"रेब्रांट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: cs:Rembrandt; cosmetic changes
छो सांगकाम्याने वाढविले: yo:Rembrandt
ओळ १४०: ओळ १४०:
[[war:Rembrandt]]
[[war:Rembrandt]]
[[yi:רעמבראנדט]]
[[yi:רעמבראנדט]]
[[yo:Rembrandt]]
[[zh:伦勃朗]]
[[zh:伦勃朗]]
[[zh-min-nan:Rembrandt van Rijn]]
[[zh-min-nan:Rembrandt van Rijn]]

०२:२१, २९ नोव्हेंबर २००९ ची आवृत्ती

रेम्ब्राँ फान रेन
चित्र:रेम्ब्रा.jpg
रेम्ब्राँने काढलेले आत्मव्यक्तिचित्र (१६६१)
पूर्ण नावरेम्ब्राँ हार्मेन्स्त्सून फान रेन
जन्म जुलै १५, १६०७
लायडन, नेदरलँड्स
मृत्यू ऑक्टोबर ४, १६६९
ऍमस्टरडॅम, नेदरलँड्स
राष्ट्रीयत्व डच
कार्यक्षेत्र चित्रकला


रेम्ब्रा हा एक जग प्रसिद्ध डच चित्रकार होता. सन १६०६ मधे तो लायडन या शहारात जन्मला. सन १६३२ पासून त्याने मात्र आपले उर्वरित आयुष्य ऍमस्टरडॅम शहरात घालवले. सन १६६९ मधे त्याचा मॄत्यु झाला. प्रकाश आणि सावल्यांचा वापर चित्रकलेत करण्यात तो कुशल होता. त्याचा काळ हा डच चित्रकलेचा सुवर्णकाळ मानला जातो.

रेम्ब्रावर करावागिओ व इतर अनेक इटालियन चित्रकारांचा प्रभाव होता. तो चित्रकलेचा शिक्षक देखिल होता.

सन १६३१ मधे लायडनमधे त्याच्या चित्रशाळेची भरभराट होत असतांना तो ऍमस्टरडॅमला आला. तो हॉलंडचा सर्वात प्रसिद्ध व्यक्तिचित्रकार होता. धार्मिकचित्रे आणि अनेक व्यक्तिचित्र काढण्याची कामे त्याला मिळाली. मानाचे आणि संपन्नतेचे जीवन जगत असतांना त्याने १६३४ मधे सास्कीया या सुंदरीशी लग्न केले. पुढे त्याच्या अनेक चित्रांची ती विषय होती. या काळातील त्याच्या चित्रांत प्रकाशाच सुंदर आणि तीव्र वापर केलेला आढळतो. व्यक्तिचित्रांखेरीज तो भूचित्रे (देखावे) आणि धातूंवर कोरीव चित्रे काढण्यात प्रसिद्ध पावला. त्याने स्वत:ची देखिल अनेक चित्रे काढली. एका अंदाजानुसार त्याने ५० ते ६० व्यक्तिचित्रे काढली.

१६३६ पासून पुढील काळात त्याच्या चित्रांचे विषय शांत, गंभीर आणि वैचारिक वाटतात. पुढील चार वर्षांत त्याची चारपैकी तीन मुले लहानवयात मरण पावली, तर १६४२ मधे त्याच्या पत्नीचे निधन झाले. १६३० ते १६४०च्या दशकांत त्याने प्रामुख्याने भूचित्रे(देखावे) आणि कोरीवचित्रे काढली. 'द नाईट वॉच' हे त्याचे प्रसिद्ध भूचित्र (देखावा) आहे.

'द नाईट वॉच' किंवा 'द मिलीशिया कंपनी ऑफ कॅप्टन बॅनिंग कोक' नावाने ओळखले जाणारे तैलचित्र(१६४२). हे चित्र सध्या 'रिक्समुझेउम, ऍमस्टरडॅम' येथे आहे.

१६४० ते १६५०च्या दशकांत त्याला कमी कामे मिळाली आणि त्याची साम्पत्तिक परिस्थिती ढासळली. आजच्या चित्रकलेच्या विद्यार्थ्यांसाठी तो एक खरा, मुक्त आणि निर्भीड कलोपासकाचे उदाहरण आहे.


प्रमुख चित्रे

त्याने जवळजवळ ६०० चित्रे, ३०० कोरीवचित्रे आणि १४०० रेखाचित्रे काढली. सेन्ट पॉल इन प्रिझन (१६२७), सपर ऍट इमाओस (१६३०), यंग गर्ल ऍट ऍन ओपन हाफ-डोअर (१६४५), द मिल (१६५०) आणि इतर अनेक चित्रे.


साचा:Link FA