"गुजरात" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: bh:गुजरात
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
{{काम चालू}}
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार = राज्य
|प्रकार = राज्य

१४:१६, २९ मे २०१० ची आवृत्ती

  ?ગુજરાત

भारत
—  राज्य  —
Map

२३° १३′ १२″ N, ७२° ३९′ १८″ E

गुणक: गुणक: Unknown argument format

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ १,९६,०२४ चौ. किमी
राजधानी गांधीनगर
मोठे शहर अहमदाबाद
जिल्हे २६
लोकसंख्या
घनता
५,०५,९६,९९२ (१० वे) (२००१)
• २५८/किमी
भाषा गुजराती
राज्यपाल नवल किशोर शर्मा
मुख्यमंत्री नरेंद्र मोदी
स्थापित १ मे १९६० (1960-05-01)
विधानसभा (जागा) Unicameral (१८२)
आयएसओ संक्षिप्त नाव IN-GJ
संकेतस्थळ: गुजरात सरकार अधिकृत संकेतस्थळ
ગુજરાત चिन्ह
ગુજરાત चिन्ह

गुजरात (गुजराती: ગુજરાત) हे भारताच्या पश्चिम भागातील एक राज्य आहे. गुजरात औद्योगिकदृष्ट्या भारताचे सगळ्यात प्रगत राज्य आहे. भारताच्या एकूण औद्योगिक उत्पन्नातील गुजरातचा वाटा १९.८% आहे.

इतिहास

पौराणिक संदर्भ

महाभारत काळात श्रीकृष्णांनी गुजरातच्या पश्चिम किनारपट्टीवर द्वारका वसवल्याचे उल्लेख आहेत. त्याचप्रमाणे पांडव अज्ञातवासासाठी ज्या विराट नगरीत आले होते तीही नगरी आजच्या कच्छप्रांतात असल्याचे मानले जाते.

ऐतिहासिक काळ

लोथल आणि धोलावीरा येथील पुरातत्वीय उत्खननांत सिंधू संस्कृतीचे अवशेष ज्याप्रमाणात आढळले यावरून त्या संस्कृतीत गुजरातचे स्थान महत्वाचे असल्याचे दिसून येते. मौर्य आणि गुप्त साम्राज्यात गुजरातमधील शहरे महत्वाची बंदरे आणि व्यापाराची केंद्रे बनली. गुप्तकाळात अनेक राजांनी गुजरातवर राज्य केले. त्यानंतर मैत्रक आणि सोलंकी राजघराण्यांची सत्ताही या भागात दीर्घकाळपर्यंत चालली. इसवी सनाच्या नवव्या शतकात गझनीच्या महमूदाने सोमनाथवर निर्णायक चढाई करून ते जिंकले आणि तेथून मुस्लिम राजवटींचा अमल सुरु झाला. चौदाव्या शतकाच्या अखेरीस दिल्लीतली सत्ता खिळखिळी झाल्याचा फायदा घेत गुजरातचा मुस्लिम प्रांतपाल जफरखान मुझफ्फर याने स्वतःच्या वेगळ्या राज्याची घोषणा केली. त्याचा पुत्र अहमद शहा याने अहमदाबाद या शहराची फेरबांधणी करून तिथे राजधानी स्थापली. दिल्लीचा मुघल बादशहा अकबराने १५७६ मध्ये ताबा मिळवेपर्यंत गुजरात सल्तनतीचा अंमल सुरु होता. सूरत हे मुघल साम्राज्यातले महत्वाचे बंदर होते. त्यानंतर उत्तर आणि पश्चिम गुजरातवर मराठा साम्राज्याने आधिपत्य मिळवले तर काठेवाड आणि कच्छच्या भागात मात्र अनेक स्थानिक राजांचा अंमल सुरु राहिला.

युरोपीय सत्ता

युरोपीय सत्तेची सुरवात गुजरातमध्ये पोर्तुगिजांपासून झाली. दमण आणि दीव,दादरा आणि नगरहवेली या वेगवेगळ्या जागी त्यांनी सत्ता स्थापन केली. १६१४ मध्ये सुरतमध्ये कारखाना सुरु करून इंग्रजांनी त्यांची भारतातली पहिली वसाहत स्थापन केली. त्यानंतर १६६८मध्ये इंग्रजांनी मुंबई प्रांत मिळवला. १८ व्या शतकातल्या दुस-या इंग्रज - मराठे युद्धात जिंकल्यानंतर इंग्रजांनी गुजरातच्या बहुसंख्य भागात आपली सत्ता स्थापन केली. वडोदरा (बडोदे) येथे गायकवाड यांच्याप्रमाणे काही सांस्थानिकांनी इंग्रजांशी शांततेचा करार करून आपली स्थानिक सत्ता टिकवली. गुजरातचा बहुतेक भाग मुंबई प्रांताशी जोडला गेला आणि मुंबईतून गुजरातचा राज्यकारबार ब्रिटीशांनी पाहिला.

भूगोल

चतुःसीमा

गुजरातच्या उत्तरेला राजस्थान राज्य व पाकिस्तान आहेत. पूर्वेस मध्य प्रदेश तर दक्षिणेस महाराष्ट्र राज्य व दीव, दमणदादरा आणि नगर हवेलीचा केंद्रशासित प्रदेश आहे. गुजरातच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे. गुजरातची राजधानी गांधीनगर राज्याच्या मध्यात वसवलेले नवीन शहर आहे. गांधीनगर अहमदाबादपासून जवळ आहे.

जिल्हे

यावरील विस्तृत लेख पहा - गुजरातमधील जिल्हे.

अर्थतंत्र

राजकारण

प्रमुख शहरे