"पाव (खाद्यपदार्थ)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो शुद्धलेखन — पररूप संधी - इक प्रत्यय (अधिक माहिती)
 
ओळ ३: ओळ ३:


पाव हा [[पीठ]] भिजवून त्याची [[कणीक|कणिक]] मळून त्या कणकेच्या उंड्याला भाजून बनवलेला एक खाद्यप्रकार आहे. पाव फुगण्यासाठी [[यीस्ट]] वापरले जाते. हा खाद्यप्रकार जगातील बहुतेक संस्कृतींमध्ये आढळून येतो. [[चित्र:Various grains.jpg|thumb|right|पाव]]
पाव हा [[पीठ]] भिजवून त्याची [[कणीक|कणिक]] मळून त्या कणकेच्या उंड्याला भाजून बनवलेला एक खाद्यप्रकार आहे. पाव फुगण्यासाठी [[यीस्ट]] वापरले जाते. हा खाद्यप्रकार जगातील बहुतेक संस्कृतींमध्ये आढळून येतो. [[चित्र:Various grains.jpg|thumb|right|पाव]]
व्यावसायीक रितीने पाव बनवून विकण्याच्या व्यवसायाला इंग्रजी मध्ये बेकरी असे म्हणतात.
व्यावसायिक रितीने पाव बनवून विकण्याच्या व्यवसायाला इंग्रजी मध्ये बेकरी असे म्हणतात.
[[चित्र:Bulka mala pszenna.jpg|thumb|right|पाव]]
[[चित्र:Bulka mala pszenna.jpg|thumb|right|पाव]]



१६:४०, २६ मे २०२२ ची नवीनतम आवृत्ती

हा लेख पाव या खाद्यपदार्थाबद्दल आहे. (खाद्य पदार्थ या दृष्टीने या नामातील चा उच्चार दंतोष्ठ्य म्हणजे वरचे दात खालच्या ओठांना टेकवून होतो. पाव हा शब्द क्रियापद या अर्थाने देखील येतो या पाव क्रियापद शब्दातील उच्चार स्वर सदृश्य असून वस्तूतः तो व्यंजनिय नाही, तसेच दातांचा ओठास स्पर्शही होत नाही या दृष्टीने हा उच्चार मराठीतील वर्णचिन्ह नसलेला वेगळा स्वरच असल्याचे काही व्याकरणकार मानतात (संदर्भ मराठी व्याकरण-डॉ लीला गोविलकर).

पाव हा पीठ भिजवून त्याची कणिक मळून त्या कणकेच्या उंड्याला भाजून बनवलेला एक खाद्यप्रकार आहे. पाव फुगण्यासाठी यीस्ट वापरले जाते. हा खाद्यप्रकार जगातील बहुतेक संस्कृतींमध्ये आढळून येतो.

पाव

व्यावसायिक रितीने पाव बनवून विकण्याच्या व्यवसायाला इंग्रजी मध्ये बेकरी असे म्हणतात.

पाव

पावाचा इतिहास[संपादन]

लादीपाव

मुघल भारतामध्ये आल्यानंतर मैदा ही प्रचलनात येऊन “नान” सारखे पदार्थ पसंत केले जाऊ लागले. पण पोर्तुगीज भारतात आले तेच मुळी अश्या प्रांतात, जिथे भात जास्त होत असे. त्यामुळे पोर्तुगीज खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग असलेला “पाव” त्यांना मिळणे दुरापास्त होऊन गेले.गव्हाचे पीठ जरी भारतामध्ये उपलब्ध असले तरी ते भिजवून फुगाविण्याकरिता लागणारे यीस्ट/खमीर भारतामध्ये कुठेही मिळत नसे. तेव्हा पोर्तुगीझांनी एक युक्ती शोधून काढली. गव्हाचे पीठ फुगाविण्यासाठी त्यांनी यीस्ट ऐवजी ताडी वापरली आणि पाव तयार केला.कालांतराने हा पाव भारतीयांनी देखील स्वीकारला. व आज आपण पावभाजी, वडापाव, मिसळपाव सारख्या पदार्थांच्या दैनंदिन जीवनातही आनंद घेतो. पुढे इंग्रजी स्टाइल चौकोनी ब्रेड पासूनही वेगवेगळी बटर आणि ब्रेड, वेगवेगळे सॅन्डविच,रोल्स, टोस्ट इ. प्रकार आपल्या जिभेवर उतरले‌.

रासायनीक प्रक्रिया[संपादन]

विशिष्ट प्रकारची कणीक,मीठ,पाणी आणि यीस्ट चा उपयोग करून आंबवून ब्रेड किंवा पाव तयार केला जातो.

विविध देशातीला पावाचे प्रकार व नावे[संपादन]

  • उत्तर भारतीय हिंदी भाषा भाषेत - पराठा, रोटी, चपाती
  • स्पेन - पान
  • ज्यु - चल्लाह
  • चेकोस्लोव्हाकिया - फ्लॅट ब्रेड,स्वीट ब्रेड,लोफ,बनपाव असे पावाचे कित्येक वेगवेगळे प्रकार आहेत. मात्र सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे चेकोस्लोव्हाकिया देशातील. तेथे पावापासून एक उभट आकाराचा सुबक असा ब्रेडचा वाडगा(बोल)बनविला जातो व त्याचा एखाद्या भांड्याप्रमाणे उपयोग करून त्यात गार्लिक सूप,ओनिअन सूप नॉनव्हेज सूप वाढले जाते. त्याला झाकणही पावाचेच असते. गरम गरम सूप पिताना आतील खुसखुशीत ओलसर पावही खाता येतो. बऱ्याच काळापासून ही पद्धत युरोपातही पसरली आहे.

बाह्य दुवे[संपादन]