"विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Mahitgar (चर्चा | योगदान)
छो "विकिपीडिया:विकिपीडियाच्या मर्यादा" हे पान "[[विकिपीडिया:हवे होते अपेक्षा आणि परिघ आणि आवाका मर�
Mahitgar (चर्चा | योगदान)
छो "विकिपीडिया:हवे होते अपेक्षा आणि परिघ आणि आवाका मर्यादा" हे पान "[[विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, व�
(काही फरक नाही)

१२:३२, १७ नोव्हेंबर २००९ ची आवृत्ती

मराठी विकिपीडिया एक विश्वकोश असल्यामुळे मजकूर विश्वकोशास साजेशा स्वरूपात बसवावा लागतो, म्हणजे काय ते आपण खाली पुढे पाहू


मराठी विकिपीडिया केवळ एक विश्वकोश आहे.संबधीत माहिती संबधीत प्रकरणात (लेखात) लिहिणे अपेक्षीत असते.

विश्वकोश संकल्पना

विश्वकोशांना स्वतःचा विशीष्ट वाचकवर्ग असतो. तो केवळ विश्वासार्ह, संक्षीप्त(मोजके) साक्षेपी(संदर्भ असलेली काही विरूद्ध मते असल्यास, त्याच्या सह) शक्य तीथे संदर्भ असलेली वस्तुनिष्ठ(Facts) आणि तटस्थपणे (impartial) दिलेली माहिती वाचत असतो.

(इथे वाचकांना रूक्षता अपेक्षीत नसते, पण निव्वळ ज्ञान आणि माहिती हवी असते. वाचकाचा दृष्टीकोण आम्ही मोजक्या Facts आणि statistics सह वाचतो. आम्हाला इतरांची परस्परविरोधी मते विशीष्ट संदर्भासहीत सांगा, पण आमचे मत प्रभावित करण्याकरिता तुमच्या स्व:चे मत स्वतः त्यात मिसळू नका असा असतो.)


सारे विश्वकोश विश्वकोशाची विश्वासार्हता जपण्याकरिता सहसा वस्तुनिष्ठ लेखन करण्याचा संकेत पाळत असतात.त्यामुळे शब्दांचा(स्वतः जोडलेल्या विशेषणांचा) फुलोरा, स्वतःच दिलेला व्यक्तिगत दुजोरा, इत्यादी ललीत लेखनाच्या किंवा ब्लॉग या स्वरूपातील लेखन टाळणे अपेक्षीत असते.

ललीत लेखनाच्या किंवा ब्लॉग स्वरूपातील लेखन आपल्या आवडीचा किंवा सवयीचा भाग असेल तर, विकिपीडियात लिहिण्याच्या दृष्टिने, आपण आधी मराठी विकिपीडियात आधीपासून असलेल्या एखाद दुसर्‍या लेखांमध्ये भर घालून पाहू शकता, मुखपृष्ठ सदर म्हणून मागे निवडले गेलेले लेख अभासू शकता अथवा धूळपाटी येथे कच्चे लेखन करून इतर संपादकांचे सहाय्य घेऊन ते बरोबर करून घेऊ शकता .

आपल्याला इतर नवागत सदस्य काय चूका करत असत्तात ते नवीन सदस्यांकडून होणार्‍या सर्वसाधारण संपादन त्रूटी लेखात जाणून घेता येईल.आणि विकिपीडियाच्या इतर मर्यादांची माहिती विकिपीडिया:विकिपीडियाच्या मर्यादा या लेखात घेता येईल.

विकिपीडियाचे सहप्रकल्प

  • विकिपीडियातील लेख अर्थातच एकांगी नसावा.
  • विकिपीडियातील लेख छापील ज्ञानकोशाप्रमाणे स्थायी नसावा सतत योग्य बदल करणे अपेक्षित असते.
  • विकिपीडियातील लेख हा शब्दकोश नाही. शब्दकोशात असते त्यापेक्षा अधिक सखोल, अधिक विस्‍तृत व मुद्देसूद माहितीचे संकलन होणे अपेक्षित आहे. मराठी शब्दकोश येथे आहे.
  • विकिपीडिया लेख हे मूळ संशोधन किंवा पहिलेच संशोधन असणे अपेक्षित नाही. येथे आधी झालेल्या इतरांच्या विचारांचा माहितीचा किंवा संशोधनाचा, लेखनाचा संदर्भ आधार देणे व मागोवा घेणे अपेक्षित आहे, त्यामुळे नवीन विचार पहिल्य़ांदाच मांडण्याकरिता हे व्यासपीठ वापरू नये.
  • विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे साधन नाही. अर्थात संबधित माहितीची योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.
  • विकिपीडियातील लेख हे केवळ अंतर्गत किंवा बहिर्गत संकेतस्थळांचे संकलन किंवा पुर्ननिर्माणही नाही.
  • विकिपीडियातील लेख कोणत्याही धर्मादाय, व्यापारी वा व्यक्‍तिगत, शासकीय,निम-शासकीय आस्थापनांचे संकेतस्थळ नाही. ब्लॉग नाही. केवळ सामाजिक संपर्क स्थापित करण्याची अथवा त्यांच्या बद्दलच्या- शंका/तक्रार/समस्या- निवारण जागा नाही.
  • विकिपीडियातील लेख हे अंदाधुंद माहिती गोळा करण्याचे ठिकाण नाही.
    • नेहमी विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची यादी नाही.
    • दूरस्थ संबध असलेल्या विषयांची, किंवा सुविचारांची यादी नाही.
    • विकिपीडियातील लेख स्थळांची माहिती देतात पण ते प्रवासवर्णन किंवा प्रवासी ठिकाणाची जाहिरात करत नाहीत.
    • आपल्या प्रिय नातेसंबध असलेल्या किंवा वैयक्‍तिक मित्रांची माहिती देण्याचे, आठवण करण्याचे ठिकाण नाही.
    • पहिल्या माहितीची स्रोत किंवा ब्रेकिंग न्यूज नाही.
    • हे व्यक्‍ति, स्थळे, दूरध्वनी क्र. इत्यादींचा संग्रह, Yellow Pages नाही.
    • दूरदर्शन किंवा आकाशवाणीची कार्यक्रमपत्रिका नाही.
    • चर्चापाने, सदस्यपाने ही प्रबोधन-प्रचार किंवा जाहिरातीची होमपेज नाहीत.
    • विकिपीडियातील लेख "कसे करावे" ची पाने नाहीत. (फक्‍त) विकिपीडिया वापरास सुकर करणारे लेख यातून वगळले आहेत.
    • आंतरजाल मार्गदर्शक नाही. लेख ज्ञानकोशाप्रमाणे असावेत.
    • पाठ्यपुस्तक नाही.
    • ललितलेख, कथा, कादंबरीबद्दल केवळ ढोबळ कथा व समीक्षण अपेक्षित आहे.
    • संकेतस्थळे असंबद्ध, अनपेक्षित ठिकाणी उघडणे अपेक्षित नाही.
  • विकिपीडियातील लेख भविष्यकालीन घटनांची असंबद्ध यादी नाही.
  • विकिपीडिया माहितीचे प्रतिबंधन करत नाही. व्यक्‍तिपरत्वे व्यक्‍तिगत जाणीवांना व रुचीला न पटणार्‍या किंवा विरोधी दृष्टिकोणांची, संचिकांची, छायाचित्रांची, संकेतस्थळांची इथे मांडणी असू शकते. अर्थात मांडणी समतोल करण्याच्या व सुसंबद्ध करण्याच्या दृष्टीने संपादन करता येते. विकी धोरणांचे पालन करण्याचा प्रयत्न केला जातो. पण तो प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतो. फ्लोरिडासह इतर अनेक ठिकाणी सर्व्हर्स असून त्यांच्या कायद्यांचा परिणाम विकी धोरणांवर होऊ शकतो. प्रत्येक वापरकर्त्याने आपापल्या देशातील कायद्यांबद्दल वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे अपेक्षित आहे.



अपूर्ण राहण्याची शक्यता असलेल्या अपेक्षा

  • इमेलवर/मोबाईलवर माहिती पाठवा
आपला ईमेल पत्ता लेख किंवा चर्चा पानावर देण्याचे टाळावे,अगदीच देणे तसे आवश्यक असल्यास @च्या चिन्हाच्या एवजी ऍट शब्द मराठीत तचेच डॉट शब्द मराठी अक्षरात लिहिण्याची दक्षता घेतल्यास यांत्रिकी शोधयंत्रे त्याचा शोध घेऊन तुमच्या इमेल पत्त्यावर उत्पातपूर्ण इमेल पाठवले जाणे टळेल
न पेक्षा विशेष:पसंती येथे तुमचा ईमेल पत्ता भरून जतन केल्यास तुमच्या सदस्यपानाच्या चर्चा पानावर कुणी संदेश/उत्तर दिल्यास असे उत्तर दिल्याचा संदेश तुमच्या इमेलवर प्राप्त होतो त्यामुळे तुमचे इमेल सार्वत्रिक जनतेपासून गोपनियही राहते आणि येथील संपादकांना स्वतःच्या इमेलबॉक्स मध्ये जाऊन तुम्हाला उत्तर देण्यापेक्षा ते तुमच्या चर्चा पानावर देणे सोपे पडते.
दुसरे हेही लक्षात घ्या येथील बहुसंख्यंडळी संपादकीय कामात व्यस्त असतात. एखाद्या विशिष्ट व्यक्तिच्या इमेलपत्त्यावर उत्तर पाठवले जाण्याची शक्यता सहसा कमी असते.इमेल किंवा मोबाईल नंबर येथे देण्या पेक्षा , आपण मराठी विकिपीडिया याहू ग्रूपचे आणि एस एम एस चॅनलचे सदस्य होऊन तेथे चर्चा करणे काही वेळा अधिक श्रेयस्कर ठरू शकते.

मराठी विकिपीडियाच्या मर्यादीत परिघात पूर्ण होण्याची शक्यता कमी असलेल्या नवीन सदस्यांकडून व्यक्त होणार्‍या अपेक्षांची उदाहरणे:

‍*ययाती कादबरी हि खुप चागली कादबरी आहे त्यामुळॅ ती लवकर प्र‍रदरशीत करावी असे लेखनाचे सपादक यान्स विनती करतो कि त्यानी हि कादबरी लवकरात लवर प्रदरशित करावी ही नबर विनती या मध्ये काही चुक झाल्यास शमा असावी

शक्यता नाही 'कारण':प्रताधिकारीत(कॉपीराईट) असलेल्या मजकुराची विनंती. (असा मजकुर प्रताधिकार मालकी असलेल्या व्यक्तिने अधिकृतपणे प्रताधिकार मुक्त केल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या सहप्रकल्पात अंतर्भूत करता येऊ शकतो)
  • तक्रार /समस्या निवारण
शक्यता नाही 'कारण' : मराठी विकिपीडिया कोणत्याही व्यक्तिचे संस्थेचे ,शासकीय निम-शासकीय खासगी अशा कोणत्याही संस्थेचे प्रतिनिधीत्व करत नाही. विकिपीडिया केवळ एक माहिती जतन करणारा विश्वकोश आहे तक्रार समस्या/निवारण केंद्र नव्हे.( बदनामी करण्याचा उद्देश न ठेवता विकिपीडिया शिवाय इतर माध्यमांतून प्रकाशित आणि तपासण्यास उपलब्ध सुयोग्य संदर्भ उपलब्ध असल्यास आस्थापनेच्या उल्लेखनीय(मर्यादीत व्याख्या) मर्यादांची दखल संबंधीत लेखात घेता येते.)


नम्स्कार् मी तुमच्हि वेब्सा इत् नेहमि पहाते मला विनोदि कविता हव्या आहेत् त्यासथि काहि मदत् मिलेल् का?

समिक्षा शिरवाले shirwale.samiksha@gmail.com

पुस्तके वाचकाना पुस्तके उपलब्ध करुण देने. 

नमसकार मित्रानो आपन रोज अनेक गोष्टी करतो पन आपन वाचन मात्र करित नाहि त्यामुळे आपले विचार हे सुधारित नाहित त्या मुळे आपल्या बुध्दीचा विकास होत नाही. आनि त्या मुळे आपण आपल्या समाजाचा विकास शकत नही.

प्रताधिकार विषयक मर्यादा

हे सुद्धा पहा