"नाशिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
ओळ ६२: ओळ ६२:
* [[सर्कल - विकास]] (अशोक स्तंभ)
* [[सर्कल - विकास]] (अशोक स्तंभ)
* मधुकर [मेन रोड]
* मधुकर [मेन रोड]
* adlabs (Trimuti Chauk)


==खरेदी==
==खरेदी==

२१:३४, १८ मार्च २००८ ची आवृत्ती

नाशिक
जिल्हा नाशिक
राज्य महाराष्ट्र
लोकसंख्या १४,७८,३६०
२००५
दूरध्वनी संकेतांक ०२५३
टपाल संकेतांक ४२२ ---
वाहन संकेतांक MH-१५
निर्वाचित प्रमुख विनायक पांडे
(महापौर)
संकेतस्थळ एनआयसी संकेतस्थळ


नाशिक (Nashik.ogg pronunciation ) अथवा नासिक महाराष्ट्राच्या उत्तर भागातील शहर आहे. सह्याद्रीच्या पठारावर वसलेले नाशिकची लोकसंख्या अंदाजे १४,००,००० आहे. हे शहर नाशिक जिल्ह्याचेनाशिक तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. येथे मुख्यत्त्वे मराठी भाषा वापरली जाते. गोदावरी नदीच्या काठावरील हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष व कांद्याचे प्रचंड उप्तादन होते. त्याच प्रमाणे वाईन (वारूणी) साठीही नाशिक प्रसिद्ध होत आहे. जगातले सर्वात मोठे मातीचे गंगापूर धरण नाशिक येथेच आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (य.च.म.मु.वि.)नाशिक येथे आहे.

येथे मराठी ही मुख्य भाषा आहे, हिंदीइंग्लिश पण प्रचलित आहेत.

नाशिक हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे. सिमेंस, महिंद्र आणी महिंद्र, मायको (Bosch), VIP, क्रॉम्पटन ग्रीव्हज, ग्लॅक्सो, ग्राफीक इंडीया, लार्सन टुब्रो(L&T), ABB, सॅमसोनाइट, सिएट आणि हिंदुस्थान एरोनोटिकस(HAL) सारखे अनेक मोठे कारखाने येथे आहेत. नाशिकला एकलहरे येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे. तसेच नाशिक रोड येथे नोटांचा छापखाना आहे.(इंडियन सिक्युरिटी प्रेस) मुंबई नाशिक मुंबई महामार्गावर सिडको हा नाशिकचा नवीन भाग वसला आहे. हा बस सेवेने जोडलेला आहे.

[महात्मा गांधी मार्ग नाशिक]


संस्कृती

ऐतिहासिक काळापासुन नाशिक धार्मिक स्थळ मानले जाते. रामायणात, नाशिक येथे राम वास्तव्यास होता असे उल्लेख आहे. मोगल साम्राज्याच्या काळात नाशिक गुलाबांचे शहर म्हणून हे गुलशनाबाद नावाने ज्ञात होते. सिंहस्थ कुंभमेळ्याचे नाशिक हे भारतामधील चार धामांपैकी एक शहर आहे. दर १२ वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो. येथील मंदीरे व गोदावरी नदीवरील घाट प्रसिंद्ध आहेत. सन सुमारे १२०० च्या दरम्यान खोदलेली पांडवलेणी आहेत. आनंदीबाई पेशवे या येथे राहण्यास होत्या. त्यांच्या नावाने आनंदवली हे ठिकाणही आहे. येथे त्यांची गढीही आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथील सुप्रसिद्ध काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा यासाठी सत्याग्रह केला होता. स्वातंत्र्य लढ्यात जॅक्सनचा वध दामोदर रंगमंदिरात नाशिक येथेच करण्यात आला होता.

जुन्या नाशकातील तालिमी व्यायामासाठी प्रसिद्ध आहेत.

नाशिकच्या आसपासही बघण्यासारखे बरेच काही आहे. त्र्यंबकेश्वर जवळ नाणी संशोधन केंद्र हे भेट देण्यासारखे आहे. तसेच सिन्नर येथे गारगोटी हे स्फटिकांचे प्रदर्शनही पाहण्यासारखे आहे.

धार्मिक प्रेक्षणीय स्थळे

मनोरंजन

नाट्यगृह

चित्रपट गृह

  • फेम सिनेमा, पुणे-नाशिक रोड, नाशिक
  • हेमलता (रविवार पेठ)
  • सिनेमॅक्स, कॉलेजरोड
  • दामोदर
  • सर्कल - विकास (अशोक स्तंभ)
  • मधुकर [मेन रोड]
  • adlabs (Trimuti Chauk)

खरेदी

  • मेन रोड हा जुन्या शहराचा मुख्य बाजार आहे.
  • कॉलेज रोड हा नव्या शहराचा बाजार होत आहे.
  • बिग बाझार College road-
  • नाशिक जिल्ह्यातील येवला येथील पैठणी प्रसिध्द आहे.
  • चांदीच्या दागिन्यांसाठीही प्रसिद्ध आहे

परिवहन

अधिक माहीतीसाठी पाहा नाशिकचे सार्वजनिक परिवहन

राहण्याच्या सोयी

  • हॉटेल ताज
  • साई पॅलेस
  • पंचवटी यात्री हॉटेल
  • हॉटेल द्वारका
  • हॉटेल नटराज

बस स्थानक

  • मध्यवर्ती बस स्थानक
  • महामार्ग बस स्थानक
  • ठक्कर बाजार बस स्थानक
  • नासिक रोड बस स्थानक
  • मेळा बस स्थानक

हवामान

पावसाळ्या व्यतरीक्त नाशिकचे हवामान कोरडे असते. वर्षाचे चार ऋतु असतात. हिवाळा (डिसेंबर ते फेब्रुवारी), उन्हाळा (मार्च ते मे), पावसाळा (जुन ते सप्टेंबर) आणी हेमंत (ऑक्टोबर व नोव्हेंबर).

कमाल तापमान ४६.७°C मे २३, १९१६ रोजी नोंद्ले गेले.

न्यूनतम तापमान ०.६°C जानेवारी ७, १९४५ रोजी नोंद्ले गेले.

नाशिकमध्ये सरासरी ७०० मी.मी. पाऊस पडतो.

हवामान [१]

स्वाद

  • नाशिकचा कोंडाजी चिवडा सुप्रसिद्ध आहे.
  • जुन्या नाशकात बुधा हलवाई यांची मिठाई-जिलेबी, पेढा व श्रीखंड चवी साठी प्रसिद्ध आहे.
  • येथील द्राक्षे व खुरचंद वडी प्रसिद्ध आहे.

शिक्षण संस्था

शाळा

  • पेठे विद्यालय (१९२४)
  • रचना विद्यालय
  • रुंगठा विद्यालय
  • नवरचना विद्यालय
  • भोसला मिलीटरी स्कुल
  • रंगुबाई जुन्नरे इंग्लिश मिडिअम शाळा
  • फ़्रावशि अकादमि, त्रिंबक रस्ता
  • किलबिल सेंट जोसेफ'स हाय स्कुल
  • पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल

महाविद्यालये

  • के. टी. एच. एम. महाविद्यालय
  • आर. वाय. के. महाविद्यालय
  • एच. पी. टी. कला महाविद्यालय
  • बी. वाय. के. कॉलेज भिकुसा यमासा क्षत्रिय वाणिज्य महाविद्यालय
  • क. का. वाघ अभियांत्रीकी महाविद्यालय
  • क. का. वाघ पॉलीटेक्नीक
  • सिंबायोसिस इंस्टीट्युट ऑफ ऑपरेशन्स मॅनेजमेंट
  • शासकीय तंत्रनिकेतन नाशिक
  • हिरे दंत महाविद्यालय
  • भुजबळ नॉलेज सिटी

प्रसिद्ध व्यक्ती

अन्य माहिती

बाहेरील पाने

नासिक गॅझेटीयर