"सदस्य चर्चा:Harshalhayat" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{User talk:Harshalhayat/चर्चा}}

[[Category:User:Harshalhayat]]
[[Category:User:Harshalhayat]]



१३:००, १ जानेवारी २००७ ची आवृत्ती


राशी

हर्षल, खगोलशास्त्र(astronomy) आणि फलज्योतिषशास्त्र(astrology) यातल्या राशी एकच आहेत. कारण दोन्ही विद्यांमध्ये आकाशातल्या बारा भागातल्या ज्या नक्षत्रांवरून, तारकासमूहांवरून प्रत्येक राशी ठरते ती नक्षत्रे, तारकासमूह जवळपास एकच आहेत. खगोलशास्त्रातील बरेचसे मूळभूत संशोधन पाश्चात्यांनी केले असल्याने खगोलशास्त्रातील राशी पाश्चात्यांच्या राशीकल्पनेप्रमाणे सुरु होतात .. ज्या भारतीय राशीकल्पनेपेक्षा काही अंश(degrees) पुढे-मागे आहेत; फारसा फरक नाही. त्यामुळे राशींचे लेख एकच ठेवून त्यात खगोलशास्त्रीय, फलज्योतिषशास्त्रीय अशा दोन्ही प्रकारांनी माहिती द्यावी. प्रत्येक राशीतील नक्षत्रांची नावे भारतीय पुराणकथा, तसेच ग्रीक/रोमन पुराणकथांमधून आली आहेत; त्याचीही माहिती अशा लेखात हवी.

--संकल्प द्रविड 04:33, 19 डिसेंबर 2006 (UTC)

हो.. या दोन विद्याशाखांमधील कल्पनांचा फरक त्या-त्या राशीवरील लेखात स्पष्ट व्हायला हवा. खगोलशास्त्रीय माहिती आणि फलज्योतिषशास्त्रीय माहिती यथायोग्य प्रमाणात वेगवेगळ्या मथळ्यांखाली त्याच लेखात लिहिणे हा मार्ग योग्य वाटतो. अर्थात या दोन्ही विद्याशाखांचे(त्यातही फलज्योतिषशास्त्रीय विद्येतील माहितीचे) वर्णन बरेच विस्तारले तर त्याकरिता स्वतंत्र लेख लिहून मुख्य लेखात संक्षेपाने माहिती लिहिणे आणि स्वतंत्र/विस्तृत लेखाचा दुवा त्या ठिकाणी जोडणे हा उपाय करता येईल.
तूर्तास तरी हे लेख एकेकटेच असू द्यावेत आणि त्यातील मजकूर विस्तारू द्यावा. पुरेसा विस्तार झाल्यावर याबाबतीत परिस्थितीनुरूप निर्णय घेऊ.
--संकल्प द्रविड 08:22, 19 डिसेंबर 2006 (UTC)

शुभेच्छांबद्दल धन्यवाद

शुभेच्छांबद्दल धन्यवाद. मला लेख लिहीण्यात अधिक रस आहे.विक्शनरीची गाडी थोडी रूळावर आणणे आवश्यक वाटते म्हणून सुरवात केली आहे.Mahitgar 06:21, 21 डिसेंबर 2006 (UTC)

Sitenotice - fundraising?!

हर्षल, माझ्या चर्चापानावर एक संदेश आला आहे: User talk:Sankalpdravid#sitenotice. मला या सूचनेतून नीटसा अर्थबोध झाला नाही. 'मराठी विकिपीडियावर' विकिमीडिया फाउंडेशनकरता निधिसंकलनाची नोटीस लावण्यासंदर्भात काही आहे का?

--संकल्प द्रविड 11:44, 26 डिसेंबर 2006 (UTC)

हर्षल, मी systemmessages मधून 'sitenotice' हा संदेश बदलला आहे. PHP फाईल बदलली नाही आहे.. कारण ती 'विकिमीडिया'वर चढवली नसल्याने त्यातील बदल सद्यस्थितीत बहुदा निरुपयोगी ठरतील असा माझा समज आहे.
--संकल्प द्रविड 12:23, 26 डिसेंबर 2006 (UTC)