच्या दृष्टीने हे प्रमाण ढोबळपणे २%च्या पुढे जाऊ नये या बाबत मी सहमत आहे.भाषांतर साचाचा प्रयोग व्हावा, सोबतच पहिला परिच्छेद आणि विभाग नावे मराठीत असावीत आणि लेखाच्या तळांशीच इंग्रजी-मराठी शब्दकोश असावा. एकदा का सुरवात झाली असेल तर नविन भाषांतरकारांना प्रोत्साहन मिळते.

भाषांतर आधी व्यक्तीगत संगणक किंवा इतरत्र करून मग इथे आणून चिटकवावे हा पर्याय अनेक कारणांमुळे प्रॅक्टीकल वाटत नाही.एकतर माझ्या सारखी काही भ्रमंती करणारी आणि इंटरनेट सेंटर वापरणारी मंडळीस प्रत्येकवेळी विशीष्ट संगणक उपलब्ध असेलच असे नाही शिवाय एखादा मोठा लेख भाषांतरअस घेतला त्यात काही दिवस गेले तो पर्यंत इतर व्यक्तींनी काही चांगली संपादने केली तर दोन्हीचे एकत्रीकरण एक नवाच प्रश्न समोर उभा करू शकते.

इंग्रजी मजकुर मराठी विकिपीडियात आणण्याचे मला जाणवणारे फायदे म्हणजे विश्वकोशीय लेखनाची संस्कृतीशी मराठी लोक फारसे परिचीत नाहीत., लेख मराठी विकिपीडीयात न आणता भाषांतरकरणारी मंडळी बहुतांश वेळा स्वैर भाषातंरे करण्याची शक्यता अधिक आहे आणि त्यात अविश्वकोशिय लेखन शैलीचा/शब्द लेखनाची शक्यता वाढते. अशी बहुतेक मंडळी लेख भाषांतरीत असल्याचे कुठेही नमुद करताना आढळत नाहीत.

लेख आधी मराठी विकिपीडियावर घेण्याने team work शक्य होऊ शकते. पर्यायी मराठी शब्द कोणते योजावेत या बद्दल चर्चा before hand आधी शक्य होऊ शकते. लग्न या लेखात एक नवे संपादक आले आणि अंशतः का होईना भाषांतर करून गेले. रोडरोलर लेखात एक संपादक आले आणि propulsion शब्दाकरिता प्रतिशब्द योजून गेले.असे आढळते

शिवाय आपण आयात केलेल्या लेखाचे भाषांतर झालेले नसेल तर संबधीत विषयाशी असलेल्या आत्मियतेमुळे मुळ संपादक कालांतराने परत फिरून स्वतःच भाषांतर करतो.(किमान मी तसे करतो त्यामुळेही कदाचित मला तसे वाटत असावे)

भाषांतरात आपण(मराठी विकिपीडियाने) अजून बॉट आणि विकएडीट आदी उपलब्ध तंत्रांचा व्यवस्थीत उपयोग केलेलेला नाही असा उपयोग करावयाचा झाल्यास आपण या विषयात पुरेशी लवचिकता दाखवावयास हवी.

महत्वाचा फायदा भविष्यातील कुणाही मशिन ट्रान्सलेशन तंत्रज्ञानावर संशोधन करून असे तंत्र आपल्याला उपलब्ध करून देणार्‍या व्यक्तींना येथील लेखांच्या इतिहासातून चांगल्या दर्जाची विदा सहज उपलब्ध होऊ शकेल आणि हे मराठी भाषेच्या भविष्याच्या दृष्टीने फायद्याचे असेल असे मला वाटते.

अर्थात या विषयावर अजून मुद्यांचे आणि चर्चेचे स्वागत आहे.

माहितगार ०७:३३, १६ जून २०१० (UTC)

मि करत असलेलि काहि महत्वाच्हि नोन्द

  • माझे मत शंका सूचना सहाय्य विनंती:
हि मराथि साइत खूपच्ह चान्गली आहे बर्याच्ह वर्शने मि मराथितुन् लिहित आहे बरेच्ह बरे आहे आणी सोपे पण आहे---अजय
  1. ...
  2. ...





धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:अप्पा
appa ०७:४६, १६ जून २०१० (UTC)~~

कार/मोटार/गाडीसाठी मराठी प्रतिशब्द

Car/Automobile या इंग्लिश शब्दासाठी कोणता मराठी शब्द योजावा?

कार, मोटार, मोटर, इ. उमेदवार आहेत. इतर काही?

कार इंजिन, कार कंपन्या, कार अपघात, इ. अनेक लेख आणि वर्ग या शब्दावर अवलंबून आहेत, तरी तुमचे मत जरूर द्या.

अभय नातू १६:५१, १८ जून २०१० (UTC)

कार ,मोटार हे शब्द बर्‍यापैकी मराठी झाल्याचे वाटते. ज्या अर्थी कार हा शब्द कार्ट या शब्दापासून झाला त्या अर्थी गाडी हा शब्दशः अर्थ बरोबर वाटतो; पण तो मराठी भाषकांनी केवळ कारसाठी न वापरता बर्‍याचदा दुचाकी आणि बस अशा सर्व स्वयंचलित वाहनांसाठीसुद्धा वापरला आहे त्यामुळे एकापेक्षा अधिक अर्थ होऊन पंचाईत होते. गाडी, दुचाकी(सायकल हीसुद्धा दुचाकीच, मोटर बाईकला स्वयंचलित दुचाकी म्हणता येईल पण त्याने स्कूटर/मोटरसायकल या दोघांतला भेद उलगडत नाही ) ,बोली भाषेत चारचाकी म्हणजे जास्तकरून कार याच अर्थाने वापरले जाते, पण शासकीय मराठीत चारचाकी हा शब्द शब्दशः चारचाके असलेली सारी वाहने.

कार साठी वापरावयाचाच झाला तर मोटारगाडी हा अधीक बरा वाटतो. 61.17.11.124 १३:०४, २० जून २०१० (UTC)


कार, मोटार

टुअरिंग कारसाठी वापरला जाणारा मोटार हा स्त्रीलिंगी शब्द पूर्णपणे मराठी झाला आहे. त्याचे अनेकवचन मोटारी आणि प्रत्ययापूर्वीचे सामान्यरूप मोटारी-. शिवाय मोटारगाडी, टमटम, घोडागाडी, बैलगाडी, छकडा, एक्का, बग्गी, व्हिक्टोरिया, ट्राम, लोकल, जलदगाडी, थेट गाडी, रेकला, हातगाडी, धकलगाडी, बस, आगगाडी, मालगाडी, मालवाहक गाडी, टेंपो, रिक्षा, सायकलरिक्षा, सहाआसनी, मेल(गाडी), टपालगाडी, कचरागाडी, फटफटी, सायकल. स्कू्टर(अनेकवचन स्कूटरी) वगैरे विविध शब्द आहेतच. सर्वच चारचाकींसाठी सरकारी शब्द ’चारचाकी वाहन’ असा आहे, नुसता चारचाकी नाही. त्यामुळे कुठलाही घोटाळा होण्याचे कारण नाही. स्वयंचलित वगैरे शब्दांची अजिबात गरज नाही. --J १३:३५, २८ जून २०१० (UTC)

विकिपीडिया धूळपाटी

विकिपीडिया:धूळपाटी येथील विकिपीडिया:धूळपाटी/fontpracticepreload सुविधा व्यवस्थितपणे वापरले गेल्याचे आढळत नाही.
  1. ही सुविधा सुरू ठेवावी ?
  2. ही सुविधा काढून टाकावी ?

कृपया आपले मत सांगा

-माहितगार ही सुविधा काढून टाकावी. काही नवीन सदस्यांकडून दुरुपयोग होतो आहे असे वाटते. वि. नरसीकर (चर्चा) ०६:२६, २३ जून २०१० (UTC)

थोडा बदल करून पाहिला आहे, पाहू काय होते ते, सुविधा पूर्ण बंद केली तर इतर लेखांच्या पानात trial and error चे प्रमाण आणि उत्पात वाढेल की काय? फायदा किती होतो आहे याची नक्की कल्पना नाही.

सुविधा मुख्य धूळपाटीवरून काढून एखाद्या धूळपाटी उपपानावर स्थानांतरित करून पाहू. कदाचित अधिक फायदा होईल.

माहितगार ०७:२७, २३ जून २०१० (UTC)

महत्त्वपूर्ण बदल

मराठी विकिपीडियाच्या वाचक, संपादक, भाषांतरकार इत्यादींना विकिपीडिया मूल्यांचा आणि संकेतांचा परिचय करून देण्याच्या दृष्टीने विकिपीडिया:साईट नोटीस मध्ये महत्त्वपूर्ण बदल प्रस्तावित आहेत. मुख्यत्वे ‘इतर माहिती’ साच्यांच्या अतिविशिष्ट मुद्यांवर आधारित अजून साचे आणि माहिती वाढवली जात आहे. या संदर्भात सदस्यांनी प्रतिसाद/प्रतिक्रिया/सूचना नोंदवाव्यात आणि प्रकल्पात वेळोवेळी प्रमाणलेखन (शुद्धलेखन) पाळले जाईल यासाठी हातभार लावावा ही नम्र विनंती.माहितगार ०७:११, २१ जून २०१० (UTC)

मला मदत हवी आहे!

मदतकर्त्यांना सुचना: आपण मदत केल्यावर हा संदेश काढून टाकावा

विकिपीडिया:साईट नोटीस वरील नवीन बदलांनंतर केवळ विकिपीडिया:चावडी आणि विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ येथे संपादनाकरिता पान उघडेपर्यंत एक त्रुटी संदेश दिसेल.

Template loop detected: साचा:अविशिष्ट उपपान असा संदेश दाखवत आहे असे मला आढळले. इतर कुणाला अशी त्रुटी इतर कोणत्या पानावर आढळली आहे का? ह्या त्रुटीमागची कारणमीमांसा शोधून ती दूर करण्यास तातडीचे साहाय्य हवे आहे. ही त्रुटी दूर करता नाही आली तर विस्तार योजना गुंडाळून ठेवावी लागेल माहितगार ०५:३८, २२ जून २०१० (UTC)

end value

check end value

साचा वापर असे दिसेल
{{अविशिष्ट उपपान|page=विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती|start=1|end=16|seed=1}}
( चर्चेतील शंका : वर्गीकरण कसे करावे? कसे शोधावे ? )
{{अविशिष्ट उपपान|page=विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती|start=1|end=12|seed=1}}
( चर्चेतील शंका : वर्गीकरण कसे करावे? कसे शोधावे ? )

Maihudon ०९:२२, २४ जून २०१० (UTC)

धन्यवाद, नंतरच्या नव्या चार साचात पुन्हा अविशिष्ट उपपान साचा वापरला असल्यामुळेही कदाचित असे होत असेल. cookies त्यातच अविशीष्टपणे दिसणारी पाने यामुळे प्रॉब्लेम समजण्यास वेळ लागतो.माहितगार ०६:५७, २६ जून २०१० (UTC)

मार्गक्रमण साचे महत्वाचे बदल

नरसीकर यांनी तयार केलेला साचा {{भारतातील विमानतळ}} मध्ये काही errors येत होते. थोडी माहिती घेतल्यास असे दिसले कि

ह्या साच्यात केलेले बदल (संदर्भ : इंग्लिश विकि) मराठी विकि वर झाले नव्हते. मी ते सध्या केले आहेत.

काहि formating errors आहेत, माझ्या मते Common.js मध्ये काहि बदल, update जरूरी आहेत.

जर मी केलेले बदल अपेक्षित नसतील तर उलटवावे लागतील.

Maihudon ०८:१८, २१ जून २०१० (UTC)

  • माझ्या मते Common.js मध्ये काहि बदल, update जरूरी आहेत.
सहमत मिडियाविकी चर्चा:Common.js सुद्धा पहावी माहितगार ०९:४६, २१ जून २०१० (UTC)
कोणते बदल अपेक्षित आहेत?
अभय नातू १६:४४, २१ जून २०१० (UTC)


{{भारतातील विमानतळ}} हा साचा पाहिल्यास असे दिसते की cell width मध्ये चुक आहे तसेच Background color येत नाही आहेत.
Maihudon १८:०४, २१ जून २०१० (UTC)
चर्चापानांकरिता प्रकल्प विषयक साचे आयात करणे सुद्धा बहूधा याच कारणामुळे आडले होते आणि आहे असे स्मरते. इंग्लिश विकिपीडीयावर Common.js सारखी इतर सुद्धा .js पाने अशाच काही उद्देशांकरिता आहेत असे जाणवले.पण नेमका काय बदल केला तर काय परिणाम होणार ते निश्चित माहित नसल्यामुळे या गोष्टीस मी हात लावला नाही.माहितगार ०५:४४, २२ जून २०१० (UTC)
Common.js मधील बदल आजमावून पाहण्यासाठी सदस्यनाव/common.js तयार करा व तेथे मिडियाविकि:Common.js मधील मजकूर डकवा. न्याहाळकातील सय (कॅश) घालवून तसेच न्याहाळक बंद-चालू केल्यावर नवीन Common.js तुमच्यापुरती लागू होईल. त्यातील बदलांबाबत खात्री पटल्यावर शक्यतो अजून एखाद्या सदस्याकडून खातरजमा करुन घ्या व नंतर मूळ Common.jsमध्ये बदल करा. अर्थात हा शेवटचा बदल फक्त प्रबंधकांनांच करता येतो.
अभय नातू १७:२३, २२ जून २०१० (UTC)

common.css

माझ्या मते common.css मध्ये बदल करावे लागणार आहेत.

तात्पुरता उपाय म्हणुन Navbox वापरतांना formating साठी खालील css tags गरजेनुसार वापरावे

  • |bodystyle = background:#fdfdfd; width:100%; vertical-align:middle;
  • |titlestyle = background:#ccccff; padding-left:1em; padding-right:1em; text-align:center;
  • |abovestyle = background:#ddddff; padding-left:1em; padding-right:1em; text-align:center;
  • |belowstyle = background:#ddddff; padding-left:1em; padding-right:1em; text-align:center;
  • |groupstyle = background:#ddddff; padding-left:1em; padding-right:1em; text-align:right;
  • |liststyle = background:transparent; text-align:left/center;
  • |oddstyle = background:transparent;
  • |evenstyle = background:#f7f7f7;

Maihudon १०:५९, २८ जून २०१० (UTC)

आणि विकिपीडिया is getting a new look येऊ घातले त्याचे काय?

मागच्या बीटा व्हर्शन विषयी मी माझे मत मागेच विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू/सुलभीकरण येथे नोंदवले आहे. खासकरून आपल्या मराठी टंकन सुविधेचे काय होणार ते अजुनही स्पष्ट नाही.
माहितगार ०५:५६, २२ जून २०१० (UTC)
मराठी टंकन सुविधा मराठी विकिपीडियामधील Monobook.js या जावास्क्रिप्टमुळे उपलब्ध आहे. ही संचिका साठवून ठेवून नवीन अवतार प्रकट झाल्यावर एखाद्या प्रबंधकाने Monobook.js मध्ये योग्य ते बदल केल्यास ही सुविधा परत उपलब्ध होईल.
अभय नातू १७:२७, २२ जून २०१० (UTC)

प्रचालक होण्यासाठी अर्ज / कौल

नमस्कार, मी गेल्या काही दिवसांपासून मराठी विकिपीडियासह मराठी विकिक्वोट मध्येही लिखाणास सुरूवात केली आहे. मी आतापर्यंत मराठी विकिपीडिया येथे १५३१ संपादने आणि मराठी विकिक्वोट येथे ७० संपादने केलेली आहेत. मराठी विकिक्वोट येथे प्रचालक म्हणून काम करण्यास मी उत्सुक असून त्याप्रमाणे मी q:Wikiquote चर्चा:Administrators येथे अर्ज माझा अर्ज सादर केला आहे. मराठी विकिपीडिया वरील सर्वांना मी विनंती करतो की, याबाबत तुमच्या प्रतिक्रिया q:Wikiquote:कौल येथे कळवाव्यात. सगळ्यांच्या मतांचे स्वागत आहे. Gypsypkd ०५:५८, २४ जून २०१० (UTC)

अभ्यवेक्षण कि सेंसॉरशीप

परिभाषा कोशातील परिभाषिक शब्दांचा शोध मनोगत कृपेने आंतरजालावर आता थोडा सुसह्य झाला आहे, त्याचा उपयोग करून मी मराठी विकिपीडियावर आणि विकिक्वोटवर सेन्सॉरशिप एवजी अगदीच अप्रचलित अभ्यवेक्षण शब्द वापरला. खरे तर अभ्यवेक्षण हा शब्द मलाही भाषेत वापरण्याच्या दृष्टीने क्लिष्ट वाटतो आहे. गूगलवर शोध घेतलातर लोकसत्तातील एका अपवादात्मक बातमीशिवाय इतर कुठेही वापरलेला आढळत नाही.
कोणते वापरावे ?माहितगार ०८:१३, २८ जून २०१० (UTC)

अभ्यवेक्षण हाच शब्द ठेवावा. रुळण्यास वेळ लागेल पण तो मराठी आहे हे ही नसे थोडके. असे अनेक शब्द योजवयास हवे. हळूहळू ते रुळतील. सेन्सॉरशिप हा शब्द अनेक वेळा कानावर पडल्याने तो सोपा वाटतो हे एक कारण आहे. अभ्यवेक्षण ची पण कालांतराने सवय पडेल. वि. नरसीकर (चर्चा) ०८:४२, २८ जून २०१० (UTC)

  • वरील मताशी सहमत, मराठी शब्दही रुळतील, सवय होईल. Gypsypkd ११:४१, २८ जून २०१० (UTC)
अभ्यवेक्षण अशा क्लिष्ट, भारदस्त शब्दाऐवजी दुसरा मराठी शब्द योजता येणार नाही का?
मुस्कटदाबी, काटछाट, मल्लीनाथी हे काही शब्द वानगीदाखल.
अभय नातू १५:२८, २८ जून २०१० (UTC)

परिनिरीक्षण

चित्रपट-नाटकांच्या सेन्सॉरसाठी परिनिरीक्षण(करणे) आणि सेन्सॉरबोर्डासाठी परिनिरीक्षण मंडळ हे दोन्ही शब्द नेहमीच्या वाचनातले आहेत. गूगलवर शोध घेऊन खात्री करून घेतली आहे. सेन्सॉरशिपकरिता परिनिरीक्षण हे नाम वापरायला काहीही हरकत नाही. अभक्ष्यवेक्षण हा शब्द कधीही रूढ होणार नाही. --J १८:०९, २८ जून २०१० (UTC)

अवर्गीकृत पाने

मराठी विकितील अनेक लेख अवर्गीकृत अवस्थेत आढळतात. आता मराठी विकित जुने झालेले सदस्यही (केवळ आपली संपादन संख्या वाढवत) नवीन लेख (नुसते पान) तयार करून त्या लेखात काहीही माहिती लिहीत नाही. अशा लेखांना योग्य वर्गात कसे टाकावे? Gypsypkd ११:४१, २८ जून २०१० (UTC)

१. अशा सदस्यांना (हलकेच) वर्गीकरण आणि एक तरी आंतरविकी दुवा घालण्याची आठवण करावी.
२. विकिपीडियावरील सगळे अवर्गीकृत लेख येथे आहेत. जमेल तसे, तेव्हा ते चाळून शक्य तर वर्गीकृत करावेत.
अशा वर्गीकरणात शंका आली तर चावडीवर (किंवा जुन्या सदस्यांना थेट) विचारावे.
अभय नातू १५:२०, २८ जून २०१० (UTC)

विकिक्वोट

सर्व विकि मित्रांना नमस्कार, मराठी विकिक्वोट विषयी असलेले विकिपीडिया:धूळपाटी२५ हे पान पहावे, शक्य ती मदत करावी. Gypsypkd ०५:३७, २९ जून २०१० (UTC)

विकिपीडिया:कौल

Previously there was a Small Wiki Monitoring Team and further Meta introduced Global Sysop system, Since we at Marathi Wikipedia and Marathi Wiktionary has got sufficieant routin patrol from Marathi Wikipedians and also we have sufficient numbers of local sysops available.Earlier I did discuss this issue with User Abhay Natu to opt out of unnecessary involvement of Global Sysops , besides if any mistake happens from them , since they do not know local Marathi Wikipedia languge and localy agreed conventions, it is difficult to contact and prove certain aspects and would be time consuming for avarage marathi wikipedian who does not know what is meta and how it functions.Following is the discussion at meta and it seems we will need support vote at विकिपीडिया:कौल page to opt out.माहितगार ०६:३४, ३० जून २०१० (UTC)

  • मला थोडी माहिती हवी आहे.

छायाचित्रे चढवताना ती विकीकॉमन्स वर चढवण्याचे काय फायदे होतात? त्यासाठी इंग्रजी विकीवर सदस्यत्व असणे आवश्यक आहे का? की मला मराठी खात्यातूनच हे काम करता येईल? माझे मराठीवरचे खाते मी हिंदी किंवा इंग्रजी विकीवर वापरु शकतो का? अशी खाती जोडता येतात का?

धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
सौरभदा १२:३६, ३० जून २०१० (UTC)~~