"मराठी भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ २९: ओळ २९:


भारतात मराठी मुख्यत्वे [[महाराष्ट्र]] राज्यात बोलली जाते. त्याचबरोबर [[गोवा]], [[कर्नाटक]], [[गुजरात]], [[आंध्र प्रदेश]], [[मध्य प्रदेश]], [[तामिळनाडू]] व [[छत्तीसगढ]] राज्यात आणि [[दमण व दीव]], [[दादरा आणि नगर हवेली]] या केंद्रशासीत प्रदेशातील काही भागात मराठी बोलली जाते. मराठी भाषक मोठ्या प्रमाणात असलेले भाग- [[बडोदा]], [[सुरत]], दक्षिण गुजरात व [[अहमदाबाद]] (गुजरात राज्य), [[बेळगांव]], [[हुबळी]]- धारवाड, [[गुलबर्गा]], [[बिदर]], उत्तर कर्नाटक (कर्नाटक राज्य), [[हैद्राबाद]] (आंध्र प्रदेश), [[इंदूर]], [[ग्वाल्हेर]] (मध्य प्रदेश) व [[तंजावर]] (तामिळनाडू)
भारतात मराठी मुख्यत्वे [[महाराष्ट्र]] राज्यात बोलली जाते. त्याचबरोबर [[गोवा]], [[कर्नाटक]], [[गुजरात]], [[आंध्र प्रदेश]], [[मध्य प्रदेश]], [[तामिळनाडू]] व [[छत्तीसगढ]] राज्यात आणि [[दमण व दीव]], [[दादरा आणि नगर हवेली]] या केंद्रशासीत प्रदेशातील काही भागात मराठी बोलली जाते. मराठी भाषक मोठ्या प्रमाणात असलेले भाग- [[बडोदा]], [[सुरत]], दक्षिण गुजरात व [[अहमदाबाद]] (गुजरात राज्य), [[बेळगांव]], [[हुबळी]]- धारवाड, [[गुलबर्गा]], [[बिदर]], उत्तर कर्नाटक (कर्नाटक राज्य), [[हैद्राबाद]] (आंध्र प्रदेश), [[इंदूर]], [[ग्वाल्हेर]] (मध्य प्रदेश) व [[तंजावर]] (तामिळनाडू)

मराठी प्रथम भाषा असणार्‍यांच्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील सतरावी व भारतातील चौथी भाषा आहे. महाराष्ट्र व गोव्याव्यतिरिक्त मराठी [[बेळगांव]], [[हुबळी]]-धारवाड, [[बिदर]], [[इंदूर]], [[ग्वाल्हेर]], [[बडोदा]], [[हैद्राबाद]], [[तंजावर]] येथेदेखील बोलली जाते. भारताबाहेर [[इस्त्राएल]] व [[मॉरिशस]] या देशातसुद्धा मराठी भाषक आहेत. मराठी माणंसे [[युरोप]]-अमेरिकेसह जगभर पसरली आहेत.


== मराठी भाषेचा इतिहास==
== मराठी भाषेचा इतिहास==

१२:१०, ३ मे २००८ ची आवृत्ती

marāṭhī
मराठी
स्थानिक वापर भारत, मॉरीशसइस्त्राएल
प्रदेश महाराष्ट्र, गोवा, काही प्रमाणात- गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू
लोकसंख्या ७०,००,००० (प्रथमभाषा)
२०,००,००० (द्वितीयभाषा)
क्रम १५
बोलीभाषा कोकणी, अहिराणी, माणदेशी, मालवणी, वर्‍हाडी
भाषाकुळ
इंडो-युरोपीय

 इंडो-इराणीय
  इंडो-आर्य
   इंडो-आर्य दक्षिण विभाग
    मराठी

  • marāṭhī
लिपी देवनागरी, मोडी लिपी (प्राचीन)
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर भारत
राजभाषा- महाराष्ट्र, गोवा, दमण व दीव, दादरा आणि नगर हवेली
भाषा संकेत
ISO ६३९-१ mr
ISO ६३९-२ mar


मराठी ही इंडो-युरोपीय भाषाकुलातील एक भाषा आहे. भारतातील प्रमुख भाषांपैकी मराठी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा ह्या राज्यांची मराठी ही राजभाषा आहे. मराठी प्रथम भाषा (मातृभाषा) असणार्‍यांच्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी[१] व भारतातील चौथी भाषा आहे.[२]

भाषिक प्रदेश

मराठी भाषा भारतासह मॉरीशसइस्त्राएल या देशातही बोलली जाते.[३] त्याचबरोबर जगभरात विखुरलेल्या महाराष्ट्रीय भाषकांमुळे मराठी अमेरिकेची संयुक्त संस्थाने, संयुक्त अरब अमिरात, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, सिंगापूर, जर्मनी, युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलियान्युझीलंड येथेही बोलली जाते.[४]

भारतात मराठी मुख्यत्वे महाराष्ट्र राज्यात बोलली जाते. त्याचबरोबर गोवा, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडूछत्तीसगढ राज्यात आणि दमण व दीव, दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासीत प्रदेशातील काही भागात मराठी बोलली जाते. मराठी भाषक मोठ्या प्रमाणात असलेले भाग- बडोदा, सुरत, दक्षिण गुजरात व अहमदाबाद (गुजरात राज्य), बेळगांव, हुबळी- धारवाड, गुलबर्गा, बिदर, उत्तर कर्नाटक (कर्नाटक राज्य), हैद्राबाद (आंध्र प्रदेश), इंदूर, ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) व तंजावर (तामिळनाडू)

मराठी भाषेचा इतिहास

मराठी भाषा महाराष्ट्रगोवा राज्याची राजभाषा असून सुमारे ९ कोटी लोकांची मातृभाषा आहे. मराठी भाषा कमीत कमी १००० वर्षापासून अस्तित्वात आहे.[५] भारतीय संविधानाने मराठीला इतर २२ भाषांबरोबर अनुसूचित भाषेचा दर्जा दिला आहे.

मराठी भाषेचा उदय संस्‍कृतच्या प्रभावाने प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झाला. पैठण (प्रतिष्ठान) येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला. देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि पेशव्यांनी या साम्राज्याचा विस्तार केला. त्यानंतर मराठी भाषेस राजाश्रय मिळाला. इ.स. १९४७ नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठीला अधिकृत राज्यभाषेचा दर्जा दिला. इ.स. १९६० मध्ये मराठी भाषिकांच्या एकसंध महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला. इ.स. १९३०साचा:Fact पासून मराठी साहित्य संमेलन सुरु झाले. मराठी साहित्यिकांनी १९९० च्या दशकापर्यंत मराठी साहित्याचा कळस गाठला.

चित्र:Shravanbelagola marathi.jpg
श्रावणबेळगोळ येथील सर्वात जुना मराठी शिलालेख, प्रताधिकार-कामत.कॉम

सर्वात जुना मराठी लेखनाचा पुरावा सातारा येथे विजयादित्य-काळातील ताम्रपट्टीवर आहे (इ. स. ७३९) येथे आहे. श्रावणबेळगोळ, कर्नाटक येथे सर्वात प्राचीन मराठी शिलालेख आहे. हा शिलालेखात राजा गंगराय व त्याचा सेनापती चामुंडराय यांचे उल्लेख आहेत.


श्री चामुंडराये करवियले ।
श्री गंगाराये सुत्ताले करवियले ।

या प्रकारे त्या शिलालेखात उल्लेख आढळतो.

कुडल संगम, ता. दक्षिण सोलापूर येथील मराठीतील पहिला शिलालेख - "वाछि तो विजेया होईवा ।।': कुडल शब्द कन्नड असून त्याचा अर्थ संगम आहे. भीमा व सीना या दोन नद्यांच्या संगमावर वसलेल्या या गावात चालुक्‍यकालीन संगमेश्‍वर मंदिर आहे. त्याची स्थिती बऱ्यापैकी असून तेथील सभामंडपातील तुळईवर अडीच ओळींचा लेख कोरलेला आहे. त्याचा काही भाग संस्कृत काही भाग मराठी आहे. शेवटचे वाक्‍य "वाछि तो विजेया होईवा ।।' असे मराठीत आहे. विशेष म्हणजे त्यात स्पष्ट कालोल्लेख सापडतो, तेथे शके ९४० असे कोरले आहे. साधारणतः इ. स. १०१८ या काळात तो कोरला आहे. कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्‍वराच्या उंच मूर्तीच्या पायाशी मराठीत कोरलेला लेख - "चामुण्डराजे करवियले" हा काळाच्या दृष्टीने आद्य मराठी लेख समजला जात असे. तो आता मागे पडला असून तो मान कुडलला मिळाला आहे. श्रवणबेळगोळच्यानंतर दिवे आगार ताम्रपटाचा शोध लागला. त्याचा काळ शके ९८२ होता. त्यानंतर कुडलच्या शिलालेखाचा शोध लागला. त्यामुळे मराठीतील आद्य शिलालेखाचा मान आता कुडलकडे आला आहे[६]. ९४० संवत्सरात कोणी पंडिताने मंदिराला भेट दिली अशा आशय त्यात आहे.

मराठी भाषा बोलली जाणारा प्रदेश निळ्या रंगात दर्शविलेला आहे


मराठी मुळाक्षरांचे उच्चार

Consonants
  Labial Dental Alveolar Retroflex Alveopalatal Velar Glottal
Voiceless
stops
p

t̪ʰ
  ʈ
ʈʰ

cɕʰ
k
 
Voiced
stops
b

d̪ʰ
  ɖ
ɖʰ
ɟʝ
ɟʝʰ
ɡ
ɡʰ
 
Voiceless
fricatives
    s   ɕ   h
Nasals m

n̪ʰ
  ɳ
ɳʰ
ɲ ŋ  
Liquids ʋ
ʋʰ
  l ɾ
ɾʰ
ɭ ɽ j    
Vowels
  Front Central Back
High
i
 
u
Mid ə
Low    
चित्र:Marathi signboard.jpg
मराठी भाषेतील एक पाटी

हेसुद्धा पहा

मराठी संकेतस्थळे

  • विकिपीडिया हे जाहिरात करण्याचे स्थळ नसल्यामुळे, कृपया संकेतस्थळांचे दुवे मुख्य लेख - मराठी संकेतस्थळे

या लेखातच द्यावेत. या विभागात मराठी संकेतस्थळे हा लेख पूर्ण झाल्यानंतर दुवाविरहित परिच्छेद अतंर्भूत केला जाईल या दृष्टीने ह्या विभागात रस असलेल्यांनी मराठी संकेतस्थळे हा लेख परिपूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे ही विनंती.

संदर्भ