"राजेंद्र प्रसाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो शुद्धलेखन, replaced: कॉंग्रेस → काँग्रेस (10) using AWB
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
ओळ २४: ओळ २४:
| पुरस्कार = [[भारतरत्न]]
| पुरस्कार = [[भारतरत्न]]
|}}
|}}
'''डॉ. राजेंद्रप्रसाद सहाय''' (जन्म : ३ डिसेंबर १८८४; मृत्यू : २८ फेब्रुवारी १९६३) हे स्वतंत्र [[भारत|भारताचे]] पहिले [[राष्ट्रपती]] होते. त्यांनी सन १९५० ते १९६२ या काळात भारताच्या राष्ट्रपतीचे पद भूषविले.
'''डॉ. राजेंद्रप्रसाद सहाय''' (जन्म : ३ डिसेंबर १८८४; - २८ फेब्रुवारी १९६३) हे स्वतंत्र [[भारत|भारताचे]] पहिले [[राष्ट्रपती]] होते. त्यांनी सन १९५० ते १९६२ या काळात भारताच्या राष्ट्रपतीचे पद भूषविले.
व्यवसायाने [[वकील]] असलेले डॉ. राजेंद्रप्रसाद, [[भारताचा स्वातंत्र्यलढा|भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान]] [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस पक्षात]] सामील झाले व [[बिहार]]मधील एक प्रमुख राजकीय नेते बनले. [[महात्मा गांधी|महात्मा गांधींचे]] समर्थक असलेल्या राजेंद्रप्रसाद ह्यांना ब्रिटिश सरकारने १९३१ मधील [[मिठाचा सत्याग्रह]] व १९४२ मधील [[भारत छोडो आंदोलन|भारत छोडो आंदोलनादरम्यान]] तुरुंगात डांबले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारताने नवीन [[भारताचे संविधान|संविधानाचा]] स्वीकार केला व राजेंद्रप्रसादांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड केली गेली. ह्या पदावर ते १२ वर्षे राहिले.<ref>{{स्रोत बातमी|title=डॉ. राजेंद्रप्रसाद घेत निम्मेच वेतन|दुवा=http://www.lokmat.com/national/dr-rajendra-prasad-taking-half-salary/|ॲक्सेसदिनांक=७ ऑगस्ट २०१८|प्रकाशक=लोकमत|दिनांक=९ जानेवारी २०१७}}</ref>
व्यवसायाने [[वकील]] असलेले डॉ. राजेंद्रप्रसाद, [[भारताचा स्वातंत्र्यलढा|भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान]] [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस पक्षात]] सामील झाले व [[बिहार]]मधील एक प्रमुख राजकीय नेते बनले. [[महात्मा गांधी|महात्मा गांधींचे]] समर्थक असलेल्या राजेंद्रप्रसाद ह्यांना ब्रिटिश सरकारने १९३१ मधील [[मिठाचा सत्याग्रह]] व १९४२ मधील [[भारत छोडो आंदोलन|भारत छोडो आंदोलनादरम्यान]] तुरुंगात डांबले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारताने नवीन [[भारताचे संविधान|संविधानाचा]] स्वीकार केला व राजेंद्रप्रसादांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड केली गेली. ह्या पदावर ते १२ वर्षे राहिले.<ref>{{स्रोत बातमी|title=डॉ. राजेंद्रप्रसाद घेत निम्मेच वेतन|दुवा=http://www.lokmat.com/national/dr-rajendra-prasad-taking-half-salary/|ॲक्सेसदिनांक=७ ऑगस्ट २०१८|प्रकाशक=लोकमत|दिनांक=९ जानेवारी २०१७}}</ref>



०१:३४, २८ ऑगस्ट २०२१ ची आवृत्ती

डॉ. राजेंद्रप्रसाद

कार्यकाळ
जानेवारी २६, इ.स. १९५० – मे १३ इ.स. १९६२[१]
पंतप्रधान जवाहरलाल नेहरू
उपराष्ट्रपती सर्वेपल्ली राधाकृष्णन (१९५२-१९६२)
मागील पदनिर्मिती
पुढील सर्वपल्ली राधाकृष्णन

जन्म डिसेंबर ३, इ.स. १८८४
जेरादेई, बंगाल प्रांत, ब्रिटिश भारत (आजचा बिहार)
मृत्यू फेब्रुवारी २८, इ.स. १९६३
पाटणा
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी राजवंशी देवी
व्यवसाय वकिली
धर्म हिंदू
पुरस्कार भारतरत्न

डॉ. राजेंद्रप्रसाद सहाय (जन्म : ३ डिसेंबर १८८४; - २८ फेब्रुवारी १९६३) हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते. त्यांनी सन १९५० ते १९६२ या काळात भारताच्या राष्ट्रपतीचे पद भूषविले. व्यवसायाने वकील असलेले डॉ. राजेंद्रप्रसाद, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान काँग्रेस पक्षात सामील झाले व बिहारमधील एक प्रमुख राजकीय नेते बनले. महात्मा गांधींचे समर्थक असलेल्या राजेंद्रप्रसाद ह्यांना ब्रिटिश सरकारने १९३१ मधील मिठाचा सत्याग्रह व १९४२ मधील भारत छोडो आंदोलनादरम्यान तुरुंगात डांबले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारताने नवीन संविधानाचा स्वीकार केला व राजेंद्रप्रसादांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड केली गेली. ह्या पदावर ते १२ वर्षे राहिले.[२]

जन्म

डॉ. प्रसादांचा जन्म ब्रिटिश भारतातील बंगाल प्रांतात (आजचा बिहार) जेरादेई येथे झाला. त्यांचे वडील महादेव हे एक कायस्थ हिंदू होते. ते संस्कृत आणि पर्शियन भाषेचे विद्वान होते. डॉ. प्रसादांची आई कमलेश्वरी देवी धार्मिक स्त्री होती. त्यांनी बालपणी डॉ. प्रसादांना रामायणातील गोष्टी सांगून धार्मिक संस्कार केले.

शैक्षणिक काळ

प्रसाद पाच वर्षांचे असतांना त्यांच्या पालकांनी त्यांना एक मौलवींच्या हाताखाली पर्शियन भाषा, हिंदी आणि अंकगणित शिकण्यासाठी ठेवले. पारंपरिक प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना छपरा जिल्हा शाळेत पाठविण्यात आले. दरम्यान, १८९६ मध्ये वयाच्या १२व्या वर्षी त्यांचा राजवंशी देवीशी विवाह झाला. तत्पश्चात ते त्यांचे थोरले बंधू महेंद्र प्रसाद यांच्याबरोबर टी.के. घोष यांच्या अकादमीत दोन वर्षे शिकले. ते कलकत्ता युनिव्हर्सिटीच्या प्रवेश परीक्षेत प्रथम आले आणि त्यांना महिना ३० रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली.

डॉ. प्रसादांनी सन १९०२ मध्ये कलकत्ता प्रेसीडेंसी कॉलेजात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आणि मार्च १९०५ मध्ये प्रथम श्रेणीत स्नातक पारिखस उत्तीर्ण झाले. त्यानंतर ते कला क्षेत्राकडे वळले आणि डिसेंबर १९०७ मध्ये त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून प्रथम श्रेणीत अर्थशास्त्रात एम. ए. पूर्ण केले. ह्या कालावधीत ते एक समर्पित विद्यार्थी तसेच सक्रिय सार्वजनिक कार्यकर्ते होते. ते द डॉन सोसायटीचे सक्रिय सदस्य होते.आपल्या कुटुंब आणि शिक्षणाच्या बाबतीत त्यांच्या कर्तव्याच्या कारणामुळेच त्यांनी सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटीत सामील होण्यास नकार दिला. १९०६ मध्ये पटना महाविद्यालयाच्या सभागृहात बिहारमधील बिहारी स्टुडंट्स कॉन्फरन्सच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. भारतातील आपल्या प्रकारची ही पहिली संस्था होती. बिहारमधील अनुग्रह नारायण सिन्हा व कृष्णसिंह यासारखे बिहारच्या प्रमुख नेत्यांनी आपली कारकीर्द याच संस्थेतून सुरु केली.

कारकीर्द

शिक्षक

राजेंद्र प्रसाद यांनी विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक म्हणून काम केले. अर्थशास्त्रात एम.ए. पूर्ण केल्यानंतर ते बिहारमधील लंगत सिंग कॉलेज ऑफ मुजफ्फरपूर येथे इंग्रजीचे प्राध्यापक झाले आणि पुढे जाऊन ते प्राचार्य बनले. तथापि, पुढे त्यांनी आपल्या कायद्याच्या अभ्यासासाठी महाविद्यालय सोडले आणि रिपन कॉलेज, कलकत्ता (सध्याचे सुरेंद्रनाथ लॉ कॉलेज) मध्ये प्रवेश घेतला. १९०९ मध्ये कोलकाता येथे त्यांचे कायद्याचे शिक्षण घेत असताना त्यांनी कलकत्ता सिटी कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणूनही काम केले. १९१५ साली, प्रसाद मास्टर्स इन लॉच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आणि त्यांनी सुवर्ण पदक जिंकले. १९३७ मध्ये त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून कायद्याच्या क्षेत्रात डॉक्टरेट मिळवली.

वकील

१९१६ साली ते बिहार आणि ओडिशाच्या उच्च न्यायालयात दाखल झाले. नंतर १९१७ मध्ये सिनेट ॲंड सिंडीकेट ऑफ पटणा युनिव्हर्सिटीचे प्रथम सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली. बिहारमधील रेशीमसाठी प्रसिद्ध असलेल्या भागलपूर येथेही त्यांनी वकिली केली.

स्वातंत्र्य चळवळीतील कार्य

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी प्रसाद यांचा पहिला संपर्क १९०६ मध्ये कोलकाता येथे आयोजित एका वार्षिक सत्रात होता, जेथे कलकत्ता येथे शिकत असताना त्यांनी स्वयंसेवक म्हणून सहभाग घेतला. १९११ मध्ये जेव्हा कोलकाता येथे वार्षिक अधिवेशन पुन्हा आयोजित केले गेले तेव्हा त्यांनी औपचारिकरीत्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९१६ साली आयोजित भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लखनौ सत्रादरम्यान ते महात्मा गांधी यांना भेटले. चंपारण येथील एका शोधनिबंध कार्यादरम्यान, महात्मा गांधींनी प्रसाद यांना आपल्या स्वयंसेवकांसोबत येण्यास सांगितले. प्रसाद गांधीजींचे समर्पण, धैर्य व दृढ विश्वास बघून एवढे भारावून गेले की त्यांनी १९२० मधील काँग्रेसची असहकार चळवळ जाहीर झाल्याबरोबर आपल्या वकिली कारकीर्दीला रामराम ठोकला व त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात स्वतःला झोकून दिले.

गांधीजींच्या पाश्चात्य शैक्षणिक संस्थांवर बहिष्काराच्या आव्हानाला सक्रिय पाठिंबा दिला. त्यांनी आपला मुलगा मृत्युंजय प्रसाद याला इंग्रजी विद्यापीठातून काढून बिहार विद्यापीठात प्रवेश घेण्यास सांगितला.

१९१४ मध्ये बिहार आणि बंगालमध्ये आलेल्या पूरांमुळे प्रभावित लोकांना मदत करण्यासाठी त्यांनी सक्रिय भूमिका घेतली. जेव्हा १५ जानेवारी १९३४ ला बिहारमध्ये भीषण भूकंप झाला तेव्हा प्रसाद तुरूंगात होते. त्या काळात त्यांनी त्यांचे जवळचे सहकारी अनुग्रह नारायण सिन्हा यांना मदतकार्यासाठी पाठवले. दोन दिवसांनी म्हणजेच १७ जानेवारीला त्यांची सुटका करण्यात आली. सुटल्यानंतर त्यांनी लगेच बिहार केंद्रीय मदत समितीची स्थापना केली आणि स्वतः मदत निधी गोळा करण्याचे काम उचलले. ३१ मे १९३५ क्वेट्टा भूकंपाच्या काळात, जेव्हा सरकारच्या आदेशामुळे त्यांना देश सोडून जाण्यास मनाई केली तेव्हा त्यांनी सिंध आणि पंजाबमध्ये त्यांच्या स्वतःच्या अध्यक्षतेखाली क्वेटा केंद्रीय मदत समिती स्थापन केली.

ऑक्टोबर १९३४ च्या मुंबई अधिवेशनात ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडले गेले. १९३९ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा ते पुन्हा अध्यक्ष झाले. ८ ऑगस्ट १९४२ रोजी काँग्रेसने मुंबईत भारत सोडून जाण्याचा ठराव पारित केला. त्यांना सादकत आश्रम, पाटणा येथून अटक करण्यात आली आणि बांकिपुर सेंट्रल जेलमध्ये पाठविण्यात आले. जवळपास तीन वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर १५ जून १९४५ रोजी त्यांची सुटका करण्यात आली.

२ सप्टेंबर १९४६ रोजी जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखालील काळजीवाहू सरकारच्या १२ नामांकित मंत्र्यात त्यांना अन्न व कृषी विभाग मिळाले. नंतर ११ डिसेंबर १९४६ रोजी ते भारतीय संविधान समितीचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. १७ नोव्हेंबर १९४७ रोजी जे. बी. कृपलानी यांनी राजीनामा सादर केल्यानंतर ते तिसऱ्यांदा काँग्रेसचे अध्यक्ष झाले.

राजेंद्र प्रसादांवरील मराठी पुस्तके

  • डॉ. राजेंद्र प्रसाद (संध्या शिरवाडकर)
  • राजेंद्र प्रसाद यांच्या जीवनाचें ओझरते दर्शन (रा.प्र. कानिटकर).

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "भारत के पूर्व राष्ट्रपति" (हिंदी भाषेत). २६ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले.
  2. ^ "डॉ. राजेंद्रप्रसाद घेत निम्मेच वेतन". ७ ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

मागील:
भारतीय गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी
भारताचे राष्ट्रपती
जानेवारी २६, इ.स. १९५०मे १३, इ.स. १९६२
पुढील:
सर्वेपल्ली राधाकृष्णन