"मिशेल ओबामा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: sr:Мишел Обама
ArthurBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: war:Michelle Obama
ओळ ६१: ओळ ६१:
[[uz:Michelle Obama]]
[[uz:Michelle Obama]]
[[vi:Michelle Obama]]
[[vi:Michelle Obama]]
[[war:Michelle Obama]]
[[yi:מישעל אבאמא]]
[[yi:מישעל אבאמא]]
[[yo:Michelle Obama]]
[[yo:Michelle Obama]]

००:४३, १७ एप्रिल २०१० ची आवृत्ती

मिशेल रॉबिन्सन ओबामा (जन्म: जानेवारी १७, १९६४) ह्या अमेरिकेच्या प्रथम महिला (इंग्लिश: First Lady) (राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांच्या पत्नि) आहेत. अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच एका आफ्रिकन अमेरिकन महिलेला हा मान मिळाला आहे.

मिशेल रॉबिन्सनचा जन्म व बालपण शिकागो शहरात झाले. त्यांनी प्रिन्सटन विद्यापीठहार्वर्ड विधी विद्यालयामधून शिक्षण घेतले आहे. शिक्षणानंतर शिकागोमध्ये नोकरी करत असताना त्यांची बराक ओबामांशी ओळख झाली. बराक व मिशेल ह्यांनी १९९२ साली लग्न केले. ओबामा दांपत्याला मलिया आणि साशा ह्या दोन मुली आहेत.

२००८ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये मिशेल ओबामांनी आपल्या नवर्‍याला निवडुन आणण्यात मोठा वाटा उचलला. डेमोक्रॅटिक पक्षाच्या बैठकीदरम्यान त्यांनी दिलेल्या भाषणाला चांगला प्रतिसाद मिळाला.

प्रथम महिला ह्या पदावर मिशेल ओबामांनी जगभरातील लोकांना मोहून टाकले आहे. त्यांचे प्रभावशाली व्यक्तिमत्व, उच्च शिक्षण, समाजकार्याची कळकळ इत्यादी बाबींच्या जोरावर त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचे उत्कृष्ट कपडे हा फॅशन जगतातील एक मोठा चर्चेचा विषय झाला आहे.