"विरामचिन्हे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
209.131.62.113 (चर्चा)यांची आवृत्ती 495998 परतवली.
ओळ ४: ओळ ४:
* पूर्णविराम ( '''.''' )
* पूर्णविराम ( '''.''' )
* स्वल्पविराम ( ''',''' )
* स्वल्पविराम ( ''',''' )
* अर्धविराम ( ''';''' ) (इंग्रजीतला शब्द्, सेमी-कोलन)
* अर्धविराम ( ''';''' )
* अपूर्णविराम ( ''':''' ) , म्हणजे कोलन (इंग्रजी शब्द्)
* उद्गारचिन्ह ( '''!''' )
* उद्गारचिन्ह ( '''!''' )
* प्रश्नचिन्ह ( '''?''' )
* प्रश्नचिन्ह ( '''?''' )

०७:१२, २३ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती

वाक्यांमधून व्यक्त करायचे विचार आणि भावना यथार्थतेने व्यक्त करण्याकरता विरामचिन्हांचा वापर केला जातो.

विरामचिन्हे

  • पूर्णविराम ( . )
  • स्वल्पविराम ( , )
  • अर्धविराम ( ; )
  • उद्गारचिन्ह ( ! )
  • प्रश्नचिन्ह ( ? )

विरामचिन्हांचा वापर

  • थांबा - मजकूर वाचताना योग्य त्या ठिकाणी योग्य काळ थांबण्याची सूचना देण्याकरता पूर्णविराम (.), स्वल्पविराम (,), आणि अर्धविराम (;) ही तीन चिन्हे लेखक वापरतात.
  • आश्चर्य - वाक्यातून लेखकाला अपेक्षित आश्चर्य भाव व्यक्त करण्यासाठी आश्चर्यचिन्ह (!) वापरतात.
  • प्रश्न - वाक्याला प्रश्नार्थक स्वरुप देण्यासाठी वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्हाचा (?) वापर करतात.

विरामचिन्हांची उपयुक्तता दाखवणारी उदाहरणे

मराठी

सूचना: खालील गोष्ट प्र. के. अत्रेंविषयी प्रसिद्ध असलेल्या अनेक आख्यायिकांपैकी एक आहे. त्याचा येथे उल्लेख केवळ स्वल्पविरामाचे महत्व दर्शविणारे एक विनोदी उदाहरण म्हणून केला आहे.


एकदा ना. सी. फडके प्र. के.अत्रेंना म्हणाले, "वाक्यात स्वल्पविरामाचा नक्की उपयोग काय?" अत्रे म्हणाले, " योग्य वेळ आली की मी ते तुम्हाला सांगीन." 
त्यानंतर लवकरच फडकेंच्या पत्नीला अत्रे भेटले असताना अत्रे म्हणाले, 
  "मी तुझा नवरा तू माझी बायको आपण सिनेमाला जाऊ या." 
ही गोष्ट अर्थात लगेच फडकेंच्या कानावर आली, आणि त्यांनी अत्रेंकडे त्याबाबत खुलासा मागितला. अत्रेंनी स्पष्टीकरण दिले ते असे:
  "अहो, मी म्हटले होते 'मी, तुझा नवरा, तू, माझी बायको, आपण सिनेमाला जाऊ या.'

हिंदी

रोको, मत जाने दो!
रोको मत, जाने दो!

इंग्रजी

एकदा एका (शालेय) वर्गात, इंग्रजी व्याकरणाच्या तासाला, एका वाक्यात विरामचिन्हांचा योग्य उपयोग करण्याबाबतच्या एका प्रश्नाला 
मुलांकडून आणि मुलींकडून वेगळी उत्तरे आली.
ती अशी:
   मुलांचे उत्तर: 'वूमन, विदाउट हर मॅन, इझ अ बीस्ट.' (Woman, without her man, is a beast)
याउलट
   मुलींचे उत्तर: 'वूमन! विदाउट हर, मॅन इझ अ बीस्ट.' (Woman! without her, man is a beast)