"शहापूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ १५: ओळ १५:
==दळणवळण==
==दळणवळण==
शहापूर हे तालुक्यातील प्रमुख ठिकाण असुन या तालुक्यामधे जवळजवळ ६० गावे येतात.
शहापूर हे तालुक्यातील प्रमुख ठिकाण असुन या तालुक्यामधे जवळजवळ ६० गावे येतात.
त्यात किन्हवली, डोलखाम्ब,शेणवा हि प्रमुख बाजारची ठिकाणे आहेत.
त्यात [[किन्हवली]], डोलखाम्ब,शेणवा हि प्रमुख बाजारची ठिकाणे आहेत.


[[वर्ग:ठाणे जिल्हा]]
[[वर्ग:ठाणे जिल्हा]]

१८:५०, २५ मार्च २०१० ची आवृत्ती

शहापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातल्या ठाणे जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे. शहापूर, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मुंबई पासून ९० कि. मी. अंतरावर वसले आहे. आसनगाव हे जवळील रेल्वे स्थानक असून ते मुंबईच्या मध्य उपनगरीय रेल्वेमार्गावरील मुंबई सी.एस.टी पासून ८५ कि. मी. अंतरावर आहे.

शहापूर हा ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे. शहापूर तालुक्यात मुंबईला पाणी पुरवठा करणारी तीन धरणे आहेत. सह्याद्रीने वेढलेल्या शहापूर लगत किल्ले माहुली व आजोबा पर्वत ही गिर्यारोहणाची ठिकाणे आहेत.

२००१ च्या जनगणनेनुसार शहापूरची लोकसंख्या १०,४९० असून, ह्यात ५,५७१ पुरुष व ५,११९ स्त्रीयांचा समावेश होतो.

भूगोल

शहापूर १९.४५ अ़क्षांश उत्तरेस व ७३.३३३ रेखांश पूर्वेस असून समुद्र सपाटी पासून ४५ मी. उंचीवर वसले आहे.

शहापूरकर

विवीध जाती धर्माचे लोक वर्षानुवर्षे शहापूरमध्ये एकत्र सुखाने नांदताहेत. ह्यात प्रामुख्याने हिंदू, जैन, बौद्ध व मुस्लीम धर्मीय लोकांचा अंतर्भाव होतो. हिंदूंमध्ये प्रामुख्याने कुणबी, आगरी, ब्राह्मण, वाणी, मराठा, लेवा पाटील इ. जातींचे लोक आहेत.

नोकरी हे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असल्याने रोज कामानिमीत्त मुंबईस ये-जा करणार्यांची संख्या मोठी आहे. उपनगरीय रेल्वे हे दळणवळणाचे प्रमुख साधन आहे. काही लोकांचा शेती हा व्यवसाय असून, प्रामुख्याने भात शेती केली जाते.

दळणवळण

शहापूर हे तालुक्यातील प्रमुख ठिकाण असुन या तालुक्यामधे जवळजवळ ६० गावे येतात. त्यात किन्हवली, डोलखाम्ब,शेणवा हि प्रमुख बाजारची ठिकाणे आहेत.